नवीन व्यवसाय कोणता करावा

नवीन व्यवसाय कोणता करावा, कोणताही व्यवसाय हा लहान किवा मोठा नसतो तो एक व्यवसाय असतो. आज जास्त करून लोक व्यापार करण्यास पसंत करतात कारण की व्यवसायमध्ये तुम्ही स्वता: एक बॉस असता व ना तुम्हाला कुणा दुसर्‍याच्या हाताखाली काम करावे लागत नाही. या अगोदर आपण ज्या महिला घरी आहेत व घरी बसून काम करण्याचा विचार करत असतात त्यांना घरगुती व्यवसाय महिलांसाठी कोणते आहेत ह्या विषयी माहिती करून घेतली आहे. 

आज या लेखामध्ये आपण व्यवसाय म्हणजे काय? हे समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शनया विषयी ही माहिती घेणार आहोत. तसेच तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतात, व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करायचा यासाठी नवीन व्यवसाय कोणता करावा हे खाली काही व्यवसायांविषयी माहिती दिली आहे. 

नवीन व्यवसाय कोणता करावा

व्यवसाय म्हणजे काय?

व्यवसाय ही संस्था (Organization) किंवा व्यावसायिक संस्था (Enterprising entity) आहे जी कमर्शियल, इंडस्ट्रियल किंवा प्रॉफेश्नल क्रियाकलापांमध्ये गुंतलेली असते. व्यवसाय ना-नफा संस्था असू शकतात किंवा ते नफेखोर संस्था असू शकतात जे चॅरिटेबल मिशन पूर्ण करण्यासाठी कार्य करतात किंवा सामाजिक कारण पुढे करतात.

व्यवसाय हा एक Occupation, प्रॉफेशन किंवा व्यापार आहे, किंवा ही एक कमर्शियल अॅक्टिविटी आहे ज्यामध्ये नफ्याच्या बदल्यात वस्तू किंवा सेवा प्रदान करणे समाविष्ट असते. व्यवसायातील नफा म्हणजे पैसेच असे नसतात.

व्यवसाय मार्गदर्शन

वरती आपण व्यवसाय म्हणजे काय? याची माहिती किवा व्याख्या थोडक्यात समजावून घेतली. आता आपण एखादा नवीन व्यवसाय कोणता करावा व नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन समजावून घेणार आहोत.
कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या सहा स्टेपनी  सुरवात करायला पाहिजे. 

1. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय आयडिया

कोणताही नवीन बिजनेस किवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या मनामध्ये खूप सारे विचार आणि आयडिया येत असतात. यासाठी तुम्हाला एक नवीन आणि वेगळी आयडिया शोधावी लागेल जेणेकरून आपण एक चांगला व्यवसाय सुरू करू शकू.

2. मार्केट रिसर्च करणे 

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयडिया नुसार मार्केट रिसर्च करावा लागेल. यातून तुम्हाला हे माहीत होईल की मार्केट मध्ये त्या प्रॉडक्टची मागणी आणि सप्लाय किती आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल. जर का हे तुम्ही यशवीरित्या करू शकला तर तुम्हाला  भविष्यात व्यवसायमध्ये चांगला फायदा होईल.

3. व्यवसाय किवा बिजनेस प्लान तैयार करणे 

तुम्ही एक चांगली बिजनेस आयडिया आणि मार्केट मध्ये त्या बिजनेस विषयी चांगला रिसर्च केला असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसाया बद्धल बिजनेस प्लान तैयार करावा लागेल. यामध्ये तुम्ही व्यवसायासाठी खर्च किती लागेल, मॅनपॉवर, मटेरियल, जागा, एत्यादींचा विचार करावा लागेल. जेव्हा हे सगळ तुम्ही एका पेपर मध्ये लिहाल त्यावेळी तुम्हाला खूप नवीन काही शिकायला भेटेल व एक चांगला व्यवसाय सुरू करण्यास तुम्हाला मदत होईल.

4. व्यवसाय कौशल्यांवर काम करा 

तुमच्या मनामध्ये एक विचार येत असतो तो म्हणजे नवीन व्यवसाय कोणता करावा व आपल्या व्यवसायला व्यवसाय मार्गदर्शन कोण करेल. यासाठी तुम्हाला जो व्यवसाय सुरू करणार आहे त्या विषयी माहिती असायला पाहिजे व माहिती नसेल तर तुम्हाला व्यवसाय कौशल्यांवर काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला सेल्स मार्केटिंग, फायनॅनष्यल मॅनेजमेंट, अकाऊंटिंग, लीडरशिप, प्रॉब्लेम स्लोविंग, एत्यादी. नवीन गोष्टी शिकून घाव्या लागतील. व हे सगळे नवीन कौशल्य ऑनलाइन फ्लॅट फॉर्म वरती तुम्हाला भेटून जाईल.

5. व्यवसाय रजिस्टर करणे 

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या व्यवसायचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर तुम्ही कोणतेही कंपनी किवाऑर्गनाइज़ेशन सुरू करायची असल्यास त्यासाठी तुम्हाला त्याचे लायसेंस आणि पेरमिट्स असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला अप्लाय करावे लागेल.

6. तुमच्या व्यवसायला मार्केट मध्ये लॉंच करा 

वरील सगळे टप्पे पूर्ण केल्यावर लास्ट टप्पा तो म्हणजे तुमच्या व्यवसाय मार्केट मध्ये लॉंच करणे. हा तुमच्यासाठी एक चांगला टप्पा आहे कारण की तुमच्या मनामध्ये नवीन व्यवसाय कोणता करावा ते व्यवसाय रजिस्ट्रेशन पर्यत्न तुमच्या मनामध्ये आपलेले सगळे टप्पे पूर्णपणे कंप्लीट केलेले असतात.

नवीन व्यवसाय कोणता करावा

वरती आपण व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसाय मार्गदर्शन या विषयी माहिती घेतेली,  आपल्या मनामध्ये नेहमी विचार येत असतात ते म्हणजे नवीन व्यवसाय कोणता करावा तो व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला फायदा होईल का?, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल कोठून आणणार एत्यादी.
आता आपण नवीन व्यवसाय कोणता करावा याविषयी काही आयडिया बगणार आहोत.

1. ट्रॅवल एजन्सि 

एक यशस्वी ट्रॅव्हल एजंट तो असतो जो इतरांना सहजतेने आणि सोयीने प्रवास करु शकतो. यासाठी तुम्हाला काही सर्टिफिकेट घ्यावे लागतील आणि एक चांगले ऑफिस बनवावे लागेल कारण की लोक जेव्हा फिरायला जातात तेव्हा ते कोणत्याही लफड्यात आपण पडणार नाही असा विचार करून  चांगल्या ट्रॅवल एजन्सि ध्वारे टिकिट बूक करत असतात.
यामध्ये तुम्ही ट्रवेल्लिंग, हॉटेल बूकिंग, एत्यादी सगळ्या सुविधा घेण्यास लोक पसंत करतात. यासाठी तुम्हाला जगामधील त्या ठिकानांची माहिती असणे गरजेचे आहे जिथे लोग फिरायला जाणार आहेत. हा सध्या नवीन व्यवसाय कोणता करावा यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.

2. वीडिंग प्लॅनर 

प्रत्येक जन आपल्या घरामध्ये एक चांगल्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडवा याचा विचार करत असतो. यासाठी शहरामध्ये लोग वीडिंग प्लॅनर याची नियुक्ती करण्यास पसंती करतात. त्यासाठी त्याला एक चांगली रक्कम पे करण्यास लोक तैयार असतात.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधण्याच्या प्रक्रियेस सामान्यत: कार्यक्रम नियोजन (इवेंट प्लॅनर) असे संबोधले जाते त्यामध्ये बजेट, वेळापत्रक, साइट निवड, आवश्यक परवानग्या घेणे, वाहतूक व पार्किंगचे नियोजन करणे, स्पीकर्स किंवा मनोरंजन करणार्‍यांची व्यवस्था करणे, सजावट व्यवस्था करणे, कार्यक्रमाची सुरक्षा, केटरिंग, समन्वय यांचा समावेश असू शकतो.
वीडिंग प्लॅनर बनन्यासाठी तुमच्याकडे मॅनपॉवर असणे गरजेचे आहे जे लग्न समारंभामधील काम सजतेने पार पडतील. हा सध्या नवीन व्यवसाय कोणता करावा यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

3. केटरींगचा व्यवसाय 

एक कॅटरिंग व्यवसाय अत्यंत यशस्वी, आनंददायक आणि परिपूर्ण होऊ शकतो. या व्यवसायात, आपण आपल्या खाण्यावर आणि लोकांवर प्रेम करता तेव्हा आपण ग्राहकांना संतुष्ट करू शकता. आपल्याला भोजन आणि आवडत असल्यास ग्राहकांना त्यांनी मागितलेलेच मिळेल याची खात्री करुन घ्यायला आवडत असल्यास कॅटरिंग व्यवसाय सुरू करणे निवडा. नवीन व्यवसाय कोणता करावा यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.
आज लोकांकडे जास्त वेळ आणि मॅनपॉवर नसल्याने जेवणाचे सगळे काम हे केटरींग एजन्सिला देण्यास लोक पसंत करतात. हा व्यवसाय सुरू करण्यास तुमच्याकडे एक टीम आणि थोडे पैसे असल्यास तुम्ही सजतेने हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला सुरवातीला याची अॅडवरटाजिंग करावी लागेल. यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा उपयोग करून जाहिरात करू शकता.

4. चहा, कॉफी शॉप आणि फास्ट फूड

चहा, कॉफी शॉप आणि फास्ट फूड ही एक असा व्यवसाय आणि जो शहरामध्ये आणि त्याच बरोबर गावामध्ये डोळे झाकून सुरू करण्यासारखा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला चांगली जागा, प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. या व्यवसाय तुम्ही कमी खर्चामध्ये सुरू करू शकता. एकदा का लोकांना तुमच्या आयटमची चव लागू लागली की हा व्यवसाय खूप तेजी मध्ये चालू शकतो. नवीन व्यवसाय कोणता करावा यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.
जस-जशे जग पुढे जात आहे तस-तसे चहा, कॉफी आणि फास्ट फूड खाण्यास लोकांची पसंती वाढत चालली आहे. यूट्यूबचा उपयोग करून तुम्ही नव-नवीन आयडिया शिकू शकता. आणि तुमचा एक सक्सेसफुल व्यवसाय सुरू करू शकता.

5. ब्लॉगिंग 

ब्लॉगिंग हा एक अतिशय चांगला आणि सुरक्षित ऑप्शन आहे. जे लोक नवीन व्यवसाय कोणता करावा याचा विचार करत आहेत त्यांना हा एक चांगला पर्याय आहे. ब्लॉगिंग मध्ये पैसे कामवण्यासाठी तुम्हाला खूप शिकावे लागेल आणि टाइम द्यावा लागेल. एक सुकेस्स्फुल ब्लॉगर महिनाला लाखो रुपये कमवत आहेत.
ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त मॅनपॉवर आणि भांडवल याची गरज पडत नाही. तुम्ही स्वता: हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय फ्री मध्ये किवा 4 ते 5 हजार रुपयामध्ये सुरू करू शकता. ब्लॉगिंग बिजनेस सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असायला पाहीजे.
कोणत्या विषयावर ब्लॉग सुरू करायचा यासाठी मराठी ब्लॉग या होम पेज वेबसाइट मध्ये मराठी ब्लॉग टोपीक्स तुम्ही पाहू शकता.

6. फिलिएट मार्केटिंग

फिलिएट मार्केटिंग ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखाद्या संबद्ध व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीची किंवा कंपनीच्या उत्पादनांच्या विक्री करून कमिशन मिळवने. फिलिएट मार्केटर केवळ त्यांच्या आवडत्या उत्पादनाचा शोध घेतो, नंतर त्या उत्पादनास प्रोत्साहन देतो आणि त्यांनी केलेल्या प्रत्येक विक्रीतून नफ्याचा एक तुकडा मिळवितो.
फिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रणालीचा उपयोग करून तुम्ही प्रॉडक्टची विक्री करू शकता. यामध्ये तुम्ही ब्लॉगिंग ध्वारे लोकांना त्या प्रॉडक्टची माहिती देत असता. तुम्हाला चांगले लिहता येत असेल तर तुम्ही एक चांगला ब्लॉगर व त्याच बरोबर एक चांगला फिलिएट मार्केटर बनू शकता. यामध्ये तुम्हाला तोडी मेहनत घ्यावी लागेल.
फिलिएट मार्केटिंग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. जे लोक नवीन व्यवसाय कोणता करावा याचा विचार करत आहेत त्यांना हा एक चांगला पर्याय आहे. वरती आपण ब्लॉगिंग म्हणजे काय हे माहिती करून घेतले तुम्ही तुमच्या ब्लॉगला फिलिएट मार्केटिंग ध्वारे monetization करू शकता.

7. डिजिटल मार्केटिंग एजन्सि 

डिजिटल मार्केटिंग, ज्याला ऑनलाइन मार्केटिंग देखील म्हटले जाते, डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट, मोबाइल डिव्हाइस, सोशल मीडिया, सर्च इंजिन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर चॅनेलचा वापर. जे लोक नवीन व्यवसाय कोणता करावा याचा विचार करत आहेत त्यांना हा एक चांगला पर्याय आहे.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे तुम्ही कस्टमर पर्यत्न पोहचणे. डिजिटल मार्केटिंग हे एक व्यापक फील्ड आहे, ज्यात ईमेल, कंटेंट मार्केटिंग, सर्च प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि बरेच काही द्वारे ग्राहकांना आकर्षित करणारे केंद्र आहे.
ही एक नवीन फील्ड आहे, ह्या मध्ये तुम्ही एक ट्रेनिंग सेंटर सुरू करून लोकांना डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती देऊ शकता. ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी थोडे भांडवल तुमच्याकडे असणे गरजेचे आहे किवा भांडवल नसेल तर तुम्ही ऑनलाइन क्लाससेस रेकॉर्डिंग करून विकू शकता.

8. फ्रीलान्सिंग

फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतंत्ररित्या काम करणारे कामगार त्याला एका विशिष्ठ कामासाठी नियुक्त करणे. एक उदाहरण घायच झाल्यास तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग साइटसाठी एक चांगले आर्टिकल लिहायचे आहे त्यासाठी तुम्ही एक freelancer अपॉईंट करू शकता.
जर तुमच्याकडे कोणतेही स्किल असेल तर तुम्ही ऑनलाइन freelancing वेबसाइट वरुण कामे घेऊ शकता. यामध्ये तुम्ही वेबसाइट डिजायनिंग, कंटेंट रायटींग, लोगो बनवणे, ट्रान्सलेट करणे, सॉफ्टवेअर डेवलपमेंट एत्यादी बरेच कामे तुम्ही ऑनलाइन घेऊ शकता.

9. इंटिरियर डिजायनिंग 

घराचे सजावट करणे कुणाला आवाढत नाही, प्रत्येकाला आपल्या स्वतनातले एक चांगले घर असावे असे वाटते. त्यासाठी लोक खूप पैसे खर्च करण्यास तैयार असतात. इंटिरियर डिजायनिंग हा एक असा कोर्स आहे जो कोन्ही ही करून आपला व्यवसाय किवा नौकारी मिळवू शकतो.

10. डांस सेंटर

तुम्ही एक चांगले डांसर किवा कोरीओग्राफर (Choreographer) असाल तर जागा भाड्याने घेणून तुम्ही डांस सेंटर सुरू करू शकता. किवा तुम्हाला डांस येत नसेल तर तुम्ही डांस teachers ला भाड्याने ठेवून डांस सेंटर सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या डांस सेंटरची जाहिरात करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

11. योगा क्लाससेस 

योगाचे ज्ञान आणि सर्व ‘योग आसन’ करण्याची सवय हे चांगल्या योग प्रशिक्षकाचे गुण आहेत.रोज योगा केल्याने सर्व तनाव आणि स्ट्रैस कमी झालेले जगभरात तुम्ही पाहिलेले आहे. योग प्रशिक्षकांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जास्त मागणी आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शून्य गुंतवणूक आवश्यक आहे. नवीन व्यवसाय कोणता करावा यासाठी एक चांगला ऑप्शन आहे.

12. अन्य व्यवसाय किवा बिनभांडवली व्यवसाय

अन्य काही व्यवसाय आहेत ज्यांची आपण नावे माहिती करून घेऊया, कारण की प्रत्येक व्यवसाय विषयी डीटेल मध्ये माहिती घेत राहिल्यास आर्टिकल खूप मोठे होईल व तुम्ही बोर होताल. जे कोणी नवीन व्यवसाय कोणता करावा याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी खलील लिस्ट फायदेशीर आहे.
 •  मेडिकल स्टोर
 • ऑटोमोबाइल रेपाइर आणि ऑटोमोबाइल पार्ट्स
 • पाणी पुरी स्टॉल
 • एड्युकेशन ब्रोकर
 • कोचिंग सेंटर
 • Nursery स्कूल
 • सायबर कॅफे
 • किराणा दुकान
 • इंग्लिश क्लाससेस
 • जिम सेंटर
 • ई बूक सेल्लर
 • अकाऊंटिंग
 • फ्लॉवर डेकोरेशन
 • जनरल स्टोर
 • वेबसाइट डेवलपमेंट
 • ब्युटि पार्लर
 • संगणक दुरुस्ती सेंटर
 • कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर
 • फोटोग्राफी
 • फॅशन डिजायनर
 • शेअर मार्केट
 • मेणबत्ती बनवणे
 • कूरियर सर्विस
 • फिश फरमिंग
 • पौल्ट्री फरमिंग
 • सलून
 • गिफ्ट स्टोर
 • लौंडरी दुकान
 • कार्ड पेंटिंग काम
 • सेक्युर्टी एजन्सि
 • ज्यूस शॉप
 • पिशव्या बनवणे
 • ड्रायविंग स्कूल
 • पत्रावळ्या आणि द्रोण बनवणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *