SEO म्हणजे काय? SEO रंकिंग फ़ैक्टर 2023

SEO म्हणजे काय? तुम्ही ह्या वेबसाइट वर विजिट दिली आहे म्हणजे तुम्ही एक ब्लॉगर किवा वेबसाइट डिजायनर आणि तुम्हाला तुमची वेबसाइट रॅंक करण्यासाठी  SEO म्हणजे काय? आणि कसे करायचे हे तुम्ही शोधत आहात.

2021 या डिजिटल मार्केटिंग आणि इंटरनेटच्या दुंनियामध्ये एसईओ हे खूप महत्वाचे आहे याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या वेबसाइट, ब्लॉग आणि e-कॉमर्स वेबसाइटला गूगल आणि अन्य सर्च इंजिन मध्ये रॅंक करू शकता. 

पण तुम्ही विचार करत असचाल हे SEO म्हणजे काय? आणि हे कसे कारायचे? ह्या लेखामध्ये आपण SEO म्हणजे काय? SEO चे टाइप कोणते आहे? SEO रंकिंग फ़ैक्टर कोणते आहेत ह्याचा विचार आपण ह्या लेखामध्ये करणार आहोत.

SEO म्हणजे काय

SEO म्हणजे काय?

SEO म्हणजे सर्च इंजिन ओप्टिमैजेशन ही एक टार्गेटेड ट्रॅफिक आपल्या वेबसाइट किवा वेबपेजवर आणण्याची प्रॅक्टिस आहे, ज्या मुळे आपल्या वेबसाइट वर क्वालिटी आणि कुयंटिटी ट्रॅफिक निर्माण होईल.

जर तुम्ही ब्लॉगिंगची सुरवात केली आहे तर तुम्हाला SEO म्हणजे काय? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये जरूर येईल कारण की बींना एसईओ गूगल मध्ये रॅंक करणे खूप कठीण आहे.

SEO म्हणजे काय

 

मी गूगल मध्ये What is SEO हे टाइप केल्यानंतर मला जे काही पगेस टॉप वरती दिसले हे तुम्ही एक एसईओ केल्यानंतर गूगल हे पगेस टॉप मध्ये रॅंक करते.

गूगल बरोबर अन्य काही सर्च इंजिन आहेत, त्यामध्ये Yahoo आणि Bing याचा समावेश होतो, यांच्या व्यतिरिक्त अन्य काही सर्च इंजिन आहेत. पण आपण जास्त करून गूगल आणि त्यानंतर Yahoo आणि Bing हे वापरत आहोत.

हे ही वाचा 

SEO टाइप्स कोणते आहेत? 

वेबसाइट टॉप पेज वर रॅंक करण्यासाठी तुम्ही तीन प्रकारे एसईओ करू शकता. ह्या लेखामध्ये आपण याची फक्त माहिती बगुया. पुढील लेखामध्ये आपण ह्या विषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेऊया.

1. ऑन पेज एसईओ 

ऑन पेज एसईओ म्हणजे तुम्ही आर्टिकल लिहीत असताना तुमच्या आर्टिकल एसईओ प्रमाणे ओपटीमाईज करणे. ह्याची एक चेक लिस्ट आहे ह्या नुसार तुम्ही तुमची वेबसाइट एसईओ ओपटीमाईज करू शकता.

2. ऑफ पेज एसईओ 

ऑफ पेज एसईओ मध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाइट मध्ये काही बदल करता येत नाहीत. ह्या मध्ये आपण आपल्या वेबसाइटसाठी काही बक्कलिंक बनवत असतो, त्यामुळे आपली वेबसाइटची एक अथॉरिटी क्रिएट होते आणि आपली वेबसाइट गूगलमध्ये रॅंक होण्यास मदत होते.  

3. टेक्निकल एसईओ 

टेक्निकल एसईओ म्हणजे मध्ये तुम्ही पेज स्पीड, मोबाइल फ्रिएंडली साइट, HTTPS चा उपयोग करणे, रोबोट. टीएक्सटी फाइल Manage करणे एत्यादी. हे काही पॉइंट टेक्निकल एसईओ मध्ये येतात.

सर्च इंजिन कसे काम करते?/ एसईओ कसे काम करते? 

सर्च इंजिन ही एक लायब्ररी आहे, आणि त्याच्या मध्ये बिल्यन मध्ये पगेस आणि वेबसाइट स्टोर केलेल्या आहेत.

सर्च इंजिन गूगल आणि अन्य ह्यांचे एक अल्गॉरिथ्म आहे जे रीयल टाइम यूजरला चांगले रिजल्ट दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.

आपण जास्त करून गूगल याचा वापर करत असतो कारण हे एक पॉप्युलर सर्च इंजिन आहे. 

गूगल आणि त्याचे अल्गॉरिथ्म कोट्यावधी मध्ये पगेस स्कॅन करून बेस्ट पगेस टॉप मध्ये दाखवण्याचे काम करते.

तुम्ही विचार करत असाल की हे बेस्ट रिजल्ट गूगल कसे शोधून काढते. यासाठी खूप सारे फॅक्टर्स आहेत.

1. पेज रीलेवंसी 

तुम्ही गूगल मध्ये टाइप केले  “केक कसा बनवायचा” तर गूगल तुमच्या समोर गूगल “2021 मध्ये ब्लॉग कसा लिहावा?” हे नाही दाखवणार. तो तुम्हाला त्या रेलटेड पगेस दाखवण्याचा प्रयत्न करेल.

SEO म्हणजे काय

 

वरती फोटो मध्ये एक चांगले उधारण दाखवले आहे, मी गूगल मध्ये “केक कसा बनवायचा” हे टाइप केल्यानंतर गूगल ने मला टॉप 5 पेजेस मध्ये यूट्यूब मधील रिजल्ट दाखवले. व मी नंतर 3 ते 4 पगेस सर्च केल्यानंतर मला “केक कसा बनवायचा” ह्या वरती एक ही असे आर्टिकल भेटले नाही.

याचा अर्थ गूगलमध्ये “केक कसा बनवायचा” हे आर्टिकल उपलब्ध नसले तरी गूगल अन्य रिजल्ट न दाखवता यूट्यूबचे पगेस तुमच्यापुढे दाखवत आहे.

2. अथॉरिटी 

अथॉरिटी म्हणजे गूगल अशी पजेस रॅंक करतो की ज्या मध्ये अचूक आणि खरी माहिती आहे.

पण गूगल हे कसे समजते की तुम्ही जे आर्टिकल लिहले आहे त्यामध्ये खरी आणि अचूक माहिती आहे?

त्यासाठी गूगल हे शोधत असते की तुम्ही लिहलेले आर्टिकल अन्य दुसर्‍या कोणत्या वेबसाइटला लिंक आहे का यालाच आपण बॅकलिंक असे म्हणतो.

SEO म्हणजे काय

म्हणजे जास्त आणि औथरीती वेबसाइट वर तुमच्या आर्टिकलला लिंक केले असेल तेवढे जास्त तुमचे आर्टिकल रॅंक होण्यास मदत होईल.

SEO म्हणजे काय

 

हे ही वाचा 

3. उसेफुल्नेस्स 

कंटेंट रेलेवेंट आणि औथरीती असेल पण कामाचा नसेल तर गूगल ते पेजेस रॅंक करत नाही.

आणि गूगलने ह्या अगोदर सांगीतले आहे की तुमचा कंटेंट कामाचा नसेल तर तो रॅंक करता येणार नाही.

एक उधारण घेण्याच झाल्यास तुम्ही गूगल मध्ये सर्च केले “पीएफ ऑनलाइन आवेदन” कसे करायचे आणि तुमच्या समोर पीएफ म्हणजे काय? पीएफचे फायदे, पीएफ मध्ये सध्या रेट ऑफ इंट्रेस्ट किती आहे? असे रिजल्ट दिसू लागले तर तुम्ही त्या पेज वरुण एक्जिट करून दुसर्‍या पेज वर विजिट द्याल.

असे झाल्यास गूगल टॉप मधील असणारी पेजेस रॅंक करत नाही आणि जी यूजरच्या रीक्वायरमेंट नुसार पेजेस आहेत ती पेजेस गूगल मध्ये रॅंक होतात.

एसईओ का गरजेचे आहे? 

तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की इंटरनेटवर रोज करोडो मध्ये पोस्ट पब्लिश होत असतात, आणि त्यामधील काही मोजक्याच पोस्ट सर्च मध्ये टॉप पेज मध्ये दिसतात.

काही पोस्ट टॉप मध्ये दिसण्याचे कारण हे आहे की गूगल किवा अन्य सर्च इंजिनचे अल्गॉरिथ्म रॅंक करायच्या अगोदर ह्या सगळ्या घोष्टी जाणून घेतो, आणि त्यानंतरच कोणत्या पोस्ट रॅंक करायच्या हे निर्णय घेतो.

गूगल नेहमी प्रयत्न करत असतो की लोकांना एक चांगली माहिती वाचायला भेटावी आणि लोकांचा गूगल वरती विश्वास निर्माण व्हवा म्हणून.

गूगल मध्ये टॉप पेजवर रॅंक करण्याची खूप काही रंकिंग फॅक्टर दिले गेले आहेत. यासाठी सर्च इंजिन ओप्टिमैजेशन गरजेचे आहे.

एक उधारण घ्यायच झाल्यास तुम्ही गूगल मध्ये “ब्लॉग म्हणजे काय?” हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जवळ जवळ 18 लाख किवा त्यापेक्षा जास्त रिजल्ट दिसतात. ही सगळी पेज स्क्रोल करून गूगल यूजर पुढे यूजफुल माहिती देण्याचे काम करत असतो. त्यामुळे एसईओ गरजेचे आहे.

SEO म्हणजे काय

 

एसईओ रंकिंग फॅक्टर

टॉप पेजवरती रॅंक करण्यासाठी गूगलचे 200 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत.

1. कंटेंट क्वालिटी 

कंटेंट क्वालिटी हा एक मेन रंकिंग फॅक्टर आहे. जर तुमची वेबसाइट गुड एसईओ ओप्टिमाईज आहे पण तुमच्या कंटेंटची लांबी 2000 शब्धापेक्षा कमी असेल तर तुमच्या वेबसाइटवर रंकिंग इफेक्ट पडेल.

प्रश्न हा आहे की क्वालिटी आणि कंटेंट किती वर्डचा असला पाहिजे?

गूगलला तुमच्या वेबसाइटवरील कंटेंट हा यूजरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा असावा. एका स्टडीमधून असे सिद्ध झाले आहे की कंटेंटची लांबी 1900 ते 2000 वर्ड मधील कंटेंट पहिल्या पोजिशन वरती रॅंक करत आहेत.

2. यूजफुल कंटेंट 

त्यानंतर तुम्ही जो कंटेंट पब्लिश केला आहे तो किती यूजफुल आहे, हे ही मेन आहे कारण की नुसत जास्त वर्ड असणारे कंटेंट गूगल रॅंक करत नाही.

तुम्ही गूगल मध्ये सर्च केले “2021 मध्ये ब्लॉग कसा लिहावा?” तर तुमच्यापुढे खूप सारी वेबसाइटची पेजेस ओपन होतील त्यामध्ये तुम्हाला दोन पेजेस दिसतील त्यामध्ये एक “2021 मध्ये ब्लॉग कसा लिहावा “आणि दुसरे “2021 मध्ये ब्लॉग कसा सुरू करावा”

SEO म्हणजे काय

 

यावरून याचा अर्थ हा आहे की यूजर गूगल मध्ये ब्लॉग कसा लिहावा? हे शोधत आहे त्याला ब्लॉग कसा सुरू करावा ह्या विषयी माहिती जाणून घ्यायची नाही. म्हणून तुमचा कंटेंट हा यूजर कुयरी नुसार यूजफुल असावा.

3. कंटेंट उनिक असावा. 

गूगल हा कॉपीराइट कंटेंट रॅंक करत नाही.

तुम्हाला पहिल्या पेज वर रॅंक करायचे असल्यास तुमचा कंटेंट हा वेगळा आणि यूजफुल असला पाहिजे, तरच तुम्ही तुमचा ब्लॉग गूगल मध्ये रॅंक करू शकतो.

तुम्ही विचार करत असाल कॉपीराइट कंटेंट गूगल का रॅक करत नाही?

समजा तुम्ही खूप मेहनत करून एक आर्टिकल गूगल मध्ये पब्लिश केले आणि दुसर्‍या व्यक्तीने तुमचे आर्टिकल कॉपी करून त्यावर बक्कलिंक बनवून रॅंक केले. तर तुम्ही हा विचार कराल की आर्टिकल लिहून काय फायदा आपण ही दुसरे आर्टिकल कॉपी करून रॅंक करूया.

याचा अर्थ गूगल मध्ये नवीन माहिती पब्लिश होणार नाही आणि नंतर लोक गूगलला विजिट देणार नाहीत.

हे ही वाचा 

4. क्रॉलिबिलिटी (Crawlability)

वरती आपण बगीतल्याप्रमाणे जो पर्यत्न तुमच्या वेबसाइट वर काय आहे हे गूगलला माहीत होत नाही तो पर्यत्न गूगल तुमची पेजेस रॅंक करत नाही.

गूगल खूप सार्‍या नवीन टेक्निकचा वापर करून तुमची वेबसाइट रॅंक करतो पण मेन कारण आहे तो म्हणजे Crawling. आणि Crawling करण्यासाठी गूगल कम्प्युटर प्रोग्राम “स्पाईडर” याचा वापर करतो.

समझा तुमच्या होमपेज वरती हाय अथॉरिटी साइटची बक्कलिंक आहे आणि ती वेबसाइट गूगल मध्ये इंडेक्स झालेली आहे.

ज्यावेळी गूगल ती साइट crawl करेल त्यावेळी तो तुमच्या साइट वरील लिंक शोधून तुमची ही वेबसाइट इंडेक्स करेल.

काही मेन पॉइंट आहे जे गूगल Crawlers करत नाही. 

1. पूअर इंटरनल लिंकिंग

गूगल आपल्या साइटवर इंटरनल लिंक आसणारी पेजेस Crawl करतो, जे पेजेस इंटरनल लिंक नाहीत ती पेजेस गूगल Crwal करत नाही.

2. Nofollowed इंटरनल लिंक

इंटरनल लिंक मध्ये nofollow टॅग असेल तर गूगल ती पेजेस Crawl करत नाही.

3. नो indexed पेजेस 

Noindex meta tag किवा HTTP header वापरुन आपण गूगलच्या इंडेक्स मधील पेजेस वगळू शकतो. आणि दुसर्‍या पेज वरती फक्त noindexed इंटरनल लिंक असेल तर गूगल ते पेजेस शोधू शकणार नाही.

4. robots.txt ब्लॉक करणे

robots.txt ही फाइल गूगलला सांगत असते की तुम्ही कोणत्या पेज वरती विजिट करा आणि कोणत्या पेज वर विजिट करू नका. तुम्ही पेजेस ब्लॉग केले असतील तर गूगल Crawl करणार नाही.

5. मोबाइल फ्रेंडलिनेस 

गूगलमध्ये 63% पेक्षा जास्त लोक हे मोबाइल डिवाइस मधून विजिट देतात आणि हा नंबर वाडत चालला आहे.

तुमच्या वेबसाइट वर मोबाइल एक्सपिरियंस पूअर असेल तर गूगल तुमची रंकिंग डाउन करतो आणि मोबाइल सर्च रिजल्ट मध्ये वारनिंग डिसप्ले करतो.

जर तुम्हाला 2021 मध्ये रॅंक करायचे असेल तर तुमची साइट मोबाइल फ्रिएंडली असली पाहिजे.

तुमची वेबसाइट मोबाइल फ्रिएंडली आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही मोबाइल फ्रिएंडली टेस्ट वरती क्लिक करून चेक करू शकता.

SEO म्हणजे काय

6. पेजस्पीड

पेजस्पीड म्हणजे तुमची वेबसाइट किती फास्ट लोड होती, हा गूगलचा रंकिंग फ़ैक्टर आहे मोबाइल आणि डेस्कटॉपसाठी.

तुम्ही विचार करत असाल असे का? आम्ही एक चांगले, क्वालिटी आणि यूजरच्या सगळ्या कुयरी दूर करत असणारे कंटेंट अपलोड करत आहोत.

जर का तुम्ही लिहलेला कंटेंट जर फास्ट ओपन नाही झाला तर यूजर एक्जिट करून दुसर्‍या साइट वर विजिट देतो.

आमझोन ने एक स्टडी मध्ये सगीतले आहे की आमची वेबसाइट 1 सेकंड लेट लोड झाली तर आम्हाला 1 बिल्यन रुपयाचा लॉस होतो.

तुम्ही तुमची वेबसाइट स्पीड चेक करण्यासाठी गूगलचा फ्री “गूगल Pagespeed Insights tool” चा वापर करून तुम्ही पेज स्पीड चेक करू शकता.

SEO म्हणजे काय

7. बॅकलिंक

बॅकलिंक म्हणजे दुसर्‍या वेबसाइटला वोटिंग देणे.

गूगल आणि अन्य दुसरे सर्च इंजिन हे तुमच्या साइट वर किती वोटिंग आहे हे शोधून काढतात आणि त्यानंतर ते तुमचे पेजेस गूगल मध्ये रॅंक करायचे आहे की नाही ते डिसाइड करतात.

समझा A ह्या साइट वर 100 बक्कलिंक आहेत आणि B ह्या साइट वर 70 बक्कलिंक आहेत. गूगल A ह्या साइटला टॉप पेज वर रॅंक करण्यास भर देईल.

SEO म्हणजे काय

 8. डोमेन अथॉरिटी 

वरती आपण बॅकलिंक ह्या विषयी माहिती बगीतली की तुमच्या साइट वर जेवढ्या जास्त बॅकलिंक असतील तेवढी तुमची साइट रॅंक होण्यास मदत होईल.

तसेच जेवढ्या जास्त बॅकलिंक असतील तेवढी तुमच्या साइट आणि डोमेनची अथॉरिटी वाढेल.

तसेच गूगल सध्या हाय अथॉरिटी असणार्‍या साइटला रॅंक करत आहे.

जर तुमची साइट हाय अथॉरिटी असेल आणि तुम्ही एखादे आर्टिकल बींना बॅकलिंक पब्लिश केले तर गूगल हे आर्टिकल लगेच रॅंक करते. 

9. अँकर टेक्स्ट 

अँकर टेक्स्ट म्हणजे एखाद्या पेज वर स्पेसिफिक कीवर्ड वरती लिंक इन्सर्ट करणे यालाच आपण बॅकलिंक असे म्हणतो. 

एक उधारण घेयच झाल्यास माझ्या “Marathi Blog” या साइट वरती एक बॅकलिंक अँकर टेक्स्ट मध्ये दिली आहे यालाच आपण अँकर टेक्स्ट म्हणू शकतो.

SEO म्हणजे काय? SEO रंकिंग फ़ैक्टर 2023

10. रीलटेड कीवर्ड

तुम्ही आर्टिकल लिहीत असताना त्या कीवर्ड रेलटेड किती किती कीवर्ड तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये समाविष्ट केले आहे हे महत्वाचे आहे.

तुम्हाला कोणत्याही एका कीवर्ड वरती रॅंक करणे मुश्किल आहे त्यासाठी रीलटेड कीवर्ड तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये समाविष्ट करा.

पहिल्या लेखामध्ये आपण “2021 मध्ये ब्लॉग कसा लिहावा” यामध्ये रीलटेड कीवर्ड कसे शोधतात हे बगितले आहे. तुम्हाला त्या आर्टिकल मध्ये सगळी माहिती वाचायला भेटेल.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *