गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती | Mud Crab Farming Business in Marathi

गोड्या पाण्यातील खेकडा पालन (Mud Crab Farming Business in Marathi ), आज आपल्या देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये खेकड्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. आज आपल्या देशामध्ये खेकडा हा आवडीने खातात आणि तसेच त्याचा औषदासाठीही चांगल्या प्रमाणात याचा उपयोग केला जातो. आज मार्केटमध्ये पुरवठा पेक्षा मागणी जास्त आहे, कारण की याचे उत्पादन खूप कमी प्रमाणात होते व आजही लोक या व्यवसायाकडे जास्त करून लक्ष देत नाहीत.

आज आपल्या महाराष्टमध्ये जास्त प्रमाणात शेळी पालन, मासे पालन, पोल्ट्री व्यवसाय, दूध व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण हे व्यवसाय लोकप्रिय आहेत आणि आपल्याकडे जास्त प्रमाणात जे दुसरे लोक व्यवसाय करत आहेत तेच व्यवसाय करण्यास आपण लोक प्राध्यान्य देत आहोत.

आज आपण या लेखांतर्गत गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती डीटेल मध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला  खेकडा पालन हा व्यवसाय कशा प्रकारे करता येईल, याबद्धल डीटेल मध्ये माहिती बेटेल आणि आपल्याला हा व्यवसाय सुरू करण्यास मदत तोडी मदत मिळेल. 

गोड्या पाण्यातील खेकडा पालन

गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती (Mud Crab Farming Business in Marathi )

गोड्या पाण्यातील खेकडा पालन म्हणजे एखादा टॅंक बनवून त्यामध्ये खेकड्याची लहान पिल्ले सोडणे व त्यांना चारा देणे. ही पिल्ले मोठी मार्केट मध्ये विकणे. आपल्याला बाजारात विकण्यासाठी जवळ जवळ 1 वर्षाचा कालावधी लागतो. 

गोड्या पाण्यातील खेकडा पालनाच्या जातीबद्धल विचार करायचा झाल्यास दोन प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत. एक लहान जाती आणि दुसर्‍या मोठ्या जाती, अश्या दोन प्रकारच्या दोन जाती आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. लहान प्रजातींना “लाल पंजे ” म्हणून ओळखले जाते तर मोठ्या प्रजातींना ” ग्रीन मड क्रॅब्स ” म्हणून ओळखले जाते.

स्क्यल्ला जातीचे खेकडे ये नदी, नाले, समुद्र किनारी जिथे पाणी स्थिर आणि अस्वच्छ पाणी आहे त्या ठिकाणी आढळतात.  गोड्या पाण्यातील खेकडे पालन याला आपण मड खेकडे पालन असेही म्हणू शकतो.

खेकड्याचे प्रकार

खेकड्याचे दोन प्रकार उपलब्ध आहेत, एक लाल पंजा आणि दूसरा हिरव्या मातीचा खेकडा.

1. हिरव्या मातीचा खेकडा

हिरव्या मातीचा खेकड्याचा आकार हा मोठा आहे, ह्याची जास्तीत जास्त 22 सेंटिमिटर पर्यत्न वाढ होऊ शकते आणि याचे वजन 2 किलो पर्यत्न वाढू शकते. हा खेकडा मोकळ्या पाण्यामध्ये आढळतो. ह्याला मोकळ्या पाण्यात राहण्याची सवय असल्याने ह्याच्या अंगावर बहूभुज खुणा आढळतात. 

2. लाल पंजा 

लाल पंजा ह्याचा आकार हिरव्या मातीच्या खेकड्यापेक्षा लहान आहे, ह्याची जास्तीत जास्त 13 सेंटिमिटर पर्यत्न वाढ होऊ शकते आणि याचे वजन 1.2 किलो पर्यत्न वाढू शकते. ह्या खेकड्याला मातीमध्ये बजवून घेण्याची सवय असल्यामुळे त्याच्या अंगावर बहूभुज खुणा आढळतात.

आपल्याला व्यवसाय करण्यासाठी दोन्ही प्रकारच्या खेकड्याचे पालन आपण करू शकतो. तसेच ह्याचे मार्केटमध्ये ह्याचे डिमांड मोठ्या प्रमाणावर असल्याने ह्याला बाजारभाव ही चांगला मिळतो.

गोड्या पाण्यातील खेकडा पालन कसे सुरू करायचे? | How to Start Mud Crab farming Business 

सुरवातीला खेकडा पालन करण्यासाठी आपल्याला थोडी माहिती असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आपण ह्या व्यवसायास सुरवात सुरू करू शकतो.

1. खेकडा पालन व्यवसायाबद्धल माहिती मिळवणे. 

आपल्याला खेकडा आपल व्यवसाय किवा इतर कोणताही व्यवसाय सुरू करायचा असल्यास ह्याची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या जवळ कोठे हा व्यवसाय सुरू आहे तिथे जाऊन माहिती घ्यावी लागते.

खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला ह्यासाठी टॅंक कसा बनवायचा, खेकड्याचे बी किवा पिल्ले आपल्याला कोठे भेटतील, त्यांना खायला काय लागते, टॅंक मध्ये पानी कोणत्या प्रकारचे आणि कसले सोडावे, खेकडे मोठे झाल्यावर ह्यासाठी मार्केट कसे शोधावे हयाविषयी सर्व माहिती आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

2. खेकडा पालन करण्यासाठी जागेची निवड आणि टॅंकचे बांधकाम कसे करायचे?

आपली जागा ही मोकळी आणि हवेशीर असावी, तसेच जवळ पानी, लाइट ह्या सुविधा उपलब्ध असाव्यात जेणेकरून आपल्याला सुरवातीला भांडवल कमी लागेल.

जागेची निवड केल्यानंतर आपल्याला किती किलो पर्यत्न आणि किती खेकड्यांचे पालन करायचे आहे हे ठरवावे लागेल, त्यानुसार आपल्याला टॅंकचे निर्माण करावे लागते.

आपल्याला 2000 ते 2500 किलो पर्यत्न खेकडा पालन करण्यासाठी 25 *25 आणि 7′ उंचीहा टॅंक बनवावा लागेल. 

टॅंकचे बांधकाम करत असताना आपल्याला हा पूर्ण पणे आरआरसी मध्ये ह्याचे निर्माण करावे लागते कारण की खेकडे हे दगडामध्ये राहतात, व त्यामुळे खड्डा लिक होण्याची शक्यता जास्त आहे.

खेकडे बाहेर जाऊ नये म्हणून आपल्याला वरुण 2 ते 3 फूट उंचीची आतल्या बाजूने परशी बसवावी लागते.

टॅंकच्या आतमध्ये आपल्याला नैसर्गिक पद्धतीचे वातावरण निर्माण करावे लागते, त्यासाठी आपल्याला आतमध्ये वाळू, माती दगड, लहान झाडे, शेवाळ ह्याचे निर्माण 2 ते 3 फूट पर्यत्न करावे लागते.

टॅंकच्या आतमध्ये खेकड्यांना ऑक्सिजनसाठी देखील व्यवस्था करावी लागते.

टॅंकमध्ये पानी हे आपल्याला बोर किवा विहारीचे वापरणे गरजेचे आहे, तसेच आपण नगरपालिका पुरवठाचे वापरणे टाळावे कारण की ह्या पाण्यामध्ये पाऊडरचा वापर केलेला असतो त्यामुळे खेकडे मरण पावतात तर ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

3. खेकड्यांची पिल्ले कोठून विकत घ्यावी. 

खेकड्यांची पिल्ले ही आपल्याला जवळच्या मार्केट मधून विकत घ्यावी लागतात. आज आपल्याला मार्केट खेकड्यांची पिल्ले विकत घ्यायचं झाल्यास  200 पासून ते 500 रुपये किलो पर्यत्न भेटतात. आपल्याला ह्यांची पिल्ले विकत घेत असताना मादी प्रजातीची पिल्ले ज्यास्त प्रमाणात विकत घ्यावीत, कारण एक मादी साठरपणे 500 ते 1000 पिल्लांना जन्म देते.

खेकड्यांची पिल्ले विकत घेण्याबरोबरच आपण त्यांची मोठे खेकडे देखील विकत घ्यावेट, मोठी पिल्ले ही लहान पिल्लांना जन्म देतात आणि त्यामुळे त्यांची संख्या ही वाढेल आणि आपल्याला विक्रीसाठी लवकर पिल्ले देखील भेटतील.

हे ही वाचा 

4. खेकड्यांना चारा कोणता घालावा. 

खेकड्यांना आपण आठवड्यातून जास्तीत – जास्त दोनदा खायला घालू शकतो, त्यासाठी जे मासे विकतात त्यांचे वेस्ट किवा सुकत टाकू शकतो, त्यासाठी आपल्याला जास्त खर्च येत नाही.

5. खेकड्यांची विक्री 

लहान खेकड्यांची पिल्ले मोठी होण्यास आपल्याला एका वर्षाचा कालावधी लागतो, व त्यानंतर आपण त्यांची विक्री करू शकतो.

आज खेकड्यांची मागणी खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे आपण आपल्या लोकल मार्केट, हॉटेल किवा शहरामध्ये विक्रीसाठी पाठवू शकतो, आज मार्केट मध्ये 1000 रुपये किलो पर्यत्न खेकड्यांना दर आपल्याला मिळू शकतो.

खेकडा खाण्याचे फायदे

1.मधुमेह रुग्णासाठी लाभदायक:  खेकड्यामध्ये क्रोमियमचे प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी आढळते, त्यामुळे आपली साखर नियंत्रात राहते. मधुमेह रुग्णासाठी याचे सेवन केले जाते.

2. कॅन्सरचा धोका कमी होतो: खेकड्यांच्या शरीरमध्ये मिनरलचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडंटमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते.

3. हार्ड अटॅकचा डोका कमी होतो: खेकड्यांमध्ये ओमोनो 3 फ्याटी अॅसिड, नायसिन आणि क्रोमियमचे प्रमाण आढळते, त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल प्रमाण कमी होण्यास मदत होते.

4. रोगप्रतीकरकशक्ती वाढते: निरोगी आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी खेकड्याचे सेवन फायदेशीर आहे. सर्दी, खोकला, क्षातीमध्ये काफा झाल्या असेल तर याचा त्रास लगेच कमी होतो.

5. खेकड्याचे सेवन प्रोटीन मिळवण्यासाठी चांगले आहे.

6. खेकड्यामध्ये विटामीन बी12 चे प्रमाण आढळते त्यामुळे रक्तपेशींची निर्मिती वाढते.

7. खेकड्याचे सेवन केल्याने एनीमियाचा दोखा कमी होतो.

8. आपले वजन कमी करण्यास खेकडा फायदेशीर आहे.

9. गुडघे आणि सांधेदुखी याचा उपचारासाठी याचे सेवन केले जाते.

10. रक्तदाब नियंत्रित राहतो.

खेकडा पालन अनुदान योजना

खेकडा पालन करण्यासाठी वेगळे कोणतेही सरकारकडून आपल्याला अनुदान भेटत नाही, आपला नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण बँकेकडून लोन घेऊन ह्या गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसायची सुरवात करू शकतो.

ह्यासाठी आपण कोणत्याही नॅशनल बँकेकडून लोन घेऊ शकतो.

खेकडा काय खातो?

खेकड्यांना आपण आठवड्यातून जास्तीत – जास्त दोनदा खायला घालू शकतो, त्यासाठी जे मासे विकतात त्यांचे वेस्ट किवा सुकत टाकू शकतो, त्यासाठी आपल्याला जास्त खर्च येत नाही.

हे ही वाचा 

About The Author

9 thoughts on “गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय बद्धल माहिती | Mud Crab Farming Business in Marathi”

    1. संपुर्ण माहीती प्रशिक्षन व सेट अप करुन मिळेल

    2. आपलाच जवळचा

      आधी माणसं आणी नाती नीट सांभाळा…..
      मग प्राणी सांभाळा …अनिका गायकर मॅडम….😂😂🤣

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *