पोल्ट्री व्यवसाय माहिती, मार्गदर्शन, पोल्ट्री शेड खर्च

पोल्ट्री व्यवसाय माहिती | अंडी उत्पादन व्यवसाय | देशी कोंबडी पालन माहिती | कोंबडी पालन अनुदान | पोल्ट्री शेड खर्च मराठी | पोल्ट्री उद्योग

नोकरी करण्यापेक्षा कोणताही व्यवसाय लहान नाही, मग त्यामध्ये कृषी वर आधारित व्यवसाय (शेळी पालन किवा दूध व्यवसाय) किवा एखादा वडापाव, चहाचा गाडा असो, यामध्ये तुम्ही स्वताचे मालक असता व तुम्हाला दुसर्‍याच्या हाताखाली काम करावे लागत नाही. असे भरपूर व्यवसाय आहेत की जे तुम्ही कमी खर्चामध्ये सुरू करू शकता.

आज आपण पोल्ट्री व्यवसाय माहिती या लेखाअंतर्गत पोल्ट्री व्यवसाय कसा सुरू करावा स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेणार आहोत. तसेच यासाठी किती खर्च लागतो, याचे फायदे कोणते आहेत एत्यादी विषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत.

पोल्ट्री व्यवसाय माहिती

पोल्ट्री व्यवसाय माहिती

आज आपल्या देशामध्ये लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे लोकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. व आज लोक व्यवसाय करण्यास पसंत करत आहेत. मागील काही वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय खूप तेजीत चालला आहे. हा व्यवसायामध्ये आज शिक्षण झालेले तरुण लोक उतरत आहेत. कारण की तुम्ही एकदा का हा व्यवसाय तेजीत सुरू केला तर या यामध्ये खूप फायदा आहे.

कोंबडी पालन हे मांस आणि अंडी यासाठी केले जाते. एक कोंबडी वर्षातून 180 ते 270 अंडी देते. आणि लहान पिल्ले जनमल्या पासून 5 ते 6 महिन्यात अंडी द्यायला सुरवात करतात.

जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यास सुरवात करता त्यावेळी तुम्हाला याविषयी माहिती नसते व नुकसान होऊ शकते. यासाठी या व्यवसाय विषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही जवळच्या पोल्ट्री फार्मला विजिट देऊन याविषयी माहिती घेऊ शकता. 

पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याअगोदर ह्या घोष्टीविषयी माहीती असणे गरजेचे आहे. 

 • अंड्याची उत्पादन प्रक्रिया
 • ब्रॉयलर पुनरुत्पादन प्रक्रिया
 • लागणारे उपकरणे
 • मार्किटिंग विषयी माहिती 
 • जाहिरात तंत्र
 • व्यावसायिक जमीन किंवा जागेची माहिती
 • पॅकेजिंग माहिती आणि लागणारा खर्च

कोंबडी जाती | कोंबड्यांचे प्रकार 

आज भारतामध्ये विविध प्रकारच्या कोंबड्या आढळतात. पण आज जास्त करून तीन प्रकारच्या कोंबड्यांचे पालन केले जाते, यामध्ये लेयर कोंबडी, बॉयलर कोंबडी आणि देशी कोंबडी. यांविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेऊया. 

1. लेयर कोंबडी 

या कोंबडीचा उपयोग अंड्यासाठी केला जातो, लेयर कोंबडी 4 ते 5 महिन्यांनंतर अंडी देण्यास सुरवात करते आणि जवळ जवळ 1 वर्षापर्यत्न अंडी देते. 16 महिन्यानंतर ही कोंबडी मांससाठी विकली जाते.

2. बॉयलर कोंबडी  

याचा उपयोग मांससाठी केला जातो. बॉयलर कोंबडीची दुसर्‍या कोंबड्यापेक्षा लवकर वाढ होते. यांचा उपयोग मांस विक्रीसाठी केला जातो.

3. देशी कोंबडी

देशी कोंबडीचा उपयोग अंडी आणि मांस दोन्हीसाठी केला जातो.

हे ही वाचा 

 पोल्ट्री व्यवसाय कसा सुरू करायचा | कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन

वरती आपण पोल्ट्री व्यवसाय विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नवीन पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागते याविषयी आपण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया. 

स्टेप 1: व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्याविषयी माहिती मिळवा. 

कोणत्याही व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता त्यावेळी त्या व्यवसाय विषयी माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला जवळच्या फार्मला भेट देणे. त्या फार्मचे जे मालिक आहेत त्यांच्याकडून डीटेल मध्ये माहिती घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळच्या पोल्ट्री फार्मला बेट द्या. यामध्ये तुम्ही जर 100 कोंबड्या पाळण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी जागा किती लागतो. कोंबड्याची पिल्ले कुठे उपलब्ध होतात, त्यांना खायला काय लागते, त्याची अंडी आणि कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर कुठे विकता येतील, एत्यादी. विषयी माहिती जाणून घ्या. 

स्टेप 2: जागेविषयी माहिती  

जस बागायला गेले तर एका कोंबडीला 1 ते 1.5 sqft एवढी जागा लागते. तुम्ही 100 कोंबड्या पाळण्याचा विचार करत असाल तर 100 ते 150 sqft आणि 1000 कोंबड्या पाळण्याचा विचार करत असाल तर 1000 ते 1500 sqft. एवढी जागा लागते. हे झाल कोंबड्यांच्या जागेविषयी.

पण तुम्ही शेड बनवण्याअगोदर ती आणि त्याच्या आसपासची जागा ही स्वच्छ, सूरक्षित आणि शहरापासून जवळ आहे का नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. तसेच शेड बनवण्यासाठी एकूण किती खर्च येईल हे ही माहीत असणे गरजेचे आहे. 

तुम्ही शहरामध्ये हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला परवानगीची गरज पडते, तसेच आसपासच्या लोकांकडून NOC (No objection Certificate) घ्यावे लागते. तुम्ही शेडची उभारणी करण्याअगोदर याची गरज आहे का हे तपासून शेडची उभारणी करा.

स्टेप 3: कोंबड्यांची निवड  

पोल्ट्री फॉर्म विषयी माहिती आणि शेडची उभारणी केल्यानंतर जो मुख्य मुदा आहे तो म्हणजे कोंबड्यांची निवड. आज भारतात तीन प्रकारच्या कोंबड्या आढळतात एक लेयर कोंबडी, बॉयलर कोंबडी आणि लास्ट गावठी कोंबडी.

वरती आपण या कोंबड्यांचे प्रकार यामध्ये याविषयी माहिती दिली आहे, यावरून तुम्ही योग्य आणि जवळचे बाजार बघून त्यांची निवड करून घ्या. 

स्टेप 4: पिल्ले विकत घेणे  

तुम्ही कोणत्या प्रकारच्या कोंबड्यांचे पालन करणार आहे हे ठरवील्यानंतर त्यांची पिल्ले कोठे मिळतील व कशाप्रकारे आणता येतील याविषयी माहिती करून घ्यावे लागेल.

हे लक्षात असू द्या जेव्हा तुम्ही पिल्ले विकत घेता त्यावेळी त्यांना कोणता रोग नाही ना याची खात्री करा. नाहीतर ते तुमच्या दुसर्‍या पिल्लांनवर याचा परिमाण होईल. आज बाजारामध्ये एका पिल्लाची किमत 30 ते 35 रुपये आहे व तुम्हाला 100 पिल्ले घेण्यासाठी 3000 ते 3500 रुपयापर्यत्न खर्च येईल. 

स्टेप 5: खाण्याची सोय  

तुम्ही पिल्लांना वेग वेगळा चारा देऊ शकता. याची वाढ लवकर होण्यासाठी धान्ये, तांदूळ हे घालू शकता. हे खूप पौष्टिक आहे त्यामुळे पिलांची वाढ लवकर होते.

तसेच पिल्लांना पानी देत असताना ते चांगले आणि स्वच्छ असले पाहिजे. कोंबड्यांना खायला दिवसा ध्या. जर तुम्ही व्यवस्थित खायला दिले तर एक पिल्लू 50 ते 55 दिवसात 1 किलो वजन देते.

स्टेप 6. कोंबड्यांना मार्केटमध्ये पोहचवणे 

ह्याची लास्ट स्टेप आहे ती म्हणजे कोंबड्यांना बाजारात विकणे. जर तुम्ही अंडी विकत असाल तर 4 ते 5 रुपये आणि कोंबडी 80 ते 85 रुपये किलो पर्यत्न विकली जाते. याची किमत सीजन नुसार बदलत राहते. 

पोल्ट्री शेड खर्च मराठी

पोल्ट्री व्यवसाय कृषी भागात खूप फास्ट मध्ये पसरत आहे, कारण की यासाठी लागणारा खर्च कमी आणि फायदा जास्त आहे. विकासाच्या प्रगतीसाठी सरकार प्रक्रिया, प्रजनन, पालन व उबवणुकीचे काम या प्रक्रियेत गुंतवणूक करीत आहे.

लहान पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी तुम्हाला 50,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. मध्यम पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी 1.5 लाख ते 3.5 लाख रुपये आणि मोठ्या प्रमाणात पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 7 लाख रुपये खर्च लागतो.

यासाठी तुम्हाला सरकार कडून अनुदान तसेच आज पोल्ट्री व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज देण्यासाठी तयार आहेत.

पोल्ट्री व्यवसायचे फायदे 

वरती आपण पोल्ट्री व्यवसाय याविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेतली, की हा व्यवसायाची उभारणी कशा प्रकारे करता येथे, यासाठी लागणारा खर्च, कोंबड्यांची निवड, एत्यादी. आता आपण एक पोल्ट्री व्यवसायाचे फायदे कोणते आहेत याविषयी माहिती करून घेऊया. 

 • तुम्हाला काम मिळते.
 • फायदा जास्त होतो.
 • काम सुरू करण्यासाठी गुंतवणूक करण्याची माहिती मिळते.
 • पैशाचा स्त्रोत निर्माण होतो.
 • पोल्ट्री व्यवसायासाठी कमी पाण्याची गरज पडते.
 • कमी वेळेत जास्त फायदा होतो.

हे ही वाचा 

Leave a Reply

%d bloggers like this: