महिला सम्मान योजना (Mahila Samman Yojana in MSRTC Bus in Marathi):- महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक खूशखबर दिली आहे कारण यापुढे महिलांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी पूर्ण तिकीट काढण्याची गरज नाही.
ह्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत महिला सम्मान योजना (Mahila Samman Yojana in MSRTC Bus in Marathi) काय आहे, ह्या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना घेता येईल, व कश्याप्रकारे घेता येईल.
महिला सम्मान योजना (Mahila Samman Yojana in MSRTC Bus in Marathi)
महाराष्ट्रचे वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 – 24 चे बजेट मांडताना महिलांसाठी महिला सम्मान योजनेची घोषणा केली, हे बजट त्यांनी 9 मार्च रोजी हे महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडले. तसेच त्यावेळी त्यांनी बर्याच योजनांची घोषणा केली. मग त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री किसान योजना असो किवा अन्य योजना असो.
महिला सम्मान योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवण मंडळ (MSRTC) मध्ये प्रवास करणार्या सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% तिकीटामध्ये सवलत देण्याची घोषणा केली, आणि लगेच 10 दिवसात म्हणजेच 17 मार्च 2023 पासून या योजनेची अंबलबजावणीही करण्यात आली.
MSRTC मध्ये काम करणार्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेचा किती महिलांना फायदा होईल हे सांगणे कठीण आहे, कारण की या अगोदर पूर्वी लिंग-संबंधित तिकीट बस मध्ये देत नव्हते. त्याच्या मते एकूण प्रवाशाच्या 30-40% महिलांना ह्याचा फायदा होऊ शकतो.
सध्या MSRTC मध्ये 12 वर्षीपर्यंत मुलींना बसमध्ये 50% तिकीटामध्ये सवलत दिली जात आहे, तसेच 65 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना 50% तिकीटामध्ये सवलत आणि 75% पेक्षा जास्त वय असणार्या व्यक्तींना 100% तिकीटामध्ये सवलत भेटत आहे.
महिला सम्मान योजनेच्या नियम आणि अटी
ह्या योजनेचा लाभ सर्व महिलांना देण्यात आला आहे, पण ह्यामध्ये काही मियम आणि अटी ही लागू करण्यात आल्या आहेत जसे की :
1. महिला सम्मान योजना ही फक्त महाराष्ट्रमध्ये कुठेही प्रवास करणार्या महिलांना लागू करण्यात आली आहे, महाराष्ट्र बाहेर MSRTC च्या बसने प्रवास करायचा असल्यास तुम्हाला संपूर्ण भाडे ध्यावे लागलं. जसे की तुम्ही पुणे ते सूरत प्रवास MSRTC च्या बस ने करत आहात, त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यत्न 50% तिकीटामध्ये सवलत भेटेल, व नंतर तुम्हाला 100% तिकीट घ्यावे लागेल.
2. महिला सम्मान योजनेचा लाभ तुम्ही सदर सिटि मध्ये घेऊ शकत नाही जसे की दादर ते डोंबवली ह्यामध्ये प्रवास करताना तुम्हाला MSRTC बस मध्ये 50% सवलत भेटणार नाही.
3. महिला सम्मान योजनेचा लाभ हा सर्व प्रकारच्या बसेस करिता लागू करण्यात आला आहे, ज्यामधे AC किवा NON- AC बसेसचा ही समावेश करण्यात आला आहे.
4. अडवांस बूकिंग (Advance Booking) करणार्या महिलांना ह्याचा लाभ घेता येणार नाही.
5. ज्या महिला संगणक आरक्षण सुविधाध्वारे, विंडो बूकिंग, ऑनलाइन बूकिंग, मोबाइल अप्प ध्वारे बूकिंग, एत्यादी ध्वारे तिकीट घेतील त्यांना सेवा कर आकारण्यात येईल.
6. ज्या महिला 50% आरक्षणाचा लाभ घेतील त्यांना वातानुकूलित सेवांकरिता वस्तु व सेवा कर आकारण्यात येईल.
ही ही वाचा