महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 | Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi

महाराष्ट्र लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi): महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी सुरू केलेली सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, राज्य सरकारकडून एक विशेष आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांना शिक्षण आणि स्वयंनिर्मितीला प्रोत्साहन देणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे.

या योजनेत सामील होण्यासाठी, मुलगी महाराष्ट्र राज्यात जन्मलेली असणे आवश्यक आहे. तसेच कौटुंबिक उत्पन्न कमी असावे आणि त्यांना कोणतीही सरकारी नोकरी नसावी. या योजनेअंतर्गत, सरकार मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्ष वायापर्यत्न  75000 रुपये रक्कम जमा करते. ज्याचा वापर मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी केला जाऊ शकतो.

ह्या अगोदर महाराष्ट्र सरकारने 2023-24 च्या बजेट मध्ये महिला सन्मान योजना, महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ह्याची घोषणा केली आहे. 

ह्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi) काय आहे आणि ह्याचा लाभ कश्या प्रकारे आपल्याला घेता येतो हे जाणून घेणार आहोत. 

Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi

महाराष्ट्र लेक लाडकी योजना (Maharashtra Lek Ladki Yojana in Marathi)

महाराष्ट्र सरकारने 2023 -24 चे बजट विधान सभेत मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजना 2023 याची घोषणा केली. या योजनेध्वारे गरीब कुटुंबातील महिलांना आपल्या लहान मुलींना उच्च शिक्षणासाठी एक मदत दिली जाईल. 

महाराष्ट्र सरकारध्वारे मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये ही आर्थिक मदत दिली जाईल. ह्यामुळे गरीब कुटुंबातील माता पितांना आपल्या मुलींना शिकवताना कोणतेही अडचण येणार नाही. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणार्‍या कुटुंबातील मुलींना ह्याचा लाभ होईल. मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, मुलगी पहिलीत आल्यावर 4000 रुपये, सहावीत आल्यावर 6000 रुपये आणि अकरवीत आल्यावर 8000 रुपये तिच्या नावावर जमा केले जातील, आणि नंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75000 रुपये दिले जातील. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना ह्याची फक्त घोषणा करण्यात आली आहे,  महाराष्ट्र सरकार ध्वारे ही योजना लागू करण्यात आली नाही. जेव्हा महाराष्ट्र सरकार ही योजना सुरू करेल तेव्हा तुम्ही ह्यासाठी ऑनलाइन किवा ऑफलाइन फॉर्म भरू शकता. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजना पात्रता 

  1. महाराष्ट्र लेक लाडकी योजना ह्याचा लाभ घेणारी व्यक्ती महाराष्ट्रचा रहवाशी असावा. 
  2. ही योजना फक्त मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. 
  3. राज्यातील पिवळे आणि ऑरेंज राशन कार्ड असणार्‍या कुटुंबांना ह्याचा लाभ घेता येतो. 
  4. महाराष्ट्र लेक लाडकी योजना ह्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक अकाऊंट असले पाहिजे.
  5. ह्या योजनेचा लाभ तुमचे वय 18 वर्ष असेपर्यत्न घेता येतो. 

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र 

  • आई वडिलांचे आधार कार्ड
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  • पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • बँक खाते विवरण
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *