इंटरनेट म्हणजे काय| इंटरनेट कसे काम करते? | What is the Internet| How does the internet work?

इंटरनेट म्हणजे काय? आज आपण इंटरनेटचा उपयोग व्यापार, बँकिंग, आयटी सेक्टर, कम्युनिकेशन आणि टेक्नॉलजी एत्यादी सेक्टर मध्ये करत आहोत. इंटरनेट नसेल तर आपण काहीही करू शकत नाही कारण की इंटरनेट ही एक काळाची गरज बनली आहे. 

जर तुमच्या मोबाइल मध्ये 10 minute इंटरनेट बंद झाले तर आपल्याला काही तरी हरवल्या सारखे वाटते. आज आपण या लेखामध्ये इंटरनेट म्हणजे काय?, इंटरनेटचा शोध कोणी लावला?, इंटरनेटचे फायदे आणि तोटे, इंटरनेट कसे काम करते? आणि इंटरनेटचे प्रकार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.  

इंटरनेट म्हणजे काय

इंटरनेट म्हणजे काय?

इंटरनेट खूप सार्‍या नेटवर्कचे जाळे आहे जे पूर्ण जगाला संगणक ध्वारे जोडलेले आहे आणि जग भरामध्ये कम्प्युटर नेटवर्कला आदान प्रधान करते.

इंटरनेट माहिती पुरवण्याची आधुनिक टेक्निक आहे. इंटरनेटला विविध कम्प्युटर नेटवर्कचा एक जगामधील जाळे म्हंटले आहे. यामध्ये लाखो कम्प्युटर एक दुसर्‍यांना जोडले गेले आहेत.  विशेषता: कम्प्युटरला टेलीफोनला जोडले जाते.

इंटरनेट हे कोणत्याही एका कंपनी आणि सरकार यांच्या अन्डर काम करत नाही, यामध्ये खूप सारे सर्वर जोडलेले असतात. जे वेगवेगळ्या कंपनी आणि प्रायवेट शाखेचे असतात. काही म्हत्वाच्या इंटरनेट सेवा जसे की gopher, file transfer protocol, World wide web हे इंटरनेट ध्वारे माहिती देण्याचे काम करतात.

इंटरनेटचा शोध कोणी लावला? 

पहिल्यांदा इंटरनेटचा उपयोग अमिरिकी सैनिकांसाठी केला गेला होता. उद्धाच्या वेळी अमिरिकी सैनिकाना एक चांगली, मोठी आणि विश्विनीय सेवा हवी होती.

1969 मध्ये ARPANET नावाचे एक नेटवर्क जे चार कम्प्युटरला जोडून बनवले होते, तेव्हा पासून इंटरनेटची सुरवात सुरू झाली.

1972 पर्यत्न यामध्ये जवळ जवळ 4 वरुण 37 कम्प्युटर जोडले गेले. आणि 1973 पर्यत्न याचा विस्तार England मधील नार्वे या शहरापर्यत्न पोहचला.

1974 मध्ये ARPANET याला सामान्य लोकांना पर्यत्न प्रयोग करण्यासाठी घेऊन येण्यात आले, याला टेलनेट या नावाने वोळखले गेले.

1982 मध्ये सामान्य लोकांना वापर करण्यासाठी काही नियम बनवण्यात आले याला protocol म्हंटले गेले. या प्रोटोकॉलला TCP/IP (ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल/ इंटरनेट प्रोटोकॉल) याच्या नावाने वोळखले गेले.

1990 मध्ये ARPANET याला बंद करण्यात आले आणि नेटवर्क ऑफ नेटवर्क याच्या रूपामध्ये इंटरनेट बनवले गेले. सध्या इंटरनेट या माध्यमापासून लाखो ते करोडो कम्प्युटर एक दुसर्‍यांना जोडले गेले आहेत.

VSNL विदेश संचार निगम लिमिटेड ही संस्था भारतामध्ये इंटरनेटसाठी नेटवोर्कची सेवा देण्याची काम करते.

हे ही वाचा 

इंटरनेटचे फायदे आणि तोटे

वरती आपण इंटरनेट म्हणजे काय? आणि इंटरनेटचा शोध कसा लागला याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, आता आपण आपल्या जीवनामध्ये इंटरनेटचे फायदे आणि तोटे कोणते आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

इंटरनेटचे फायदे

1. ऑनलाइन बिल भरणे. 

इंटरनेटच्या मदतीने आपण ऑनलाइन घरी बसून आपले मोबाइल, लाइट बिल, इंटरनेट बिल किवा अन्य बिल भरू शकतो. आपण यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किवा यूपीआय ध्वारे आपण बिल पेमेंट करू शकतो.

2. ऑनलाइन कम्युनिकेशन 

आज आपण इंटरनेटचा उपयोग करून घरी बसून काही फोटो, विडियो किवा ईतर डॉक्युमेंट इंटरनेट ध्वारे पाठवू शकतो, यासाठी आपण सोशल मीडिया, ईमेल किवा अन्य साधंनांचा उपयोग करून महितीची देवाण घेवाण करू शकतो.

3. ऑनलाइन ऑफिस कामे

आज COVID-19 मुळे ज्या आयटी कंपन्या आहेत ते आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम काम देत आहेत. यामुळे लोक घरी बसून ऑनलाइन काम करत आहेत. इंटरनेटमुळे आज आपण ऑनलाइन ऑफिसची कामे घरी बसून करू लागलो आहोत.

4. ऑनलाइन शॉपिंग  

आज तुम्हाला माहीत असेल की आमझोन, फ्लिपकार्ड सारख्या ऑनलाइन शॉपिंग साइट वर स्वस्त आणि घरपोच सेवा दिली जाते. यामध्ये तुम्ही कोणतेही वस्तु विकत घेतली तर त्याची इंस्टॉल करण्यापर्यात्न सेवा दिली जाते हे सगळे आपण इंटरनेटमुळे करू शकलो आहे.

5. बिजनेस प्रमोशन  

तुम्ही आज इंटरनेटच्या मदतीने ऑनलाइन तुमच्या बिजनेसचे प्रमोशन करू शकता किवा दुसर्‍या एखाद्याचा बिजनेसचे प्रमोशन करून लाखो रुपये कमवू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग, एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.

6. ऑनलाइन जॉब मिळवणे. 

आज इंटरनेट मुळे तुम्ही ऑनलाइन जॉब शोधू शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये जावून चौकशी करण्याची गरज पडत नाही.

7. मनोरंजन 

आज तुमच्याकडे टीव्ही नसला तरी तुम्ही ऑनलाइन इंटरनेट ध्वारे घरी बसून करमणूक करू शकता यासाठी तुम्हाला दुसरीकडे बाहेर जाण्याची गरज पडत नाही.

इंटरनेटचे तोटे 

1. टाइम खराब होणे. 

जे लोक इंटरनेटचा उपयोग आपल्या ऑफिस कामासाठी आणि माहिती प्रदान करण्यासाठी करतात त्यांच्यासाठी इंटरनेट खूप लाभदायक आहे पण जे लोक इंटरनेटचा उपयोग फालतू कामासाठी करून आपला टाइम वेस्ट करतात त्यांच्यासाठी इंटरनेट हे धोखदायक आहे.

2.इंटरनेटसाठी पैसे खर्च होणे. 

इंटरनेट कनेक्शन आपण जेव्हा गरज असेल त्यावेळीच घेतले पाहिजे कारण की इंटरनेट हे आपल्याला फ्री मध्ये भेटत नाही, यासाठी आपल्याला महिन्याला 1000 रुपया पर्यत्न खर्च येतो. तसेच आज काल मोबाइल मध्ये ही आपण इंटरनेटसाठी 150 ते 200 रुपये प्रती महिना खर्च होत आहे. 

3. तसेच काही अन्य तोटे आहेत

 •  शोषण, पोर्ण मूवीज बगणे, फोटो वायरल करणे.
 • हॅकिंग करणे, ऑनलाइन fraud, चीटिंग. 
 • स्पॅम ईमेल पाठवून advertisement करणे. 
 • इंटरनेटची घाण सवय लागणे. 
 • जास्त इंटरनेट वापरामुळे हेल्थ इफेक्ट होणे.

इंटरनेट कसे काम करते? 

इंटरनेट कसे काम करते हे माहीत करून घेण्याअगोदर तुम्हाला वेबची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे.

सगळ्यात अगोदर आपण इंटरनेटवर डाटा ट्रान्समिशन कसे होतो म्हणजेच इंटरनेटवर तुम्ही विचारलेली माहिती एका जागेवरून दुसर्‍याजागी कशी जाते हे माहीत करून घेणार आहोत.

आपण जेव्हा google.com हे आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर ओपन करायचा प्रयत्न करतो त्यावेळी आपला कम्प्युटर हा एक क्लाईंट या पद्धतीने काम करतो, जो सर्वर गूगल उपयोग करत आहे त्याला आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देण्याचे काम करतो.

जेव्हा आपण आपल्या browser मध्ये google.com हे सर्च करतो त्यावेळी आपण कम्प्युटर यांनी क्लाईंट गूगल सर्वरला विनंती पाठवतो आणि काही सेकंडमध्ये आपल्या पुढे google.com हे पेज ओपेन होते.

इंटरनेट वर पाठवलेले massage किवा request एकाचा वेळी सेंड होत नाहीत याला वेगवेगळ्या पार्ट मध्ये विभागले जाते आणि या पार्टना नेटवर्क ध्वारे सर्वर पर्यत्न पोहचवले जाते.

आपल्या मनामध्ये एक शंका किवा प्रश्न येत असेल तो म्हणजे एकाच वेळी इंटरनेट वर लाखो ते करोडो लोक सर्च करत असतात यांनी एकाचा वेळी करोडो request सर्वरला पाठवली जाते त्यावेळी वेवेगळ्या पार्टला कसे माहीत होते की त्यांना exact कोठे जायचे आहे?

यासाठी IP अॅड्रेस याचा उपयोग केला जातो जो इंटरनेटशी जोडलेल्या प्रत्येक डिवाइसला प्रदान केला जातो त्यावरून यूजरला माहिती पुरवली जाते.

भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली? 

भारतामध्ये इंटरनेटची सुरवात 14 ऑगस्ट 1995 रोजी झाली होती पण सर्वांसाठी 15 ऑगस्ट 1995 रोजी VSNL फॉरेन कम्युनिकेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या ध्वारे सुरू करण्यात आले.

तेव्हा इंटरनेटचा उपयोग काही इम्पॉर्टंट सेवांची माहिती देवाण घेवाण करण्यासाठी करण्यात येत होता आणि त्यावेळी इंटरनेटचे स्पीड हे 8-10 kbps येवढे होते.

जेव्हा भारतामध्ये इंटेरनेटची सुरवात करण्यात आली होती त्यावेळी मात्र 20 ते 30 कम्प्युटर जोडले गेले होते आणि इंटरनेट कनेक्शनचा खर्च ही खूप जास्त होता. 8-10kbps इंटरनेट स्पीड असणार्‍या इंटरनेटचा खर्च 500-600 रुपये महिना होता. जो त्यावेळी खूप जास्त होता.

आज इंटरनेट प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये पोहचले आहे. आणि आज इंटरनेटचा उपयोग वेगवेगळ्या शाखामध्ये विविध कामासाठी केला जातो.

आपण या पॅराग्राफ मध्ये इंटरनेट म्हणजे काय? या लेखाअंतर्गत भारतात इंटरनेटची सुरुवात कधी झाली? याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटते की मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल.

इंटरनेटचे प्रकार

कम्प्युटर सिस्टम पासून इंटेरनेट जोडण्यासाठी एनआयसी, मोडेम, एत्यादी डिवाइसचा उपयोग केला जातो. तसेच याच्या बरोबर इंटेरनेट सर्विस प्रोवायडर कडून ही कनेक्शन घ्यावे लागते. इंटेरनेट सर्विस प्रोवायडर कडून जे कनेक्शन घेतले जाते त्यामुळे आपले इंटेरनेट अॅक्सेस केले जाते.

आणि यूजर त्याच्या रीक्वायरमेंट नुसार इंटरनेटचा वापर करू शकतो. आपण यामध्ये इंटरनेटचे कोणते प्रकार आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

1. डायल अप कनेक्शन

डायल उप कनेक्शन घेण्यासाठी टेलीफोन लाइन किवा मोडेम याचा उपयोग केला जातो, त्यानंतर यूजरला इंटेरनेट सर्विस प्रोवायडर ध्वारे इंटेरनेट अकाऊंट दिले जाते. इंटेरनेट अकाऊंट बनल्यानंतर इंटेरनेट सर्विस प्रोवायडर ध्वारे टेलीफोन नंबर किवा यूजर नेम आणि पासवर्ड दिला जातो.

इंटेरनेट कनेक्शन बनवण्यासाठी यूजला टेलीफोन नंबरला टेलीफोन लाइनच्या मदतीने डायल करावे लागते यामुळे याला डायल उप कनेक्शन असे म्हणतात.

सर्वर मधून कनेक्शन बनवल्या नंतर यूजला दिल्या गेलेल्या यूजर नेम आणि पासवर्ड भरावा लागतो. यूजर ध्वारे दिले गेलेले यूजर नेम आणि पासवर्ड मॅच झाल्याने इंटेरनेट कनेक्शन सुरू होते.

2. ब्रॉड बॅंड कनेक्शन  

आपण एखादा व्यवसाय करण्यासाठी डायल उप कनेक्शन फायद्याचे आहे, कारण की यामध्ये अधिक इंटेरनेट स्पीडमुळे इंटेरनेट कनेक्शन प्राप्त होत नाही. यामुळे मायक्रो वेवच्या माध्यमातून इंटेरनेट कनेक्शन उपलब्ध केले जाते, यासाठी टेलीफोन लाइनची मदत घेतली जाते. यामध्ये जास्त फ्रिक्वेन्सी वर डाटा उपलब्ध होतो. या प्रकारच्या लाइनला ब्रॉड बॅंड कनेक्शन म्हंटले जाते.

हे कनेक्शन फायबर ऑप्टिक्स, coaxial केबल किवा मायक्रो वेव यांच्या मदतीने बनवले जाते, या कनेक्शन मध्ये 64 kpbp पासून 2mbps पर्यत्न स्पीड उपलब्ध होते.

3. डिजिटल Subscriber लाइन  (डीएसएल)

डीएसएल हे एक असे कनेक्शन आहे ज्यामध्ये टेलीफोन लाइन याच्या माध्यमातून जास्त स्पीड वाले इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते. या कनेक्शन मध्ये काही टेलीफोन लाइनला यूजरसाठी नीरधारित केले जाते आणि त्या लाइनला आयएसपी सर्वरला जोडले जाते. 

ही टेलीफोन लाइन डीएसएल मोडेम याच्या सहयाने यूजरला हाय स्पीड वरती इंटरनेट कनेक्शन प्रोवाइड करण्याचे काम करते. डीएसएल मोडेम टेलीफोन लाइन मधून प्राप्त झालेले वीक सिग्नलला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्वर्ट केले जाते. 

त्याच बरोबर यूजरला फास्ट स्पीड वरती डाटा डाऊनलोड किवा अपलोड करण्याची सुविधा प्राप्त केली जाते. या प्रकारच्या कनेक्शन मध्ये यूजर 128kbps पासून 2 mbps पर्यत्न स्पीड उपलब्ध होते. 

4. Leased लाइन कनेक्शन  

हे कनेक्शन पण डीएसएल च्या बरोबर हाय स्पीड वाले कनेक्शन आहे. यामध्ये एक किवा एकापेक्षा जास्त टेलीफोन लाइनला यूजरला लांब कालावधीसाठी लीज वरती दिले जातात. ज्यामुळे यूजरला एक सारख्या स्पीड वरती इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होते. 

ही leased लाइन 24 hours ISP सर्वरला कनेक्ट राहती आणि याचा दुसर्‍या यूजरध्वारे याचा उपयोग केला जात नाही. 

5. इंटेग्रटेड subscribe डिजिटल नेटवर्क (आयएसडीएन) 

आयएसडीएन ध्वारे फास्ट इंटरनेट कनेक्शन प्राप्त होते. यामध्ये हाय स्पीड इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक्स cable चा उपयोग केला जातो. 

6. वेरी स्मॅल अपर्चर टेर्मिनल (VSAT)

कोणत्याही प्रकारच्या इंटरनेट कनेक्शनला यूजर पर्यत्न cable किवा वायर याच्या मार्फत पोहचवले जाते. या समस्याला दूर करण्यासाठी वायरलेस कनेक्शन या टेक्निकचा उपयोग केला जातो. 

VSAT ही एक अशी टेक्निक आहे ज्यामध्ये सॅटलाइटच्या माध्यमातून कम्युनिकेशन सिग्नलला यूजर पर्यत्न पोचवले जाते. यामध्ये एक आंटिना उभा केला जातो. 

इंटरनेटचा उपयोग मराठी

आज इंटेरनेट हा आपल्या आउष्याचा एक हिस्सा बनला आहे, जर काही कारणाने इंटेरनेट बंद झाले तर आपल्याला कसे तरी वाटू लागते आणि आपण त्या सर्विस प्रोवायडरला शिव्या द्यायला सुरवात करतो.

आज इंटेरनेट मुळे खूप कामे सोपी झाली आहेत आणि आपण घरी बसून ती कामे करू शकतो. यामध्ये इंटेरनेट म्हणजे काय? या लेखांतर्गत इंटरनेटचे कोणते उपयोग आहेत याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया.

 • ईमेलसाठी
 • सोशल मीडिया (Facebook, twitter, whatsupp, etc)
 • रिसर्च करण्यासाठी
 • ऑनलाइन e-बूक वाचण्यासाठी
 • न्यूज
 • ऑनलाइन बँकिंग
 • टिकिट बूकिंग
 • गेम खेळण्यासाठी
 • फाइल डाऊनलोड करण्यासाठी
 • जॉब सर्च करण्यासाठी
 • ऑनलाइन क्लाससेस
 • ऑनलाइन बिल भरणे

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *