भारत सरकारने 2023-24 (Q2) जुलै-सप्टेंबरच्या योजनांसाठी नवीन व्याजदर जाहीर केले आहेत, ज्यामध्ये अशा काही योजना आहेत ज्यामध्ये व्याजदर वाढवले गेले आहेत तर काही योजनामध्ये बदल करण्यात आला नाही.
ह्या वर्षासाठी जुलै-सप्टेंबर 2023 (Q2) सविंग स्कीम व्याजदर काय आहेत आणि त्यापूर्वीचे व्याजदर काय होते ते डीटेल मध्ये समजून घेऊया.
जुलै-सप्टेंबर 2023 (Q2) सविंग स्कीम व्याजदर: छोटी बचत योजना, PPF, NSC, KVP, SCSS आणि SSY व्याजदर
30 जून रोजी, अर्थमंत्र्यांनी 2023-24 (Q2) जुलै-सप्टेंबरच्या बचत योजनांवरील नवीन व्याजदर पत्रकारांद्वारे जाहीर केले.
यामध्ये लहान बचत योजनांमध्ये ०.1 ते ०.3 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षाच्या लहान बचतीवर 6.8 ते 6.9% वाढ, दोन वर्षांसाठी 6.9 ते 7.0%, तीन ते पाच वर्षांसाठी कोणताही बदल नाही.
पाच वर्षांसाठी रेकूरिंग डिपॉजिट (RD) वरती 6.2 वरून 6.5% पर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत योजना (NSC), पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSAC) या योजनेमध्ये कोणतेही वाढ करण्यात आली नाही.
गेल्या वेळी असे काही बदल झाले होते.
सरकारने लघु बचत योजनेत सलग 2 वेळा बदल केले आहेत, याआधी 2023-23 च्या एप्रिल-जूनमध्ये 5.8 वरून 6.2% पर्यंत वाढ केली होती. यासोबतच पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना 7.1 वरून 7.4% पर्यंत वाढवण्यात आली होती, परंतु यावेळी कोणताही बदल झालेला नाही.