महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Sanman Bachat Yojana Marathi | Mahila Samman Savings Certificate Scheme

भारत सरकारने आपल्या देशातील महिलांना गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने अल्पबचत योजनेअंतर्गत महिला सन्मान बचत योजना (Mahila Sanman Bachat Yojana Marathi) ही नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात.

ह्या अगोदर किवा आता महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये FD केल्यावर 7% ह्या प्रमाणे व्याज भेटते ते पण 5 वर्ष गुंतवणूक केल्यावर, पोस्ट ऑफिस मध्ये 2 वर्षे पैसे गुंतवणूक केल्यावर 6.8% ह्या प्रमाणे पैसे भेटतात.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषणेनंतर, या योजनेची अधिसूचना वित्त मंत्रालयाने जारी केली आहे, म्हणजेच आता तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ 2 वर्षात 7.5 टक्के व्याज दिले जाईल.

Mahila Sanman Bachat Yojana Marathi

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Sanman Bachat Yojana Marathi)

1 फेब्रुवारी 2023 रोजी नवीन वित्तीय वर्षाचे बजेट मांडण्यात आले त्या वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजना (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC) या नवीन योजनेची घोषणा केली. ह्या योजनेची सुरवात 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत योजना ही एक वन टाइम गुंतवणूक करण्याची योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही 1000 रुपये पासून ते 2 लाख रुपया पर्यत्न गुंतवणूक करू शकता. ह्या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करायची मर्यादा आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्यामध्ये तुम्ही इनवेस्तमेंट केल्यास तुम्हाला 7.5% ह्या प्रमाणे व्याज दर भेटते. ह्यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला इन्वेस्ट करू शकतात.

जर तुम्ही पोस्ट ऑफिस किवा बँकमध्ये आपले पैसे इन्वेस्ट करायला गेला तर 7% इंट्रेस्ट भेटू शकतो. ह्यामुळे महिलासाठी ही योजना फायदेशीर आहे.

ह्या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 पर्यत्न घेऊ शकता, म्हणजेच तुम्ही ह्या कालावधी मध्ये तुम्ही ह्यामध्ये पैसे इन्वेस्ट केल्यास तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्हाला ह्याची मॅच्युरिटी अमाऊंट भेटते.

एकदा का ही योजना सुरवात केल्यास तुम्ही मध्येच ह्याचे अकाऊंट बंद करू शकत नाही. अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाल्यास तुम्ही ह्याचे अकाऊंट बंद करू शकता.

मुदतपूर्व खाते 6 महिन्यांनंतरच बंद केले जाऊ शकते. पैसे काढण्यासाठी तुम्हाला त्यात फॉर्म-2 भरावा लागेल. अल्पवयीन मुले फॉर्म-3 भरू शकतील. 1 वर्षानंतर 40% रक्कम काढता येते.

FAQ: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Sanman Bachat Yojana Marathi )

1. ह्या योजनेचा लाभ को घेऊ शकतो. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्या योजनेचा लाभ भारतातील सर्व गटातील महिला घेऊ शकतात. ह्यामध्ये वयाची कोणतेही मर्यादा नाही.

2. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्या योजनेचे अकाऊंट कोठे ओपन करू शकतो. 

सरकार ने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेचे अकाऊंट आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये ओपन करू शकतो.

3. महिला सन्मान योजनेमध्ये किती टक्के व्याज भेटते. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ह्या योजनेमध्ये सरकारने 7.5% व्याज देण्याची घोषणा 1 फेब्रुवारी 2023 च्या बजेट मध्ये करण्यात आली आहे.

4. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्या योजनेमध्ये किती रुपये गुंतवणूक करू शकतो. 

ह्या योजनेची सुरवात आपण कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करून ह्याची सुरवात करू शकतो.

5. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्यामध्ये पैसे किती दिवसासाठी गुंतवणूक केले जातात. 

ह्या मध्ये तुम्ही 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 ह्या कालावधी मध्ये पैसे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 2 वर्षानंतर तुमचे पैसे फॉर्म 2 भरून परत घेता येतात.

6. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्यामध्ये अकाऊंट मधून बंद करता येते का. 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र-MSSC ह्या योजनेमध्ये अकाऊंट मध्येच बंद करण्यासाठी खूप कडक नियम बनवण्यात आले आहेत, पण काही विशेष परिस्थीथी मध्ये तुम्ही अकाऊंट बंद करू शकता.

  • अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाल्यावर
  • अकाऊंट होल्डरला गंभीर आजार असल्यास
  • वरील दोन ऑप्शन सोडल्यास अकाऊंट ओपन केल्यानंतर 6 महिन्यांनंतर ही बंद करू शकतो, पण तेव्हा अकाऊंट होल्डरला 2% व्याज दिले जाते.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *