NGO Meaning in Marathi | एनजीओ म्हणजे काय | NGO कसे काम करते

NGO Meaning in Marathi, आज आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे अत्याचाराला बळी पडतात. अनेक मुले अनाथ आहेत, अनेकजण आपल्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढतात. घटस्फोट किंवा विधवा झाल्यानंतर स्त्रिया निराधार होतात, तर अनेक महिला बलात्कार किंवा अॅसिड हल्ल्यासारख्या घृणास्पद कृत्यांना बळी पडतात.

जेव्हा कोणीही या लोकांना मदत देत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे हा एकच मार्ग उरतो. आज आपल्या देशामध्ये अश्या संस्था मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. आज आपण या संस्थाविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत. 

NGO Meaning in Marathi

NGO Meaning in Marathi | एनजीओ म्हणजे काय ? (What is NGO?)

एनजीओ (NGO) ही एक गैर-सरकारी संस्था आहे जी कोणत्याही नफ्याचा विचार न करता काम करते.  तसेच ही संस्था सरकारपासून स्वतंत्रपणे कार्य करते, यालाच आपण नागरी संस्था असेही म्हणतो, या संस्था मानवतावादी कारणे किंवा पर्यावरण यासारख्या सामाजिक किंवा राजकीय ध्येयासाठी समुदाय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संघटित केल्या जातात.

1945 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या युनायटेड नेशन्सच्या चार्टरमध्ये अनुच्छेद 71 मध्ये अशा प्रकारचे बिगर-सरकारी संस्था किंवा एनजीओ असे संबोधण्यात आले होते. एनजीओची कोणतीही निश्चित किंवा औपचारिक व्याख्या नसली तरी, त्यांना सामान्यतः सरकारी प्रभावापासून स्वतंत्र नसलेल्या संस्था म्हणून परिभाषित केले जाते (जरी त्यांना सरकारी निधि मुळू शकला असला तरी).

NGO full form Marathi

NGO: Non Government Organization याचा इंग्लिश मध्ये लॉन्ग फॉर्म आहे आणि याला मराठी मध्ये आपण गैर सरकारी संघटना असे म्हणतो. 

ही अशी संघटना आहे जी सरकारच्या अंतर्गत काम करत नाही, आणि पण सरकार या संघटनांना फुंडिंग देण्याचे काम करते. या संस्था कोणत्याही नफ्याचा विचार न करता लोकांना आपली देवा देण्याचे काम करतात. 

NGO कसे काम करते?

एनजीओ कोणीही चालवू शकते का? एनजीओ ही एक व्यक्ती चालवू शकत नाही. एनजीओ चालवण्यासाठी एका पेक्षा जास्त लोकांची गरज असते.

या शाखेची सुरवात हा आपला फायदा व्हावा या उद्देशाने नाही, तर जे लोक गरजू आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी एनजीओ काम करते.

एनजीओ चालवणारा व्यक्ती हा कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी किवा याला आपण समाजसेवा असेही म्हणू शकतो. आपण अनेकदा एकले असेल की ज्यांच्यावर अॅसिड अटॅक झाला आहे त्यांना एनजीओ मध्ये ठेवले जाते आणि त्यांना तिथेच नौकारी दिली जाते.

काही एनजीओ शाखा ह्या ठिकठिकाणी जाऊन लोकांना मदत करतात.  काही स्वयंसेवी संस्था वृद्धांना आधार देतात.

एनजीओची नोंदणीही करता येते आणि नोंदणी न करताही समाजसेवा करता येते. याची नोंदणी करण्याचा फायदा हा होतो की सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते.

आज जवळ जवळ भारतात 3.2 लाख नोंदणीकृत NGO शाखा आहेत. भारतातील सर्व एनजीओ शाखा केंद्रीय सोसायटी कायद्यांतर्गत काम करतात. पण राजस्थान राज्यातील स्वयंसेवी संस्थांसाठी राजस्थान सोसायटी कायदा करण्यात आला आहे.

एनजीओ चे कामे: 

  1. गरिबांना अन्न पुरवणे.
  2. चांगले शिक्षण देणे.
  3. अशिक्षित गरीब लोकांना शिकवणे.
  4. महिलांना घरे उपलब्ध करून देणे.
  5. झाडे लावणे.
  6. जलसंधारणासाठी काम करणे.
  7. प्रदूषण रोखण्यासाठी काम करणे आणि लोकांमध्ये जंनजागृती निर्माण करणे.
  8. आदिवासींच्या समस्यांसाठी काम करत राहणे.
  9. आजारी असलेल्या लोकांसाठी काम करणे.
  10. वृद्ध आणि अनाथ मुलांना आधार देणे.

एनजीओला निधी कसा भेटतो? 

एनजीओला निधी कसा मिळतो हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण आपल्या मनामध्ये एक शंका किवा विचार येत असतो की हे लोक एनजीओ चालवण्याची पैसे कोठून गोळा करतात. तसेच तुम्ही नवीन एनजीओ करू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी फंड कसा उभा करायचा हे माहीत असणे गरजेचे आहे.

एनजीओचे वार्षिक बजेट शेकडो दशलक्ष (किंवा अब्जावधी) डॉलर्सचे असू शकते, एनजीओच्या उभारणीसाठी आणि यशासाठी निधी उभारणीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. निधी स्त्रोतांमध्ये… 

  • सदस्यत्व देणगी 
  • वस्तू आणि सेवांची विक्री
  • खाजगी क्षेत्रातील कंपन्याकडून फंड उभारणे. 
  • परोपकारी संस्था 
  • स्थानिक संस्था 
  • राज्य आणि फेडरल एजन्सींचे अनुदान 
  • खाजगी देणग्या, एत्यादी 

वैयक्तिक खाजगी देणगीदारांचा एनजीओ निधीचा महत्त्वपूर्ण भाग असतो. यातील काही देणग्या धनाढ्य व्यक्तींकडून येतात, जसे की टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना दिलेली $1 अब्ज देणगी किंवा वॉरन बफेने बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला 10 दशलक्ष doller ची देणगी. 

सरकारपासून वेगळ्या असूनही, अनेक स्वयंसेवी संस्था काम करण्यासाठी सरकारी निधीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. काही सरकारी एनजीओ निधी विवादास्पद म्हणून पाहिले जाऊ शकते कारण निधी देशाच्या विकासाच्या उद्दिष्टांऐवजी विशिष्ट राजकीय लक्ष्यांना समर्थन देऊ शकतो.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *