मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | Fish Farming Business

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती (Fish Farming Business), आज आपल्या भारतामध्ये जेवढ्या प्रमाणात मास्यांची गरज आहे तेवढे मासे उपलब्ध नाही यामुळे भारत सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 60% पर्यत्न अनुदान देते, कारण की मासे हे खाण्याबरोबर ईतर औषधासाठी ही ह्यांची गरज आहे ह्यामुळे ह्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

ह्या लेखामध्ये डीटेल मध्ये हयाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जसे की ह्याची सुरवात कशी करायची, ह्यासाठी लागणारा खर्च, एत्यादी.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

मत्स्य पालन म्हणजे मासे पाळून याची देख रेख करून ते मासे मोठे झाल्यानंतर बाजारात विकणे आणि ह्या व्यवसायामध्ये 5 ते 10 पट नफा मिळवणे होय. 

मासे पालन व्यवसाय हा विविध प्रकारे व पद्धतीने केला जाते आणि यावर मिळणारा नफा हा अवलंबून आहे. आज बाजारामध्ये मास्यांची खूप मागणी आहे हे आपल्याला माहीत असेलच, कारण की जेव्हा आपण मार्केट मध्ये मासे विकत घ्यायला जातो त्यावेळी चौकशी केल्यावर आपल्याला समजेल की हे लोग मासे कोठून आणतात आणि आपल्याला हा व्यवसाय करायला पाहिजे का नाही ते.

हा व्यवसाय आपण शेतीला जोड धंदा म्हणून सुद्धा करू शकतो तसे बागायला गेले तर कोणेही ह्याची सुरवात करू शकतो.

मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया 

खाली आपण एक नवीन मत्स्य पालन व्यवसाय सुरू कश्या प्रकारे करता येईल हयाविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत. 

1. मत्स्य पालन व्यवसाय विषयी माहिती गोळा करणे 

एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्यांदा त्या व्यवसायाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपण मस्य पालन हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती आणि ट्रेनिंग घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण आसपास जिथे हा व्यवसाय केला जातो त्या ठिकाणी विजिट देऊन त्याविषयी माहिती गोळा केली पाहिजे.

जसे की टॅंक बनवण्याची प्रक्रिया, मास्यांची पिल्ले कोठे बेटतात, यासाठी खाद्य, मासे कुठे विकले जातात, मस्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या समस्या येतात याविषयी माहिती घेतली पाहिजे. ही सगळी माहिती आपण मिळवल्यानंतर आपण जेव्हा हा व्यवसाय सुरू कराल त्यावेळी आपल्याला कमी खर्च, कमी नुकसान आणि चांगला फायदा होऊ शकतो.

2. जागेची निवड 

जागेची निवड करण्याअगोदर आपण कोणत्या पद्धतीने मस्य पालन करणार आहे हे ठरवले पाहिजे. आज मस्य पालन विविध प्रकारे केले जाते जसे की बायोफ्लोक मस्य पालन, पिंजरा मस्य पालन, कुत्रीम तळे बनवून मस्य पालन, एत्यादी. जागेची निवड करण्याअगोदर ह्याचा विचार करणे गरजेचे आहे.

आपण कोणत्या पद्धतीने मस्य पालन करणार आहे हे ठरविल्यानंतर त्यानुसार जागा निवडली पाहिजे जी हवेशीर असली पाहिजे कारण की मस्य पालन करताना वातावरण आणि जागेचा खूप फरक पडतो. जास्त थंडी असले तर मास्यांचे वाढ होण्यास वेळ लागतो.

3. तळ्याची बांधणी 

तळ्याची बांधणी आपण वरती ठरविल्यानुसार कोणत्या पद्धतीने मस्य पालन करणार आहोत त्यानुसार आपण करू शकता. जेव्हा आपण तळ्याची निरमीती करतो त्यावेळी आपण ड्रेनेज सिस्टम चांगली बनवण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यकते नुसार पाइपलाइन, ऑक्सिजन निर्मातीसाठी पाइप लाइन, एत्यादी करून घेतले पाहिजे. 

4. मास्यांची खरेदी आणि देखभाल 

आज आपल्या भारतामध्ये लहान मास्यांची पिल्ले ही वेस्ट बंगाल आणि अंधारप्रेदेश ह्या ठिकाणावरून जास्त करून मागवली जातात. तसेच तुम्ही आपल्या जवळ कोठे बेटतात हयाविषयी माहिती घेणून मागवु शकता.

मास्यांची देखभाल करण्यासाठी त्यांना अन्न देणे घरजेचे आहे व हे अन्न प्रोटीन युक्त असले पाहिजे कारण यामुळे मास्यांची वाढ फास्ट होते. मास्यांसाठी उरलेले अन्न, फळे, किवा धान्य दिले तर मास्यांची वाढ होत नाही आणि त्यामुळे तळे खराब आणि आपला टाइम वाया जातो.

5. मास्यांची विक्री 

मास्यांची विक्री आपण आवश्यकतेनुसार करू शकतो जसे की लोकल मार्केट किवा एखाद्या व्यापर्‍याला यानुसार आपण यांची विक्री करू शकतो.

मासेपालनाचे प्रकार 

1. पिंजरा पद्धत (cage system)

या प्रकारची पद्धत समुद्र, तलाव आणि नदीमध्ये केली जाते, यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज पडत नाही म्हणजेच सुरवातीचा खर्च (शेड खर्च, तलाव उभारणीचा खर्च, मासे विकत घेण्याचा खर्च, एत्यादी).

यामध्ये फक्त आपल्याला ज्यावेळी मासे पकडायचे आहेत त्यावेळी आपल्याला थोडा खर्च करावा लागतो. या पद्धतीमध्ये आपल्याला समुद्रामध्ये किवा नदीमध्ये मासे पकडून बाजारात विकावे लागतात. यामध्ये मासे पकडण्याचा खर्च थोडा जास्त आहे ईतर पद्धतीपेक्षा.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

2. कृत्रिम तलाव बनवून (Making Artificial Pond)

आपण आपल्या शेतामध्ये पानी साठवण्यासाठी एखादे शेततळे उभारले असेल तर आपण त्यामध्ये मासे सोडून मत्स्य पालन व्यवसाय करू शकतो, यामुळे आपला डबल फायदा होईल. किवा आपण मत्स्य पालन व्यवसाय करायचा असल्यास एक कृत्रिम तलाव बनवून हा व्यवसाय सुरू करू शकतो.

तसेच या व्यवसायमध्ये खर्च थोडा जास्त आहे यामध्ये आपल्याला तळे उभारण्याचा खर्च, ऑक्सिजन, तलावाला सावली देण्याचा खर्च, मासे विकत घेणे, मास्यांना खाद्य देणे, एत्यादी. यामध्ये मेहनतीचा खर्च जास्त आहे पण चांगल्या प्रकारचे आणि आपल्याला हवे तसे मास्यांचे उत्पादन आपण करू शकतो.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

3. बायोफ्लोक मस्य पालन (Biofloc Fish Farming)

बायोफ्लोक मस्य पालन मध्ये एक लहान 5 ते 10 मिटर व्यासचे (diamater)  गोल आकाराचे तले बनवले जाते 1 मिटर उंचीचे आणि त्यामध्ये मस्य पालन केले जाते, ही एक इस्रायल बेस नवीन टेक्निक आहे आणि याचा आज जास्त प्रमाणात उपयोग आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो.

यामध्ये एक लहान आकाराचे तले बनवण्यासाठी 20 हजार रुपये पर्यत्न खर्च येतो. आपल्याला कमी पैसे गुंतवणूक करून बायोफ्लोक मस्य पालन व्यवसाय करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे व आपल्याला यामध्ये सुरवातीला माहिती बेटेल व नुकसान खूप कमी होईल.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

4. घरी किवा बंद खोलीत मस्य पालन (Indoor Fish Farming)

आज आपल्या भारतामध्ये नवनवीन टेक्निकचा वापर करून मस्य पालन केले जाते त्यामध्येच एक आहे आपल्या घरी किवा बंद खोलीत मस्य पालन. यामध्ये एका बंद खोलीत मस्यांना राहण्यासारखे वातावरण करून मस्य पालन केले जाते.

हे ही वाचा 

मत्स्य व्यवसाय कायदा

ऐतिहासिक कायदे आणि नियम

1. ब्रिटिश युग मत्स्यव्यवसाय कायदा 1897 (British Era Fisheries Act 1897)

प्रामुख्याने या कायद्यामध्ये विष आणि स्फोटकांचा वापर करून मासे मारी करणे हा गुन्हा आहे. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास माशांना विष देणे किंवा स्फोटके वापरुन त्यांना ठार मारणे हे आपल्या आरोग्यासाठी अस्वस्थ ठरेल आणि प्रभावित भागात माशांचे भविष्य नष्ट करेल.

2. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 (Environment Protection Act 1986)

भोपाळ दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला हा कायदा स्थानिक, राज्य आणि फेडरल एजन्सींना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि मानवांना आणि इतर सजीवांना होणारे धोके टाळण्यासाठी एकत्र काम करण्याची चौकट प्रदान करणारा कायदा आहे. भोपाळ दुर्घटनेला जगातील सर्वात वाईट औद्योगिक आपत्तींपैकी एक मानले जाते. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड प्लांटमध्ये गॅस गळतीमुळे 2,00 हून अधिक लोकांचा त्वरित मृत्यू झाला आणि अखेरीस हजारो लोक मारले गेले आणि जखमी झाले.

3. पाणी प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1974 (Water Prevention and Control of Pollution Act 1974)

उद्योग, शेती आणि घरगुती स्त्रोतांद्वारे पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. मुख्य उद्दिष्टे प्रदूषण रोखणे आणि नियंत्रित करणे आणि जलाशयांचे पुनर्संचयित करणे, प्रदूषणाच्या पातळीचे मूल्यांकन करणे आणि प्रदूषकांवर परिणाम निर्माण करणे हे होते.

4. वन्यजीव संरक्षण कायदा (1972)  (Wildlife Protection Act 1972)

शेती, शहरीकरण आणि उद्योगामुळे वन्यजीवांचे अधिवास नष्ट झाले किंवा गंभीरपणे निकृष्ट झाले. हा कायदा वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी मदत करण्यासाठी लिहिले गेले होते. वन्य प्राण्यांच्या व्यापाराशी संबंधित स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कायदे आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी स्थापन करणे.

वर्तमान कायदे आणि नियम (Current Laws and Regulations)

कायदे बनवण्याची जबाबदारी संघीय आणि राज्य सरकारांमध्ये विभागली गेली आहे. ऐतिहासिक कायद्यांव्यतिरिक्त राज्ये मत्स्यपालन आणि जल आणि जलमार्गांच्या प्रदूषणाशी संबंधित कायदे करू शकतात.

भारत सरकारने 2006 मध्ये राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ सुरू केले ज्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

  • तलाव आणि टाक्यांमध्ये मत्स्यपालन
  • जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसाय विकास
  • कोस्टल एक्वाकल्चर
  • खोल समुद्रात मासेमारी आणि ट्यूना प्रक्रिया

माशांची नावे मराठी

1. तिलपिया मासे 

तिलपिया हा गोड्या पाण्यातील मासा आहे जो पाळणे खूप सोपे आहे. हा मासा वेगाने वाढतो आणि पुनरुत्पादन करते आणि उबदार पाण्यात सर्वोत्तम राहतो. ह्या मास्याला लैंगिकदृष्ट्या प्रौढ होण्यासाठी अंदाजे दोन वर्षे लागतात.

टिलापिया पोसणे सोपे आहे कारण ते फायटोप्लँक्टन, एकपेशीय शैवाल आणि झूप्लँक्टनवर खातात, जे लहान प्राणी किंवा अपरिपक्व मोठ्या प्राण्यांना संदर्भित करतात. या प्रकारच्या मत्स्यपालन करण्यासाठी आपल्याकडे विविध प्रकारचे तलाव आहेत, परंतु व्यावसायिक मासेपालन करण्यासाठी जमिनीवर तलाव बांधणे गरजेचे आहे.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

 

2. कॅटफिश मासे 

जर आपल्याला लगेच मास्यांची वाढ हवी असले तर कॅटफिश पाळणे हा एक चांगला ऑप्शन आहे. हे मासे आपळण्यासाठी कमी मेहनत आणि लहान किवा मोठ्या आकाराचे तलाव असले तरी आपण ह्याचे पालन करू शकतो.

जर तुम्हाला मासे हवे असतील जे तुम्ही लवकर कापणी कराल, तर कॅटफिश शेती तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे. त्यांना थोड्या प्रयत्नांची आवश्यकता असते आणि मोठ्या आकाराचे तलाव आदर्श असले तरीही ते कोणत्याही आकाराच्या तलावामध्ये पाळले जाऊ शकतात. हा सर्वात देखभालीयोग्य माशांपैकी एक आहे आणि आज बाजारात त्याला खूप मागणी आहे.

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती

3. रोहू मासे 

रोहू मासे खार्‍या पाण्यामध्ये आढळतात, ह्यांचे शरीर बोटीच्या आकाराचे असते त्यामुळे ह्यांना पाण्यात तरंगणे सोपे जाते. हे मासे खाण्यासाठी उडीसा, बिहार, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल आणि आसाम मध्ये आढळतात. 

4. अन्य मासे 

  • कटला मासे
  • सिल्व्हर कार्प मासे
  • कॉमन कार्प मासे
  • ग्रास कार्प मासे
  • मृगल मासे

पानी निरीक्षण करण्याची उपकरण 

मासे पाळण्यासाठी आपण पाण्याचा PH वॅल्यू 7-8 असली पाहिजे ह्यामुळे मास्यांना शुद्ध पाणी बेटेल. ह्यासाठी तुम्ही इंडिया मार्ट वरुण किवा लोकल मार्केट मधून उपकरण विकत घेऊ शकता.

मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा खर्च 

मत्स्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरवातीला तळे बनवण्यासाठी 30 ते 50 हजार रुपये खर्च येतो. नंतर पानी, लाइट, खाना पिणे का खर्च, एत्यादी मिळून 1.5 लाख रुपया पर्यत्न खर्च येतो. म्हणजेच जवळ जवळ 2 लाख रुपया पर्यत्न तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

मत्स्य पालन व्यवसायातून किती फायदा होतो. 

आपण ह्या व्यवसायमध्ये जेवढे पैसे गुंतवणूक कराल ह्याच्या तिप्पट तुम्हाला नफा होऊ शकतो. हा नफा हा आपल्या कामावर, मार्केटिंग करण्यावर, मास्यांची देखभाल करण्यावर अवलंबून आहे.

मत्स्य व्यवसाय योजना

केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार मत्स्यव्यवसाय क्षेत्रात 25,000 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे. सागरी क्षेत्रात मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि छोट्या मच्छीमारांना भेडसावत असलेल्या समस्या दूर करण्यासाठी सरकारकडून अनेक तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या योजनेअंतर्गत 5 वर्षात अतिरिक्त 70 लाख टन मासे तयार केले जातील. यामुळे माशांची निर्यात दुप्पट होऊन 1,00,000 कोटी रुपये ईतकी होईल. ही योजना मत्स्य उत्पादनात जो गॅप आहे तो भरून टाकण्याबरोबरच उत्पादकता, तंत्रज्ञान, आधुनिकीकरण आणि मूल्य साखळीचे बळकटीकरण, ट्रेसिबिलिटी, गुणवत्ता इ. वाढवेल.

मत्स्य पालन व्यवसायाचे फायदे 

1. भारतामध्ये मास्यांची डिमांड रोज वाढत आहे आणि ह्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. तसेच विदेशात सुधा ह्याची डिमांड आहे.

2. ह्यासाठी कमी खर्च आणि फायदा जास्त आहे.

3. भारत सरकार मस्य पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60% सब्सिडि देते.

हे ही वाचा 

 

About The Author

7 thoughts on “मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | Fish Farming Business”

  1. hi
    rushi ovhal here

    pls guide me for this project i am intrested in this project i have total 2 ekr of land

    mo no 9096672882

  2. मला हा व्यवसाय करायचा आहे माहिती पाहिजे आहे

  3. Madhuri gosavi

    मला मत्स्य पालन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याविषयी मला माहिती हवी आहे

    1. Details मध्ये माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या मस्य पालन व्यवसायला भेट द्या

  4. मला मत्स | व्यवसाय करायचा आहे मला माहिती द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *