टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया | Business Based on Agriculture

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामधील निम्या पेक्षा जास्त लोक हे कृषी वर आधारित आहेत. तुम्हीही शेतकरी आहात आणि कृषी वर आधारित बिजनेस करून धंदा करून जास्त पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया याचा विचार करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. 

टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया

 

टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया (Business based on agriculture)

1. कृषी फार्म (Agricultural Farm)

कृषी फार्मचा व्यवसाय तुम्ही कमीत कमी पैसे गुंतवून सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला मार्केट मध्ये कशाची मागणी आहे हे लक्ष्यात घेतले पाहिजे. फायदेशीर कृषी व्यवसाय खाली दिलेल्या व्यवसाय पेकी तुम्ही करू शकता.

 • राई तेलाचे उत्पादन
 • फळ उत्पादन
 • बटाटा उत्पादन
 • बियाणे उत्पादन
 • टोमॅटोचे उत्पादन
 • शेंगदाणा तेलाचे उत्पादन
 • मसाल्याची शेती
 • कोळंबी माशाची शेती
 • गाजर शेती
 • डाळिंबिची शेती, एत्यादी 

 

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

2. फुलांचा व्यवसाय

शोभेच्या फुलांचा व्यवसाय हा वर्षातील 365 दिवस कामाची आणि पैसे कमावण्याची कल्पना आहे. यासाठी तुम्हाला नेहमीच मागणी असणार्‍या फुलांचा निरोगी साठा ठेवावा लागेल, जसे की पर्णसंभार, झाडे, फुलझाडे, घरगुती झाडे आणि लॉन शीट इत्यादी. फुलांचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही याची जाहीरात ही करू शकता.

ठराविक वेळी मोठ्या प्रमाणात पैसे कमविण्यासाठी एखादी व्यक्ती झेंडू आणि गुलाब वाणिज्यिक प्रमाणात पिकवू शकता. दासेहरा, ख्रिसमस इत्यादीसारख्या प्रमुख सणाच्या आधी 1-2 महिन्यापूर्वी या फुलांच्या पिकांची लागवड सुरू करून तुम्ही जास्त प्रमाणात नफा करू शकता जसे की झेंडूची फुले. ही एक टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया आहे.

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

3. दूध उत्पादन

दुधाचा व्यवसाय हा शेतकर्‍यांसाठी आज ही फायदेशीर आहे आणि भविष्यात ही फायदेशीर राहणार आहे. यामध्ये 50% पेक्षा जास्त रिटर्न आहे. जर तुम्ही 100 रुपये इन्वेस्ट करत असाल तर 150 रुपये तुम्हाला रिटर्न भेटतील. दुधाचा व्यवसायासाठी तुम्हाला मुख्य खर्च हा शेड बनवण्यासाठी आणि गुरांच्या आहारात पडतो. गायींच्या काही जाती जास्त प्रमाणात दूध देण्याच्या क्षमतेसाठी खास ओळखल्या जातात यामध्ये 

 • साहिवाल
 • जर्सी
 • एच.एफ

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

हे ही वाचा 

4. गुरांच्या चारासाठी चारा उत्पादन

दिवसेंदिवस गुरांच्या चार्‍याची मागणी वाढत आहे. भारतामध्ये लहान शेतकरी आणि दूध उत्पादक हे जनावरांच्या पशुधनाची गरज पूर्ण करण्यासाठी तृतीय पक्षावर अवलंबून असतात. तुम्ही दोन ते चार एकरामध्ये चारा उत्पादनाचा व्यवसाय सुरू करू शकता. काही चारा पिके खालीलप्रमाणे आहेत. 

 • धान्य आणि हिरव्या चारासाठी मका
 • धान्य आणि हिरवा चारा यासाठी चिक्की
 • हिरव्या चारासाठी बिरसीम
 • हिरव्या चारासाठी हत्ती गवत
 • अझोला आणि सुबाबुलची निर्मिती

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

5. रोपवाटिका

शेतकर्‍यांसाठी आणखी एक चांगला आणि फायदेशीर धंदा आहे. तुम्ही हा बिजनेस एक ते दोन एकर जमिनीमध्ये सुरू करू शकता. यासाठी तुम्ही स्मार्टपणे जमिनीचा उपयोग करू शकता. सरकार एक लहान आणि उच्च तंत्रज्ञानाची रोपवाटिका स्थापित करण्यासाठी योजना देखील समर्थन करतात. 

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

6. कुक्कुट पालन

कुक्कुट पालनाचा व्यवसाय आपण दोन प्रकारे करू शकतो. एक स्वत: हून कुक्कुट पालन आणि दूसरा कंत्राटी कुक्कुट पालन, कुणीही फायदेशीर कुक्कुट पालनाचा व्यवसाय चालू करू शकतो यामध्ये तुम्ही कोंबडीची अंडी आणि कोंबड्यांसाठी पोल्ट्री फार्मिंग चालू करू शकता.

स्वत: हून कुक्कुट पालनामध्ये पैसे जास्त गुंतवावे लागतात आणि रिटर्न ही तेवढ्याच प्रमाणात जास्त भेटते. कुक्कुट पालन व्यवसाय यामध्ये द्भवणारी मुख्य अडचण म्हणजे एव्हीयन रोगयासाठी तुम्ही नियोजित लसीकरण आणि योग्य व्यवस्थापन केल्याने ही अडचण तुम्ही दूर करू शकता. 

दूसरा कंत्राटी कुक्कुट पालन यामध्ये कमी गुंतवणूक आणि कमी प्रमाणात रिटर्न भेटते. सुरवातीला तुम्हाला शेड बांधण्यासाठी पैसे गुंतवावे लागतात. आपल्याशी सौदा करणारा एक खाजगी व्यक्ती आपल्या पिल्लांची लस आणि पोल्ट्री फीडसाठी सर्व आवश्यक गोष्टी प्रदान करतो.

खर बगीतल कुक्कुट पालन हा खूप रिसकी आणि फायदेशीर व्यवसाय आहे. जर तुम्ही थोडे ट्रेनिंग आणि रिस्क घेऊन व्यवसाय सुरू केला तर तुम्ही यामध्ये सक्सेस व्यवसाय सुरू करू शकता. 

टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया | Business Based on Agriculture

हे ही वाचा 

7. मशरूम शेती व्यवसाय

मशरूम शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवलाची गरज नाही. ही व्यवसाय तुम्ही 50,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता आणि जस जशी मागणी वाढेल तसे तुम्ही व्यवसाय वाढवू शकता.

यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे शाहकरी ते चिकन आणि मटन ची जागा घेते.  मशरूम हे हवामानानुसार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये उपलब्ध असते  यामध्ये जास्त करून दोन सीजन मध्ये आढळले जाते. ही एक टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया आहे.

 • थंडीचा सीजन : पांढरा बटण मशरूम.
 • उबदार स्थिती : ऑयस्टर आणि धान पेंढा मशरूम

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

हे ही वाचा 

8. गोगलगाई शेती

गोगलगाय शेतीत नफ्याचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. गोगलगाय शेतीत नफ्याचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. गोगलगाईचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. गोगलगाईच्या शेतीसाठी तुम्ही मॉडर्न उपग्रडेटेड तंत्रण्याचा उपयोग करू शकता आणि वर्षाला अधिक नफा कमवू शकता.  ही एक टॉप 10 कृषी वर आधारित बिजनेस आयडिया आहे.

गोगलगाई शेती सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या घोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत. 

 • व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुमच्या जवळील बाजाराचा अंदाज घेणे आवश्यक आहे. 
 • तुमचा बिजनेस प्लान तेयर करणे गरजेचे आहे.  
 • तुम्ही फायदेशीर बिजनेस सुरू करण्यासाठी लोकेशन म्हतवाचे आहे.   
 • यामध्ये तुम्हाला किती अनुभव आहे.  

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

9. मासे पालन

मासे पालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला यागोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 

 • तुमच्याकडे तलाव नसल्यास तुम्ही निर्माण करू शकता. 
 • पाउस सुरू होण्यापूर्वी मासे बियाणे खरेदी करून तलवात सोडा. 
 • त्यांना फिश फीड वेळेवर खायला द्या.
 • उन्हाळयामध्ये तलावात पाण्याची पातळी कमीत कमी 3 ते 5 फूट ठेवा. 
 • त्यांची वेळेवर सेवा करत रहा. 

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

हे ही वाचा 

10. शेती कंपोस्टचे उत्पादन

शेती कंपोस्टचे उत्पादन हा एक फायदेशीर शेती व्यवसाय आहे जे तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकता. यासाठी तुम्ही कुजलेला माल, उपटलेली तण आणि झाडे, जुन्या वर्तमानपत्रे याचा उपयोग करू शकता. कंपोस्टिंगमध्ये प्रत्येक बायोडिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली कचरा लागू आहे. 

टॉप 10 कृषीवर आधारित बिजनेस आयडिया

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *