प्रधानमंत्री पीक विमा योजना | Prime Minister’s Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री पीक विमा योजना, नमस्कार आपण भारत सरकारच्या सरकारी योगणा मराठी ब्लॉग या वेबसाइट ध्वारे तुमच्या पर्यत्न पोहचवण्याचे काम करत आहे.आज आपल्या देशातील शेतकरी शेती करू शकत नाही, कारण की काही कारणाने त्याचे पीकचे नुकसान होते.

आज मी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना काय आहे, या योगणेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, या योगणेचा उद्देश काय आहे, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, या योगणेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी आहेत. यासगळ्यांचा विचार आपण या लेखामध्ये करणार आहोत.

प्रधानमंत्री पीक विमा योजना (Prime Minister’s Crop Insurance Scheme)

प्रत्येक वर्षी काही नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जास्त पाऊस, वारे, गारा पडणे, अवकळी पाऊस पडणे व काही वर्षी पाऊस नाही पडल्यामुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान होत आहे, व त्यांनी शेतामध्ये जे भांडवल गुंतणूक केली आहे ती ही त्यांना भेटेत नाही.

त्यांना अशा संकटामध्ये मदत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवरी 2016 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना याची घोषणा केली. या योगणेअंतर्गत भारतातील शेतकर्‍यांना खरीब हंगामासाठी 2% प्रीमियम आणि रब्बी हंगामासाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो.

प्रधानमंत्री पीक विमा योजना या मध्ये प्रीमियमची रक्कम खूप कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील प्रत्येक शेतकर्‍याला या योगणेचा लाभ घेता येईल. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात मात्र, शेतकर्‍यांना 5% प्रीमियम भरावा लागेल.

या योगणेचा उद्देश 

 • शासनाने नैसर्गिक आपत्ती, कीटक व रोगांमुळे अधिसूचित केलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे.
 • शेतकर्‍यांना शेतीमध्ये रस निर्माण आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी भर देणे.
 • शेतकर्‍यांना शेतीमध्ये नवीन आणि आधुनिक पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे.
 • कृषी क्षेत्रात पत उपलब्धतेची हमी देणे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना: ऑनलाइन फॉर्म 

ज्या कोणी शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला नाही व ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे माहीत नाही, त्यांना आपण स्टेप बाय स्टेप प्रधानमंत्री पीक विमा योजना: ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा हे जाणून घेणार आहोत. हा फॉर्म तुम्ही ऑनलाइन घरी बसून ही भरू शकता यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही.

हे लक्षात असू द्या, ह्या योगणेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे बँक पासबूक आणि 7/12 उतार्‍याची स्कॅन कॉपी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी असली पाहिजे. ऑनलाइन घरी बसून फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे एक संगणक आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

स्टेप 1: सर्व प्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजना या वेबसाइट वर विजिट करा. विजिट करण्यासाठी येथे क्लिक करा. तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये पहिला ऑप्शन “Farmer Corner” वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

 

स्टेप 2: “Farmer Corner” वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपेन होईल, त्यामध्ये दोन ऑप्शन दिसतील “Login for Farmer” आणि दूसरा “Guest Farmer”. जर तुमचे अगोदर अकाऊंट असेल तर पहील्या ऑप्शन वर क्लिक करा, व अकाऊंट नसेल तर “Guest Framer” वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

स्टेप 3: “Guest Farmer” वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपेन होईल त्यामध्ये तुमची सगळी माहिती भरून घ्या, जसे की नाव, Relationship, Relative Name, मोबाइल नंबर, एत्यादी, माहिती भरल्यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी तुमच्या मोबाइल मध्ये ओटीपी येईल तो भरून तुमचा नंबर वेरीफाय करा.

तसेच खाली दिलेली ईतर माहिती भरून  “Create User” वरती क्लिक करा.

प्रधानमंत्री पीक विमा योजना

 

स्टेप 4: “Create User” वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज वरती बँक डीटेल विचारली जातील ते भरून घ्या. खाली आल्यानंतर पत्ता भरून नेक्स्ट वरती क्लिक करा.

स्टेप 5: नंतर तुमच्या समोर बँक डीटेल सिलेक्ट करायचा एक ऑप्शन येईल तो सिलेक्ट करा. खाली आल्यानंतर Nominee Details मध्ये तुम्ही Nominee details भरून घ्या, त्यामध्ये नाव, वय, तुमचे आणि तुमच्या Nominee चे नाते काय आहे, त्याचा पूर्ण पत्ता एत्यादी. हे सगळे भरून झाल्यानंतर नेक्स्ट या बाटनावर क्लिक करा.

स्टेप 6: तुमच्या समोर “Crop details” हा फॉर्मचे पेज ओपेन होईल. त्यामध्ये तुम्ही ज्या स्टेट मध्ये राहता त्या स्टेटचे नाव, स्कीम, सीजन कुठला आहे, Year हे भरून घ्या.

स्टेप 7: खाली आल्यानंतर तुम्हाला “Land Details” भरावे लागतील. त्यामधील सगळी माहिती भरून घ्या.

स्टेप 8: खाली त्याच पेज वर तुम्हाला “Mix Cropping” हा ऑप्शन दिसेल. जर तुम्ही कोणते अंतर पीक घेतले असेल तर “यस” वर क्लिक करा, व घेतले नसेल तर “नो” वर क्लिक करा.

स्टेप 9: त्यानंतर खाली Crop या सेक्शन वर तुम्हाला सिलेक्ट क्रॉप्स हा ऑप्शन दिसेल. नंतर तुम्ही कधी पैरणी केली आहे त्याची तारीख, तुमचा सर्वे नंबर, एत्यादी माहिती भरून घ्या. नंतर Add या बटनावर क्लिक करा.

स्टेप 10: अॅड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखी कोणते पीक अॅड करायचे असल्यास तुम्ही अॅड करू शकता.

स्टेप 11: हे सगळी माहिती भरल्यानंतेर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी खाली ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्ही तुमचे पासबूक फोटो, तुमचा 7/12 उतारा अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करा.

स्टेप 12: डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्ही भरल्याला फॉर्मचा प्रीव्यू तुमच्या पुढे ओपेन होईल. फॉर्म वेरीफाय करून  Make Payment वर क्लिक करा.

स्टेप 13: तुम्ही पेमेंट करून तुमच्या समोर डीटेल दिसतील. व तुमचा फॉर्म अशा रीतीने सबमिट होईल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स 

वरती आपण ऑनलाइन घरी बसून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अप्लाय कसे करायचे याविषयी माहिती करून घेतली. तुमच्या मनामध्ये खूप सारे विचार येत असतील, की या योगणेसाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतात. वरती आपण बगीतल्याप्रमाणे खाली काही डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे.

 • बँक पासबूक
 • 7/12 उतारा

या योगणेचा लाभ घेण्यासाठी काही अटी 

 • या योगणेचा फायदा घेण्यासाठी पीक पेरल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला फॉर्म भरावा लागतो.
 • पीक काढायच्या 14 दिवस अगोदर जर का तुमचे काही कारणाने नुकसान झाले तर तुम्ही ह्या योगणेचा लाभ घेऊ शकता.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच विम्याच्या रक्कमेचा लाभ देण्यात येईल.
 • स्मार्ट फोन, रिमोट सेन्सिंग ड्रोन आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर हार्वेस्टिंग डेटा गोळा करण्यासाठी आणि दाव्याच्या देयकामध्ये होणारा विलंब कमी करण्यासाठी साइटवर अपलोड करण्यासाठी केला जातो.
 • गतवर्षी कापूस पिकाच्या विम्याचे प्रीमियम प्रति एकर 62 रुपये होते, तर धान पिकासाठी ते 505.86 रुपये, बाजरीसाठी 222.58 रुपये आणि मकासाठी एकरी 202.34 रुपये होते.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *