शेळी पालन माहिती, प्रकार, शेळ्यांच्या जाती, फायदे

शेळी पालन माहिती, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जवळजवळ 50% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. आज आपल्याला माहीत आहे की नुसती शेती करून पोट भरणे खूप कठीण आहे कारण की आज काही लोकांकडे खूप कमी जमीन आहे. तसेच जमीनीमध्ये पीक चांगले आले तर त्याला हमीभाव भेटत नाही, काही वेळा चांगले आले पीक आले तर अवकाळी पावसाने खूप नुकसान होते. आज महाराष्टात काही जिल्हे आहेत त्यामध्ये सारखा दुष्काळ किवा पाऊस पडत नाही. 

त्यामुळे हे लोक शेती करत-करत जोड व्यवसाय करण्याचा विचार करत असतात आणि काही लोक करत आहेत. या मध्ये दूध व्यवसाय, शेळी पालन, कोंबडी पालन, एत्यादी.

आपण आज शेळी पालन माहिती या लेखाअंतर्गत शेळी पालन व्यवसाय या विषयी माहिती, त्याचे प्रकार, भारतात शेळ्यांचे प्रकार कोणते आहेत, शेळी पालनाचे फायदे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

शेळी पालन माहिती

शेळी पालन माहिती

ज्यांना शेती कमी आहे व शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन हा एक चांगला शेतीपूरक व्यवसाय आहे. शेळी पालन करण्यासाठी आपल्याला कमी जागा, कमी भांडवल लागते आणि आपण शेती करत-करत हा व्यवसाय करू शकतो. शेती करत आपण बंदिस्त शेळी पालन करू शकतो.

शेळयांना ईतर जनावरपेक्षा कमी चारा आणि पानी लागते, एक गाईला जेवढा चारा लागतो त्यामध्ये 10 शेळ्या जगू शकतात. त्यामुळे ज्यांना कमी शेती आहे त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.

जे लोक शेती करत शेळी पालन करण्याचा विचार करत असतील त्यांना शेळ्यांसाठी वेगळ्या शेडची गरज पडत नाही, आपण आपल्या घरामध्ये शेळ्या बांदू शकतो. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात शेळयांचे पालन करता त्यावेळी तुम्हाला शेडची आवश्यकता पडते, यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते.

आज महाराष्ट मध्ये जास्त करून शेतकरी शेती करत हा व्यवसाय करत असतो, त्यामध्ये त्यांना शेतामध्ये जो चारा निगतो ते शेळयांना घालत आहेत किवा रिकाम्या वेळी हे लोक शेळयांना चरण्यासाठी बाहेर घेऊन जात आहेत, जास्त करून हे लोक बंदिस्त किवा निंबंदिस्त शेळी पालन करत आहेत.

शेळी पालन करत असताना आपण दोन प्रकारे पैसे कमवू शकतो एक म्हणजे त्याचे मास विकून किवा दूध विकून. 

मराठी विकिपीडिया नुसार आज भारतामध्ये शेळ्याची एकूण संख्या 123 दशलक्ष आहे आणि जगामध्ये एकूण संख्या 620 दशलक्ष आहे, ईतकी संख्या असूनही भारतात शेळ्यांचे उत्पन्न खूप कमी आहे. या देशातील उत्पन्न बगता मांस, कातडे, दूध यांच्या उत्पन्नापैंकी शेळ्यांचे उत्पन्न 3% दूध, 45 ते 50 टक्के मांस आणि कातडी 45% ईतके आहे.

शेळी पालनाचे प्रकार

शेळी पालनाचे एकूण तीन प्रकार आढळतात एक परंपरागत पद्धत, दुसरी अर्धबंदिस्त पद्धत आणि तिसरा बंदिस्त पद्धत. या प्रत्येक प्रकराविषयी आपण डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत.

1. परंपरागत पद्धत

परंपरागत पद्धतीमध्ये शेळ्यांना मोकळे चरायला सोडले जाते, ह्या प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी एक वेगळा माणूस असतो तो रोज शेळ्यांना बाहेर चरण्यासाठी घेऊन जातो.

ह्या प्रकारच्या व्यवसायमध्ये जास्त खर्च लागत नाही, शेळ्या फक्त बाहेर चरून जगू शकतात. आणि अशा प्रकारामध्ये शेळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. एकदा का शेळ्यांसाठी शेडची उभारणी केली की तुम्हाला जास्त खर्च येत नाही.

2. अर्धबंदिस्त पद्धत 

ज्यांना रोज शेळ्यांना बाहेर चरायला घेऊन जाने शक्य नाही आणि आपल्या शेतीला एक जोड धंदा म्हणून अर्धबंदिस्त शेळी पालन सुरू करू शकतो.

या प्रकारच्या शेळीपालनामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ बाहेर चरायला सोडले जात नाही. काही लोक शेळ्यांना ज्या सीजन मध्ये चरायला चारा आहे त्या सीजन मध्ये सोडतात आणि अन्य सीजनमध्ये त्यांना आपल्या शेड मध्ये चारा पुरवण्याचे काम करतात.

तसेच मोकाट शेळीपाळांनामध्ये आंतर प्रजनन होत असते, त्यामुळे शेळीचा दर्जा कमी होतो पण अर्धबंदिस्त शेळी पाळांनामध्ये हे थोड अवगड आहे बंदिस्त शेळी पाळणापेक्षा.

3. बंदिस्त पद्धत

बंदिस्त शेळी पाळांनामध्ये शेळ्यांना 24 तास शेडमध्ये बांधून ठेवले जाते. यामध्ये खर्च थोडा जास्त आहे.

हा व्यवसाय जे शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून काही थोड्या शेळ्या पाळून बंदिस्त शेळीपाळण करतात किवा काही लोक मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचा व्यवसाय करण्यासाठी ही पद्धत वापरतात.

यासाठी एक चांगली जागा, सेपरेट शेड, शेळ्यांना चारा त्यांचा दवाखाना, एत्यादी प्रकारचे खर्च येतात. हा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे.

हे वी वाचा 

शेळ्यांच्या जाती

भारतामध्ये शेळीच्या खूप जाती आढळतात आणि त्यांच्या जातीनुसार त्याचे संगोपन केले जाते. वरती आपण शेळी पालन माहिती याविषयी जाणून घेतले, आता आपण शेळयांच्या कोणत्या जाती आहेत आणि त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो याविषयी माहिती करून घेऊया.

1. उस्मानाबादी शेळी 

नावाप्रमाणे ह्या प्रकारच्या शेळ्या महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात आढळतात. याचे पालन मांस यासाठी केले जाते. याचा रंग कळा आणि वर्षातून दोनदा हे बाळांना जन्म देतात.

ही शेळी जवळ-जवळ दोन बाळांना जन्म देते, त्याचे कान लांब 20 ते 25 सेंटिमिटर आढळतात आणि त्यांचे नाक रोमन असते.

शेळी पालन माहिती

2. सुरती शेळी 

सुरती ही शेळी गुजरातमध्ये आढळते. ही दुभत्या जातीची बकरी आहे, याचा रंग पांढरा असतो आणि कान मध्यम आकाराचे.

याची शिंगे लहान आणि वक्र असतात. तसेच सुरती प्रकाळच्या शेळ्या लांब चालण्यास सक्षम असतात.

शेळी पालन माहिती

3. मारवाडी शेळी 

मारवाडी शेळीचे पालन तीन कामासाठी केले जाते एक दूध, दुसरे मांस आणि तिसरे केसांसाठी. ह्या प्रकारच्या शेळ्या राजस्थान मध्ये मारवार जिल्ह्यामध्ये आढळतात.

याचा रंग पुर्णपणे काळा असतो, याचे कान पांढरे असतात आणि याची शिंगे त्याची कॉर्कस्क्रूप्रमाणे असतात. मारवाडी शेळीचा आकार मध्यम असतो.

शेळी पालन माहिती

4. जमुनापारी शेळी 

ही शेळी इटावा, मथुरा इत्यादी ठिकाणी आढळते. याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. ही शेळ्यांची सगळ्यात मोठी जात आहे.

याचा रंग पांढरा आणि शरीरमध्ये भुर्‍या रंगाचे धब्बे आढळतात, याचे कान खूप मोठे असते, यांचे शिंग 8 ते 9 सेंटिमिटर असतात आणि रोज  2 ते 2.5 लीटर दूध देण्याची क्षमता असते.

 5. बार्बरी शेळी 

बार्बरी एटा, अलिगड आणि आग्रा जिल्ह्यात आढळते. याचे पालन मांस उत्पादनसाठी केले जाते. याचा आकार लहान आढळतो आणि याच्या रंगामध्ये भिन्नता आढळते.

कान नळी सारखे मुडलेले असते आणि शरीरमध्ये पूर्ण धब्बे, भुरे आढळतात. ह्या प्रकारच्या शेळ्या दिल्ली या ठिकाणी पाळण्यास उपउक्त आहेत.

6. बीटल शेळी 

या प्रकारच्या शेळ्या दुधासाठी चांगल्या आहेत. ह्या गुदासपुर पंजाब मध्ये आढळतात. बीटल प्रकारच्या शेळ्यांचा आकार मोठा आणि रंग काळा आणि पांढर्‍या रंगाचे धब्बे आढळतात. कान लांब लटकलेले असते आणि डोक्याच्या आत वाकलेले असते. 

7. काळी बेंगल शेळी 

ह्या प्रकारची शेळी जास्त करून बंगाल, उडीसा, बिहार मध्ये पाळली जाते. ह्याचे पाय लहान असतात. त्यांचा रंग काळा असतो. अनुनासिक ओळ सरळ किंवा किंचित दाबली जाते. केस लहान आणि चमकदार असतात. पाय किंचित चपटे, कान लहान असते आणि काखेत पसरतात. 

8. सिरोही शेळी 

ही राजस्थान मध्ये सिरोही जील्यामध्ये आढळते, याचे पालन दूध आणि मांस यासाठी केले जाते. याचे शरीरमध्यम आकाराचे असते. याचे कान लटकलेले असतात आणि याचा आकार 10 सेंटिमिटर पेक्षा लांब असतो.

9. कच्छ शेळी 

ह्या प्रकारची शेळी गुजरामध्ये कच्छ जिल्ह्यात आढळते, याचा आकार मोठा असतो आणि दुधासाठी याचे पालन केले जाते. याचे केस लांब आणि नाक उंचावलेले असते. शिंगे जाड, टोकदार आणि वरच्या व बाहेरील बाजूने वाढलेली जातात.

10. गद्दी शेळी 

ही  हिमाचल प्रदेशच्या कांगडा कुल्लू खोर्‍यात आढळते.

शेळीपालनाचे फायदे

शेळीपालन हा शेतीला जोड धंदा म्हणून केला जातो व याचे फायदेही शेतकर्‍यांसाठी खूप आहेत. आता आपण शेळीपालनाचे कोणते फायदे आहेत हे माहीत करून घेऊया.

  • गरजेच्या वेळी शेळ्या विकून पैसे प्राप्त करू शकतो.
  • शेळी पालन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टेक्निकची गरज पडत नाही.
  • हा व्यवसायाचा विस्तार खूप फास्ट मध्ये होतो त्यामुळे कमी खर्चात जास्त फायदा होतो.
  • ज्यांना शेती कमी किवा काहीच नाही त्यांसाठी हा व्यवसाय चांगला आहे.
  • शेळ्या एका वर्षातून दोनदा बाळाला जन्म देतात त्यामुळे जास्त नफा होतो.
  • शेळी दोन किवा त्यापेक्षा जास्त पिल्लांना जन्म देती त्यामुळे नफा जास्त मिळतो.
  • शेळी ही कटक असते व त्याची हवामान बदलेले तरी सहन करण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे दवाखान्याचा खर्च कमी येतो.

हे वी वाचा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *