माहितीचा अधिकार माहिती | माहितीचा अधिकार अर्ज ग्रामपंचायत

माहितीचा अधिकार माहिती, महितीचा अधिकार हा आपल्याला 2005 पासून लागू करण्यात आला यामागे एक उधीष्ट म्हणजे सरकारी कामात पारदर्शकपणा आणणे. हा कायदा आणण्याच्या अगोदर आपण सरकारी कार्यालमध्ये माहिती घेऊ शकत न्हवतो. तसेच आपल्या आजोबाजूला कोणतेही काम सुरू असल्यास आपल्याला त्या कामाची माहिती घेता येत न्हवती. 

पण जेव्हा पासून हा कायदा लागू करण्यात आला तेव्हा पासून आपल्याला कोणत्याही सरकारी कमाविषयी माहिती, त्या सरकारी कार्यालयामध्ये किती निधी आला व त्याचा वापर आपण कशा प्रकारे केला याविषयी माहिती आपल्याला घेता येत न्हवते.   

आज आपण या लेखामध्ये माहितीचा अधिकार काय आहे? या अधिकाराचा उपयोग आपल्याला कशा प्रकारे करता येईल या विषयी आपण डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत. 

माहितीचा अधिकार माहिती

माहितीचा अधिकार माहिती

महितीचा अधिकार हा कायदा आणण्याचा मुख्य हेतु म्हणजे नागरिकांना सक्षम बनविणे, सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वा वाढवणे, भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे, आणि आपल्या लोकशाहीला लोकांपासून यशस्वी बनवणे. एक सक्षम नागरिक प्रशासनाच्या साधनांवर आवश्यक दक्षता राखण्यास आणि सरकारला अधिक जबाबदार बनविण्यास सक्षम आहे. नागरिकांना शासनाच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी हा कायदा एक मोठे पाऊल आहे.

भारत सरकारने 2005 साली भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी माहितीचा अधिकार (राइट टु इन्फॉर्मेशन) या कायद्या लागू केला. या कायद्याअंतर्गत भारतातील कोणतीही व्यक्ती सरकारच्या कोणत्याही विभागाची माहिती घेऊ शकते. 

जेव्हा तुम्ही कोणत्याही विभागाची माहिती घेण्याचा विचार करता त्यावेळी तुम्हाला त्या विभागाच्या वेबसाइट वर जाऊन माहितीचा अधिकार अर्ज डाऊनलोड करू शकता. या मध्ये तुम्ही लिखित किवा तोंडी सुद्धा माहिती घेऊ शकता. तुम्हाला लोकल भाषेत आणि इंग्लिश मध्ये माहिती घेण्याचा अधिकार आहे.

माहितीचा अधिकार कसा वापरावा?

सरकारच्या सगळ्या कार्यालयामध्ये जसे की मंत्रालय, सार्वजनिक कार्यालये यामध्ये माहिती अधिकार्‍याची नियुक्ती केली जाते. कलम 6 महितीचा अधिकार या नुसार केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विभाग किंवा सार्वजनिक संस्था ज्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे त्या सार्वजनिक माहिती अधिकारी किवा सहाय्यक सार्वजनिक माहिती अधिकारी यांना अर्ज करावा लागतो.

समजा तुम्हाला PWD विभागाची माहिती घ्यायची आहे तर तुम्ही PWD विभागाच्या सार्वजनिक माहिती अधिकार्‍यांना अर्ज करून माहिती घेऊ शकता.

किती दिवसात माहिती भेटेल? 

महितीचा अधिकार कलम 7 मध्ये सांगण्यात आले आहे की कोणतेही सूचना 30 दिवसाच्या आत दिली जाईल. त्याचबरोबर कोणतीही माहिती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती 48 तासांच्या आत प्रदान केली जाईल.

याचा अर्थ कोणतेही सूचना भारतीय सविधान कलम 21 अंतर्गत असेल तर ती 48 तासाच्या आत माहिती दिली जाईल.

तसेच तुम्ही महितीचा अधिकार घेण्यासाठी दिवसाची मोजणी कशी केली जाते हा ही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर ज्या दिवशी तुम्ही फी जमा करचाल त्या दिवसापासून मोजणी सुरू होते. आणि तुम्हाला 30 दिवसाच्या आत माहिती देणे बंदनकारक आहे.

ऑनलाईन माहितीचा अधिकार

भारतातील कोणताही नागरिक ऑफलाइन बरोबर ऑनलाइन अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्ही www.rtionline.gov.in या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.

माहिती न दिल्यास काय कारवाई केली जाते?  

जर तुम्ही महितीचा अधिकार या अंतर्गत माहिती अधिकारी ने माहिती दिली नाही तर तुम्हाला त्याचे कारण सांगावे लागते, यासह यासंदर्भात कोणतेही आवाहन केले पाहिजे, ती माहिती देईल. अन्यथा त्याला दंड भरावा लागू शकतो.

आरटीआय कलम 20 अंतर्गत माहिती अधिकारी माहिती देण्यास मना करतो किवा चुकीची माहिती देतो किवा अपूर्ण माहिती देतो, किवा माहिती देयला लागू नये म्हणून कागद पत्रे नष्ट करतो त्यावेळी त्याला दंड लावला जाऊ शकतो.

कलम 20 मध्ये संगितले आहे की 30 दिवसाच्या आत माहिती नाही दिली तर 250 रुपये प्रती दिवस दंड भरावा लागतो आणि ही रक्कम 25 हजार पेक्षा जास्त होणार नाही. या व्यतिरिक्त केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग अशा अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करू शकते.

माहितीचा अधिकार अर्ज ग्रामपंचायत

ग्रामपंचायत ही एक सार्वजनिक संस्था आहे आणि त्यास पारदर्शक, जबाबदार काम करावे लागते. म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कामांसंदर्भातील महत्वाची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी. ग्रामपंचायत अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिका्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ग्रामस्थांवर वैयक्तिकरित्या आणि ग्रामसभेवर कारवाई न करण्याची त्यांची कृती किंवा कारणे त्यांनी सांगावीत.

एक उधारण घ्यायचं झाल्यास तुम्हाला ग्रामपंचायतच्या एरिया मध्ये एखादे काम सुरू असल्यास त्याची माहिती ग्रामपंचायतला देणे बंदनकारक आहे जसे की ठेकेदारचे नाव, कामाचे बजट, काम सुरू ते संपण्याच्या कालावधी, एत्यादी.

माहितीचा अधिकार फॉर्म कसा भरावा? | माहितीचा अधिकार अर्ज

वरती आपण महितीचा अधिकार काय आहे या विषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच आता आपण आपल्याला एखाद्या कार्यालयामध्येमाहिती जाणून घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा या विषयी माहिती करून घेऊया. 

महितीचा अधिकार अर्ज 

सेवा मध्ये,
सार्वजनिक माहिती अधिकारी
(विभागाचे नाव)
(विभागाचा पत्ता)

विषयः माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अर्ज.

महोदय,

……………. ग्रामपंचायतीसंदर्भात पुढील तपशील द्या.

1. कोणत्या योजनांतर्गत ग्रामपंचायतीस वर्षाच्या मध्यात किती रक्कम वाटप करण्यात आली आहे …………. पूर्ण केले? वर्षानुसार वाटपाचा तपशील द्या.

2. या कालावधीत वरील ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व कामांशी संबंधित खालील बाबी द्या:

 1. कामाचे नाव:
 2. कामाची संपूर्ण माहिती
 3. कामासाठी मंजूर झालेली रक्कम
 4. काम सुरू होण्याची तारीख
 5. काम संपण्याची तारीख किवा चालू कामाची माहिती
 6. काम करणार्‍या ठेकेदारचे नाव
 7. कार्य प्रारंभ तारीख
 8. कार्य समाप्ती तारीख
 9. कामासाठी कंत्राट कोणत्या दराने देण्यात आले?
 10. किती पैसे दिले गेले आहेत.
 11. कामाच्या रेखाटनेची साक्षांकित प्रत
 12. हे काम कधी व कोणत्या आधारावर घेण्यात आले? संबंधित कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती देखील द्या.
 13. कामाची पाहणी करणारे आणि देयकास मान्यता देणार्‍या अधिकारी / कर्मचार्‍यांची नावे व पदनाम.
 14. वर्क ऑर्डरची एक प्रत आणि कामाची कामगार नोंदणी / मस्टर रोलची प्रत द्या.

3. वरील ग्रामपंचायतीमध्ये वर्षातील कामे / योजनांवरील खर्चाची माहिती पुढील तपशीलांसह द्या.

 • कामाचे नाव ज्यासाठी खर्च केला गेला
 • कामाचे संक्षिप्त वर्णन
 • कामासाठी मंजूर रक्कम
 • एजन्सीचे नाव
 • कार्य प्रारंभ तारीख
 • कामाच्या रेखाटनेची साक्षांकित प्रत,
 • हे काम कधी व कोणत्या आधारावर घेण्यात आले? संबंधित कागदपत्रांच्या प्रतीही द्या.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *