एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

आज डिजिटल इंडियाचा जमाना आहे. आपण कोणताही प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी त्या प्रॉडक्ट विषयी पूर्ण माहिती घेऊन तो विकत घेत असतो. आज तुम्ही ऑनलाइन यूट्यूब किवा वेबसाइट वर खूप सारे विडियो आणि ब्लॉग बघितले असतील हे यूट्यूबर आणि ब्लॉगर ऑनलाइन प्रॉडक्टचे रिव्यू करून एफिलिएट मार्केटिंग ध्वारे लाखो रुपये कमवत आहेत. 

तसेच तुम्ही सोशल मीडिया आणि ईमेल मार्केटिंग याद्ध्वरे ही एफिलिएट मार्केटिंग करता येते. आज आपण डीटेल मध्ये एफिलिएट मार्केटिंग काय आहे? एफिलिएट मार्केटिंग कशी काम करते? आणि एफिलिएट मार्केटिंगची सुरवात कशी करायची? याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

 

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

एफिलिएट मार्केटिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामधे तुम्ही दूसर्‍यांचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकून कमिशन मिळवू शकता. दूसर्‍यांचे प्रॉडक्ट निवडणे, ते प्रॉडक्ट दुसर्‍यांना प्रोमोट करणे आणि स्मॅल अमाऊंट मध्ये कमिशन मिळवणे.

एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग रणनीतीचा उपयोग करू शकतो. यामध्ये आपण स्वत: ची वेबसाइट बनवून ब्लॉग ध्वारे, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, पेड अॅडवरटाजिंग, कंटेंट मार्केटिंग आणि यूट्यूबवर विडियो बनवून affiliate मार्केटिंग करू शकतो. सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम एत्यादीचा वापर करून एफिलिएट मार्केटिंग करू शकतो.

एफिलिएट मार्केटिंग कसे काम करते?

1. व्यापारी

विक्रेता, उद्योजक, व्यापारी, उत्पादन निर्माता, एत्यादींचा समावेश असू शकतो. यामध्ये घरगुती वस्तु, मेकअप सामान, इलेक्ट्रॉनिक्स व अन्य वस्तूंचा समावेश असू शकतो. तसेच ऑनलाइन क्लाससेस, सॉफ्टवेअर, होस्टिंग साइट, काही ऑनलाइन टूल जे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी उपयोगी आहेत यांचा यामध्ये समावेश असू शकतो.

2. एफिलिएट

ह्याला आपण पब्लिशर ही म्हणू शकतो. हा एक व्यक्ती किवा एक कंपनी यामध्ये काम करते. हे लोक ब्लॉग, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग एत्यादी ध्वारे प्रॉडक्टची जाहिरात करून लाखो रुपये मध्ये पैसे कमवतात.

3. ग्राहक

आपण ऑनलाइन वस्तु विकत घेण्यासाठी त्या वस्तुविषयी संपूर्ण माहिती करून घेवून ती वस्तु आपण विकत घेत असतो. एक उधारण समजून घेऊया आपण मोबाइल विकत घेण्यासाठी आपण त्याचे रिव्यू यूट्यूब, ब्लॉग किवा अन्य ठिकाणी बगुण नंतर तो मोबाइल विकत घेयचा का नाही ते ठरवतो. हे ऑनलाइन रिव्यू देण्याचे काम एफिलिएट मार्केटर करत असतो. आपण त्यांनी दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो प्रॉडक्ट विकत घेतो आणि त्यांना स्मॅल अमाऊंट मध्ये कमिशन भेटते.

4. नेटवर्क

एफिलिएट प्रोग्राम मॅनेज करणे हे सगळ्या कंपन्यांना शक्य नाही हे लोक आपले प्रॉडक्ट ऑनलाइन प्रोमोट करण्यासाठी एफिलिएट नेटवर्क कंपन्यांशी भागीदारी करतात. यामध्ये कमिशन जंक्शन, कुएलिंक एत्यादी नेटवर्क काम करत आहेत. 

एफिलिएट मार्केटिंगची संबिधीत परिभाषा

एफिलिएट

एफिलिएट याला म्हणतात की जो एफिलिएट प्रोग्राम जॉइन करून त्यांचे प्रॉडक्ट सोशल मीडिया, ब्लॉग, वेबसाइट किवा अन्य स्त्रोतचा उपयोग करून प्रोमोट करतो.

एफिलिएट मार्केटप्लेस

काही अश्या कंपनी आहेत ज्या वेग वेगळ्या कॅटेगरी मध्ये एफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात. उधारण नेटवर्किंग मार्केटिंग, सॉफ्टवेअर मार्केटिंग, प्रॉडक्ट मार्केटिंग यासाठी वेग वेगळे कंपण्यांचे एफिलिएट प्रोग्राम आहेत. 

एफिलिएट आयडी

एफिलिएट प्रोग्राम जॉइन केल्यानंतर प्रत्येक एफिलिएट मार्केटर ला एक Unique ID दिली जाते.   

एफिलिएट लिंक

एफिलिएट मार्केटर ला जो प्रॉडक्ट प्रोमोट करायचा आहे, त्यासाठी त्याला त्या प्रॉडक्ट ची लिंक दिली जाते किवा तो लिंक त्या वेबसाइट वरुण जनरेट करतो. त्या लिंक वर क्लिक करून कस्टमर दुसर्‍या वेबसाइट वर पोहचतो. ही लिंक एफिलिएट प्रोग्राम ध्वरा ट्रॅक केली जाते.    

कमिशन

कस्टमर ने प्रॉडक्ट विकत घेतल्यावर एफिलिएट मार्केटर ला काही पर्सेंटेज मध्ये कमिशन दिले जाते.

लिंक क्लोक्किंग

एफिलिएट मार्केटर लिंक जनरेट करतो या लिंक खूप मोठ्या असतात, यासाठी एफिलिएट मार्केटर यूआरएल शॉर्टनरचा उपयोग करून लिंक लहान बनवतो.

एफिलिएट मॅनेजर 

काही एफिलिएट प्रोग्राम ध्वारा एफिलिएटची मदत करण्यासाठी काही व्यक्तीची नियुक्ती केली जाते. त्या व्यक्तीला एफिलिएट मॅनेजर म्हणतात.

पेमेंट मोड 

पेमेंट स्वीकार करण्यासाठी एफिलिएट कशा ध्वारे पेमेंट रीसीव करतो. जस की पेपल, बिटकॉइन, बँक ट्रान्सफर, वायर ट्रांफर ईत्यादी.

पेमेंट थ्रेशोल्ड 

एफिलिएट प्रोग्राम ध्वारे कमीत कमी रक्कम जी आपण आपल्या बँक अकाऊंट मध्ये स्वीकारू शकतो. उधारण मी एक एबीसी नावाचा एफिलिएट प्रोग्राम जॉइन केला, त्या प्रोग्रामचा कमीत कमी पेमेंट देण्याची कंडिशन 1000 रुपये आहे.

एफिलिएट मार्केटिंगची सुरवात कशी करायची ?

1. प्लॅटफॉर्म निवड करा 

एफिलिएट मार्केटिंग सुरू करण्यासाठी दोन मुख्य प्लॅटफॉर्म आहेत एक ब्लॉग आणि दूसरा यूट्यूब. या दोन्ही पैकी कोणत्याही एका किवा दोन्हीही प्लॅटफॉर्म चा उपयोग करून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता. 

आज ब्लॉग सुरवात करणे सोपे आहे. ब्लॉग सुरवात करण्यासाठी बाजारामध्ये खूप प्रमाणात tutorial उपलब्ध आहेत, यामध्ये यूट्यूब, ऑनलाइन क्लाससेस, ए बुक्स एत्यादी. 

दूसरा प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब, यूट्यूब वर विडियो अपलोड करणे मोफत आहे. तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट चा रिव्यू यूट्यूब वर करून ग्राहकांना पटवून देऊ शकता. 

2. नीच निवड करणे 

एक चांगली नीचची निवड करण्यासाठी खाली दिलेल्या पॉइंट चा विचार करणे गरजेचे आहे व यावरून तुम्ही चांगली नीचची निवड करू शकता.  

 • प्रथम तुम्हाला कोणत्या देशाचे ट्रॅफिकला टार्गेट करणार आहे याचा आढवा घ्यावा लागेल.
 • आज एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी स्पर्धा खूप प्रमाणात वाढत आहे, त्यासाठी तुम्हाला लो कॉम्पटिशन नीच निवडावी लागेल. 
 • तसेच निवड केलेली नीच वरुण तुम्हाला पर्सेंटेज कमिशन, तसेच कन्वर्शन रेट याचा विचार करावा लागेल. 
 • या नीच वरती गूगल मध्ये सध्या किती वेबसाइट रॅंक करतात व त्या वेबसाइट बरोबर स्पर्धा करणे आपल्याला शक्य आहे का याचा विचार करावा लागेल.
 • निवड केलेल्या नीच ची मार्केट मध्ये गरज आहे का हा प्रॉडक्ट लोक किती प्रमाणात विकत घेतील हे आपल्याला माहीत असले पाइजे. 
 • आणि आपणजी नीच निवड केली आहे त्याचे एफिलिएट प्रोग्राम उपलब्धआहेत का 

3. सामील होण्यासाठी एफिलिएट प्रोग्राम शोधणे 

एफिलिएट मार्केटिंगसाठी नीच ची निवड केल्यानंतर तुम्ही नीच नुसार अफ्फिलियते प्रोग्राम शोधू शकता यासाठी तुम्हाला त्या प्रोग्राम ची टर्म्स आणि कंडिशन, मिनिमम पे आऊट, पर्सेंटेज ऑफ कमिशन एत्यादी घोष्टींचा विचार करावा लागेल.सुरवातीला आमझोन असोशिएट प्रोग्राम जॉइन करून तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करू शकता.

तसेच मार्केट मध्ये बरेच एफिलिएट प्रोग्राम आहेत. 

 1. आमझोन एफिलिएट
 2. क्लिक बँक 
 3. कमिशन जंक्शन 
 4. eBay 
 5. स्नॅपडील एफिलिएट
 6. कन्व्हर्टकिट
 7. क्युलिंक

4. वेबसाइट निर्माण करणे 

वेबसाइट निर्माण करण्यासाठी तुम्ही ब्लॉगर आणि वर्डप्रेस याचा उपयोग करू शकता.

ब्लॉगर मध्ये तुम्ही मोफत आणि कमी खर्चा मध्ये वेबसाइट निर्माण करू शकता पण यामध्ये तुम्हाला मर्यादा खूप प्रमाणात आहेत. तुम्हाला कोडिंग चे ज्ञान असणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त डोमिन बाय करून वेबसाइट बनवू शकता. 

वर्डप्रेस मध्ये तुम्हाला डोमिन आणि होस्टिंग विकत घ्यावी लागते. यामध्ये एका क्लिक वर तुम्हाला हवी अशी वेबसाइट बनवू  शकता. यामध्ये तुम्हाला  खूप सारे प्लगइन भेटतात त्यामुळे तुम्हाला वेबसाइट Customize करणे सोपे जाते. 

5. चांगले कंटेंट लिखणे

तुमची साइट रेडी आहे आणि तुम्ही affiliate प्रोग्राम जॉइन केला आहे, यानंतर तुम्हाला हाय क्वालिटी कंटेंट लिखणे गरजेचे आहे. कंटेंट लिहीत असताना या घोष्टी चा विचार विचार करावा लागेल

1. हाय क्वालिटी कंटेंट . कंटेंट लिहीत असताना आपल्या स्पर्धक पेक्षा चांगल्या गुणवत्ताचे कंटेंट आपल्याकडे असले पाहिजे जेणेकरून ग्राहकची एंगेजमेंट आणि रूपांतरण रेटमध्ये वाढ होईल    

2. कंटेंट लांबी : आपल्या स्पर्धक पेक्षा जास्त लांबी कंटेंट पब्लिश करणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचा ब्लॉग गूगल मध्ये रॅंक होण्यास मदत होईल

3. कॉपीराइट इमेज आणि कंटेंट : गूगल किवा अन्य सर्च इंजिन मध्ये कॉपीराइट किंटेंट आणि इमेज रॅंक होत नाहीत. यासाठी तुम्हाला स्वता: किवा दुसर्‍यांकडून कंटेंट लिहून घ्यावे लागेल. 

4. प्रॉडक्ट रिव्यू : कंटेंट लिहीत असताना तुम्ही त्या प्रॉडक्ट विषयी डीटेल माहिती, त्या प्रॉडक्ट चे मार्केट रिव्यू, तुलना हे तुमच्या कंटेंट मध्ये असले पाहिजे. 

6. साइट वर ट्रॅफिक आणणे 

तुम्ही एक चांगले कंटेंट लिहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाइट वर ट्रॅफिक आणावे लागेल, जेणेकरून लिंक वरती क्लिक मिळतील.

ट्रॅफिक आणण्यासाठी या तीन रणनीतीचा उपयोग करू शकता.

a. पेड ट्रॅफिक 

पेड ट्रॅफिक साठी तुम्ही PPC अड्सचा उपयोग करू शकता. याचा फायदा तुमच्या साइट वर लगेच ट्रॅफिक निर्माण होईल. पण याचा तुम्हाला तोटा ही होऊ शकतो. तुम्ही जसे पैसे अड्स वरती पैसे खर्च करत जाल तसे वेबसाइट वर ट्रॅफिक वाढत जाईल. 

b. सर्च इंजिन ओप्टिमैजेशन 

हे Organic ट्रॅफिक आहे. तुमचा ब्लॉग रॅंक होण्यासाठी टाइम लागतो. त्यासाठी तुम्हाला ऑन पेज आणि ऑफ पेज SEO  करावा लागेल. याचा मेन फायदा मंजे तुम्हाला फ्री आणि अनलिमिटेड ट्रॅफिक तुमच्या वेबसाइट वर भेटेल. 

c. ईमेल लिस्ट 

जेवढी मोटी ईमेल लिस्ट असेल तेवढे तुम्ही ट्रॅफिक बिल्ड करू शकता यासाठी तुम्हाला फक्त एक मेल यूजर ला करावा लागेल. 

CPM, CPC, RPM आणि CPS काय आहे ?

1. CPM (कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन)

आपण अ‍ॅडसेन्स किवा अन्य अ‍ॅडनेटवर्कची ad आपल्या वेबसाइट वर दाखवत असल्यास, ते अ‍ॅडनेटवर्कआपल्याला 1000 इम्प्रेशन वरती एक अमाऊंट पे केली जाते. यामध्ये यूजर ने प्रॉडक्ट विकत नाही घेतला तरी आपल्याला 1000 इम्प्रेशन प्रमाणे पैसे भेटतात.

2. CPC (कॉस्ट पर क्लिक)

यूजर तुमच्या वेबसाइट लावल्याला ad, बॅनर किवा टेक्स्ट वर प्रतेकी क्लिक प्रमाणे तुम्हाला पैसे भेटतात.

3. RPM (रेविन्यू पर 1000 इम्प्रेशन )

अ‍ॅडसेन्स मध्ये CPM आणि CPC मिळून 1000 इम्प्रेशन वरती जी अमाऊंट यूजर ब्लॉग ओनर ला भेटते त्याला RPM म्हणतात. 

4 .CPS (कॉस्ट पर sale )

जेव्हा यूजर तुमच्या लिंक वर क्लिक करून प्रॉडक्ट विकत घेतो. त्याच्या आधारे तुम्हाला कॉस्ट पर सेल प्रमाणे कमिशन भेटते.

 

7 thoughts on “एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?”

Leave a Comment