Health tips Marathi | हेल्थ टिप्स मराठी, आपली बॉडी चांगली आणि रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण योग्य तो आहार, वेळेवर झोपणे, सकाळी लवक उठणे, हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.
या लेखामध्ये आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी Health tips Marathi | हेल्थ टिप्स मराठी दिल्या गेल्या आहेत. याचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये केल्यास आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहणास मदत होईल.
Health tips Marathi | हेल्थ टिप्स मराठी
1. सकाळ उठल्यावर कोमट पानी घ्या: स्वस्त राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पानी 3 ते 4 ग्लास घ्या, यामुळे आपल्या शरीरातील टोकसीन्स बाहेर पडतील.
2. रोज 20 मिनिटे योगा करा: रोज सकाळी कमीत कमी 20 मीनटे योगासने आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही निरोगी आणि फिट राहाल व तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही खुश राहाल.
3. सकाळी कोवळ्या उनात उभे रहा: सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे सेवन करणे हे व्हिटॅमिन-डी चा चांगला स्रोत आहे, जे शरीराची त्वचा आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी व आपल्या आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे.
4. सकाळचा नाष्टा: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट युक्त नाष्टा करा. जर तुम्ही सकाळी नाष्टा केला तर दिवसभर उत्साही राहता आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे.
5. जेवण्याच्या अगोदर कोशिंबीर खा: कोशिंबीर पचन क्रियासाठी उपयुक्त आहे. कारण की कोशिंबीर मध्ये मिनरल्सचा चांगला स्रोत आहे. जेवणाच्या अगोदर अर्था तास कोशिंबीर खाल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे.
6. जेवल्यानंतर लगेच पानी पिऊ नका: जेवल्यानंतर लगेच पानी पिले नाही पाहिजे, लगेच पानी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही आणि जठरात आग कमी होते.
7. दोन टाइम जेवणामधील अंतर: दोन टाइम जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने तुम्हाला अॅसिडिटी, वजन वाढणे यांचा त्रास जाणवु लागतो.
8. जेवण करण्याअगोदर: जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर आणि झोपण्याच्या अगोदर बाथरूमला जाण्याची गरज आहे. जेवण करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने मूळव्याद आणि साखरेचा दोखा कमी होतो, आंघोळ करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने बॉडी नॉर्मल होती आणि झोपण्याच्या अगोदर लघवी केल्याने झोप चांगली लागते.
9. आरोग्यासाठी झोप: आपल्याला कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. झोपण्याच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या बॉडीला दुरुस्त करते आणि आपल्या शरीराला आराम मिळतो त्यामुळे आपण फुल्ल चार्ज होतो.
10. जेवण्याच्या वेळी फळे टाळा: जेवण्याच्या वेळी फळे खायचे टाळा यामुळे तुमची साखर दुप्पट होईल.
11. तेल्याचे वापर: जास्त तेल आणि जड अन्न वापरू नका. भाज्या जास्त तापमानमध्ये शिजवु नका, त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो. ओव्हनचा वापर करत असताना तापमानाची विशेष काळजी घ्या. आणि आपले जेवण नेहमी झाकून ठेवा.
12. प्रोटीन उक्त जेवण घ्या: जेवणामध्ये कोशिंबीर, दही, दूध, दाळ, हिरव्या भाज्या, मसूर आणि तृणधान्ये यांचा उपयोग अवश्य करा. आपल्या प्लेट मध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ समाविष्ट करा.
13. सूर्यनमस्कार: हिवाळ्याच्या सीजन मध्ये तंदुरुस्त आणि आरोग्य योग्य ठेवण्यासाठी, सूर्य नमस्कार योग करा. जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान दोनदा सूर्यनमस्कार करा. तसेच रोज सूर्य नमस्कार केल्याने शरीराच्या व्यायामाबरोबरच मानसिक आरोग्यही चांगले होते. पाचक प्रणाली चांगली राहते आणि शरीराची लवचिकता कायम राहते.
14. ध्यान आणि प्राणायाम: कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम गरजेचे आहे. मानसिक आरोग्य व आजारांना दूर ठेवण्यासाठी 15 मिनिटे ध्यान व प्राणायाम करा. सहज प्राणायामात आपण कपालभाती, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी करू शकतो.
15. आंघोळ करण्याबाबत: डेली लाइफच्या आरोग्यविषयक टिपांपैकी एक सर्वात महत्वाचा फिटनेस टिप म्हणजे चांगली आंघोळ करणे. सर्दी झाल्यास कोमट पाण्याचा वापर करा. खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका.
हे ही वाचा
- केस गळतीवर घरगुती उपाय आणि त्याची कारणे
- किडनी स्टोन मराठी माहिती, प्रकार, लक्षणे, उपाय
- मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध उपचार, काय खाऊ नये?
16. पानी पिण्याबाबत: हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाणी कमी पिऊ नये. काही लोक थंडीच्या सीजनमध्ये कमी पाणी पितात किवा जास्त गरम पाणी पितात, हे हानिकारक आहे. तसेच उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिऊ नये.
17. पचन क्रिया: पचन क्रिया व्यवस्थित करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारमध्ये फायबर आणि प्रोटीन यांचा समावेश करा.
18. दूध आणि फळांचा उपयोग: सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळं खा. रात्री जेवणानंतर 1 ग्लास गरम दूध पिल्याने आरोग्यासाठी चांगले आहे.
19. अन्न चावुन खा: आपल्या तोंडाची लाळ अन्न पचनसाठी चांगली असते. आपण जितके जास्त अन्न चावतो तितकेच लाळेचे एंजाइम अन्नामध्ये मिसळतील. कमीतकमी 30 ते 35 वेळा चावण्याचा प्रयत्न करा.
20. जमीनीवर बसून जेवण करा: जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून भोजन करतो तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते, ज्यामुळे शरीर आणि पाचन तंत्र मजबूत होते. रीढ़ की हड्डी आणि स्नायू देखील आराम देतात.
21. शरीराची मालिश करा: शरीराची मालिश हा एक संपूर्ण जुनाट नैसर्गिक उपाय आहे जो संपूर्ण शरीरात उर्जा आणि ताजेपणा आणतो.
22. साखर आणि मीठ कमी वापरा: साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बीपी आणि मधुमेह सारख्या आजारांना जन्म मिळतो. म्हणूनच, या दोन्ही नियंत्रित प्रमाणात वापरणे हे आरोग्यासाठी उत्तम उपाय आहे.
23. चहा, कॉफी आणि सिगारेट टाळा: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी चहा, कॉफी आणि सिगारेटचा वापर कमी करा. कारण की यामध्ये कॅफिन आढळते हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे
24. रात्रीचे जेवण: रात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजे आणि झोपण्याच्या अगोदर 3 तास जेवण केले पाहिजे.
25. जेवण करताना पाणी पिऊ नका: जेवण करण्याअगोदर 15 मिनीटे पाणी घेतल्याने पचनासाठी चांगले आणि थोडे गरम पाणी घेतल्याने अधिक चांगले.
26. आठवड्यातून एकदा उपवास: आपल्या शरीराला डिटॉक्स (शरीर शुध्दीकरण) करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा. तसेच आपल्या पचन क्रियेला आराम मिळतो.
27. संध्याकाळी चालणे: रात्री जेवण केल्यानंतर चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे.
28. रात्री डिटोक्स वॉटर घ्या: रात्री डिटोक्स वॉटर घ्या जेणेकरून आपले शरीर व्यवस्थित डिटॉक्सिफाइ होईल.
29. गरज नसताना चिंता करू नका: ताण हा एक दिमाखाप्रमाणे असतो जो आपले आरोग्य आतून लपवून ठेवतो. म्हणूनच, अनावश्यक तणाव काढून टाका, तुम्हाला खूप चांगले वाटू लागते.
30. तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या: तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपल्या लिवर आणि विशेषत: आपल्या आरोग्य आणि सामान्यतेसाठी चांगले आहे.
31. पाठ सरल करून बसा: पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीमधील आणि पोटामधील अवयवांना आराम मिळतो.
हे ही वाचा
खुप छान माहिती