PPF अकाऊंट म्हणजे काय: PPF ही एक जुनी योजना आहे, जी भारत सरकार चालवते. ज्यांना इन्कम टॅक्स मध्ये सूट आणि रिस्क फ्री रिटर्न हवे आहेत, त्यांच्यासाठी PPF ही चांगली योजना आहे.
जर तुम्ही PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 42 लाख रुपयांपर्यंत करमुक्त रक्कम मिळते, जे तुम्ही तुमची सेवानिवृत्ती, मुलांचे लग्न, शिक्षण यासाठी वापरू शकता.
तुम्ही 500 रुपये भरून ऑनलाइन नेट बँकिंग ध्वारे किवा तुमचे ज्या बँकेत अकाऊंट आहे, तिथे जाऊन PPF चे अकाऊंट उघडू शकता.
खाली आम्ही PPF अकाऊंट म्हणजे काय, PPF अकाऊंट कसे काम करते, PPF अकाऊंट चे फायदे काय आहेत, त्याचे नुकसान. तुम्हाला जर PPF मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याचे नियम काय आहेत. हयाविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
PPF अकाऊंट म्हणजे काय (What is PPF in Marathi)
PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, ह्याची सुरवात 1968 मध्ये सुरू करण्यात आली होती. PPF ही एक छोटी बचत योजना आहे, यामध्ये तुम्ही दरवर्षी 500 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
PPF मध्ये, चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर पर्यंत, भारत सरकारने त्यावर 7.1% व्याज दर देण्याची घोषणा केली आहे. दर तिमाहीत सुधारित होणारे व्याजदर कमी-अधिक केले जातात.
योजनेचे नाव | PPF: पब्लिक प्रोविडेंट फंड |
व्याज दर | 7.1% जुलै – सेप्टेंबर 2023 (Q2) |
किमान गुंतवणूक रक्कम | 500 रुपये / वर्ष |
जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम | 1.5 लाख रुपये / वर्ष |
कालावधी | 15 वर्ष |
टॅक्स बचत | 80C मध्ये 1.5 लाख रुपये |
पीपीजीमध्ये गुंतवलेल्या पैशासाठी तुम्ही इन्कम टॅक्स 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट घेऊ शकता, PPF मधून तुम्हाला जो रिटर्न मिळतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री मिळतो.
भारतातील कोणताही नागरिक आपले PPF अकाऊंट पोस्ट ऑफिस, बँक हयाठिकाणी 500 रुपये देऊन सुरू करू शकतो. PPF मध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा करता येत नाहीत.
PPF अकाऊंट कसे सुरू करायचे (How to Open PPF Account marathi)
PPF ही एक अशी योजना आहे, जी तुम्हाला 15 वर्षांनंतर चांगला परतावा देते. त्यामुळे तुम्ही मुलांचे शिक्षण, त्यांचे लगीन, रिटायरमेंट प्लॅनिंग ह्यासाठी PPF मध्ये गुंतवणूक करू शकता.
PPF मध्ये आता 7.1% रिटर्न मिळते, व हे रिटर्न कमी ज्यास्त होऊ शकते, 1888 ते 2000 च्या दरम्यान PPF मध्ये 12% रिटर्न भेटत होते, नंतर सरकार ने ते कमी करत 7.1% पर्यत्न घेऊन आले.
PPF मध्ये अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला
1. भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडू शकता.
2. या बँकांमध्ये पीपीएफ खाते उघडता येते.
- ICICI bank
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- एचडीएफसी बँक
- इंडियन ओव्हरसीज बँक
- अॅक्सिस बँक
- IDBI बँक
- बँक ऑफ बडोदा
- पंजाब नॅशनल बँक
- कॉर्पोरेशन बँक
- ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
- बँक ऑफ इंडिया
- स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर
- स्टेट बँक ऑफ हैदराबाद
- अलाहाबाद बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- कॅनरा बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- इंडियन बँक
- युनायटेड बँक ऑफ इंडिया
- देना बँक
- विजया बँक
- बँक ऑफ महाराष्ट्र
- स्टेट बँक ऑफ पटियाला
- स्टेट बँक ऑफ त्रावणकोर
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर
वर नमूद केलेल्या कोणत्याही बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. ह्या बँकेचे नेट बँकिंग किवा मोबाइल बँकिंग चा वापर तुम्ही करत असाल तर, ऑनलाइन घरी बसून तुम्हाला PPF चे अकाऊंट सुरू करता येते.
पोस्ट ऑफिस मध्ये PPF चे अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड ह्याची गरज पडते. पण बँकेत तुमचे खाते असल्याने तुम्हाला डॉक्युमेंटची आवश्यकता पडत नाही.
PPF अकाऊंट चे नियम
1. PPF खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो, म्हणजेच 15 वर्षांपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही.
2. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही खात्याची मुदत 5 वर्षांपर्यंत वाढवू शकता.
3. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही PPF मधून 5 वर्षांनंतर पैसे काढू शकता.
4. PPF मध्ये, तुम्हाला सध्या 7.1% दराने व्याज दिले जाते आणि हे व्याज दर महिन्याला मोजले जाते. जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी पैसे जमा केले तर तुम्हाला त्या महिन्याचे व्याज मिळेल, अन्यथा ते मिळणार नाही.
5. तुम्ही PPF मध्ये कितीही रक्कम जमा करू शकत नाही, तुम्हाला दरवर्षी PPF मध्ये 500 ते 1.5 लाख रुपये जमा करण्याची परवानगी आहे.
6. PPF खाते 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिक उघडू शकतो, एका व्यक्तीच्या नावाने फक्त 1 खाते उघडता येते.
7. PPF मध्ये गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये 1.5 लाख रुपयापर्यत्न सूट मिळते.
8. पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांचे PPF खाते उघडू शकतात.
9. तुम्ही पोस्ट ऑफिस, कोणत्याही राष्ट्रीय बँक SBI, ICICI, HDFC इत्यादी मध्ये PPF खाते उघडू शकता.
10. परदेशी नागरिकांना PPF खाते उघडण्याची परवानगी नाही.
11. तुम्ही पीपीएफ खाते जाइंटमध्ये उघडू शकत नाही, तुम्ही फक्त तुमच्या मुलाचे नावाने जाइंट मध्ये PPF चे अकाऊंट उघडू शकता.
12. तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 500 रुपये जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुमचे खाते बंद होऊ शकते.
पीपीएफ अकाऊंट चे फायदे
1. तुम्ही पीपीएफ खात्यावर दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा करू शकता आणि 15 वर्षांनंतर तुम्हाला 45 लाख रुपये रिटर्न टॅक्स फ्री मिळू शकते.
2. PPF मध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस FD, RD, National Savings Certificate पेक्षा जास्त व्याजदर मिळतात. सध्या तुम्हाला PPF मध्ये 7.1% दराने व्याज मिळत आहे.
3. तुम्ही पोस्ट ऑफिस आणि कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत 500 रुपये भरून पीपीएफ खाते उघडू शकता.
4. तुम्ही PPF मध्ये वर्षातून कितीही वेळा पैसे जमा करू शकता, तुम्ही त्यात 50-50 किंवा 100-100 रुपये देखील जमा करू शकता.
5. दरवर्षी तुम्हाला 1.5 लाख रुपये जमा करण्याची परवानगी आहे.
6. इन्कम टॅक्स अंतर्गत PPF मध्ये जमा केलेल्या पैशावर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता.
7. PPF मध्ये गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षांचा आहे, परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या खात्याचा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
8. पीपीएफमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी मिळालेले पैसे पूर्णपणे करमुक्त राहते, तुम्हाला त्यात कोणताही कर भरण्याची गरज नाही.
9. तुम्हाला 5 वर्षांनंतर अनेक कारणांमुळे PPF अकाऊंट मधून पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.
10. PPF अकाऊंट मधून तुम्ही कमी व्याज दरामध्ये कर्ज घेऊ शकता.
11. भारतातील प्रत्येक नागरिक PPF मध्ये खाते उघडू शकतो, त्याचे पालक त्यांच्या अल्पवयीन मुलाचे खाते PPF मध्ये उघडू शकतात.
12. तुम्हाला पीपीएफ खाते दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करण्याची सुविधा दिली जाते.
13. पीपीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
पीपीएफ अकाऊंट चे नुकसान
1. आज PPF मध्ये तुम्हाला 7.1% वार्षिक व्याज मिळते आणि तुम्हाला हे पैसे 15 वर्षांसाठी गुंतवावे लागतात. जर तुम्ही त्याच बँकेत FD करण्यासाठी गेलात तर तुम्हाला कमी वेळेत जास्त आणि समान व्याज मिळते.
2. जर तुम्ही PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.1% व्याज मिळते, पण जर तुम्ही तेच पैसे NPS (National Pension Scheme) मध्ये ठेवले तर तुम्हाला 12% पर्यंत व्याज मिळू शकते. आणि जर तुम्ही हे पैसे म्युच्युअल फंडाद्वारे SIP मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला 15% पर्यंत व्याज मिळू शकते.
3. जर तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 15 वर्षांनंतर 42 लाख रुपये मिळतील आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडातून एसआयपी केली तर तुम्हाला 80 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळेल. हा परतावा PPF पेक्षा खूप जास्त आहे.
4. तुमचे पैसे PPF मध्ये बराच काळ टिकून राहतात आणि तुम्ही त्या दरम्यान काढू शकत नाही.
5. सरकार पीपीएफमध्ये निश्चित व्याजदर ठेवत नाही, दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेतला जातो आणि कमी-अधिक प्रमाणात कमी जास्त केला जातो.
6. तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी 1.5 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.
7. तुम्हाला 80C अंतर्गत आयकर सूट देण्यात आली आहे, परंतु यामध्ये इतर पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे PPF गुंतवणुकीत पूर्ण कर सूट घेतली जाऊ शकत नाही.
8. तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी, तुम्हाला दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील, अन्यथा तुम्हाला दंड आकारला जाईल.
PPF अकाउंट लवकर बंद करण्याचे नियम
PPF चे अकाऊंट 15 वर्षासाठी सुरू केले जाते, काही विशेष कारणामुळे PPF चे अकाऊंट तुम्ही 5 वर्षांनंतर बंद करू शकता. 5 वर्षा अगोदर तुमचे PPF चे अकाऊंट बंद करता येत नाही.
3 वर्षांनंतर तुम्हाला PPF अकाऊंट मधून लोन दिले जाते.
5 वर्षा नंतरतुम्ही कोणत्या करनावास्तव अकाऊंट बंद करता येते हे पाहुयात.
- वैद्यकीय एमर्जन्सि असल्यास आणि तुम्हाला स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्यास.
- तुम्हाला तुमच्या स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी किंवा तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास.
- खातेधारकाचा मृत्यू झाला तरी मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केले जाऊ शकते. या परिस्थितीत 5 वर्षांचा नियम लागू होत नाही.
जर तुम्ही खाते पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढले तर 1% व्याज वजा करून पैसे परत केले जातील.
PPF अकाऊंट बंद करण्यासाठी तुम्हाला बँक मध्ये एक लिखित अर्ज द्यावा लागतो, व नंतर तुमचे खाते बंद केले जाते.
PPF आणि ELSS म्यूचुअल फंड मधील फरक
आज आपण PPF आणि ELSS म्युच्युअल फंडांबद्दल काय फरक आहे हे जाणून घेत आहोत, जर तुम्ही PPF आणि ELSS फंड मध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स मध्ये सूट घेता येती.
PPF
PPF म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड, जो भारत सरकारने सुरू केला आहे, ही योजना तुम्हाला दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी देते.
PPF मध्ये तुम्हाला सरकारकडून निश्चित परतावा दिला जातो, आज PPF मध्ये तुम्हाला वार्षिक 7.1% परतावा दिला जातो.
तुम्हाला PPF मध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता.
तुमचे खाते 15 वर्षांनी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला सरकारला गुंतवणूक आणि व्याजदरावर कोणताही कर भरावा लागणार नाही. तुम्हाला तुमचे संपूर्ण करमुक्त पैसे पीपीएफमध्ये मिळतात.
ELSS
ELSS ही म्युच्युअल फंडामध्ये एकाच वेळी किंवा SIP द्वारे गुंतवणूक करण्याची योजना आहे, जी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांद्वारे चालविली जाते.
ELSS म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे 3 वर्षांसाठी लॉक केले जातात.
तुम्ही यामध्ये कितीही रक्कम गुंतवू शकता आणि 80C अंतर्गत तुम्ही ELSS फंडामध्ये 1.5 लाखांची सूट घेऊ शकता.
तुम्हाला ELSS फंडांमध्ये कोणतेही निश्चित परतावा दिले जात नाही, परंतु गेल्या 10 वर्षांत ELSS म्युच्युअल फंडांनी 15% पर्यंत परतावा दिला आहे.
ELSS फंडातील 3 वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर, तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता.
जर तुम्ही ELSS म्युच्युअल फंडात पैसे काढले, तर तुम्हाला 10% LTCG भरावा लागेल: जर परतावा 1 लाखांपेक्षा जास्त असेल तर दीर्घकालीन भांडवली लाभ कर.
PPF | ELSS म्यूचुअल फंड | |
1. | PPF मध्ये 15 वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते. | ELSS मध्ये 3 वर्षासाठी पैसे लॉक होतात. |
2. | PPF मध्ये फिक्स रिटर्न 7.1% आहे. | ELSS मध्ये शेअर मार्केट नुसार रिटर्न भेटतात. |
3. | 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स मध्ये सूट घेऊ शकतो. | 1.5 लाख रुपये इन्कम टॅक्स मध्ये सूट घेऊ शकतो. |
4. | प्रत्येक वर्षी 1.5 लाख रुपये जमा केल्यास 44 लाख रुपये कर मुक्त मिळतात. | मार्केट नुसार रिटर्न मिळतात. ELSS मध्ये कोणताही फिक्स परतावा नाही. |
FAQ
1.PPF म्हणजे काय आणि ते कसे काम करते?
PPF यांनी की पब्लिक प्रोविडेंट फंड ही योजना भारत सरकार ध्वारे चालवली जाते. PPF मध्ये तुम्हाला सेफ आणि फिक्स रिटर्न दिले जातात. PPF मध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर आणि रिटर्न वर टॅक्स मध्ये सूट दिली जाते.
2. आपण PPF खाते ऑनलाइन उघडू शकतो का?
PPF खाते तुम्ही ऑनलाइन घरी बसल्या उघडू शकता, ऑनलाइन अकाऊंट सुरू करण्यासाठी तुम्हाला नॅशनल बँकेचे नेट बँकिंग किवा मोबाइल बँकिंग असणे गरजेचे आहे.
3. PPF कधी सुरू करण्यात आले?
PPF ची सुरवात 1968 मध्ये सुरू करण्यात आली, त्यावेळी PPF मध्ये 4.8% व्याज दर आणि 15000 रुपये पेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती.
सरकारने हळू हळू व्याज दर आणि गुंतवणूक करण्याची रक्कम हयावरती वाढ करण्यात आली.
4. मी माझे पीपीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ऑनलाइन कसे हस्तांतरित करू शकतो?
तुम्ही एक बँक मधून दुसर्या बँकेत तुमची PPF अकाऊंट ट्रान्सफर करू शकता, ह्यासाठी तुम्हाला बँक मध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
5. PPF मधून काढलेली रक्कम करपात्र आहे का?
PPF मधून तुम्हाला जे काही रक्कम मिळते टी पुर्णपणे कर मुक्त आहे. ह्यामध्ये तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
6. 15 वर्षांनंतर PPF चा कालावधी वाढवता येईल का?
PPF चा कालावधी तुम्ही 15 वर्षा नंतर 5 वर्षासाठी वाढवू शकता.
7. एक व्यक्ती किती PPF अकाऊंट उघडू शकतो?
PPF चे खाते एका पेक्षा जास्त सुरू करता येत नाहीत, तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावरती PPF चे अकाऊंट सुरू करू शकता.
8. PPF मध्ये वर्षाला किती पैसे जमा करू शकतो?
PPF मध्ये 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे जमा करता येत नाहीत.