Influencer Meaning in Marathi, इंफ्लुएंसर हा शब्ध आज काल खूप जास्त प्रमाणात उपयोगात आणला जात आहे, पण इंफ्लुएंसर किवा सोशल मीडिया इंफ्लुएंसर याचा अर्थ आजकाल खूप लोकांना माहीत नाही.
आज आपण सगळेच सोशल मीडियाचा उपयोग करत आहोत, आपण आपल्या रिकाम्या वेळेत सोशल मीडियाचा उपयोग करत असतो जसे की फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एत्यादी.
आज आपण सोशल मीडिया ध्वारे आपले दोस्त, नातेवाईक, सेलिब्रिटी यांच्याशी जोडले गेले आहोत. तसेच आपण सोशल मीडियाचा उपयोग फोटो किवा अन्य माहिती शेअर करण्यासाठी करत असतो.
या सोशल मीडियाच्या दुनियेत इंफ्लुएंसर हा एक शब्द खूप चर्चेत येत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर, फेसबुक इन्फ्लुएंसर वगैरे नावं अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात.
Influencer Meaning in Marathi (इंफ्लुएंसर म्हणजे काय?)
इंफ्लुएंसर ही एक अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ म्हणून ओळखली जाते व त्यांचे स्थिर अनुसरण देखील असते. लोक त्या व्यक्तीच्या मतांवर विश्वास ठेवतात आणि त्या व्यक्तीचे समाजामध्ये बरेच वजन असते. तसेच सोशल मीडियामध्ये यांचा मोठा सामाजिक प्रभाव आणि उपस्थिती असते.
इंफ्लुएंसरकडे खूप पॉवर असते व तुम्हाला जर एखाद्या प्रॉडक्ट किवा ब्रॅंडची अॅडवरटाजिंग करायची असेल तर तुम्ही इंफ्लुएंसरच्या मदतीने करू शकता.
इंफ्लुएंसर काय काम करतो?
इंफ्लुएंसर मानली जाणारी व्यक्ती म्हणून, एक इंफ्लुएंसर त्यांच्या फोललोवेर्सन खरेदी करण्यासाठी आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग करत असतो, व ही मार्केटिंग इंफ्लुएंसर सोशल मीडिया, पॉडकास्ट, न्यूजपेपर, एत्यादींचा वापर करून करत असतो. ही मार्केटिंग करण्यासाठी ब्रण्ड्स इंफ्लुएंसरला पैसे देतात.
सोशल मीडिया इंफ्लुएंसर म्हणजे काय? (What is Social Media Influencer?)
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अशा व्यक्तीला म्हणतात, ज्याचे सोशल मीडिया हँडल किंवा खाते त्याच्याशी बरेच फॉलोअर्स आहेत. ते एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा उद्योगात त्यांच्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या आधारावर त्यांनी फॉलोअर्स मिळवलेले असतात.
लोकांना त्यांच्याद्वारे शेअर केलेली पोस्ट किंवा माहिती खूप आवडते, अधिकाधिक लोकांना त्यांची माहिती आवडत असते आणि लोक ती माहिती दुसर्या व्यक्तीला शेअरही करत असतात. त्यामुळे त्यांचा मजकूर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो.
माहिती शेअर केल्याने लोक त्यांच्यावर प्रभावित होतात व त्या व्यक्तीला फॉलो करण्यास सुरवात करते, त्यामुळे फॉलोअर्समध्ये वाढ होत जाती. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आपल्या फॉलोअर्सच्या आधारे ब्रंडची आणि प्रॉडक्टची मार्केटिंग करू शकतो.
तसेच आपण हे ही म्हणू शकत नाही की सोशल मीडिया मध्ये जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती हा इंफ्लुएंसर असतो. सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची मते लोकांसाठी खूप महत्त्वाची असतात आणि ते लोकांना काहीतरी सुचवू शकतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हा लोकांना खरेदी करण्याचा निर्णय देऊ शकतो व त्यांच्यावर प्रभाव ही टाकू शकतो. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हा सेलिब्रिटीपासून ब्लॉगर किंवा व्यावसायिकापर्यंत कोणीही असू शकतो.
इंफ्लुएंसर मार्केटिंग म्हणजे काय? (What is Influencer Marketing ?)
खूप सारे ब्रॅंड आपल्या नवीन प्रॉडक्टची ब्रंडिंग करण्यासाठी इंफ्लुएंसर किवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांची मदत घेतात. व ब्रॅंड या इंफ्लुएंसर ध्वारे आपली माहिती लोकांपर्यत्न पोहचवत असतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स कंपन्यांच्या उत्पादनांचा एक प्रकारे प्रचार करतात आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये सांगतात, त्याला इन्फ्लुएंसर मार्केटिंग म्हणतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स त्यांची माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब इत्यादी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करतात. यामुळे मोठ्या संख्येने लोक त्यांच्यात सामील होतात आणि त्यांचे अनुसरण करतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स एका विशिष्ट क्षेत्रात त्यांची स्वतःची सामग्री तयार करतात. ते त्यांच्या क्षेत्रात अनुभव आणि ज्ञानाद्वारे प्रसिद्धि निर्माण करतात.
हे ही वाचा
- NGO Meaning in Marathi | एनजीओ म्हणजे काय | NGO कसे काम करते
- FASTAG Information in Marathi | FASTAG म्हणजे काय?
- ड्रायव्हिंग लायसन्स माहिती, अप्लाय ऑनलाइन, डॉक्युमेंट्स
फॅशन इंफ्लुएंसर म्हणजे काय? (What is Fashion Influencer?)
फॅशन इंफ्लुएंसरला आपण सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असेही म्हणू शकतो. कारण हे लोक सोशल मीडिया वरती माहिती शेअर करत असतात.
फरक एवढाच आहे की फॅशन इंफ्लुएंसर हा फॅशनशी रेलटेड माहिती शेअर करत असतो, व त्या रेलटेड ब्रॅंडस आपली ब्रंडिंग करण्यासाठी फॅशन इंफ्लुएंसरची मदत घेत असतात.
इंफ्लुएंसरचे प्रकार
1. मेघा इंफ्लुएंसर
मेघा इंफ्लुएंसर यांच्याकडे एक दशलक्षहून अधिक फॉलोअर्ससह असतात, मेघा इंफ्लुएंसरला आपण सेलिब्रिटी असेही म्हणू शकतो कारण की त्यांच्याकडे मिल्यनसहून अधिक फोललोवेर्स असतात.
मेघा इंफ्लुएंसर हे सोशल मेडियावर अधिक सक्रिय असतात व त्यांचे फोललोवेर्स सोशल मेडियावर जास्त हून अधिक वेळ घालवत असतात. आज काही ब्रॅंड किवा व्यक्ती आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग करण्यासाठी लाखोहून अधिक पैसे मेघा इंफ्लुएंसरला मोजण्यासाठी तयार आहेत.
2. मॅक्रो-इंफ्लुएंसर
मॅक्रो – इंफ्लुएंसर आपण 500,000 ते 1 दशलक्ष फोललोवेर्सना म्हणू शकतो. यामध्ये सेलिब्रिटी, टीव्ही anchor, प्लएर्स, आणि पॉलिटिक्स यांचा समावेश असू शकतो.
सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी ते आपल्या प्रतिष्ठेचा फायदा घेऊन आपले फोललोवेर्स वाढवत असतात, आणि ब्रण्ड्सकडून जाहिरात करण्यासाठी ज्यास्त किमतीची अपेक्षा करू शकतात.
3. मीडियम इंफ्लुएंसर
मीडियम इंफ्लुएंसर हा एक मोठा सेलिब्रिटी ग्रुप नसला तरीही ते आपल्या फोललोवेर्स कडून एक चांगला प्रतिकारक ग्रुप मानला जातो. मीडियम इंफ्लुएंसरमध्ये 50K to 500k फोललोवेर्स असतात.
4. मायक्रो इंफ्लुएंसर
मेघा इंफ्लुएंसरच्या तुलनेत मॅक्रो इंफ्लुएंसरची फोललोवेर्सची संख्या खूपच कमी असते. ब्रँड सामान्यतः या गटाला प्रतिबद्धता आणि विश्वासाच्या दृष्टीने अधिक प्रभावी मानतात.
5. नॅनो-इंफ्लुएंसर
या मध्ये सर्वात कमी फोललोवेर्स असतात, नॅनो-इंफ्लुएंसर आपल्या ब्रण्ड्सना माफक रीच देत असतात. व अशा इंफ्लुएंसरमध्ये Engagement रेट जास्त असतो.
सोशल मीडिया इंफ्लुएंसर कसे बनायचे?
सोशल मीडिया इंफ्लुएंसर बनण्यासाठी आपल्याला आपण ज्या क्षेत्रात माहिती आहे, त्याक्षेत्रात सोशल मीडिया वरती पहिल्यांदा अकाऊंट ओपन करावे लागते.
जसे की आपल्याला टेक्नॉलजी विषयी माहिती असेल तर आपण इंस्टाग्राम किवा ईतर प्लॅटफॉर्म वरती अकाऊंट ओपन करू शकतो, आणि त्याविषयी चांगली माहिती लोकांपर्यत्न पोहचवू शकतो.
सोशल मीडियावर लोकांसोबत काहीतरी असे शेअर करा की, ज्यामध्ये तुम्ही तज्ञ आहात, तुम्हाला त्या क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव आहे. तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही लोकांसोबत जे काही शेअर करता त्यात तुम्हाला स्वारस्य असणे आवश्यक आहे. तसेच आपण प्रथम आपल्या क्षेत्रातील एखाद्या विषयात तज्ञ बनले पाहिजे.
तसेच चांगला कंटेंट लिहा, लोकांपर्यत्न चांगली माहिती शेयर करा जेणेकरून लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि सोशल मीडिया वरती कंटेंट रेग्युलर पोस्ट करत रहा.
सोशल मीडिया वरती लोकांनी केलेले commends यांना रीप्लाय द्या, यामुळे तुम्ही आपले फोललोवेर्स मध्ये अॅक्टिव राहाल आणि त्यांना तुमच्यावर भरवसा होईल. तुमच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा फीडबॅक ऐका आणि त्यानुसार सुधारणा करत रहा. तुमच्या क्षेत्राशी संबंधित इतर ब्लॉग, बातम्या, मत इत्यादी वाचत राहा.
शेवटी, इंफ्लुएंसर होण्यासाठी खूप संयम, वेळ, कठोर परिश्रम लागत असते. सोशल मीडियावर लोकांशी कनेक्ट होण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. यास तुमचा बराच वेळ लागू शकतो, म्हणूनच तुम्ही या क्षेत्रात एका रात्रीत इंफ्लुएंसर बनून पैसे कमावण्याचा विचार करू शकत नाही.
हे ही वाचा