घरगुती व्यवसाय महिलांसाठी | Home Business For Woman

घरगुती व्यवसाय महिलांसाठी (Home Business For Woman), गेल्या काही दशकांत भारतातील महिला उद्योजकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आज, महिला जवळजवळ प्रत्येक उद्योग आणि क्षेत्रात प्रवेश करत आहेत. म्हणूनच, महिलांनी त्यांच्या कौशल्य आणि उत्कटतेच्या आधारावर उद्योजक म्हणून निवडण्यासाठी आणि त्या वाढविण्यासाठी आम्ही काही प्रमुख व्यवसाय कल्पना सादर केल्या आहेत.

नमस्कार, आज आपण या लेखामध्ये घरगुती व्यवसाय महिलांसाठी (Home Business For Woman) कोणते आहेत ह्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. महिलांसाठी खूप सारे व्यवसायीक विचार जे आपण या लेखामध्ये माहिती करून घेणार आहोत जे घरी बसून करता येतील. 

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

 

घरगुती व्यवसाय महिलांसाठी (Home Business For Woman)

1. बेकरी व्यवसाय (Bakery Business)

बेकरी व्यवसाय हा सगळ्यात जुना व्यवसाय आहे. कारण की हा व्यवसाय रोजच्या देंनंदिन गरजा पूर्ण करणारा आहे. जगातील इतर अनेक कॅटरिंग व्यवसायांमध्ये बेकरी व्यवसाय हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे.

जर तुम्ही एखाया घरगुती कार्यक्रमामध्ये स्वता: केक बनवत असाल तर घरी बसून केक बनवणे हा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. कारण या व्यवसायसाठी खर्च खूप कमी आहे व केकची मागणी जास्त प्रमाणात वाढत आहे. आज तुम्हाला माहीत असेल की वाढदिवसासाठी केकची मागणी खूप प्रमाणात वाढत आहे. महिला घरामध्ये बसून केक बनवू शकतात, यासाठी तुम्हाला दुकान उघण्याची गरज नाही.

बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज पडत नाही. पण गरजे एवढे भांडवल या व्यवसायसाठी लागते. आज आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन लेगेच भेटते. महिला याचा फायदा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात.

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

2. लेखन करणे (Content Writing)

तुम्हाला जर चांगले लिहता येत असेल तर तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता, कारण की आज चांगले लिहणारे लोक खूप कमी आहेत. तुम्ही हा व्यवसाय कोठेही बसून करू शकता व महिलांसाठी रिकाम्या वेळेमध्ये चांगला व्यवसाय आहे. 

आज ब्लॉगर, वेबसाइट क्रेयटर हे चांगले लेखन करणारे लोक शोधत आहेत. ई कॉमर्स वेबसाइट मध्ये वाढ झाल्याने आज लेखकांची मागणी वाढत आहे.

या व्यवसायचे फायदे 

 • तुमच्याकडे संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही हा व्यवसाय कुठूनही करू शकता. 
 •  तुम्हाला टाइम भेटल तेव्हा तुम्ही हा व्यवसाय करू शकता. 
 • लेख लिहणे, कॉपीराइटिंग आणि बरेच काही यासह विविध प्रकारचे लिखाण उपलब्ध आहे.
 • कव्हर करण्यासाठी विविध प्रकारचे विषय, याचा अर्थ असा की आपण कंटाळवाणे टाळू शकता.
 • कमी खर्चामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता, तुम्हाला एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शनची गरज लागते.

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

 

3. ब्लॉगिंग (Blogging)

वरती आपण लेखन करणे या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेतली, व घरी किवा कोठेही बसून आपण हा व्यवसाय करू शकतो. जर तुम्हाला लेखन करणे आवडत असेल तर तुम्ही स्वताचा ब्लॉग बनवू शकता व सोयीस्कर नुसार आर्टिकल लिहून तुम्ही तुमच्या वेबसाइट वर पोस्ट करू शकता. हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे.

तुमच्या मनामध्ये एक विचार आला असेल की वेबसाइट बनवण्यासाठी आपल्याला कोडिंगची माहिती नाही किवा वेबसाइट बनवण्यासाठी  डेवलपरला पैसे ध्यावे लागतील. पण तुम्ही बिना कोडिंगची फ्री मध्ये वेबसाइट बनवू शकता, जर तुम्ही थोडे पैसे डोमिन आणि होस्टिंगसाठी खर्च केले तर चांगला पर्याय आहे किवा ब्लॉगर मध्ये तुम्ही फ्री मध्ये वेबसाइट बनवू शकता.

तसेच ऑनलाइन ब्लॉगिंग करून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय सुरू करू शकता, तुम्ही ऑनलाइन आमझोन किवा ईटर ए कॉमर्स वेबसाइट वरील प्रॉडक्टची माहिती तुमच्या ब्लॉग ध्वारे लोकांना देऊन एफिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय सुरू करू शकता.

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

4. डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

डिजिटल मार्केटिंग म्हणजे ही एक सर्विस किवा प्रॉडक्ट विकण्याचे ऑनलाइन साधन आहे, डिजिटल मार्केटिंगसाठी आपण ऑनलाइन उपकरणांचा जसे की इंटरनेट आणि संगणक यांच्या साह्याने आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. याला आपण ऑनलाइन मार्केटिंग असे सुद्धा म्हणू शकतो.

आपण वरती बेकरी व्यवसाय, ब्लॉगिंग आणि लेखन करणे या विषयी माहिती जाणून घेतली. डिजिटल मार्केटिंग ध्वारे तुम्ही हे किवा खाली दिलेले व्यवसाय याची अॅडवरटाजिंग करून तुमच्या बिजनेस मध्ये वाढ करू शकता. तसेच ई कॉमर्स वेबसाइट वरील प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून ऑनलाइन विकू शकता.

डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्ही ऑनलाइन सोशल मीडिया फेसबूक, Instagram, LinkedIn, एत्यादीचा उपयोग करू शकता. तसेच डिजिटल मार्केटिंग तुम्ही ब्लॉगिंग, यूट्यूब, ईमेल मार्केटिंग याद्वारे तुम्ही करू शकता.

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

5. फोटोग्राफी (Photography)

महिला हा विचार मनामध्ये करत असतील की घरी बसून हा व्यवसाय कसा करायचा, कारण की फॉटोग्राफरची मागणी एखाद्या लग्न समारांबामद्धे किवा कार्यक्रमामध्ये असते व त्यामध्ये जास्त करून पुरुष तुम्हाला पाहायला भेटले असतील.

तर तुम्हाला फोटो काडायचा शंद असेल तर तुम्ही ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवू शकता, यामध्ये खूप सार्‍या वेबसाइट आहेत जे ऑनलाइन फोटो विकून तुम्हाला पैसे देत असतात. यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे फोटोचा स्टॉक असेल त्या वेबसाइट वर अपलोड करत राहायचा आहे. लोक त्यांच्या मागणी नुसार अॅडवरटाजिंग, ब्लॉगिंग किवा अन्य कामासाठी ऑनलाइन वेबसाइट ध्वारे फोटो विकत घेत असतात कारण की त्यांना ज्या ठिकांचा फोटो पाइजे तिथे जाऊन काडने परवडत नाही.

ह्या काही ऑनलाइन वेबसाइट आहेत जिथे तुम्ही ऑनलाइन फोटो विकून पैसे कमवू शकता

 • गेटी इमागेस  (Getty Images)
 • (शटरस्टॉक) Shutterstock
 • (आय स्टॉक) iStock
 • 500px
 • (स्टोक्क्सी) Stocksy
 • (कॅन स्टॉक फोटो) Can Stock Photo
 • (फ्री डिजिटल फोटोस. नेट) FreeDigitalPhotos.net
 • (अडोबे स्टॉक)  Adobe Stock
 • (फोटोळिया) Fotolia
 • (फोटो डूने) PhotoDune
 • (ड्रीम्सटाईम) Dreamstine
 • (डिपॉझिटफोटो) Depositphotos
 • (आय एम) EyeEm
 • 123RF

हे ही वाचा 

6. ऑनलाइन क्लास किवा क्लाससेस देणे (Online Teaching Classes)

ऑनलाइन क्लास किवा क्लाससेस देणे हा घरगुती व्यवसाय महिलांसाठी एक चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर आवड असेल तर तुम्ही घरी बसून त्या विषयावर क्लाससेस रेकॉर्डिंग करू शकता.

ऑनलाइन खूप सारे प्लॅटफॉर्म किवा वेबसाइट आहेत ज्या मध्ये तुम्ही रेकॉर्डिंग केलेले क्लाससेस अपलोड करून पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला व्यू ध्वारे पैसे भेटतात.

तसेच दूसरा ऑप्शन हा आहे की तुम्ही रेकॉर्ड केलेले क्लाससेस यूट्यूब वरती अपलोड करून पैसे कमवू शकता. तसेच जर का तुम्हाला चांगली पद्धार्थ बनवण्याची रेसिपी माहित असेल तर त्याची विडियो रेकॉर्ड करून तुम्ही यूट्यूब वर अपलोड करू शकता.

7. अकाऊंटिंग (Accounting)

अकाऊंटिंग म्हणजे एखाद्या व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची नोंद घेण्याची प्रक्रिया.अकाऊंटिंग प्रक्रियेमध्ये या व्यवहारांचे सारांश, विश्लेषण आणि अहवाल तपासणी उपक्रम एजन्सी, नियामक आणि कर संकलन संस्थांना दिले जातात.

जर का कोणी महिला कॉमर्स मधून ग्रॅजुएट झाली असेल व त्यांना अकाऊंट विषयी माहिती असेल तर त्या महिला घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकता. कारण की एक लहान कंपनी आपल्या कंपनीची बॅलेन्स शीट आणि अकाऊंटशी निगडीत असे काम करण्यासाठी लोकांच्या शोधामध्ये आहेत.

अश्या टाइप मध्ये नौकारी शोधण्यासाठी तुम्हाला जॉब देणार्‍या वेबसाइट मध्ये तुमचा CV अपलोड करून ठेवावा लागेल किवा त्या वेबसाइट वर अशा प्रकारे जॉब ची रीक्वायरमेंट आहे का ते शोधावे लागेल.

घरगुती व्यवसाय महिलांसाठी

8. इव्हेंट प्लॅनर (Event Planner)

कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधण्याच्या प्रक्रियेस सामान्यत: कार्यक्रम नियोजन (इव्हेंट प्लॅनर) असे संबोधले जाते त्यामध्ये बजेट, वेळापत्रक, साइट निवड, आवश्यक परवानग्या घेणे, वाहतूक व पार्किंगचे संयोजन करणे, स्पीकर्स किंवा मनोरंजन करणार्‍यांची व्यवस्था करणे, सजावट व्यवस्था करणे, कार्यक्रमाची सुरक्षा, केटरिंग, समन्वय यांचा समावेश असू शकतो.

तृतीय-पक्षाच्या विक्रेत्यांसह आणि आपत्कालीन योजनांसह. प्रत्येक कार्यक्रम त्याच्या स्वभावात भिन्न असतो त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीची प्रक्रिया इव्हेंटच्या प्रकारानुसार भिन्न असते. 

महिलांना इवेंट प्लॅनिंग करणे खूप पसंत आहे आणि ते घरी बसून इवेंट प्लॅनिंग करू शकतात, यामध्ये तुम्ही वाढदिवस, लग्न सोळा, एत्यादी योगणा करू शकता. वरती आपण डिजिटल मार्केटिंग ह्या विषयी माहिती जाणून घेतली याचा उपयोग करून तुम्ही एक इवेंट प्लॅनर आहे याची जाहिरात करू शकता.

9. यूट्यूब चॅनल (Youtube Channel)

तुम्हाला एखाध्या गोष्टी मध्ये आवढ असेल तर तुम्ही स्वता: चा यूट्यूब चॅनल सुरू करून त्या मध्ये विडियो अपलोड करू शकता. यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही टॉपिक वर विडियो बनवू शकता यामध्ये तुम्ही ऑनलाइन क्लाससेस, रेकिपी विषयी माहिती, टेक्नॉलजी विषयी माहिती, ऑनलाइन प्रॉडक्टचे रिव्यू देणे, एत्यादी.

यूट्यूब चॅनल ध्वारे पैसे कमवण्याचे खूप सारे ऑप्शन आहेत यामध्ये तुम्ही adsense ध्वारे तुमचा चेंनेल monetization करून  त्या ध्वारे पैसे कमवू शकता विका एफिलिएट मार्केटिंग ध्वारे जसे की एखादया प्रॉडक्टचे ऑनलाइन रिव्यू देवून तो प्रॉडक्ट ऑनलाइन विकून कमिशन ध्वारे पैसे कमवू शकता. 

10. कूकिंग किवा मेस सुरू करणे (Starting Cooking or Mess)

वरती आपण बगीतले की महिला त्यांच्या कौशल्य नुसार त्यांना कोणता व्यवसाय करता येईल, पण कूकिंग किवा मेस सुरू करणे हा व्यवसाय सर्वच महिला सुरू करू शकतात. शहरामध्ये लोक घरगुती पद्धतीचे मेस शोधत असतात.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *