ड्रायव्हिंग लायसन्स माहिती, अप्लाय ऑनलाइन, डॉक्युमेंट्स

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती, आज ड्रायविंग लायसेंस नसेल तर तुम्ही गाडी चालवू शकत नाही, व चालवली तर तुम्हाला 1988 मोटर ड्रायविंग वेहिकल अक्ट्स नुसार दंड भरावा लागतो.

तुम्ही पाहिले असेल की ड्रायविंग लायसेंस काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिस शोधणे, डॉक्युमेंटची जुळवा जुळव करणे, नंतर एखाद्या कम्प्युटर सेंटर किवा प्रायवेट सेंटर मध्ये जाऊन अप्लाय करणे किवा आरटीओ ऑफिसला जाऊन अप्लाय करणे.

या लेखामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्स माहिती, ड्रायव्हिंग लायसेंस चे प्रकार, ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू आणि तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल तर, ड्यूप्लिकेट लायसेंस कसे कडायचे याविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

ड्रायविंग लायसेंस हे एक अशे डॉक्युमेंट आहे जे भारत सरकार ध्वारे दिले जाते. हे तुम्हाला उपलब्ध झाल्यानंतर टू व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर किवा अन्य वाहने चालवण्यास परवानगी मिळते.

भारतामध्ये ड्रायविंग लायसेंस हे रीजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (आरटीए) किवा रीजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (आरटीओ) यांच्या ध्वारे तुमची टेस्ट घेऊन दिले जाते.  1988 मोटर vehicle अक्ट्स नुसार कोणतेही व्यक्ती बिना ड्रायविंग लायसेंस नुसार गाडी चालवू शकत नाही, व चालवल्यास त्याला नियमानुसार फाइन भरावा लागतो.

जर तुम्ही नवीन असाल व तुम्हाला गाडी चालवता येत नसेल तर पहिल्यांदा लेर्नर ड्रायविंग लायसेंस काढावे लागते यासाठी तुम्हाला काही टेस्ट द्याव्या लागतात, व त्यानंतर 6 महिन्याच्या कालावधी मध्ये तुम्हाला पेरनमेंट ड्रायविंग लायसेंस भेटते यासाठी ही तुम्हाला गाडी चालवावी लागते.

ड्रायव्हिंग लायसेंस चे प्रकार 

तुमच्या गाडीच्या टाइप नुसार तुम्हाला ड्रायविंग लायसेंस भेटते, व वेगवेगळ्या गाड्यानुसार त्याची पात्रता निकष जोडले गेले आहेत. खाली काही ड्रायविंग लायसेंस चे प्रकार दिले आहेत. 

 • मोटरसायकल ज्याचे इंजिन capacity 50 cc किवा त्यापेक्षा कमी आहे.
 • मोटर सायकल ज्यामध्ये गियर आहे, मोटरसायकल ज्याची capacity 50 cc किवा त्यापेक्षा जास्त आहे.
 • मोटार वाहन (एलएमव्ही) कारसह
 • गीयरसह मोटरसायकल
 • मोटर सायकल कोणत्याही सीसी ची पण त्यामध्ये गियर नाही. 
 • लाइट मोटर वेहिकल फॉर नोन ट्रान्सपोर्ट कामासाठी
 • लाइट मोटर वेहिकल कमर्शियल कामासाठी
 • अवजड प्रवासी मोटर वाहन
 • अवजड वस्तू मोटार वाहन

हे ही वाचा 

ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म

तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, असल्यास सर्व प्रथम तुम्हाला त्याच्या official वेबसाइट वर विजिट ध्यावी लागते, आपण खाली स्टेप बाय स्टेप ड्रायविंग लायसेंससाठी अप्लाय कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया.

स्टेप 1: सर्व प्रथम तुम्ही त्यांच्या official वेबसाइटला भेट द्या: क्लिक करा.  

स्टेप 2: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपेन होईल त्यामध्ये “Drivers/ Learners License” हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

 

स्टेप 3: यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा, मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो.

स्टेप 4: स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये अप्लाय लेर्नर लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस फॉर रेनेवळ, अप्लाय ड्यूप्लिकेट लायसेंस, एत्यादी. 

तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करत असाल आणि तुमच्या कसे लर्निंग लायसेंसही नसेल तर पहिला ऑप्शन “Apply for Learner License” यावरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

 

स्टेप 5: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचे अॅप्लिकेशन किती स्टेज मध्ये तुम्ही बरणार आहात याविषयी माहिती दिली गेली आहे.

अॅप्लिकेशन फॉर्म बरत असताना तुम्हाला प्रथम फॉर्म पूर्ण भरावा लागतो, नंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन फी जमा करावी लागते, त्यानंतर तुमचे पेमेंट स्टेटस वेरीफाय करावे लागते, त्यानंतर तुम्ही पेमेंट केलेली पावती प्रिंट किवा डाऊनलोड करू शकता आणि फायनल तुम्ही लर्निंग लायसेंससाठी स्लॉट बूक करू शकता.

स्टेप 6: “Continue” वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला एक कटगेरी सिलेक्ट करायला विचारले जाईल की तुम्ही (Foreigner) / Repatriate / Refugees / Foreigners (But not Diplomats) / Ex-Servicemen / Physically Challenged] आहात का. 

यामध्ये तुम्ही सामान्य नागरिक असाल तर “General” सिलेक्ट करा.

व त्यानंतर तुम्हाला “Applicant does not hold Driving/ Learner License” यावरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करा. 

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

स्टेप 7: नंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सुरवातीला तुम्हाला स्टेट आणि तुमचे आरटीओ ऑफिस विचारले जाईल. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा.

नंतर खाली दिलेला संपूर्ण फॉर्म बरून घ्या जसे की तुमचे नाव, Gender, Date of Birth, तुमचे वय, एत्यादी

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

तुमची जनरल माहिती भरल्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला कशाचे ड्रायविंग लायसेंस बनवाचे आहे ते सिलेक्ट करा यामध्ये टू व्हीलर, 3 व्हीलर किवा अन्य.

नंतर तुम्हाला खाली तुम्ही ड्रायविंग स्कूल मध्ये ट्रेडिंग घेतले आहे का हा ऑप्शन दिसेल, घेतले असेल तर तुम्ही यस वरती क्लिक करू त्या शाखेचे डीटेल मध्ये माहिती भरून घ्या व नसेल तर नो वरती क्लिक करा.

नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला एक “Declaration” ऑप्शन दिसेल त्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला विचारले आहे की तुमचा अॅक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर तुम्ही तुमचे ऑर्गन donate करणार आहात का. करणार असेल तर yes वरती क्लिक करा नाहीतर नो वरती क्लिक करा.

आणि दूसरा ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला वर दिलेली माहिती बरोबर आहे म्हणून विचारले आहे, yes वरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करा.

स्टेप 8: Submit वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी विचारले जाईल, तुम्ही तुमचा फोटो, आणि सही अपलोड करा.

स्टेप 9 : नंतर पेमेंटचा ऑप्शन तुमच्या पुढे दिसेल त्यावरती क्लिक करून पेमेंट बरून घ्या.

स्टेप 10: तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्मचा नंबर दिला जाईल त्यानुसार तुम्हाला लर्निंग लायसेंससाठी तुम्हाला माहिती दिली जाईल.

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू

वरती आपण ऑनलाइन ड्रायविंग लायसेंससाठी कसे अप्लाय करायचे याविषयी माहिती जाणून घेतली. जेव्हा तुम्ही ड्रायविंग लायसेंस बनवता त्याची एक व्हॅलिडिटी दिलेली असते व त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी अप्लाय करावे लागते.

तर आपण खाली स्टेप बाय स्टेप ड्रायविंग लायसेंस कसे रिन्यू करायचे याविषयी माहिती करून घेऊया.

स्टेप 1: सर्व प्रथम तुम्ही याच्या official वेबसाइटला भेट द्या: क्लिक करा.  

स्टेप 2: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल त्यामध्ये “Drivers/ Learners License” हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

स्टेप 3: यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा, मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो.

स्टेप 4: स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये अप्लाय लेर्नर लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस फॉर रेनेवळ, अप्लाय ड्यूप्लिकेट लायसेंस, एत्यादी

आपल्याला आपले ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करायचे आहे त्यासाठी “Apply for DL Renewal” वरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

स्टेप 5: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 7 स्टेप मध्ये तुम्ही ड्रायविंग लायसेंस रेनेवळ करू शकता म्हणून माहिती दिली आहे.

 • पहिल्या स्टेज मध्ये तुम्हाला applicant ची डीटेल भरावी लागतील म्हणजे तुमचा ड्रायविंग लायसेंस नंबर, जन्मतारीख, एत्यादी. 
 • दुसर्‍या स्टेप मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील. 
 • नंतर थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला फोटो आणि सही स्कॅन केलेली अपलोड करावी लागते.
 • त्यानंतर तुम्ही पहिले जे लायसेंस काढले आहे तेच renew करणार आहे का किवा दुसरे कोणते लायसेंस तुम्हाला अप्लाय करायचे आहे हे ह्या विषयी अप्लाय करायचे आहे, तुम्ही दुसरे स्लॉट चे ड्रायविंग लायसेंस कडायचे असल्यास तुम्हाला परत टेस्ट पास करण्यासाठी जावे लागते.
 • नंतर तुम्ही पेमेंट फी जमा करा.
 • तुमचे पेमेंट स्टेटस वेरीफाय करा.
 • आणि लास्ट तुम्ही पेमेंट केलेली पावती डाऊनलोड किवा प्रिंट करून ठेवा.

अशा रीतीने तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी अप्लाय करू शकता यासाठी तुम्हाला कुठे बाहेर किवा आरटीओ ऑफिस जाण्याची गरज पडत नाही. तुम्ही घरी बसून ऑनलाइन अप्लाय करू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स हरवले

जर तुमचे ड्रायविंग लायसेंस काही कारणाने हरवले असेल तर आपण ऑनलाइन कशा प्रकारे ड्यूप्लिकेट ड्रायविंग लायसेंससाठी अप्लाय कसे करायचे याविषयी माहिती स्टेप बाय स्टेप मध्ये जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण ड्रायविंग लायसेंस साठी ऑनलाइन अप्लाय कसे करायचे आणि दुसरे ड्रायविंग लायसेंस कसे रेनेवळ करायचे या विषयी माहिती जाणून घेतली.

स्टेप 1: सर्व प्रथम तुम्ही याच्या official वेबसाइटला भेट द्या: क्लिक करा.  

स्टेप 2: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपेन होईल त्यामध्ये “Drivers/ Learners License” हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

स्टेप 3: यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा, मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो.

स्टेप 4: स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये अप्लाय लेर्नर लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस फॉर रेनेवळ, अप्लाय ड्यूप्लिकेट लायसेंस, एत्यादी. 

आपले ड्रायविंग लायसेंस हरवले आहे यासाठी अप्लाय करत आहोत, यासाठी तुम्ही “Apply Duplicate DL” वरती क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स माहिती

स्टेप 5: क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला 7 स्टेप मध्ये तुम्ही ड्यूप्लिकेट ड्रायविंग लायसेंस ला कसे अप्लाय करायचे आहे ह्या विषयी माहिती दिली आहे. 

 • पहिल्या स्टेज मध्ये तुम्हाला applicant ची डीटेल भरावी लागतील म्हणजे तुमचा ड्रायविंग लायसेंस नंबर, जन्मतारीख, एत्यादी. 
 • दुसर्‍या स्टेप मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावी लागतील.
 • नंतर थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला फोटो आणि सही स्कॅन केलेली अपलोड करावी लागते.
 • त्यांनातर तुम्ही पहिले जे लायसेंस काढले आहे तेच renew करणार आहे का किवा दुसरे कोणते लायसेंस तुम्हाला अप्लाय करायचे.  आहे हे ह्या विषयी अप्लाय करायचे आहे, तुम्ही दुसरे स्लॉट चे ड्रायविंग लायसेंस कडायचे असल्यास तुम्हाला परत टेस्ट पास करण्यासाठी जावे लागते.
 • नंतर तुम्ही पेमेंट फी जमा करा.
 • तुमचे पेमेंट स्टेटस वेरीफाय करा.
 • आणि लास्ट तुम्ही पेमेंट केलेली पावती डाऊनलोड किवा प्रिंट करून ठेवा.

अशा रीतीने तुम्ही तुमचे ड्रायविंग लायसेंस हरवले असेल तर ड्यूप्लिकेट ड्रायविंग लायसेंस काढू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणारी कागदपत्रे

 • घरचा पत्ता असणारे ओळखपत्र: मतदान कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, तुम्ही इन्कम टॅक्स भरलेला असेल तर त्याची पावती, लाइट बिल्ल किवा लाइट बिल्ल घेतलेले कनेक्शन याची पावती, राशन कार्ड, एत्यादी
 • वय प्रमाणपत्र: हे तुमचे वय माहीते करून घेण्यासाठी लागते तुम्ही 18 वर्ष पेक्षा जास्त वय आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये तुम्ही शाळेचा दाखला, 10 वीचे बोर्ड सर्टिफिकेट, पॅन कार्ड, कोर्ट ध्वारे दिले गेलेले जन्म तारखेची एफिडेविट, एत्यादी.
 •  आयडी प्रूफ: यासाठी तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, राशन कार्ड यापैकी कोणतेही एक याचा वापर करू शकता.
 • ज्यांचे ड्रायविंग लायसेंस बनवायचे आहे त्याचे दोन आयडेनटिटी साइज फोटो
 • ज्यांचे ड्रायविंग लायसेंस बनवायचे आहे त्यांचे सही, ही ऑनलाइन अपलोड करण्यासाठी लागते त्यामुळे स्कॅन केलेली असावी.
 • भारतातील काही राज्यामध्ये सही आणि फोटो लागत नाहीत.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *