सोवरण गोल्ड बाँड योजना काय आहे: आरबीआयने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आरबीआय ने दोन लेटेस्ट सिरीज ची घोषणा केली आहे. ह्या वित्तीय वर्षाची तीसरी सिरीज 18-25 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. आणि ह्याचे बॉन्ड तुमच्या अकाऊंट वरती 28 डिसेंबर 2023 ला मिळतील. हे सोवरण बॉन्ड तुम्हाला आरबीआय ध्वारे दिले जातील.
तसेच त्याच बरोबर ह्या वित्तीय वर्षाची चौथी सिरीज 12-14 फेबुरारी ह्या कलावधीत सुरू होईल. आणि ह्याचे बॉन्ड तुमच्या अकाऊंट वरती 21 फेब्रुवारी 2024 ला मिळतील
सोवरण गोल्ड बाँड हे एक असे बॉन्ड आहे, जे तुम्ही आरबीआय मार्फत प्रत्यक्ष ऐवजी डिजिटल स्वरूपात खरेदी करू शकता, जर तुम्हाला भविष्यासाठी सोने खरेदी करायचे असेल तर सोवरण गोल्ड बाँड हा एक चांगला पर्याय आहे.
यामुळे, सोन्याची किंमत ज्या प्रकारे वाढते त्यानुसार तुम्हाला परतावा मिळतो आणि त्यासोबत RBI तुम्हाला वार्षिक 2.5% पर्यंत अतिरिक्त व्याज देते.
आज आपण या लेखात सोवरण गोल्ड बाँड योजना काय आहे, सोवरण गोल्ड बाँड कसे खरेदी करावे, सोवरण गोल्ड बॉन्ड योजनेचे फायदे आणि तोटे तोटे काय आहेत, याविषयी डीटेल मध्ये पाहणार आहोत.
सोवरण गोल्ड बाँड योजना काय आहे? (Sovran Gold Bond yojana kai ahe)
सोवरण गोल्ड बाँड ही अशी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही सवलतीत ऑनलाइन सोने खरेदी करू शकता, जे लोक आपल्या घरात फिजिकल गोल्ड ठेवतात त्यांच्यासाठी, सोवरण गोल्ड बाँड योजना ही एक चांगली योजना आहे.
सोवरण गोल्ड बाँड ही आरबीआयने सुरू केलेली योजना आहे, जी पहिल्यांदा नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. आज, सोमवार, 19 जून ते 23 जून, 2023-24 ची पहिली सिरीज RBI कडून सुरू होत आहे.
जर तुम्ही सोवरण गोल्ड बॉन्ड विकत घेतले असतील तर तुम्ही ते 8 वर्षांपर्यंत विकू शकत नाही आणि आठ वर्षांनंतर तुम्हाला जे काही पैसे मिळतील, ते संपूर्ण पैसे करमुक्त राहतील.
सरकार तुम्हाला सोवरण गोल्ड बाँडवर दरवर्षी २.५% व्याज देते, जे तुमच्या बँक खात्यात दर ६ महिन्यांनी जमा केले जाते.
सोवरण गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षाची आहे, जर तुम्ही 5 वर्षांनंतर आरबीआय बाँड परत केले तर तुमचे संपूर्ण पैसे करमुक्त राहतील.
जर तुम्हाला सोवरण गोल्ड बॉन्ड आठ वर्षापूर्वी विकायचे असतील तर तुम्ही ते सेकेंडरी बाजारात विकू शकता, परंतु तुम्हाला जे काही परतावा मिळेल तो करमुक्त नसेल.
जर तुम्ही सोवरण गोल्ड बॉन्ड 3 वर्षापूर्वी विकले तर तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल आणि जर तुम्ही तीन वर्षांनी विकलात तर तुम्हाला 20% LTCG टॅक्स भरावा लागेल.
सोवरण गोल्ड बाँड 2023-24 च्या सिरीज
पहिली: 19-23 जुन 2023
जारी करण्याची तारीख: 27 जुन 2023
दुसरी: 11 सप्टेंबर-15 सप्टेंबर 2023
जारी करण्याची तारीख: 20 सप्टेंबर 2023
तिसरी: 18 डिसेंबर – 22 डिसेंबर 2023
जारी करण्याची तारीख: डिसेंबर 28, 2023
चौथी: फेब्रुवारी 12 – फेब्रुवारी 16, 2024
जारी करण्याची तारीख: फेब्रुवारी 21, 2024
सोवरण गोल्ड बाँड कोण खरेदी करू शकतो.
RBI च्या मते, कोणताही भारतीय नागरिक, HUF, ट्रस्ट, विद्यापीठ आणि धर्मादाय संस्था सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात. सामान्य व्यक्ती आणि HUF 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकतात, ट्रस्ट आणि संस्था 20 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकतात.
पालकही त्यांच्या मुलाच्या नावावर 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतात.
सोवरण गोल्ड बॉन्ड कसे खरेदी करावे.
सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करण्याचे अनेक पर्याय आहेत, जिथे तुम्ही सोने खरेदी करू शकता.
- खाजगी बँका: स्मॅल फायनॅन्स बँक सोडून
- सरकारी बँक
- पोस्ट ऑफिस
- NSE, BSE: ब्रोकर्सकडून (Zerodha, Groww, इ.)
- SHCIL: स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
सोवरण गोल्ड बाँडचे फायदे
आरबीआय अंतर्गत भारत सरकारद्वारे जारी केलेले सोवरण गोल्ड बाँड त्याचे आपल्यासाठी काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
1. सोवरण गोल्ड बॉन्डची पहिली सिरीज नोव्हेंबर 2015 मध्ये लाँच झाली, त्यावेळी सोन्याची प्रति ग्रॅम किंमत 2684 रुपये होती आणि आज या सिरीजची किंमत 5926 रुपये आहे, म्हणजे 8 वर्षात सोन्याने तुम्हाला दुप्पट पेक्षा जास्त परतावा दिले आहे, आणि त्यासोबत तुम्हाला RBI कडून दरवर्षी 2.5% व्याज देखील दिले जाते.
2. गेल्या वर्षी 2022-23 मध्ये, सोन्याने तुम्हाला 18% पर्यंत परतावा दिला आहे.
3. सोवरण गोल्ड बाँड्समध्ये, सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे तुम्हाला समान लाभ मिळतो आणि तुम्हाला सरकारकडून 2.5% अतिरिक्त व्याज देखील मिळते.
4. सोवरण गोल्ड बाँडमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला जे काही पैसे मिळतात, ते पूर्णपणे करमुक्त राहतात.
5. तुम्ही गुंतवणुकीसाठी दुकानातून सोने खरेदी करता, त्यावेळी तुम्ही 12-16% मेकिंग चार्जेस, 3% GST भरून ते खरेदी करता, त्यानंतर तुम्हाला चोरीची भीती वाटते, परंतु तुम्हाला हे सर्व सोव्हरेन गोल्ड बाँडमध्ये द्यावे लागणार नाही.
6. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी प्रत्यक्ष सोन्याऐवजी सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता, तुम्हाला पूर्ण सुरक्षिततेसह चांगला परतावा मिळेल. तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा ते विकून तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करू शकता.
सोवरण गोल्ड बाँडचे तोटे
1. सोवरण गोल्ड बाँडची मॅच्युरिटी 8 वर्षे आहे, म्हणजेच तुम्ही आठ वर्षापूर्वी विकल्यास, तुम्हाला कर लाभ मिळणार नाही.
2. तुमच्याकडे फिजिकल सोने असल्यास, तुम्ही त्यातून कर्ज घेऊ शकता, परंतु तुमच्याकडे सोवरण गोल्ड बॉन्ड असल्यास कर्ज मिळू शकत नाही.
3. भविष्यात सोन्याची किंमत वाढेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही, त्याची किंमत कमी झाली तर तुमचे नुकसान होऊ शकते.
फिजिकल गोल्ड आणि सोवरण गोल्ड बॉन्ड मधील फरक
फिजिकल गोल्ड तुम्ही दुकानात जाऊन ते सोने खरेदी करू शकता, सोवरण गोल्ड बॉन्ड तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता.
फिजिकल गोल्ड घेण्यासाठी, तुम्हाला १२-१६% मेकिंग चार्जेस, ३% जीएसटी भरावा लागतो, परंतु सोवरण गोल्ड बॉन्ड विकत घेण्यासाठी कोणतेही चार्जेस ध्यावे लागत नाहीत.
तुम्ही फिजिकल गोल्ड विकायला गेलात, तर दुकानदार त्यावेळच्या सोन्याच्या किमतीनुसार घेतो, तुम्हाला मेकिंग चार्जेस, त्यात जीएसटी परत देत नाही. परंतु सोवरण गोल्ड बाँडवर, तुम्हाला सरकारकडून दरवर्षी 2.5% पर्यंत व्याज मिळते आणि ते त्यावेळच्या सोन्याच्या दरानुसार खरेदी केले जाते.
फिजिकल गोल्ड चोरी होण्याची भीती असते, पण सोवरण गोल्ड बॉन्ड वरती ही भीती राहत नाही.
सोवरण गोल्ड बाँड कॅल्क्युलेटर
तुम्ही सोवरण गोल्ड बॉन्ड वरती निश्चित परतावा मोजू शकत नाही, तुम्ही सोने विकता तेव्हा प्रचलित असलेल्या किंमतीनुसार तुमच्याकडून सोने परत घेतले जाते.
सोवरण गोल्ड बाँडसाठी कोणती बँक सर्वोत्तम आहे?
सोवरण गोल्ड बाँड तुम्ही खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये उपलब्ध आहे (लहान वित्त बँक सोडून) तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन ते खरेदी करू शकता.
तुम्ही सरकारी बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खाजगी बँकेत ICICI ही चांगली बँक आहे. आणि जर तुमच्याकडे त्या बँकेची इंटरनेट मोबाइल बँकिंग असेल, तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन Sovereign Gold Bond खरेदी करू शकता.
2023 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड कधी उपलब्ध होईल?
या वर्षीची 2023-24 सोवरण गोल्ड बाँड I सिरीज आरबीआयने 19 जून ते 23 जून दरम्यान सुरू केली आहे.
- I सिरीज : 19 -23 जून 2023
- II सिरीज : 11-15 सप्टेंबर 2023
- III सिरीज : 18 – 22 डिसेंबर 2023
- IV सिरीज : 12 – 16 फेब्रुवारी 2024
सेकेंडरी मार्केटमध्ये सोवरण गोल्ड बॉन्ड
सोवरण गोल्ड बाँड RBI द्वारे वर्षातून फक्त 4 वेळा लॉन्च केले जातात, त्यानंतरतुम्ही RBI कडून सोवरण गोल्ड बाँड खरेदी करू शकत नाही.
परंतु तुम्ही सेकेंडरी मार्केटमधून सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता, सेकेंडरी मार्केटमध्ये NSE, BSE च्या ब्रोकरद्वारे सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकता आणि ते ही सावलीत.
तुम्ही Groww, Zerodha आणि अनेक ऑनलाइन ब्रोकर त्यांच्याकडून खरेदी करू शकता.
RBI मार्फत तुम्हाला ज्या प्रकारे सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करण्याचा लाभ मिळतो, त्याच प्रकारे तुम्हाला सेकेंडरी मार्केटमधून गोल्ड विकत घेण्याचा लाभ मिळतो.
सेकेंडरी मार्केट मध्ये विकत घेतलेल्या सोन्याच्या बाँडची वैधता कोणत्या सिरीज मधून विकत घेतली गेली आहे आणि आरबीआयने जारी करताना त्याची परिपक्वता तारीख काय होती तीच राहते.
त्यासोबत तुम्ही सेकेंडरीमार्केटमधून खरेदी करत असलेल्या प्रत्येक सोन्याच्या बोंडवरती तुम्हाला 2.5% पर्यंत व्याज मिळेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी संपूर्ण करमुक्त रक्कम मिळते.
सोवरण गोल्ड बॉन्ड मॅच्युरिटीच्या अगोदर विकता येईल का?
सोवरण गोल्ड बोंडची मॅच्युरिटी 8 वर्षांनंतर असते, परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते सेकेंडरी मार्केटमध्ये विकू शकता, 5 वर्षांनंतर तुम्ही RBI ला सोवरण गोल्ड बॉन्ड परत करू शकता.
जर तुम्ही ते 3 वर्षापूर्वी विकले तर तुम्हाला नियमित कर स्लॅबनुसार कर भरावा लागेल, जर तुम्ही 3 वर्षांनंतर विकलात तर तुम्हाला 20% LTCG टॅक्स भरावा लागेल.
आपण ५ वर्षापूर्वी सोवरण गोल्ड बॉन्ड विकू शकतो का?
सोवरण गोल्ड बोंडची मॅच्युरिटी 8 वर्षांनंतर असते, परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते सेकेंडरी मार्केटमध्ये विकू शकता, 5 वर्षांनंतर तुम्ही RBI ला सोवरण गोल्ड बॉन्ड परत करू शकता.
जर तुम्ही ते 3 वर्षापूर्वी विकले तर तुम्हाला नियमित कर स्लॅबनुसार कर भरावा लागेल, जर तुम्ही 3 वर्षांनंतर विकलात तर तुम्हाला 20% LTCG टॅक्स भरावा लागेल.
एनआरआय व्यक्ती सोवरण गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात का?
नाही, सार्वभौम सुवर्ण रोखे भारतीय नागरिक रिक्त खरेदी करू शकतात.