दात दुखीवर घरगुती उपाय, दातदुखीचा अनुभव घेतलेल्या कोणालाही हे चांगले माहित आहे की दातदुखी ही सर्वात धोकादायक वेदना आहे. जर सुरुवातीच्या काळात या वेदनेकडे दुर्लक्ष केले गेले आणि हिरड्यांकडे जात असेल तर हे समजून घ्या की आपण दातदुखीचा नव्हे तर ‘नरकाचा छळ’ भोगायला तयार आहात.
दात दुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Toothache)
खाली काही घरगुती दाटदुखीवर उपाय दिले आहेत, तुम्हाला जर दात दुखीचा त्रास जाणवू लागला तर तुम्ही याचा उपयोग करून तात्पुरता आराम घेऊ शकता. पण नंतर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्याचा सल्ला मी तुम्हाला देईन.
1. दातामध्ये लवंग ठेवा
जर आपले दात किंवा कवच चिपडत आहेत, मुंग्या येत आहेत किंवा किंचित वेदना होत असेल तर आपल्या स्वयंपाकघरातून एक लवंग घेऊन दात किंवा कफ यामध्ये ठेवा.
तुम्ही लवंग चावून खाऊ नका तर ती चॉकलेट सारखी चोका, असे केल्यास काही मिनिटात तुमची समस्या दूर होईल.
2. गरम पाण्याचा उपयोग
गरम पानी तोंडात घेतल्याने दात दुखीमध्ये आराम मिळतो, यासाठी आपल्याला एक ग्लास पानी गरम करावे लागेल व पानी गरम करताना त्यामध्ये अर्था चमचा मीठ मिक्स करून घ्या.
पानी गरम करून झाल्यास ते थोडे थोडे तोंडात धरून दातामध्ये दाबून घ्या, त्यामुळे वेदना कमी होऊ लागतील. असे तुम्ही 10 ते 15 मिनिटे केल्यास तुम्हाला लगेच आराम मिळेल.
हे ही वाचा
- पित्तावर घरगुती उपाय, पित्त म्हणजे काय?
- केस गळतीवर घरगुती उपाय आणि त्याची कारणे
- वजन वाढवण्याचे घरगुती उपाय
3. पेरूंच्या पानाचा उपयोग
तुम्हाला दात दुखीचा त्रास जाणवू लागल्यास पेरुच्या पाने स्वच्छ करून हळू हळू चावून घ्या.
पेरूची पाने चघळल्याने दातदुखी देखील बरे होते. कारण पेरूच्या ताज्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विरोधी दाहक गुणधर्म असतात. ते दातदुखीमध्ये आराम देतात आणि दात सूज कमी करतात.
4. कच्या कांद्याचा उपयोग
कांदा एन्टीसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म यामध्ये आहे. दातदुखीचा त्रास जाणवू लागल्यास कांदा सोलून घ्या व तो कापून त्याचे लहान तुकडे दातांमध्ये ठेवा.
जर तुम्हाला तोंडामध्ये कांद्याचा तुकडा ठेवायचा त्रास होत असेल तर तो खिसून घ्या व त्याच्या रसामध्ये कापूस भिजवून फेस तयार करून घ्या, व बनवलेला फेस दातावर लावून घ्या, तुम्हाला आराम वाटू लागेल.
5. हिंगचा दात दुखीवर उपयोग
दात दुखत असल्यास तुम्ही हिंगचा ही उपयोग करू शकता. तुम्ही अर्धा चमचा हिंग घेऊन याला लिंबाच्या रसामध्ये मिसळून पेस्ट तयार करा.
ती पेस्ट हलकी गरम करा आणि नंतर दातावर लावा. तुम्हाला लगेच आराम भेटेल.
6. लसूणचा उपयोग
दात दुखत असल्यास लसूण सोलून दाताखाली चावा. यातील Allicin नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ एजंट जो दातदुखी दूर करण्यास मदत करतो.
7. हळदीचा उपयोग
हळद एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे. हळद, मीठ आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट वेदनादायक दात दुखत असेल तर ती दूर करते. हे दातदुखीच्या औषधासारखे कार्य करते आणि वेदनापासून त्वरित आराम देते.
8. बटाटाचा उपयोग
बटाट्याचे तुकडे बारीक करून चांगल्या रीतीने चावल्याने दात दुखीवर लगेच आराम मिळतो.
9. काळी मिरचीचा उपयोग
दातामध्ये थंड आणि गरम हवा किवा पानी लागल्याने होणार्या त्रासासाठी काळी मिरचीची पावडर आणि मीठ एकसारखे मिसळून घ्या. ह्यामध्ये काही थेंब पानी मिसळून पेस्ट तयार करा. हे दाटदुखीवर लगेच आराम देते.
10. मोहरीच्या तेलाचा उपयोग
आपल्या घरात मोहरीचे तेल स्वयंपाक करण्यासाठी जवळजवळ वापरले जाते. दातदुखीमध्ये आराम मिळविण्यासाठी ह्याचा उपयोग खूप आधीपासून केला जात आहे.
मोहरीच्या तेलात एक चिमूटभर मीठ मिसळल्याने आणि हिरड्यांना मालिश केल्यास दातदुखीपासून आराम मिळतो.
11. चहा पिशवीचा उपयोग
गरम पाण्यामध्ये चहा पिशवी ठेवा आणि जिथे दुखत आहे तो भाग शेकून घ्या.
12. तुळस
दात दुखीवर एलाज म्हणून तुळशीची पाने आपल्याला फायदेशीर आहेत. यासाठी काळी मिरची आणि तुळशीच्या पानाचा गोळा बनवून दाताच्या खाली ठेवल्याने आपल्याला आराम मिळतो.
हे ही वाचा: तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार
दात दुखण्याचे कारणे (Causes of Toothache)
1. आपल्या दातांची काळजी घेणे आवश्यक आहे, जर आपण याची वेळेवर काळजी नाही घेतली तर दात दुखण्याचा दोखा वाढतो व त्यामुळे दातामध्ये पोकळी निर्माण होते, आणि याचा त्रास जाणवू लागतो.
2. चुकीच्या पद्धतीने दाताची सफाई करणे यामुळे दात कमजोर होतात व त्यामुळे याच्या वेदना जाणवू लागतात.
3. आपले दात पडल्याने देखील दात दुखु लागतात.
4. अक्कल दाड उगवताना देखील आपल्याला दात दुखीचा त्रास होतो.
5. जास्त गोड खाल्याने दात दुखीचा त्रास जाणवू लागतो.
6. कॅल्शियमची कमी असल्यास दात कमजोर पडतात व त्यामुळे दात दुखु लागतात.
7. दातामध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे दात दुखीचा त्रास होतो.
हे ही वाचा