आयुर्वेदिक माहिती | आयुर्वेदिक उपचार

आयुर्वेदिक माहिती, भारत हा एक प्राचीन देश आहे. त्यासोबतच वैचारिक परिपक्वता, संस्कृती, परंपरा आणि विकासाचा बाबतीत भारत नेहमीच जगात पुढे राहिला आहे. ज्ञान-विज्ञाना सोबतच भारत ‘आयुर्विज्ञान’मध्ये देखील भारताने जगाला नवनवीन मार्ग दाखविले आहेत.

आपल्या देशातील प्रसिद्ध ऋषी मुनी यांनी वृक्ष,जडी-बुटी,फळे,फुले,बिया यांचा अभ्यास करून उपचारासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसीत केल्या. शरीरीक आणि मानसिक रोगांचा वर नियंत्रण,निदान आणि उपचार या गुणांनी आपलं आयुर्वेद परिपूर्ण आहे.

आयुर्वेदिक माहिती

आयुर्वेद म्हणजे काय?

आयुर्वेदयति बोधयति इति आयुर्वेद:

वरील श्लोका मध्ये आयुर्वेदाचा अर्थ लपला आहे,असे शास्त्र(विज्ञान) जे आयु(जीवन) बद्दल ज्ञान देतं त्याला आयुर्वेद म्हणतात. आयुर्वेद म्हणा किंवा आयुर्विज्ञान दोन्ही एकच. आयुर्वेद एक जीवन शैली आहे. या शैलीला आत्मसात करून मानव दीर्घायुष्य प्राप्त करू शकतो.

आयुर्वेद ही एक उपचार पद्धती आहे. जी जगातील सर्वात प्राचीन पद्धत मानली जाते. पण आज आपण ज्या उपचार पद्धतीचा वापर करतो त्याने फक्त आजार लवकरात लवकर बरे करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाते पण आयुर्वेद मध्ये आजारचा मुळावर उपचार करून आजाराला मुळासहीत संपवण्याला महत्व दिले जाते या मध्ये ज्या औषधी दिल्या जातात त्याचे कोणतेच दुष्परिणाम नसतात.

आयुर्वेदाचे काही नियम आहेत, याचा वापर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करायला हवा. आज पाश्चिमात्य देश सुद्धा आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत.. चला तर मग आधी आयुर्वेदा चा इतिहास पाहू.

आयुर्वेदाचे जनक आणि इतिहास

पुरातत्व संशोधकांचा नुसार जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ हा ऋग्वेद आहे. वेगवेगळ्या विद्वान लोकांनी इसवी सण पूर्व तीन हजार ते पन्नास हजार वर्षा पूर्वी याची रचना केली होती. देवतांचा उपचार पद्धतीचा वापर मानव जातीला व्हावा म्हणून देवतांचा वैद्यांनी पृथ्वी वरील काही विद्वान आचार्यांना याचे ज्ञान दिले. या शास्त्राचे आदि आचार्य अश्विनी कुमार यांना मानलं जातं. त्यांचकडून इंद्र देवाने ही विद्या प्राप्त केली, इंद्राने हे विद्या धन्वंतरी ना शिकवली. काशी चे राजा दिवोदास यांना धन्वंतरी चाच अवतार मानला जातो. त्यानंतर सुश्रुत यांनी आयुर्वेदा चा अभ्यास केला,अत्री आणि भारद्वाज पण याचे अभ्यासक म्हणून मानले जातात.

सुरवातीला ही विद्या गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे तोंडी शिकवली जात होती.पण नंतर याला ग्रंथ स्वरुपात आणण्यात आल. यात चरक ऋषींनी लिहलेला चरक संहिता आणि सुश्रुत ऋषींनी लिहीलेल्या ग्रंथाचा समावेश आहे.

आयुर्वेदाचे आचार्य आहेत -अश्विनीकुमार,धन्वंतरी,काशिराज,सहदेव,नकुल,अर्कि, च्यवन,जनक,बुध,जावाळ,जाजळी,पैल,करथ,अगस्त्य,अत्रि तसेच त्यांचे सहा शिष्य आहेत-अग्निवेश,भेड,जातूकर्ण,पराशर, सुश्रुत आणि चरक.

या तथ्यावरून आपण म्हणू शकतो की आयुर्वेद खूप प्राचीन ग्रंथ आहे. अगदी मानव जातीचा उत्पत्ती पासूनच तयार होत आलेली उपचार पद्धती आहे.

हे ही वाचा 

आयुर्वेदाचे महत्व

आयुर्वेदाला भारतीय आयुर्विज्ञान पण म्हटलं जात. यामध्ये मानवी शरीराला होणारे रोग आणि त्याला रोगमुकत करण्याचा सर्व प्रक्रिया अगदी सविस्तर पण सांगितलेल्या आहेत. आपल्या आसपासच उपलब्ध असणार्‍या विविध जडीबुटीचा वापर करून आजारांना बरे करण्याचे मार्ग सांगितले आहेत. आयुर्वेदिक ज्ञानाचे तीन सूत्र आहेत ज्यामधे आजार,आजारचे लक्षण,आणि उपचार समाविष्ट आहेत.

आयुर्वेद चे सिद्धान्त

आयुर्वेद चे सिद्धान्त हे पंचमहाभूत म्हणजेच पृथ्वी, जल, आकाश, वायु आणि अग्नि यावर आधारित आहेत. या पंचतत्वाचा संमिश्रण वर त्रिदोष म्हणजेच वात (आकाशा आणि वायु), पित्त(अग्नि) आणि कफ (जल आणि पृथ्वी) चा रूपात दर्शविल आहे. आयुर्वेदा नुसार मानवी शरीर तीन दोष, पंचमहाभूत आणि पंचेंद्रिय चा पुतळा आहे तसेच मन,बुद्धी आणि आत्मा या पुतळ्याची प्रेरक तत्व आहेत.आयुर्वेदाचा सिद्धांता चा उद्देश हा शारीरिक आणि प्रेरक तत्वांचा मध्ये संतुलन राखणे आहे.

वात, पित्त आणि कफ या तीन दोषाने मानवी संरचने मध्ये फरक पडतोच सोबतच मानवी स्वभावात आणि त्याचा मनावर,भावने वर पण याचा परिणाम होतो.

उदाहरण द्यायचं म्हटल तर कफ प्रवृत्ती ची माणसं वजनदार असतात, त्यांची पचनशक्ती इतर लोकांचा तुलनेत मंद असते. पण त्यांची स्मरणशक्ती चांगली असते आणि ते भावनिक रित्या मजबूत असतात. आपण आपली शरीर संरचना आणि प्रवृत्ती समजून घेऊन आपण सर्व तत्वांना संतुलित करून स्वत:ला स्वस्थ ठेवू शकतो.

आयुर्वेदाचे वर्गीकरण

आयुर्वेदाची आठ विभागात वर्गीकरण करण्यात आल आहे त्यांना ‘तंत्र’ अस म्हटलं जात. हे सर्व विभाग वेगवेगळे उपचार पद्धती बद्दल माहिती देतात. ते आठ विभाग खालील प्रमाणे आहेत.

*शल्यतंत्र (Surgical Techniques)

*शालक्यतंत्र  (ENT)

*काया चिकित्सा (General Medicine)

*भूतविद्या तंत्र (Psycho Therapy)

*कुमारभृत्यु (Paediatrics)

*अगदततंत्र (Toxicology)

*रसायनतंत्र (Renjunvention and Geriatrics)

*वाजीकरण (Vilification, Science of Aphrodisiac and Sexology)

आयुर्वेदा मध्ये पूर्ण शरीराचा रोगांचे उपचार लिहलेले आहेत.

शल्यतंत्र: याला इंग्रजीत सर्जरी म्हणतात,सर्वात मोठे शल्य चिकित्सक सुश्रुत होते. यामध्ये विविध प्रकारचा शल्य काढून टाकण्याचा विधी अगदी विस्तारपूर्वक सांगितले आहेत, यालाच शल्य चिकित्सा म्हणतात.

शालाक्यतंत्र: याला इंग्रजी मध्ये ENT विभाग म्हणतात. म्हणजेच यात तोंड,नाक,डोळे आणि काना संभंधित रोगांचा उपचारा बद्दल यात लिहल आहे.

कायाचिकित्सा: याला इंग्रजी मध्ये जनरल मेडिसिन म्हणतात. यात ताप,खोकला,सर्दी या रोगांचा बद्दल उपचार लिहिले आहेत.

भूतविद्या तंत्र: याला इंग्रजी मध्ये psycho therapy म्हणतात. यात ग्रह दशे नुसार संबंधित उपचार लिहिले आहेत.

कुमारभृत्यु: याला इंग्रजीत Paediatrics म्हणतात. याच अजून एक नाव आहे कौमारभृत्य. या विभागात गर्भविज्ञान बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात लहान मुले,स्त्रिया आणि स्त्री रोगा बद्दल माहिती दिली आहे.

अगदततंत्र: याला इंग्रजी मध्ये Toxicology अस म्हणतात. यात सर्व विषा बद्दल माहिती त्याची लक्षणे आणि त्यावरील उपाय लिहिले आहेत.

रसायनतंत्र: याला इंग्रजी मध्ये Renjunvention and geriatrics म्हणतात. यामध्ये म्हातारपणात शक्ती,पुरुषत्व आणि दीर्घायुषी बनण्यासाठी चे उत्तम उपाय लिहिलेले आहेत.

वाजीकरण: याला इंग्रजी मध्ये vilification किंवा Science of Aphrodisiac and Sexology म्हणतात. यात गुप्त रोगाबद्दल आणि ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांचा बद्दल लिहल आहे.

आतापर्यंत तुमचा लक्षात आल असेलच की आयुर्वेदा मध्ये सर्व आजारांचा बद्दल लिहल गेल आहे आणि त्याचा उपचारा बद्दल पण लिहल आहे.

आज काल भारता सोबतच बाहेरचा देशांना ही आयुर्वेदाच महत्व पटलेलं आहे.म्हणूनच आयुर्वेदा चा अभ्यास पण करता येतो.त्याचे विषय पुढील प्रमाणे आहेत.आयुर्वेद सिद्धान्त, आयुर्वेद संहिता,शरीर रचना, क्रिया शरीर, द्रव्यगुण विज्ञान, रस शास्त्र, रोग निदान, शल्य तंत्र, शालाक्य तंत्र, मनोरोग आणि पंचकर्म.

आयुर्वेद चे तीन स्तंभ आहेत.ज्याला त्रिस्कंध म्हटलं जात.ज्यांची नाव आहेत हेतु,लिंग आणि औषध.

आयुर्वेदिक उपचार 

रोगाची उपचार पद्धती ही खालील प्रमाणे वर्गीकृत करता येते.

शोधन उपचार

शोधन उपचार ही शारीरिक आणि मानसिक रोगांची मूळ कारणे नष्ट करण्याची उपचार पद्धत आहे. ह्या पद्धतीत आंतरिक आणि बाह्य शुद्धीकरण समाविष्ट आहे. नेहमीच्या काही उपचार पद्धती मध्ये खालील काही मुख्य पद्धती समाविष्ट आहेत.

पंचकर्म यात चिकित्सकीय वमन,विरेचन,काढ़ा एनीमा आणि नाकातून औषधे देणे आणि पंचकर्म पूर्व प्रक्रिया बाह्य आणि आंतरिक स्निग्धता आणि जाणीवपूर्वक घाम आणणे यांचा समावेश होतो. पंचकर्म उपचार पचन प्रक्रिये वर केंद्रित आहे.हा उपचार खासकरुन स्नायू विकारांवर,अस्थिरोगांवर, नाडीचे रोग, श्वसन रोग आणि पचन संस्थेचा विकारांवर उपयोगी ठरते.

शमन उपचार

शमन उपचारा मध्ये देहद्रवांचे नाश केले जाते.बिघडलेल्या देहद्रवांचे नाश होऊन इतर देहद्रवांमध्ये बिघाड न होऊ देता त्यास संथता आणण्याच्या ह्या पद्धतीस शमन असे म्हणतात.या उपचारात पाचके, व्यायाम आणि सूर्यप्रकाश, स्वच्छ मोकळी हवा यांचा वापर करून उपचार केले जातात. या उपचार पद्धतीत उपशामके व शामके याचा उपयोग केला जातो.

पथ्य व्यवस्था

पथ्य व्यवस्थेत आहाराबद्दल माहिती काय खाव,काय वर्ज्य करावे त्याचा सवयी या निर्धारित केल्या जातात याने अग्नी शमन होते आणि पचन प्रक्रिया अनुकूल होते.

निदान परिवर्जन

निदान परिवर्जनात रुग्णाच्या आहारातील आणि राहणीमानातील रोगास आमंत्रित करणार्‍या करणांना शोधून काढतात. रोगास कारण ठरणार्‍या गोष्टी टाळणे किंवा स्वतःला त्यापासून वाचविणे हे त्यात समाविष्ट आहे.

सत्ववजय

सत्ववजय म्हणजे मुख्यतः मानसिक अशांतता आणि चिंता यावर उपचार करून नियंत्रण मिळविणे आहे.यात साहस, समृती आणि एकाग्रता यांची शक्ति वाढवून त्यांची जोपासना केली जाते. मनोविज्ञान आणि मानसोपचारचा अभ्यास आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर विकसित केला गेला आहे.

रासायनीक उपचार

रासायनीक उपचारा मध्ये शक्ति आणि जीवन शक्ति वाढविली जाते. शरीराच्या रचनेची अखंडता, स्मृतीत वाढ, बुद्धीत वाढ,रोग प्रतिकार शक्तीत वाढ,यौवन,तेज आणि चेतना टिकविणे हे या उपचाराचे मुख्य उपलब्ध आहेत.

आयुर्वेदा नुसार आहार

आयुर्वेदात उपचार म्हणून आहारावर नियंत्रण हे फार महत्वाचे आहे.व्यक्तिचा मानसिक आणि आध्यात्मिक विकास त्याचबरोबर त्याचा स्वभाव हा तो कोणता आहार घेतो यावरुन ठरत होत असतो. मानवी शरीरातील अन्न हे पहिले अन्नरस मध्ये बदलत आणि त्यानंतरच्या प्रक्रियेत त्याचे रुपांतर रक्त, मांसपेशी, चरबी, अस्थि, अस्थि मज्जा, प्रजनन तत्वे यांत होते. म्हणून आहार हाच सर्व पचन क्रियेचा पाया आहे. आहारात जर पोषक तत्वे नसले तर आपण आजाराला आमंत्रण देत असतो.

आयुर्वेदिक माहिती | आयुर्वेदिक उपचार

तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदात तुमचा प्रत्येक शारीरिक आणि मानसिक आजाराचा उपाय उपलब्ध आहे.म्हणून आयुर्वेदाचा वापर करून कोणत्याही दुष्परिणामा शिवाय स्वत:चा उपचार करा आणि स्वस्थ राहा.

तुम्हा सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.. धन्यवाद.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *