शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट कसे काम करते.

शेअर मार्केट म्हणजे काय: प्रत्येक व्यक्तीला अल्पावधीत करोडपती व्हायचे असते, पण त्या व्यक्तीला जास्त मेहनत करायची नसते, त्याला एवढेच माहित असते की तो शेअर मार्केटमध्ये जाऊन करोडपती होऊ शकतो.

जगातील प्रेत्यक व्यक्ती शेअर मार्केट विषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भारतात राकेश झुनझुनवाला यांसारखे खूप लोक असे आहेत, की त्यांनी शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमावले आहेत.

तुम्हाला शेअर मार्केट मधून पैसे तर कामवायचे आहेत, पण तुम्ही शेअर मार्केट विषयी कधी डीटेलमध्ये माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला आहे का, जे लोग शेअर विकत घेतता ते कोणत्या आधारावर शेअर विकत घेत आहेत. 

आज आपण शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसे काम करते, शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याआधी रिसर्च कसे करावे, शेअर मार्केट बद्दल माहिती, आणि बरेच काही खाली जाणून घेणार आहोत. मराठी ब्लॉग ह्या साइट वरती तुम्हाला असे अनेक विषयी वरती माहिती वाचायला भेटते. 

शेअर मार्केट म्हणजे काय

अनुक्रमणिका

शेअर मार्केट म्हणजे काय (What is Share Market in Marathi)

शेअर मार्केट ही एक अशी विहीर आहे, जिथे तुम्ही करोडो रुपये कमवू शकता किंवा करोडो रुपये गमावू पण शकता, म्हणजेच ज्याला या विहिरीत पोहायला येते, तो शेअर मार्केटमधून पैसे कमवू शकतो.

मार्केट म्हणजे, इथे तुम्ही खरेदी आणि विक्री दोन्ही ही करू शकता. म्हणजेच शेअर बाजार ही अशी जागा आहे, इथे तुम्ही तुमचा पैसा प्रत्येक कंपनीत गुंतवू शकता.

आज शेअर बाजारात दोन प्रसिद्ध स्टॉक एक्स्चेंज कार्यरत आहेत, एक म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि दुसरे म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

आज, BSE आणि NSE वर 6000 हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत, तुम्ही यापैकी कोणत्याही कंपनीमध्ये पैसे गुंतवू शकता.

शेअर मार्केट आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:00 ते दुपारी 3:30 पर्यंत काम करते, ज्या दरम्यान तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता.

तुम्हाला शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे शेअर्स पाहायला मिळतात, इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर्स. जर तुम्ही इक्विटी शेअर्समध्ये शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला कंपनीमध्ये शेअर मिळतो आणि त्यानुसार तुम्हाला लाभांश मिळतो. परंतु प्रेफरन्स शेअरमध्ये तुम्हाला रिक्त लाभांश दिला जातो.

शेअर बाजार कसे काम करते (How the stock market works in Marathi)

ज्या कंपनीला पैशांची गरज आहे, आणि तिला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, ती कंपनी बाजारातून पैसे उभारण्यासाठी IPO आणते.

शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे दोन मार्ग आहेत, पहिला प्राथमिक बाजार आणि दुसरा दुय्यम बाजार.

प्राथमिक बाजार: जेव्हा कंपनी पहिल्यांदा शेअर बाजारात येते, तेव्हा ती कंपनी आपला IPO आणते, आणि गुंतवणूकदार त्या IPO मध्ये अर्ज करतात, गुंतवणूकदार IPO अंतर्गत थेट कंपनीचे शेअर्स खरेदी करतात, त्याला आपण प्राथमिक बाजार म्हणतो. म्हणजेच प्राइमरी मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट कंपनीचे शेअर्स खरेदी करता.

दुय्यम बाजार: कंपनीने आपला IPO आणल्यानंतर, तिचे शेअर्स NSE आणि BSE वर सूचीबद्ध केले जातात आणि त्यानंतर त्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी आणि विक्री NSE आणि BSE द्वारे केली जाते, त्याला आपण दुय्यम बाजार म्हणतो. म्हणजेच दुय्यम बाजारात गुंतवणूकदार स्टॉक एक्सचेंजमधून शेअर्स खरेदी करतात.

जेव्हा हे शेअर्स प्राथमिक बाजारातून शेअर्सची लिस्ट झाल्यानंतर दुय्यम बाजारात ट्रेडिंगसाठी येतात तेव्हा मागणीनुसार शेअर्सचे भाव कमी अधिक होत असतात.

शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीची वेळ आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:00 ते दुपारी 3:30 पर्यंत आहे.

दुय्यम बाजारात तुम्ही डीमॅट खात्याद्वारे शेअर्स खरेदी करता येतात, तुम्हाला जे शेअर्स खरेदी करायचे आहेत, ते तुम्ही डीमॅट खात्याद्वारे ब्रोकरला विनंती पाठवता, ब्रोकर स्टॉक एक्सचेंजला ऑर्डर देतो. त्यानंतर स्टॉक एक्स्चेंज हे शेअर्स ब्रोकरला देते आणि ब्रोकर आपल्याला डिमेट खात्यात शेअर देतात.

ही संपूर्ण प्रक्रिया 1 मिनिटात घडते, कारण लाखो लोक आहेत, जे स्टॉक एक्सचेंजवर एकाच कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री करतात. स्टॉक एक्स्चेंजला एकाच वेळी कोट्यवधी खरेदीदार आणि विक्रेता विनंत्या प्राप्त होत असतात.

शेअर मार्केट मध्ये पैसे कसे गुंतवायचे (How to invest money in share market in Marathi)

शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर मार्केट कसे चालते याच्या वर आपण वरती पहिले, आपण हे देखील पाहिले आहे की जेव्हा आपल्याला दुय्यम बाजारातून शेअर्स खरेदी करायचे असतात तेव्हा आपल्याला डिमॅट खाते हवे असते.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला डिमॅट खाते आवश्यक आहे, ते योग्य आहे, कारण आज आपण डिमॅट खात्याद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकतो.

आज बाजारात अनेक ब्रोकर आहेत जे तुमचे डिमॅट खाते मोफत उघडू शकतात, तुम्ही घरी बसून ऑनलाइन डिमॅट खाते उघडू शकता.

मी वापरत असलेले डीमॅट खाते Groww हे एक चांगले broker आहे, जिथे तुम्हाला इक्विटी मार्केट, डेरिव्हेटिव्ह मार्केट, म्युच्युअल फंड, एसआयपी, इंडेक्स फंड हे सर्व पर्याय मोफत मिळतात.

Groww मध्ये खाते उघडण्यासाठी क्लिक करा.

डिमॅट खाते उघडल्यानंतर तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छिता ते थेट खरेदी करू शकता.

शेअर्स खरेदी करताना तुम्हाला हे दोन पर्याय पाहायला मिळतात, इंट्राडे आणि डिलिव्हरी, इंट्राडे म्हणजे आज खरेदी आणि आजच विक्री, डिलिव्हरी म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा आज खरेदी केल्यानंतर कधीही विक्री.

शेअर मार्केट कसे शिकायचे (How to Learn Share Market in Marathi)

शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्हाला पहिले फंडामेंटल अनॅलिसिस आणि दुसरे टेक्निकल अनॅलिसिस येणे आवश्यक आहे. 

फंडामेंटल अनॅलिसिस मध्ये तुम्हाला कंपनीची संपूर्ण माहिती मिळू शकते, तिचा दरवर्षी नफा किती आहे, तिचा तिमाही नफा किती आहे, त्यावर किती कर्ज आहे, कंपनीचा कॅश फ्लो, कोणत्या गुंतवणूकदाराने कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला फंडामेंटल अनॅलिसिस मधून समजतात.

टेक्निकल अनॅलिसिस मध्ये तुम्हाला चार्टबद्दल माहिती, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर वापरून शेअर चे अनॅलिसिस शिकू शकता.

कंपनीच्या फंडामेंटल अनॅलिसिस जाणून घेण्यासाठी, तुम्ही www.screener.in ही साइट वापरू शकता, ही पूर्णपणे विनामूल्य साइट आहे आणि टेक्निकल अनॅलिसिस साठी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू साइटवर जाऊन चार्ट पॅटर्न, इंडिकेटर वापरू शकता.

डिमॅट खाते

ट्रेडिंग अकाऊंट वरुण तुम्ही शेअर खरीदी करू शकता, आणि खरेदी केलेले शेअर डिमेट अकाऊंट मध्ये ठेऊ शकता. 

ब्रोकर 

एखाद्या कंपनी चे शेअर तुम्ही ट्रेडिंग अकाऊंट ध्वारे खरेदी करू शकता, आणि खरेदी केलेले शेअर डिमेट अकाऊंट वरती ठेवले जातात, ये दोन्ही अकाऊंट तुम्ही ब्रोकर कडून सुरू करू शकता. 

ब्रोकर तुम्हाला शेअर्स खरेदी करण्याव्यतिरिक्त डेरिव्हेटिव्ह मार्केट, म्युच्युअल फंड, सोवरेन गोल्ड बॉन्ड यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो, आणि नंतर ते देखील डिमॅट खात्यात साठवले जाते.

ट्रेडिंग खाते

तुम्ही ट्रेडिंग खात्याद्वारे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकता, आणि नंतर ते तुमच्या डिमॅट खात्यात साठवू शकतो.

सेबी (SEBI)

SEBI म्हणजेच सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ही एक नियामक संस्था आहे, जी 12 एप्रिल 1992 रोजी भारत सरकारने भारतीय बाजारपेठेत पारदर्शकतेला चालना देण्यासाठी सुरू केली होती, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांचे रक्षण करणे, फसवणूक टाळणे, इन्साइड ट्रेडिंग थांबवणे इत्यादीसाठी हिची सुरू केले गेली आहे. 

इनसाइड ट्रेडिंग

शेअरची कमाई त्याच्या मागणीनुसार जास्त असते हे आपण वर वाचले आहे, जेव्हा एखादा म्युच्युअल फंड बाजारात हजारो कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा त्या शेअरची किंमत पूर्णपणे वाढते.

एखाद्या सामान्य किरकोळ गुंतवणूकदाराला हे म्युच्युअल फंड हे शेअर खरेदी करणार आहे हे आगाऊ कळले तर तो किरकोळ गुंतवणूकदार तो आगाऊ खरेदी करतो आणि त्यानंतर त्याला मोठा नफा मिळेल, याला इनसाइड ट्रेडिंग म्हणतात.

शेअर बाजारचे नियम

जेव्हा प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये येतो, तेव्हा तो एक दिवस श्रीमंत होण्यासाठी येतो, आणि त्याचे सर्व पैसे गमावतो. शेअर मार्केटमध्ये तुम्ही खाली दिलेल्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला कधीही नुकसान होणार नाही.

1. शेअर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी जाणून घ्या.

आजच्या काळात असे अनेक लोक आहेत, जे इतरांच्या सांगण्यावरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात किंवा ते टिप घेऊन गुंतवणूक करतात. जर तुम्हाला मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला शिकावे लागेल, स्वतःला वेळ द्यावा लागेल आणि मग गुंतवणूक करावी लागेल.

2. स्वतःला वेळ द्या.

शेअर मार्केटमधून तुम्ही एका दिवसात करोडपती होणार नाही, तुम्हाला शेअर मार्केटला वेळ द्यावा लागेल, शेअर मार्केट म्हणजे काय, मार्केट कसे चालते, याची सविस्तर माहिती घ्यावी लागेल.

3. फंडामेंटल अनॅलिसिस शिका.

तुम्हाला ज्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत, तिचा नफा किती आहे, कर्ज किती आहे, इक्विटीवर परतावा किती आहे, या सर्व गोष्टी तुम्ही फंडामेंटल अनॅलिसिसध्वारे जाणून घेऊ शकता.

मूलभूत विश्लेषण शिकण्यासाठी तुम्ही www.screener.in या वेबसाइटला मोफत भेट देऊ शकता.

4. टेक्निकल अनॅलिसिस शिका.

फंडामेंटल अनॅलिसिस आपल्याला 30% पर्यंत मदत करते, परंतु आपण टेक्निकल अनॅलिसिसमध्ये तज्ञ असल्यास, आपण तांत्रिक विश्लेषणाद्वारे अल्पावधीत पैसे कमवू शकता.

टेक्निकल अनॅलिसिसमध्ये, तुम्हाला चार्ट पॅटर्न, इंडिकेटर याविषयी माहिती असायला हवी. तुम्ही TradingView वरून कोणत्याही कंपनीच्या स्टॉकचे टेक्निकल अनॅलिसिस शिकू शकता.

5. पुस्तके वाचा

तुम्हाला शेअर मार्केटची अनेक पुस्तके ऑनलाइन सापडतील ज्यात तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती मिळेल. हे पुस्तक तुम्ही ऑनलाइन किंवा बाजारात जाऊन विकत घेऊ शकता.

6. चांगल्या कोर्समध्ये सामील व्हा.

शेअर मार्केट शिकण्यासाठी तुम्ही शेअर मार्केट ऑनलाईन शिकू शकता किंवा कुठल्यातरी कोचिंग सेंटर मध्ये जाऊन शेअर मार्केट ऑनलाईन शिकू शकता, तसेच खूप सारे युट्युबवर अनेक चॅनल आहेत, त्यावर तुम्ही चांगले चॅनल पाहून शेअर मार्केट शिकू शकता.

आज मार्केटमध्ये लोक शेअर मार्केट कोर्स बनवतात आणि विकतात, तुम्ही चांगले संशोधन करून आणि त्याचे रिव्ह्यू पाहून त्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकता.

जगातील शीर्ष 10 प्रमुख शेअर बाजार

जगात असे 16 स्टॉक एक्सचेंज आहेत ज्यांचे मूल्य $1 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. खाली आम्ही टॉप 10 स्टॉक एक्सचेंजेसबद्दल सांगितले आहे.

1. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE)
2. Nasdaq (NASDAQ)
3. जपान एक्सचेंज ग्रुप (JPX)
4. शांघाय स्टॉक एक्सचेंज (SSE)
5. हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज (SEHK)
6. युरोनेक्स्ट
7. लंडन स्टॉक एक्सचेंज
8. शेन्झेन स्टॉक एक्सचेंज (SZSE)
9. TMX Group (TSX)
10. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
11. नॅशनल स्टॉक एक्सचेंच (NSE)

भारतातील शेअर बाजार कोण चालवतो?

भारताचा शेअर बाजार ही कोणतीही एक संस्था चालवू शकत नाही, वेगवेगळ्या संस्था त्यात काम करतात, शेअर बाजार व्यवस्थित चालावा यासाठी ही संस्था काम करते असते.

1. सेबी

सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच SEBI ची सुरुवात भारत सरकारने 12 एप्रिल 1992 रोजी केली, भारतीय बाजारपेठेच्या पारदर्शकतेला चालना देण्यासाठी ह्याची सुरवात केली, त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

2. RBI (रेसेर्व बँक ऑफ इंडिया)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय स्टॉक ब्रोकर्सच्या खरेदी-विक्रीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी काम करते.

RBI ने अलीकडेच आरबीआय डिजिटल करंसी लाँच केले आहे, जे दुय्यम बाजारात वापरले जाऊ शकते.

3. BSE

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) हा भारत सरकारचा मुख्य शेअर बाजार आहे, जिथे खाजगी, सरकारी, निम-सरकारी कंपन्यांचे सर्व शेअर्स सूचीबद्ध आहेत.

बीएसई स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये देखील क्रियाकलाप आहे, ज्यामुळे ते नियमितपणे कार्य करते.

4. NSE

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) 1992 मध्ये सुरू झाले, जसे BSE तसेच NSE देखील काम करते.

5. आणखी खूप सारे आहेत, जे शेअर बाजारात काम करतात

शेअर बाजारातील नुकसान टाळण्यासाठी टिप्स

शेअर बाजारातील नुकसान टाळायचे असेल तर खाली काही मुद्दे लक्षात घेऊन तोटा टाळता येईल.

1. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती असायला हवी.

2. आज लोक टिप्स ऐकून, न्यूज चॅनेल बघून, टेलिग्रामवर टिप्स ऐकून, यूट्यूबवर बघून मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, त्याच्या माध्यमातून बाजारात पैसा गुंतवू नये.

3. तुम्हाला शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान असावे.

4. काही लोक आपला शेअर बाजारातील नफा दाखवतात आणि पैसे घेऊन टेलिग्रामवर टिप्स देतात, त्यापासून दूर राहा. 

5. आज काही लोक ऑनलाइन अॅड चालवून आपला कोर्स विकतात, ज्यांचा कोर्स चांगला आहे त्यांना जाहिरात करून कोर्स विकण्याची गरज पडत नाही, चांगले कोर्सची जाहिरात आपोआप होती.

6. काही लोक सांगतात की आम्हाला शेअर मार्केटचा इतका वर्षांचा अनुभव आहे, आमचा कोर्स घ्या. त्यांना इतक्या वर्षांचा अनुभव आहे, तर ते स्वतः कोर्स विकून पैसे का कमवत आहेत, चांगले लोक शेअर मार्केटमधून करोडो रुपये एका दिवसात कमवू शकतात.

भारतात किती शेअर बाजार आहेत?

सेबी: सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे आज भारतात एकूण 23 एक्सचेंजेस आहेत आणि BSE, NSE त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतात. यासह 23 RSE प्रादेशिक स्टॉक एक्सचेंज आहेत.

जगातील सर्वात मोठा शेअर बाजार कोणता आहे?

जगातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) आहे, ज्याचे बाजार भांडवल $30 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे.

भारतातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?

भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आहे, त्याची स्थापना 1875 मध्ये झाली, आज BSE मध्ये 6000 हून अधिक शेअर्स सूचीबद्ध आहेत.

भारतातील सर्वात महाग स्टॉक कोणत्या कंपनीचा आहे?

MRF कंपनीचा शेअर सर्वात महाग आहे, त्याची किंमत आजच्या काळात सुमारे 1 लाख रुपये आहे.

जगातील सर्वात महाग स्टॉक कोणाताआहे?

जगातील सर्वात महागडा स्टॉक बर्कशायर हॅथवे इंक या अमेरिकन कंपनीचा आहे.

शेअर मार्केटमध्ये एका दिवसात किती पैसे कमावता येतात?

शेअर मार्केटमध्ये तुम्ही एका दिवसात हवे तेवढे पैसे कमवू शकता, तुम्ही किती पैसे गुंतवत आहात, त्यानुसार तुम्ही पैसे कमवू शकता.

शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मार्गदर्शन

आज आम्ही तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट कसे काम करते, शेअर मार्केट कसे शिकायचे, त्यातील पैसे कसे गुंतवायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

याशिवाय तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मराठी ब्लॉग ह्या साइट वरती तुम्हाला असे अनेक विषयी वरती माहिती वाचायला भेटते. 

धन्यवाद !

About The Author

2 thoughts on “शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट मार्गदर्शन, शेअर मार्केट कसे काम करते.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *