भारत सरकारच्या सरकारी योगणा

नमस्कार मित्रांनो आज आपण भारत सरकारच्या सरकारी योगणा कोणत्या आहेत  व याचा आपण कशा प्रकारे फायदा घेऊ शकतो याविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. आज भारतामध्ये असे लोक असे आहेत की यांना कोणत्या सरकारी योगणा आहेत व या योगणेसाठी अॅप्लिकेशन फॉर्म भरून कसा लाभ घ्यायचा हे माहीत नाही. यामुळे मी आज फक्त कोणत्या सरकारी योगणा आहेत या विषयी माहिती सांगणार आहे.

नंतर येणार्‍या पुढील लेखामध्ये या भारत सरकारच्या सरकारी योगणा काय आहेत याविषयी डीटेल मध्ये माहिती माहिती सांगेन. तसेच ऑनलाइन किवा ऑफलाइन अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय लागतात हे ही डीटेल मध्ये आपण येणार्‍या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. 

भारत सरकारच्या सरकारी योगणा

 

भारत सरकारच्या सरकारी योगणा

1. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना

आज COVID -19 मुळे खूप सारे व्यवसाय ठप्प झाले आहेत, व कंपनी आपला स्टाफ कमी करत आहेत. याचा विचार करून केंद्र सरकारने या योजने मध्ये काही बधल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पहील्यापेक्षा जास्त सोपे कर्ज मिळणे झाले आहे.

केद्र सरकारने एप्रिल 2015 मध्ये छोटे व्यवसाय सरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सरू केली. यासाठी लोकांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी बंके मार्फत लोन दिले जाते. या योगणे अंतर्गत तुम्हाला कोणत्याही हमी न घेता कर्ज दिले जाते. 

ही योगणा तीन भागामध्ये विभागली गेली आहे

 • शिशु लोन अंतर्गत रू 50,000/ – पर्यंत कर्ज दिले जाते.
 • किशोर लोन अंतर्गत रू 50,000/ –  ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.
 • तरुण लोन अंतर्गत 5 लाख ते 20 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.  

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

2. प्रधानमंत्री गुरुकुल योजना

भारत सरकार ध्वारा सुरू केलेली प्रधानमंत्री गुरुकुल योजना स्कीम, याचा उद्धेश गरीबांना आणि गरजूंना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये घर उपलब्ध करून देणे आहे. ही योजना 25 जून 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचे 31 मार्च 2022 पर्यत्न 2 करोड घरे बनवण्याचे लक्ष्य आहे. 

प्रधानमंत्री गुरुकुल योजना अंतर्गत पहिल्यांदा घर बनवण्यासाठी किवा योजनेचा लाभ घेणार्‍यांसाठी भारत सरकार ध्वारे सबसीडी दिली जाते. म्हणजे घर विकत घेण्यासाठी होम लोण वर सबसीडी दिली जाते. ही सबसिडी 2.67 लाख रुपयापर्यत्न भेटू शकते. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे.

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

3. रमाई घरकुल योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जाती व नव-बौद्ध घटकांतील लोकांसाठी दिनांक 15 नोवेंबर 2008 पासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी सौचालयासह 1,32,000 रुपये, नक्षल ग्रस्त व डोंगराळ भागातील क्षेत्रासाठी 1,42,000 रुपये तसेच शहरी भागामध्ये 2,50,000 रुपये अनुदान देण्यात येते. हे सुधारित अनुदान 2016-17 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने या योजनेचे नाव घरकुल योजना हे नाव ठेवले आहे. महाराष्ट सरकारने रमाई घरकुल योजने अंतर्गत 51 लाख घरे देण्याचे लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत दीड लाख घरे सामाजिक न्याय विभागाने मंजूर केली आहेत. 

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

4. पंतप्रधान पीक विमा योजना

प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या देशातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते, यामध्ये पुर, वादळ, गारपीट आणि पाऊस  यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी भारत सरकारने शेतकर्‍यांसाठी मदत म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना याची सुरवात केली आहे.

सन 1985 साली राजीव गांधी पंतप्रधान असताना पहिली पीकविमा योगणा सुरू करण्यात आली. 1999 साली एन. डी. ए. सरकारने ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना”  लागू केली. या योजने मध्ये सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता.

13 जानेवरी 2016 रोजी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेस मंजूरी देण्यात आली. याअंतर्गत शेतकर्‍यांना  खरीप पिकासाठी 2% आणि रब्बी पिकासाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो.

5. किसान सन्मान निधी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो शेतकर्‍यांसाठी किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत भारत सरकार वर्षाला 6000 रुपये डायरेक्ट शेतकर्‍यांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करते.

या योजेनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज. तसेच या योगनेमध्ये तुमचे नाव व अकाऊंट वर पैसे जमा करण्यात आले आहेत का नाहीत यासाठी तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता pmkisan.gov.in या वेबसाइट वर.

संपूर्ण माहितीसाठी क्लिक करा.

6. जीवन ज्योती विमा योजना

जीवन ज्योती विमा योजना ही एक टर्म इन्शुरेंस प्लान आहे. या योजनेमध्ये तुम्ही नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्ती चा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला 2 लाख रुपयाचा विमा मिळतो. ही योजना 9 मे 2015 साली सुरू करण्यात आली जेणेकरून देश भरातील प्रत्येक व्यक्ती याचा लाभ घेऊ शकेल.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला मेडिकल चेक उपची गरज पडत नाही.  18 ते 50 वर्ष मधील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला या टर्म प्लान मध्ये रेसिस्टर केल्यानंतर वर्षाला 330 रुपये प्रीमियम भरावा लागतो. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे. 

7. पंतप्रधान कौशल्य विकास योजना

भारत सरकारच्या सरकारी योगणा ही सन 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजेनेचा हेतु देशातील तरुणांना उद्योगांशी संबंधित प्रशिक्षण देणे जेणेकरुन त्यांना रोजगार मिळू शकेल. यासाठी तरुणांना फी देण्याची गरग नाही, या योगनेमध्ये सरकार स्वत: फी भरते.

सरकार पंतप्रधान कौशल्य विकास योजना अंतर्गत 10 वी, 12 वी पास तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देते जेणेकरून त्यांना रोजगार मिळण्यास मदत होईल. सन 2020 पर्यत्न एक करोड लोकांना प्रशिक्षण देण्याचा सरकारचा लक्ष आहे. या योजनेमध्ये ऑनलाइन रेसिस्टर करण्यासाठी तुम्ही www.pmkvyofficial.org या वेबसाइट वर जाऊन रेसिस्टर करू शकता.

8. रोजगार प्रोत्साहन योजना

जर तुम्ही नोकरी मध्ये खुश नसाल किवा तुमचा स्वत: चा बिजनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारत सरकारने रोजगार प्रोत्साहन योजना तुम्हाला मदत करू शकते. पीएमआरपीवाय अंतर्गत, सरकार तीन वर्षांसाठी आपल्या व्यवसायात गुंतलेल्या कामगारांचे ईपीएफ आणि ईपीएसमधील नियोक्ताचे योगदान (12%) देईल.

पीएमआरपीवायमध्ये आतापर्यंत 31 लाख लाभार्थी औपचारिक नोकरीत सामील झाले आहेत, ज्यावर सरकारने 500 कोटींपेक्षा जास्त रकमेचे योगदान दिले आहे. त्याअंतर्गत ईपीएफओमध्ये खाते उघडणार्‍या नवीन कर्मचार्‍यांच्या ईपीएसमधील वेतनाच्या 8.33 टक्के सरकार योगदान देईल. यामुळे एसएमई क्षेत्रात नवीन कर्मचारी ठेवण्यात आणि त्यांना पीएफचा लाभ मिळवून देण्यात मालकांची आवड वाढेल. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे.

9. पंतप्रधान आयुष्मान भारत योजना

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातून बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2018 रोजी आयुष्मान भारत योजना सुरू केली. तर, पंतप्रधान मोदींनी 25 सप्टेंबर 2018 पासून अंत्योदयातील स्वप्न पाहणारे पंडित दीन दयाल उपाध्याय यांची जन्म तारीख च्या वेळी पूर्ण देशभर ही योगणा सुरू केली.

या योजनेमध्ये 2011 च्या जनगणनेनुसार 10 करोड कुटुंबांचा समावेश यासाठी तुम्ही mera.pm.jay.gov.in या वेबसाइट वर चेक करू शकता.  या योजनेमध्ये येणार्‍या प्रत्येक परिवाराला वर्षाला 5 लाख रुपयाचा हॉस्पिटल खर्च मोफत दिला जातो. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे.

10. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

भारत सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब कुटुंबांना लाभदायक ठरणारी योजना आहे. ही योजना 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेश च्या बलिया जिल्ह्यामध्ये लॉंच केली होती.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये गरीब कुटुंबांना आपले जीवन जगण्यासाठी घरगुती एलपीजी कनेक्शन देते. ही योजना केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या सहकार्याने हे चालवले जात आहे. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे 

11. प्रधानमंत्री कृषी पाटबंधारे योजना

ह्या योजनेचा मुख्य हेतु हा प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधपर्यात्न पानी पोहचणे व त्याच्या शेतातून जास्तीत जास्त पीक मिळवणे हा आहे.

ही योगणा 2015-16 च्या अर्थ संकल्पात याची तरतूद करण्यात आली आणि 1 जुलै 2015 ला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. ह्या योजनेसाठी 5,300 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे 

12. प्रधानमंत्री वाय वंदना योजना

प्रधानमंत्री वाय वंदना योजना ही सीनियर सिटीजन साठी पेंशन स्कीम आहे. मासिक निवृत्तीवेतनाची निवड केल्यावर, ज्येष्ठ नागरिकांना योजनेत 10 वर्षांच्या निश्चित दराने निश्चित पेन्शन मिळते. या योजनेत मृत्यू लाभ देखील देण्यात आला आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी वय 60 वर्षे असावे लागते. जास्तीत जास्त वयाची आट यामध्ये नाही. एक व्यक्ती जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवू शकतो. यासाठी तुम्हाला ऑनलाइन आवेदन द्यावे लागते. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे 

13.पंतप्रधान रोजगार योजना

पंतप्रधान रोजगार योजना ही केंद्र सरकारची स्वरोजगार योजना आहे. ह्या योजने अंतर्गत आपला उद्योग सुरू केल्यानंतर सरकार 25 लाख आणि सेवा क्षेत्र मध्ये गुंतूणूक केल्यानंतर 10 लाख रुपये कर्ज देते.

या योजनेमध्ये तुम्हाला कर्जाच्या रकमेवर 15% अनुदान आणि आरक्षित जात अर्जदारांना 25% अनुदान मिळते. तसेच तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम धंदा करत असल्यास ही रक्कम वाढवून तुम्हाला 25 ते 35% ईतके अनुदान मिळते. ही योजना 15 ऑगस्ट 2008 साली सुरू करण्यात आली. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे 

14. अटल पेन्शन योजना

केंद्र सरकारने मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजना सुरू केली. या योजनेचा हेतु 60 वर्षानंतर तुम्हाला प्रती महीने 1000, ते 5000 रुपये पेंशन देणे हे आहे. एपीवाय योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपण अकाली मरण पावला तर आपल्या कुटुंबाचा फायदा होत राहण्याची तरतूद आहे.

अटल पेन्शन योजना ही सहा भागामध्ये विभागली गेली आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमचे वाय 18 ते 40 वर्षे असावे लागते. पेंशन भेटण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 वर्षे गुंतूवणूक करावी लागते. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे.  

15. प्रधान मंत्री कर्म योगी मानधन  योजना

31 मे 2019 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मध्ये या योगणेची सुरवात केली. ही पेन्शन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. भारतीय जीवन महामंडळ (एलआयसी) ही योजना चालवेल.

या योजणेअंतर्गत येणार्‍या व्यक्ती ला 60 वर्षा नंतर 3000 रुपये प्रत्येक महिना पेंशन दिली जाईल.  प्रधान मंत्री कर्म योगी मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 40 वर्ष असणे गरजेचे आहे. ह्या योगणेचा लाभ देशातील लहान वर्गातील शेतकर्‍यांना आणि व्यापार्‍यांना दिला जाईल.

16.पंतप्रधान प्रवासी तीर्थ दर्शन योजना

22 जानेवारी 2019 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान प्रवासी तीर्थ दर्शन योजनेची सुरुवात केली. या योजनेची हेतु परदेशी भारतीयांना भारतात आणणे आणि त्यांना संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून देणे हे पंतप्रधान मंत्री तीर्थीर्थ दर्शन योजनेचे उद्दीष्ट आहे. परदेशी भारतीयांना असे म्हणतात की जे मूळचे भारतीय आहेत परंतु इतर देशांमध्ये गेले आहेत.

या योजनेअंतर्गत 40 लोकांना प्रत्येक वर्षी तीर्थयात्रा केली जाईल. ही यात्रा 25 दिवसाची असेल. यामध्ये येणारा सगळा खर्च सरकार उचलेल. 45 ते 65 वर्ष वयोगटातील लोक या योगणेचा फायदा घेऊ शकतात. ही एक भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे 

17. अन्य योजना

ह्या भारत सरकारच्या सरकारी योगणा आहे . तसेच आणखी कोणत्या भारत आणि महाराष्ट सरकारच्या योगणा आहेत. 

 • अपंग कल्याण योजना
 • जिल्हा उद्योग केंद्र योजना
 • अखिल भारतीय सुरक्षा अवास योजना
 • पंचयात समिती योजना महाराष्ट्र
 • मुख्यमंत्री रोजगार योगणा महाराष्ट
 • स्वयं नियोजन योजना
 • अंत्योदय अण्णा योजना
 • राष्ट्रीय शिक्षण धोरण योजना

 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *