आयुर्वेदिक वनस्पतींची नावे | Ayurvedic Plants in Marathi

आयुर्वेदिक वनस्पतींची नावे (Ayurvedic Plants in Marathi), आपल्या देशामध्ये औषधी वनस्पती मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य स्वास्थ, टिकवण्याकरीता आणि अगदी स्वस्तात आरोग्य आणि रोग बरे करण्याकरता करू शकतो.

आपल्या परिसरामधील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता असे म्हणता येईल. आता आपण त्यातल्या 5 महत्त्वाच्या ‘आयुर्वेदिक वनस्पतींची नावे (Ayurvedic Plants in Marathi) घेणार आहोत.

Ayurvedic Plants in Marathi

आयुर्वेदिक वनस्पतींची नावे (Ayurvedic Plants in Marathi)

खाली काही आयुर्वेदिक वनस्पतींची नावे (Ayurvedic Plants in Marathi), आणि त्याची याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, तसेच या आयुर्वेदिक वनस्पतींचा उपयोग आपल्यासाठी कश्या प्रकारे होतो हयाविषयी ही डीटेल मध्ये माहिती सांगण्यात आली आहे. 

कडूनिंबची माहिती (Neem Information in Marathi)

कडूनिंब (Neem) हे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. कडूनिंबची पाने, फळे, तसेच खोड औषधी उपलब्ध आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगा करता याच्या पानाचा उपयोग होतो. 

कडूनिंबाच्या पानाच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच कडूनिंबच्या पानांचा उकडून काढा करून ही वापरता येतो. 

कडूनिंब हे एक उत्तम जंतु संसर्ग नाशक आणि कीटक नाशक आहे. त्याच्या खोडच्या बाहेरील भागाचा काढा ही बर्याच आजारांवर उपायकारक ठरत आहे. 

कडूनिंब या झाडाची लागवड करने आणि त्याची काळजी घेने हे आपल्या फायद्याच आहे. कडूनिंबचे तेल असे तयार करावे कडूनिंबच्या पानाचा पाणी घालून 100 मिली ताजा रस काढावा. 

Ayurvedic Plants in Marathi

त्यात 25 मिली तिळाचे तेल घालावे. मंद आच वर ते झाकून छान पैकी उकळावे. साधारण पणे अर्ध्या तासामध्ये त्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि उरलेले मिश्रण थोडं गार करून गाळून घ्यावे. 

कडूनिंबचे हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवल्यास ते वर्ष भर सहज पणे टिकते. जखमे वर हे तेल  लावल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते. 

बाळंतपणातल्या जखमा बर्या होण्याकरता देखील कडूनिंबाची पाने घातलेल्या गरम पाण्याच्या बकेट किंवा टब मध्ये रोज 15 मिनिटे बसावे.

अडुळसाची माहिती (Adulsa information in Marathi)

अडुळसा झुडुप याचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करता येतो. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. 

रस मधाबरोबर दिला जातो. 50 ते 60 अडुळशाची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घेत, ती एक लिटर पाण्यामध्ये अर्ध्या तासा करता मंद आचे वर उकळावी. 

साधारन पाव पट पाणी उरले पाहिजेत. हा काढा गार करून गाडून एक बाटली मध्ये ठेवावा. जर यदा कदा खोकला झाल्यास 20 मिली काढा दिवसातुन 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्याची गरज नाही उरत.

तुळसची माहिती (Basil information in Marathi)

तुळस म्हणजे ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असे म्हणता येईल. तुळशीची पाने ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी किंवा राम भाम इलाज आहे असं म्हटले जाते. 

तुळशीच्या पानांचे रस मधामध्ये घालून किंवा पानांचा काढा तयार करून खोकल्यासाठी देतात. तुळसचे पान हि उष्ण असतात. म्हणून ती कफ दोषामध्ये वापरतात. 

ही पान आपन नुसती चावून देखील खाऊ शकतो. या उलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणाऱ्या असतात. म्हणून त्यामध्ये उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्त दोष) म्हणजे, जळ- जळ, पायांची आग, मळ मळ, तोंड येणे, नाका मधून रक्त येणे, रक्ती मूळ व्याध होणे, इत्यादीं करता घेतात. 

तुळसच्या बिया दूध, किंवा तुपा बरोबर घ्याव्यात. 20 ते 30 बिया पाण्यामध्ये किंवा दुधा मध्ये भिजवून ठेवाव्यात आणि एका वेळीस प्याव्यात. असे दिवसामधून 2 ते 3 वेळा नित्य नियमाने कराव. 

Ayurvedic Plants in Marathi

सर्दी आणि तापाकरीता तुळस पाणी किंवा तुळशीचा रस काढणे – एक कप भर तुळशीची पाने पाच मिनिटे पाण्यामध्ये भिजवत ठेवावी. 

मग ती वाटून कापडातून गाळून घ्यावी. याचा 20 मिली म्हणजे साधारण पणे अर्धा कप, इतका रस काढून घ्यावा. इतका रस होण्याकरता जितके लागतील तितके तुळसची पाने घ्यावी. 

हे वयोवृद्ध किंवा मोठया माणसां करीता एक वेळचा महत्वाचा डोस आहे. हा डोस सकाळ व संध्याकाळ या प्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी किंवा तापा करीता ह्याचा खूप उपयोग होतो.

हे ही वाचा

कोरफड किंवा कुमारी ची माहिती (Aloe vera  information in Marathi)

कोरफड किंवा कुमारी (Aloe vera) या वनस्पतीचा उपयोग जखम वर मलम पट्टी म्हणून उत्तम होतो. जखमेवरच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापून शरीरावर झालेली जखम धुऊन घ्या. 

कोरफडच्या तुकडयाची ओली बाजू जखमे वर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफडची पट्टी दिवसातून दोन वेळा बदला. या मुळे ओली जखम लवकर भरून बरी होते. 

Ayurvedic Plants in Marathi

शरीर भाजल्यामुळे झालेल्या जखमा वर देखील कोरफडीची मलम पट्टी लागू पडते. बर्याच आयुर्वेदिक औषधा मध्ये कोरफडी (Aloe vera Uses in Marathi) चा उपयोग मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. 

मग तो यकृताचे आजार असो स्त्रियां चे आजार असो किंवा खोकला असो या वर हे खूप गुणकारी आहे.

आपण कोरफड किंवा कुमारी आपल्या घरातील बागेत लावून व इतर लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कण खर असते आणि वर्षानु वर्षे वाढते व टिकते.

हे ही वाचा: 

 

कुडाची माहिती (Kuda information in Marathi)

कुडा (Kuda information in Marathi) हे जंगलामध्ये सापडणारे झाड आहे. कुडाला शेंग सारखी फळ पिकल्या वर काळी (Black) होतात.  

ही फळे जोडी ने झाडाच्या फांदीला लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगासारखी दिसते. 

या झाडाच्या खोडाचे साल पासून औषधी तयार होतात. जुलाब किंवा आव यासाठी ते वापरले जाते. खोडाच्या सालीचा एक तुकडा कुटून त्यात एक चमच मध मिसळून पौष्टिक आणि गुणकारी औषध तयार केले जाते. 

ग्रामीण भागात आज देखील कुड याचा काढा देखील बनवतात. 16 कप पाण्यामध्ये साला चे 1 कप कूट घालून मिश्रण 4 कप होई पर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला 1 वेळी 20 मिली काढा, दिवसामधून तीन वेळा द्यावा.

अश्वगंधा ची माहिती (Ashwagandha information in Marathi)

औषधी वनस्पती माहिती (Medicinal Plant / Herbal information in Marathi) घेताना अश्वगंधाची माहिती (Ashwagandha information in Marathi) ही आवर्जून घ्यायला हवी. 

अश्वगंधा ही सर्वात गुणकारी वनस्पती पैकी एक आहे. अश्वगंधा मुळे अनेक रोग, आजार बरे होण्यात मदत मिळते. अगदी प्राचीन काळा पासून अश्वगंधाचा उल्लेख अनेक रोग किंवा आजारांमध्ये केला आहे. 

खोकला, क्षयरोग, व्रण, खाज रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात अश्वगंधा चामोला चा वाटा आहे. अश्वगंधाची पाने उकळून त्या पासून चहा तयार केला जातो. जो आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतो. 

चंदन ची माहिती (Chandan information in Marathi)

चंदन सा बदन, चंचल चीतवन…’ हे गान आपण सगळ्यांनाच परिचयाच आहे आणि चंदन हे देखील अनेकांना परिचयाचे आहे. 

चंदन औषधी वनस्पती आणि उपयोग (Chandan plants information in marathi ) जाणून घेताना चंदनाचा उल्लेख होणार नाही असे मुळीच नाही. 

चंदनाची ओळख म्हणजे हि एक बहुगुणी वनस्पती म्हणून होते. सौंदर्य वाढवण्यासाठी चंदनाचा वापर अनेक लोक करतात. 

चंदनचा मंद सुगंध हा जवळ पास सर्वांनाचा परिचयाचा असेल. अनेक सौंदर्य प्रसाधनामध्ये चंदनाचा वापर केला जातो. चंदनाला इंग्रजी मध्ये ‘Sandalwood’ (Chandan english mean is Sandalwood) असे म्हटले जाते. 

दक्षिण भारत आणि दक्षिण पूर्व आशिया या भागात चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चंदनाच्या लाकडाचा उपयोग करुन चंदनाची पावडर केली जाते आणि याचा वापर केला जातो. 

चंदनाचे फायदे लक्षात घेऊन त्याचा (Chandan Uses in Marathi) कसा वापर करायला पाहिजेत हे पाहू-

चंदन हे थंड असते म्हणून ते कपाळावर लावल्या मुळे चिड-चिडे पणा करणाऱ्यांना चंदनाचा टिळा लावल्या मुळे डोके शांत व्हायला मदत मिळते. अनेक विज्ञानामध्ये ही चंदनाचा उल्लेख केलेला आहे.

अनेक लोक आपली एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा चंदनाची मदत घेतात. चंदनाचा टिळा लावल्यामुळे डोक्याकडे जाणाऱ्या नसांना शांतता मिळाल्यामुळे हा फरक दिसून येतो. शरीरातील उष्णता हि कमी करण्यासाठी चंदन हे खूप उपयुक्त ठरते.

हे ही वाचा

बेल फळची माहिती  (Bel fruit information in Marathi)

बेल फळ (Bel fruit information in Marathi) हे आयुर्वेदीक औषधी आहे. उष्ण कटीबंध (Tropical) अशा ठिकाणी हे दिव्य वृक्ष उगते.

प्राचीन काळापासून बेल फळचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जात आहे. शंकर देवाला अत्यंत प्रिय अशी बेलाची पाने आहेत.

पण बेलाची पानेच नाहीतर बेलाची फळे देखील खूप फायदेशीर असतात. हिंदू धर्मा मध्ये अनेक शुभ कार्यात बेलाची पान ही आवर्जून वापरली जाते.

वर्तमान काळात होणारी झाडांची कत्तल पाहता हे बेल फळ असे दिव्य वृक्ष काळाच्या आड जाऊ नये म्हणून या वृक्षाला देव पुजे मध्ये स्थान देण्यात आलेले आहेत.

बेल याला हिंदी मध्ये सिरल, संस्कृत मध्ये बिल्व असे म्हटले जाते. बेल फळची माहिती (Bel fruit information in Marathi) जाणून घेत त्याचे फायदे जाणून घेऊ या-

बेल फळची फायदे (Bel fruit Benefits in Marathi)-

बेला फळाच्या सेवना मुळे अस्थमा चा त्रास कमी होण्यास अभित पूर्व मदत मिळते.

ज्या ला कमी ऐकण्या चा त्रास होतो तर, गौ मूत्रा मध्ये बेल फळ वाटून त्याचा रस कानात घातले जाते. त्यामुळे कमी ऐकू येण्या ची समस्या कमी होते.

भूक लागत नसेल तर अशा वेळी बेल फळ खाण्याचे सल्ले दिले जातात,  त्या मुळे भूक वाढण्यास अभित पूर्व मदत मिळते

मला वरोध व बद्ध कोष्ठता या त्रासा मध्ये बेल फळा च्या रसा चे सेवन केले जाते. त्या मुळे याचा त्रास कमी होण्यास अभित पूर्व मदत मिळते.

हे ही वाचा

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *