तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार

तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार, भारतामध्ये आज प्रत्येकाच्या घरासमोर तुळस बघायला मिळेल. हिंदू धर्मामध्ये तुळशीची पुजा केली जाते. याला सुख आणि समृद्धीच्या हेतूने बगीतले जाते. तसेच आज तुळशीच्या महत्व आपल्या आरोग्यासाठी जाने-माने औषध मानले जाते.

याचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, दाटदुखी एत्यादीसाठी एक प्रभावी औषध म्हणून केला जातो. आज आपण तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.  

तुळशीचे फायदे आणि नुकसान

तुळशीचे फायदे (Benefits of Tulsi)

1.तुळस डोकेदुखीपासून आराम देते. 

आपण मागील लेखामध्ये ब्लॅक टीचे सेवन केल्याने डोकेदुखी वर आराम देते हे वाचले असेल, पण याच ब्लॅक टी मध्ये तुम्ही तुळशीची दोन पाने टाकल्याने याचा फायदा दुप्पट होतो. एनसीबीआयच्या शोधामधून हे सिद्ध झाले आहे.

2. रात्रीच्या अंधत्वामध्ये तुळशीचा रस फायदेशीर आहे. 

कंजंक्टिवाइटिस असलेल्या रूग्णला तुळशीची पाने फायदेशीर ठरू शकतात. काही संशोधनामध्ये हे सिद्ध करण्यात आले आहे. याबाधल स्पष्टपणे काहीही माहिती उपलब्ध नाही. 

3. कान दुखणे आणि जळजळ होण्यास फायदेशीर

जर कान दुखत असेल तर तुळस-पत्र-स्वरास गरम केल्यावर कानात 2 थेंब घाला. हे कान दुखण्यापासून त्वरित आराम देते.

4. दातदुखी

दात दुखीवर ईलाज म्हणून तुळशीची पाने आपल्याला फायदेशीर आहेत. यासाठी काळी मिरची आणि तुळशीच्या पानाचा गोळा बनवून दाताच्या खाली ठेवल्याने आपल्याला आराम मिळतो.

हे ही वाचा: दात दुखीवर घरगुती उपाय | Home Remedies For Toothache

5. घशाच्या समस्येमध्ये तुळस फायदेशीर

तुळशीच्या पानाचा रस बनवून हलक्या गरम पाण्यामधून मिसळून गुळण्या घेतल्याने घशाच्या समस्येसाठी फायदेशीर आहे.

6. तुळस रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. 

आज संपूर्ण जग COVID-19 विरुद्ध लढत आहे. आज प्रत्येकजन आपली प्रतिकारशक्ती वाढण्याचे उपाय शोधत आहे. तुळशीमध्ये इम्यूनोमोडायलेटरीचे गुण आढळून येतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.     

हे ही वाचा: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

7. कर्करोगात तुळस खाण्याचे फायदे

तुळशीच्या रसामध्ये रेडिओप्रोटेक्टिव्ह हे गुण असतात जे शरीरामधील टुमर पेशी मारतात. त्याच बरोबर तुळशीमध्ये युजेनॉल आढळतात त्यामध्ये अँटीकेन्सरचे गुण आढळतात.

तसेच तुळशीमध्ये रोझमारिनिक अॅसिड, एपिगेनिन, ल्युटोलिन, मायर्ट्नल सारख्या आवश्यक फायटोकेमिकल्स देखील असतात. ते विविध प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यासाठी देखील मदत करू शकतात.

8. मधुमेहासाठी तुळशीचे पाने फायदेशीर

आपण यगोदर मधुमेह म्हणजे काय? त्यासाठी उपाय तसेच ब्लॅक टी चे सेवन केल्याने मधुमेहासाठी फायदे काय आहेत हे जाणून घेतले होते. आज आपण तुळशीचे पाने वापरुन याचा फायदा कसा होतो हे जाणून घेणार आहोत.

तुळशीच्या पानामधील एंटी-डायबिटिक गुणधर्मांमुळे दररोज सकाळी तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर तुळशी मध्ये हायपोग्लाइसेमिक गुणधर्म देखील आहेत. ते शरीरात रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

हे ही वाचा: मधुमेह आहार तक्ता मराठी, मधुमेह घरगुती उपाय 

9. तनावमध्ये तुळशीची पाने फायदेशीर

तुळशीमध्ये एंटीस्ट्रेसचे गुणधर्म आढळतात जे स्ट्रैस पासून आराम देतात. रोज तुळशीचे सेवन केल्याने शरीराच्या पेशी डिटॉक्सिफाई करण्यात मदत करू शकते. यामुळे डोके शांत ठेवून टॉक्सिक मानसिक तनाव कमी करते.

10. तुळशीच्या पानाचा रस तोंड साफ करण्यासाठी फायदेशीर 

तुळशीमधील एंटीबैक्टीरियल गुणधर्म मुळे तोंडामधून येणारा दुर्गंद, पायरोरिया आणि हिरड्यांना जोडलेले अन्य आजार ठीक करण्यास मदत करते.  

11.अन्य तुळशीचे फायदे

 • खोकल्यापासुन आराम देते.
 • कोरडा खोकला आणि दमापासून आराम देते.
 • तुळशी अपचनापासून आराम देते.
 • तुळस कावीळसाठी फायदेशीर आहे.
 • प्रसूतीनंतर वेदना कमी करण्यास तुळशीचा उपयोग केला जातो.
 • नपुंसकत्व मध्ये फायदेशीर तुळस फायदेशीर आहे.
 • तुळशीचा रस कुष्ठरोगासाठी फायदेशीर आहे.
 • पांढरे डाग दूर करण्यात उपयुक्त.
 • तुळशीची पाने मेंदूसाठी फायदेशीर असतात.
 • मलेरियामध्ये फायदेशीर.
 • टायफॉइडमध्ये उपयुक्त.
 • जास्त तापमध्ये तुळस आराम देते.

तुळशीचे नुकसान (Damage to Basil)

आपण तुळशीचे फायदे काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. पण असे नाही की आयुर्वेदमध्ये प्रत्येक पदार्थ फायदेशीरच असतो असे नाही. त्याचे अतिसेवन केल्याने त्याचे नुकसान ही आपल्या शरीरासाठी आहेत. तुळशीचे अतिसेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी नुकसान काय आहेत हे जाणून घेऊया. 

1. तुळशीच्या पानमध्ये एंटीफेरिलिटीचा प्रभाव असतो, यामुळे तुळशीच्या पानाचे अतिसेवन केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. 

2. आपण वरती वाचल्याप्रमाणे तुळशीचे पाने रक्त पातळ करण्यास मदत करतात हे पण यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोकाही वाढतो.   

3. जे लोक मधुमेहाचे औषध घेत आहेत त्यांनी तुळशीची पाने खाल्याने रक्तामध्ये साखरेचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त कमी होते. 

तुळशीचे प्रकार (Types of Basil)

1. श्याम तुळशी

2. गोड तुळस

3. श्वेत/ विष्णु तुलसी

4. वन तुळस 

5. निंबू तुळस 

तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार

मित्रांनो आज आपण या लेखामध्ये तुळशीचे फायदे आणि नुकसान व तुळशीचे प्रकार याबाधल आपण माहिती करून घेतली. तुळशीच्या प्रत्येक पार्टचा उपयोग करून आपण याचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग कसा केला जातो तसेच याचे अति प्रमाणात उपयोग केल्यास याचे तोटे काय आहेत, त्याचे प्रकार याविषयी आपण डिटेल मध्ये जाणून घेतले आहे. 

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *