द्रोण पत्रावळी व्यवसाय माहिती | Paper Plate Business Information

द्रोण पत्रावळी व्यवसाय माहिती

आपल्या महाराष्ट्रा मध्ये पूर्वी पासून लग्न सोहळ्यामध्ये आणि मंदिरातील प्रसाद-महाप्रसादासाठी जेवणामध्ये द्रोण पत्रावळीचा वापर केला जातो. पण वृक्षतोडीचा समस्येमुळे पानांचा पासून तयार केलेले द्रोण आणि पत्रावळी आज काल जास्त वापरात नाही त्याला पर्याय म्हणून प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा द्रोण पत्रावळी वापरात येऊ लागल्या पण शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरावर बंदी आणली. त्यामुळेच कागदापासून बनवलेले द्रोण आणि पत्रावळी यांचा वापर आता वाढला आहे.

हे वजनाने हलके असल्याकारणाने सहल किंवा प्रवासामध्ये हे वापरण्यास अगदी सोयीस्कर वाटते. आजकाल आपण जर नीट लक्ष देऊन निरीक्षण केले असेल तर तुमच्या पण लक्षात आले असेल की नाश्ता सेंटर सारख्या बर्‍याच ठिकाणी वडा पाव, समोसे, दाबेली असले पदार्थ दुकानदार कागदाचा प्लेट मधेच देतात. याचे खूपसारे फायदे आहेत जस की दुकानदारांना प्लेट धुण्याची गरज नाही भासत त्यामुळे स्वच्छता राहते आणि या प्लेटांची अगदी सहज विल्हेवाट लावता येत असल्याने प्रदूषण नाही होत.

पेपर प्लेट आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या आकारात मिळून जातात. तर तुमचा लक्षात आल असेलच की द्रोण आणि पत्रावळी बनवण्याचा व्यवसायात किती संधी उपलब्ध आहेत. आज आपण याच व्यवसाया बद्दल अजून थोडी सविस्तर माहिती घेऊ. हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीत अगदी सहज सुरू करता येऊ शकतो. पण त्याआधी बाजारात असलेली याची मागणी, व्यवसाय सुरू करण्यास लागणार एकूण भांडवल आणि लायसन्स याबद्दलची पूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.

द्रोण पत्रावळी व्यवसाय माहिती

व्यवसाय सुरू करण्याआधी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

सर्वात आधी तर तुम्हाला ते बाजार निवडावे लागतील जिथे तुम्ही तुमचं उत्पादन विकणार आहात. लोकांच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन प्लेट बनावाव्या लागतील सोबतच गुणवत्तेकडे पण खास लक्ष द्यावे लागेल. तुम्ही तुमच्या आसपासचा छोट्या मोठ्या दुकानात, हॉटेल्समध्ये आणि फूड स्टॉल वर जाऊन त्यांचाशी चर्चा करून तुमचा व्यवसाय आणि उत्पादना बद्दल सांगू शकता याने तुमचा विक्रीत वाढ होईल.

व्यवसाय करताना आपल लक्ष हे नफ्यावर असले पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उत्पादनाच्या गुणवत्तेवर तडजोड करावी. तुम्ही जो कच्चा माल वापराल त्याचा गुणवत्तेवर पूर्ण लक्ष दिल तर साहजिकच तुमचं उत्पादन पण उत्कृष्ट दर्जाचे बनणार.

द्रोण पत्रावळी व्यवसाया साठीचा आवश्यक परवाना

आपला व्यवसाय किती जरी छोटा असला तरी त्याची नोंदणी करणे आवश्यक असते. याने पुढे कोणतीही अडचण येत नाही. आमचा सल्ला असा राहील की तुम्ही तुमचा व्यवसायाचा नावाने एका ब्रॅंडची नोंदणी करून घ्यावी याने व्यवसाय वाढीसाठी खूप मदत होते. त्यासोबत पुढे व्यवसाय वाढवण्यास आवश्यकता भासल्यास कोणत्याही बँककडून त्वरित कर्ज देखील उपलब्ध होईल. म्हणून व्यवसायाची आणि ब्रॅंडची नोंदणी आवश्यक आहे.

द्रोण पत्रावळी साठीचा आवश्यक कच्चा माल कुठून घ्यावा?

आम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे काही आवश्यक गोष्टी ज्याला आपण कच्चा माल बोलतो त्या आहेत. 

उत्कृष्ट गुणवत्ते चे प्रिंटेड PE पेपर

बॉटम रील

ऑनलाइन द्रोण पत्रावळी चा कच्चा माल साठी खालील लिंक वर क्लिक करा :

https://dir.indiamart.com/impcat/paper-plate-raw-material.html

ऑनलाइन द्रोण पत्रावळी चा मशीन साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:

https://dir.indiamart.com/pune/paper-plate-making-machine.html

द्रोण पत्रावळी बनविण्यासाठी लागणार्‍या मशीन

या व्यवसायातील जास्तीत जास्त काम हे मशीनवर अवलंबून आहे. भारतात कुठेही या मशीन मिळून जातात. आता नक्की कोणती मशीन घ्यायची हे तुमचा उपलब्ध भांडवला वर अवलंबून आहे. तुम्ही अगदी छोटी आणि कमी उत्पन्न काढणार्‍या मशीन पासून सुरवात करून आधी या व्यवसायाचा अनुभव घेऊ शकता आणि मग हळूहळू भांडवल वाढवून मोठ्या क्षमतेची मशीन घेऊन व्यवसाय वाढवू शकता.

सेमी औटोमेटिक मशीन दहा हजार ते तीस हजारच्या दरम्यान मिळून जातात. फुल्ली औटोमेटिकमध्ये सिंगल डाय आणि डबल डाय अशा दोन प्रकारचा मशीन उपलब्ध असतात. सिंगल डायची किंमत चालीस हजार पासून तर डबल डायची किंमत सत्तर हजार पासून सुरू होते.

द्रोण पत्रावळी व्यवसाय सुरू करण्यास लागणारे एकूण भांडवल

या व्यवसायाला सुरू करण्यास लागणारे एकूण भांडवल हे तुम्ही घेतलेल्या मशीनवर अवलंबून आहे. जर तुम्ही सेमी औटोमेटीक मशीन घेतली तर तीस-चाळीस हजार मध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करता येईल पण जर फुलली औटोमेटीक मशीन खरेदी केली तर सत्तर ते नव्वद हजारच भांडवल आवश्यक असेल. यात आपण तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे अस गृहीत धरलं आहे. जर जागा उपलब्ध नसेल तर त्याच भाडं हे अतिरिक्त असेल.

द्रोण पत्रावळी बनविण्याची प्रक्रिया

पत्रावळी बनविण्यासाठी सर्वात आधी कच्चा कागदाला प्लेटच्या आकारात कापावं लागतं. फुल्ली औटोमेटीक मशीनमध्ये हे काम डायद्वारे केल जात. त्यानंतर कागदाचा जेवढा भाग जास्तीचा शिल्लक आहे त्याला कापून योग्य आकार द्यावा लागतो.अशा प्रकारे मशीनच्या क्षमतेनुसार तुम्ही पत्रावळी बनवू शकता. डायमध्ये बदल करून तुम्ही पत्रावळीला वेगवेगळे आकार आणि डिझाईन देऊ शकता.

यानंतर तुम्ही बनवलेल्या पत्रावळी आकार आणि संख्येनुसार त्याची विभागणी करून आकर्षक पॅकिंग करावी.

व्यवसाय सुरू झाल्यानंतर मार्केटींग

व्यवसायात यशस्वी होण्याकरीता आणखी एक महत्वाची गोष्ट आवश्यक असते ते आहे मार्केटींग. म्हणजेच आपल्या व्यवसायाची आपल्या मालाची जाहिरात. इथेच बरेच जण मार खातात. एका नवीन ब्रॅंडला बाजारात स्थिरवताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो. आपण बनविलेल्या वस्तूंचा खप हा वाढवता आला पाहिजे यानेच व्यवसायात वाढ होते. त्यासाठी कोणत्या तरी एका व्यक्तीने पूर्ण मार्केटींगची जबाबदारी घेऊन डिस्ट्रिब्युटर आणि ठोक बाजारातील व्यवसायिकांना भेटून त्यांचापर्यंत आपल्या उत्पादनाची माहिती आणि वैशिष्ट्य सांगितली पाहिजेत आणि याचा प्रचार करायला हवा.

द्रोण पत्रावळी व्यवसायात होणारा नफा

व्यवसायात नफा मिळवण्यास वस्तूंची योग्य किंमत ठरवणे आवश्यक असते. तुमचे उत्पादन विकून आलेल्या एकूण रकमेतून तुमचा कच्चा माल, विजेचा खर्च, जागेच भाडं, कामगारांचा पगार, मार्केटींगमध्ये झालेला खर्च इत्यादि वजा करून जे शिल्लक राहील तो तुमचा नफा असतो. पण ती किंमत योग्य आहे का आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा कमी किंवा तेवढी तरी आहे याची पडताळणी करावी. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अगदीच पहिल्या महिन्यापासून तुम्ही नफ्यात असणारच अस नाही. व्यवसाय स्थिरावण्यास पुरेसा वेळ द्यावा लागतो. म्हणून सुरवातीची आकडेवारी पाहून निराश नका होवू.

द्रोण पत्रावळी व्यवसायात येणार्‍या अडचणी

आता आपण एवढी छान छान आणि आत्मविश्वास वाढवणारी माहिती घेतली पण आता जाता जाता हा व्यवसाय सुरू केल्या नंतर येणार्‍या अडचणी पाहू. या अडचणी सांगण्याचा उद्देश हा तुम्हाला फक्त सावध करणे आहे.

आपण सर्व जणांनी ऐकलं असेलच की ‘परिवर्तन संसार का नियम है’. प्रत्येक व्यवसायात हा नियम लागू पडतोच. द्रोण पत्रावळीचा व्यवसायात पण हा नियम लागू पडतो. आम्ही सुरवातीलाच सांगितलं की आधी द्रोण पत्रावळी या झाडांचा पानांचा पासून तयार केले जायचे पण नंतर वृक्षतोडीचा समस्येमुळे याच उत्पादन कमी झालं. नंतर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा प्लेट्स बनविल्या जाऊ लागल्या पण प्रदूषणाचा समस्येमुळे सरकारने यावर बंदी आणली.

कागदाचा द्रोण पत्रावळी मध्ये सध्या तरी कोणती अडचण नाही पण याला लागणारे पाणी आणि यातून निघणारे सांडपाणी ही मोठी समस्या आहे. सोबतच कागद बनविण्यासाठी देखील वृक्षतोड करावीच लागते.पर्यावरण प्रेमींचा कडून इथे पण विरोध होवू शकतो.

अशा प्रकारे जर तुम्ही काही गोष्टींची पूर्तता केली आणि दूरदृष्टी ठेवून जर हा व्यवसाय केला तर कमी गुंतवणुकी मध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता आणि एकदा का तुम्ही यात स्थिरावल तर तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकता.

तुमचा व्यवसायाला आमचाकडून खूप खूप शुभेच्छा.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *