पीएफ ऑनलाइन आवेदन | PF Online Application

पीएफ ऑनलाइन आवेदन, जर का तुम्हाला काही कारणाने पैसे काढायचे आहेत तर तुम्ही ऑनलाइन घरी बसून पीएफ ऑनलाइन आवेदन करू शकता. कारण की आज आपल्याला ऑफलाइन पीएफ काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही कंपनी सोडल्यानंतर 1 महिन्यांनंतर 75% पैसे काढू शकता. आणि त्याच्या 1 महिन्यानंतर राहिलेली 25% रक्कम काडू शकता.
आज आपण या लेखामध्ये पीएफ ऑनलाइन आवेदन मध्ये पीएफ ऑनलाइन कसा काढायचा, पीएफ काढण्यासाठी फॉर्म कोणते भरावे लागतात. आणि मैन म्हणजे पीएफ काढण्यासाठी अटी कोणत्या आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. 

पीएफ ऑनलाइन आवेदन

पीएफ ऑनलाइन आवेदन करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. 
स्टेप 1: ऑनलाइन लॉगिन करण्यासाठी ईपीएफओ वेबसाइट वर क्लिक करा  पेज ओपन झाल्यानंतर तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि Captcha भरून Sign in वरती क्लिक करा.
पीएफ ऑनलाइन आवेदन
स्टेप 2: तुमच्या समोर एक पेज ओपेन होईल त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती दिसेल. तुमचा UAN नंबर, नाव, जन्म तारीख, एत्यादी. वरती “Online Services” मध्ये “Claim (Form-31, 19, 10c & 10D)” वरती क्लिक करा.
FORM31: हा जर का तुम्ही कंपनी मध्ये काम करत असाल आणि काही कारणाने पीएफ काढण्याचा विचार करत असाल तर हा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो.
FORM 19: तुम्ही काही कारणाने कंपनी सोडली असेल व तुम्हाला फायनल सेट्टलमेंट करण्यासाठी फॉर्म 19 भरावा लागेल
FORM 10C & 10D: तुमच्या अकाऊंट वर पेंशनची जी रक्कम जमा झालेली आहे ती काढण्यासाठी फॉर्म 10C आणि 10D तुम्हाला भरावा लागतो.
पीएफ ऑनलाइन आवेदन
स्टेप 3: नंतर तुमचा बँक अकाऊंट नंबर कोम्फोर्म करून घ्या. तुम्ही जो अकाऊंट नंबर पीएफ अकाऊंट मध्ये वेरीफाय करून घेतला आहे तोच अकाऊंट नंबर भरा.
पीएफ ऑनलाइन आवेदन
स्टेप 4: तुमच्या समोर एक “WARNING: Certificate of Undertaking” हे पेज ओपेन होईल. यामध्ये ‘तुम्ही जो अकाऊंट नंबर भरला आहे, त्या अकाऊंट वर तुमची पीएफची रक्कम जमा करण्यात येईल व  मला ते मान्य आहे’ हे म्हंटले आहे.
तुमचा अकाऊंट नंबर बरोबर असेल तर “Yes” वर क्लिक करा.
पीएफ ऑनलाइन आवेदन
स्टेप 5:  अकाऊंट नंबर वेरीफाय झाल्यानंतर “Proceed For Online Claim” वरती क्लिक करा.
स्टेप 6: नंतर खाली “I want to apply for” वरती तुमच्या करेंट पीएफ स्टेटस वरुण तुम्हाला फॉर्म दिसतील, त्या नुसार तुम्ही फॉर्म 31, फॉर्म 19 किवा फॉर्म 10C & 10D पैकी एक सिलेक्ट करा.
स्टेप 7:  नंतर सिलेक्ट सर्विस वरती कंपनी सिलेक्ट करा.
स्टेप 8: तुम्हाला पीएफ काढण्यासाठी एक कारण द्यावे लागेल खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कोणतेही एक कारण सिलेक्ट करा.
लक्षात असू द्या जर तुम्ही फॉर्म 31 भरून पीएफ काढत असाल तर “Outbreak of pandemaic” हे कारण द्या तुमचा पीएफ सेट्टल लगेच होऊन जाईल.
स्टेप 9: खाली तुम्ही किती रक्कम काडणार आहे ती रक्कम भरून घ्या.
स्टेप 10: नंतर तुमचा “Employee Address” मध्ये तुम्ही जो पत्ता दिला आहे किवा आधार कार्ड मध्ये जो पत्ता आहे तो भरून घ्या.
स्टेप 11: तुम्हाला अकाऊंट नंबर वेरीफाय करण्यासाठी पासबूक किवा चेकची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल ज्यामधे तुमचे पूर्ण नाव असले पाहिजे. नाव नसेल तर पीएफ कॅन्सल होण्याचे चंकेस आहेत. पीएफ ऑनलाइन आवेदन
ही पूर्ण माहिती भरल्यानंतर 2 ते 3 वर्किंग डेज मध्ये पीएफ तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होईल.

पीएफ काढण्यासाठी अटी 

  • पीएफचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनी मध्ये कमीत कमी 6 महीने काम करावे लागते.
  • पीएफ चे पैसे रिटायरमेंट नंतर काढला जाऊ शकतो. जेव्हा तुमचे वय 55 वर्ष पेक्षा जास्त असेल तर  ईपीएफओ तुम्ही रिटायर झाला आहे हे मानतो.
  • तुमच्या अकाऊंट मधील रक्कम मेडिकल एमर्जन्सि, COVID 19 पेंडेमिक, घर विकत घेण्यासाठी किवा हायर शिक्षण घेण्यासाठी तुम्ही पीएफ काढू शकता.
  • ईपीएफओ रिटायरमेंटच्या अगोदर 90% रक्कम काढण्यास परवानगी देते.
  • तुमच्या अकाऊंट वरुण पूर्ण रक्कम काढली जावू शकते, जर का तुम्ही रिटायरमेंट च्या अगोदर बेरोजगार झाला असेल तर.
  • नवीन नियमांनुसार बेरोजगारिनंतर 1 महिन्यांनातर 75% पैसे काढू शकता.

पीएफ काढण्यासाठी फॉर्म 

1. पीएफ फॉर्म 31
पीएफ ऑनलाइन आवेदन, कोणतेही व्यक्ती कंपनीमध्ये काम करत असताना काही कारणाने पीएफ काढण्याचा विचार करत असेल तर त्यांना पीएफ फॉर्म 31 भरवा लागतो. जर तुम्ही कंपनी सोडली असेल किवा कंपनी मधून तुम्हाला काढून टकले असेल तरीही तुम्हाला पीएफ काढण्यासाठी पीएफ फॉर्म 31 भरवा लागतो.
2. पीएफ फॉर्म 19 
हा फॉर्म फॉर्म तुम्ही कंपनी सोडली असेल फायनल सेट्टलमेंटसाठी पीएफ फॉर्म 19 तुम्हाला भरावा लागतो. तसेच तुम्ही रिटायर झाला असेल तरीही तुम्हाला  पीएफ फॉर्म 19 भरावा लागतो.
3. पीएफ फॉर्म 10C & 10D 
तुमची पेंशन रक्कम काढण्यासाठी पीएफ फॉर्म 10C & 10D भरावा लागतो.

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *