मसाला उद्योग माहिती मराठी (Masala Business Information in Marathi), आपल्या भारतात आणि जगात कोणताही कार्यक्रम असल्यास जेवण बनवण्यासाठी मसाल्यांची गरज पडत असते. तसेच सण, पार्टी, लग्न, कार्यक्रम, वर्धापनदिन इत्यादी कोणत्याही समारंभात पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली जाते. यामुळे हे सर्व लोक बाजारातून विविध प्रकारचे मसाले मिळवतात किंवा घाऊक विक्रेत्याशी संपर्क साधून पदार्थ आणखी रुचकर बनवतात.
जर तुम्हा सर्वांना मसाल्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा लेख तुमच्या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण आगामी काळात मसाल्यांचा वापर आणखीनच वाढणार आहे आणि हे पाहता मसाल्यांचा व्यवसायही तुम्हा सर्वांसाठी खूप चांगला व्यवसाय ठरू शकतो.
मसाला उद्योग माहिती मराठी ( Masala Business Information in Marathi)
मसाला शब्ध एकताच आपल्या तोंडाला पानी सुटू लागते, आणि आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या मसाल्याची आठवण येत असती, मग त्यामध्ये कोथिंबीर, हळद, मिरची, वेलची किवा इतर मसाले असोत. ह्या विविध प्रकारचे मसाले वापरल्याने आपल्या भाज्यांना अप्रतिम चव येते.
मसाला उद्योग तुम्ही एकाच मशीनच्या सहाय्याने अनेक प्रकारचे मसाले बनवून आपला व्यवसाय सुरू करू शकता. सर्व प्रकारचे मसाले हे विविध भांज्यांसाठी लागत लागत असतात, त्यामुळे त्यांची मागणी ही कुप मोठ्या प्रमाणात आणि प्राचीन काळापासून जगभर उपलब्ध आहे.
मसाले बारीक करून डब्यामध्ये किवा पॅकेट मध्ये पॅक केल्यास ते खराब होत नाहीत. आज महिला अश्या मसाल्यांना प्राध्यान देत असतात.
1. कच्चा माल (Raw Material)
मसाला उद्योग माहिती मराठी (Masala Business Information in Marathi) या लेखाअंतर्गत मसाले बनवण्यासाठी आपल्याला हळद, मिरची, धणे, जिरे, वेलची, आले, बडीशेप, मेथी, सेलेरी, लवंग, एत्यादींची गरज लागते. हा कच्चा माल आपल्याला जवळच्या मार्केटमध्ये मिळण्यास काहीच अडचण येत नाही.
हा माल जास्त दिवस राहत नसल्याने आपण तो लागेल तेवढा विकत घेऊ शकतो किवा विकत घेतलेला मालडब्या मध्ये पॅकिंग करू शकतो. आज ह्याचा बाजार भावाचा विचार केल्यास आपल्या शहरानुसार 10 ते 20 रुपये कमी जास्त असू शकतो.
आज मार्केट मध्ये आपल्याला हळद ही 120 ते 130 रुपये प्रती किलो भाव आहे. काळी मिरची 500 ते 550 रुपये किलो, सुखलेली मिरची 120 ते 140 रुपये किलो, धने 140 ते 160 रुपये किलो ह्या भावाने भेटतात.
2. आवश्यक मशिनरी आणि उपकरणे (Masala Making Machine)
मासला व्यवसाय सुरू करण्यासाठी आल्याला विविध प्रकारच्या मशनिरीची गरज लागते, त्या मशानिरी कोणत्या आहेत त्याची आपण माहिती करून घेऊयात.
- क्लीनर मशीन: क्लीनर मशीन चे काम आपल्या कच्च्या मालामध्ये दगड, माती, खडे, धुळ, एत्यादी काढून टाकण्याचे काम करते.
- ड्रायर मशीन: कच्च्या मालामध्ये असलेली आर्द्रता सुकविण्यासाठी ड्रायर मशीन हे यंत्र वापरले जाते.
- ग्राइंडर मशीन: ग्राइंडर मशीन ही मुख्य मशीन आहे जी मसाले दळण्याचे काम करते.
- पॉवर ग्रेडर मशीन: आपले मसाले फिल्टर करण्यासाठी पॉवर ग्रेडर मशीन वापरली जाते. त्यामुळे बारीक मसाले तळाशी राहतात आणि वरती खरखरीत मसाले राहतात.
- पाउच पॅकिंग मशीन: मसाले पॅकिंग करण्यासाठी ह्याची गरज लागते.
3. मसाले उद्योग नोंदणी (Masala Udyog Registration)
मसाले हे खाण्यासाठी वापरले जातात त्यामुळे आपल्याला प्रथम FSSAI: Food Safety and Standards Authority of India (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) फूड लाइसेंस घ्यावे लागते. त्याच बरोबर MSME उद्योग आधारमध्ये नोंदणी करावी लागते.
यासह, तुम्हाला व्यापार परवाना आणि बीआयएस प्रमाणपत्रानुसार परवाना घ्यावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या फर्मच्या नावावर बँकेत चालू खाते आणि पॅन कार्ड बनवावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता.
हे ही वाचा
- मशरूम शेती कशी करावी | मशरूम शेती प्रशिक्षण पुणे | Mushroom Farming in Marathi
- गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती | Mud Crab Farming Business in Marathi
- Contract Farming in Marathi | कंत्राटी शेती
4. घरगुती मसाले बनवण्याची प्रक्रिया (Homemade Spice Making Process)
आपल्या घरामध्ये असे मसाले वापरले जातात की ते मशीन मध्ये पिसलेले असतात. मशीन ने बनवलेल्या मसाल्यापेक्षा हाताने बनवलेल्या मसाल्यांना विकत घेण्यास लोक प्राध्यान देतात. कारण की हाताने बनवलेल्या मसाल्याची भाजी ही खूपच स्वादिष्ट असते, आणि हाताने बनवलेले मसाले हे अधिक पौष्टिक असतात. तर ह्या मसाल्याची बनवण्याची प्रक्रिया थोडक्यात जाणून घेणार आहोत.
- पहिल्यांदा मार्केट मधून कच्चा माल विकत घ्यावा लागेल, जो मसाला आपल्याला बनवायचा आहे गरजेनुसार, नंतर उन्हामध्ये चांगल्या रीतीने सुखू दिले पाहिजेत.
- चांगल्या रीतीने सुखल्यानंतर त्यामधील रेव-दगड, धूळ, माती इ. बाहेर काढावी लागेल.
- यानंतर, ते ओकच्या मदतीने बारीक चिरडले जाते.
- धूळ, माती, खडे, दगड इत्यादी काढून टाकल्यानंतर खडे मसाले मशीनच्या हॉपरमध्ये टाकावे लागतात, त्यानंतर मशीनला वीज जोडली जाते आणि मशीन आपोआप मसाले दळून घेते.
- मसाला बारीक केल्यानंतर तो चाळणीने चाळला जातो जेणेकरून जो मसाला पॅक करायला जातो तो पूर्णपणे शुद्ध आणि योग्य असेल, त्यानंतर मसाल्याचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग केल्यानंतर ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते.
5. मसाला उद्योग सुरू करण्यासाठी जागा
मसाला उद्योग सुरू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 200 ते 250 चौरस मीटर एतकी जागा लागते. त्यामध्ये खडे मसाले सुखवणे, त्याची पॅकिंग करणे, आपले रॉ मटेरियल ठेवणे, मशीन ची जागा याचा समावेश असतो.
मसाला उद्योग सुरू करण्यासाठी खर्च
हा व्यवसाय घरी बसल्या लहान मशीनच्या सहाय्याने सुरू करू शकतो. व त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च येत नाही. लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मशीन ही विकत घ्यावी लागत नाही, त्यामुळे तुम्ही ह्याची सुरवात 50 ते 60 हजार रुपये असल्यास सुरू करू शकता.
पण मोठ्या प्रमाणात मसाला उद्योग (मसाला उद्योग माहिती मराठी) सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या मशीन विकत घ्याव्या लागतात. ज्याचा खर्च जवळ जवळ 2.5 ते 3.0 लाख रुपये पर्यत्न आहे. त्यांनातर तुम्हाला कच्चा माल विकत घेण्यासाठी 1 लाख रुपये पर्यत्न खर्च येतो.
मसाला उद्योग मधून कमाई (Masala Business profit margin)
मसाला उद्योग आपण कमी पैसे खर्च करून सुरू करण्याचा विचार करत असाल तर ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने सुरू करू शकता. ह्याची कमाईचा विचार केल्यास हा आपण किती खर्च करतो यावरती अवलंबून आहे.
तुम्ही 70 ते 80 हजार रुपये खर्च करून मसाला उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर महिना 30 ते 40 हजार रुपये पर्यत्न कमवू शकता. आणि जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसे इन्वेस्ट करून मसाला उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर महिला 1 लाख रुपये पर्यत्न नफा मिळवू शकता.
मसाले कसे पॅक करावे?
मसाल्यांच्या पॅकिंगसाठी तुम्हाला आधी बाजारातून एक पाऊच घ्यावा लागेल.पाऊचसोबतच तुम्ही मसाले देखील बॉक्समध्ये पॅक करून विकू शकता, जर तुम्हाला तुमच्या ब्रँडच्या नावाने पावडर मसाले विकायचे असतील तर तुम्ही प्रिंटिंग प्रेसच्या दुकानात जाऊ शकता. तुम्ही त्यापासून बनवलेले स्टीकर घेऊ शकता आणि ते बॉक्सवर चिकटवू शकता, ज्यामुळे तुमची जाहिरात देखील होईल आणि हळूहळू तुमचा ब्रँड देखील प्रसिद्ध होईल.
घरगुती मसाल्यांचे मार्केटिंग
मित्रांनो, घरी बनवलेले मसाले तुम्ही सहज बाजारात आणू शकता, तुम्हाला हवे तसे ते घाऊक विक्रेत्याला विकू शकता किंवा किरकोळ किमतीत तुम्ही स्वतः विकू शकता. तुम्ही मसाल्याची छोटी पॅकेट बनवूनही ऑर्डर घेऊ शकता. बाजारात विक्री वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्राहकाला वेळोवेळी काही बक्षीस भेट म्हणून देऊ शकता, यामुळे तुमची स्पाइस बिझनेस आयडिया लवकर वाढेल.
मसाला उद्योग प्रशिक्षण
मसाला उद्योग यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी सरकार ध्वारे असे कोणतेही उपक्रम राबवले जात नाहीत, यासाठी आपण जिथे जवळ ह्याचा व्यवसाय सुरू आहे तिथे जाऊन प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी तुम्ही हाकी दिवस कामगार म्हणून देखील काम करून चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊ शकता आणि तुमचा नवीन मसाला उद्योग फायदेशीर पणे सुरू करू शकता.
मसाला उद्योग मशीन
मसाला उद्योग सुरू करण्याची मशीन ही आपण ऑनलाइन https://www.indiamart.com ह्या वेबसाइट वरुण ऑर्डर करू शकता. साधारणपणे ह्या मशीनची किमत 4 लाख रुपये पर्यत्न आहे.
कोणत्या राज्याला मसाल्याचे उद्यान म्हणून ओळखले जाते?
प्रामुख्याने केरळ हे राज्य मसाला उत्पादन करण्यास अग्रेसर आहे. त्यामुळे आपण केरळ ह्या राज्याला मसाल्याचे उद्यान असेही म्हणू शकतो.
मसाल्याच्या पदार्थासाठी कोणता देश जगप्रसिद्ध आहे?
मसाल्याच्या उत्पादनात भारताचा वाटा हा 75% आहे, व मसाल्याच्या पदार्थासाठी भारत हा जगप्रसिद्ध देश आहे.
हे ही वाचा