[web_stories title=”false” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”https://marathiblog.co.in/aloe-vera-farming-in-marathi/” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /]कोरफड विषयी माहिती मराठी (Aloe Vera Farming in Marathi), कोरफड शेती ही एक अशी शेती आहे की आपण यामध्ये कमी गुंतवणूक करून जास्त कमाई करू शकतो, तसेच जो भाग दुष्काळी आहे तेथे ही शेती केली जाते कारण कोरफडीसाठी पानी नसेल तरीही हे झाड जळून जात नाही, फक्त आपल्याला याचे कमी वजन भेटते.
आज आपण या लेखाध्वारे डीटेल मध्ये कोरफड विषयी माहिती करून घेणार आहोत, व यासाठी आपण मार्केट मध्ये कश्याप्रकारे याची विक्री करायची याविषयी ही डीटेल मध्ये माहिती करून घेऊया.
कोरफडीचा इतिहास
Aloe Vera याला आपण मराठी मध्ये कोरफड आणि हिन्दी मध्ये घृत कुमारी असेही म्हणतो, ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते, आणि हे बहुधा उत्तर आफ्रिकेत उगम पावले असावे असे मानले जाते.
कोरफड ही 2 ते 3 फूट उंच आणि त्याची पाने 1 ते 1.5 फूट लांब असतात. कोरपडीच्या पानांच्या कोपर्यावरती लहान काटे आढळतात. कोरफडीच्या अनेक जाती आढळून येतात आणि त्यांचा उपयोग औषध म्हणून वेगवेगळ्या रोगांवरती केला जातो.
आज मार्केट मध्ये याची वाढ जास्त प्रमाणात होत आहे, कारण की ही वनस्पती वेगवेगळ्या रोगांवरती व तसेच कॉस्मेटिक म्हणून याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Aloe Vera Farming in Marathi | कोरफड विषयी माहिती मराठी | एलोवेरा के बारे में जानकारी
आज कोरफडची मागणी वाढत असल्याने आपण याची शेती करणे खूप लाभदायक आहे. याचा व्यवसाय आपण दोन प्रकारे करू शकतो डायरेक्ट याची पाने विकून आणि दूसरा याचे ज्यूस बनवून, तसेच आपण शेतीबरोबर याचे ज्यूस बनवून डायरेक्ट मार्केट मध्ये विकू शकतो.
कोरफडची शेती करण्यासाठी सुरवातीला थोडा जास्त आहे व नंतर याचा खर्च कमी होतो, एकदा याची लागवड केल्यावर आपल्याला एक वर्षेनी याचे पीक मिळते व तेच रोप आपण सहा वर्षे शेतात ठेऊ शकतो.
आपल्याला एक एकारमध्ये सुरवातीला 1 लाख पर्यन्त खर्च येतो व नंतर 1 वर्षेनी आपल्याला एकरी 5 ते 6 लाख रुपये पर्यत्न उत्पन्न भेटते.
कोरफडीच्या प्रमुख जाती
कोरफड व्हेराच्या अनेक प्रजाती आढळतात, ज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध चॅन्सिस, लिटोरालिस, एलो अॅबिसिनिका आहेत. भारतात जास्त प्रमाणात ह्या उच्च उत्पादक प्रजाती आहेत – IEC 111271, AAL1, IEC 111269.
आज जवळ जवळ 300 कोरफडीच्या जाती आढळतात, महाराष्ट्रमध्ये आलो बारबड मिल्लर ह्या प्रजातीची लागवड केली जाते, ह्या प्रजातीची लागवड केल्यानंतर 2 वर्षीनी आपल्याला ह्याचे पीक मिळते व नंतर आपण 7 वर्षे हे पीक आपल्या शेतामध्ये ठेऊ शकतो.
आलो बारबड मिल्लर ह्या प्रजातीमध्ये सर्व प्रकारचे गुणधर्म आढळतात, ह्यामुळे ह्याची लागवड करण्यास लोकांची पसंती आहे.
करोफड शेती करण्यासाठी माती आणि हवामान
कोरफडीची लागवड आपण कोरड्या भागापासुन ते बागायची शेतामध्ये याची लागवड केली जाऊ शकते. कोरफडीसाठी पानी कमी प्रमाणात लागते त्यामुळे हे पीक कोरड्या व कमी पाण्यामध्ये ह्याचे पीक चांगले येऊ शकते.
ह्याची लागवड चांगल्या प्रकारे करण्यासाठी 20 ते 22 डिग्री तापमान योग्य आहे. आपल्या शेतामध्ये IC 111271, IC 111280, IC 111269 आणि IC 111273 ह्या प्रजातीमध्ये ह्याची लागवड करता येते.
कोरफड शेतीची लागवड
कोरफडीची लागवड फेब्रुवारी ते ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पेरणी करता येते. हिवाळ्यात पेरणी केली जात नाही. याशिवाय शेतकऱ्यांनी वर्षभरात केव्हाही पेरणी केली तर कोणतीही अडचण येत नाही. ह्याची लागवड करत्यावेळी दोन रोपामध्ये 2 फूट अंतर ठेवले पाहिजे. रोपाची लागवड केल्यानंतर, शेतकरी वर्षातून दोनदा त्याची पाने काढू शकतात आणि नफा मिळवू शकतात.
1 हेक्टर मध्ये आपण 10,000 रोपे लावू शकतो, लागवड केल्यानंतर रोपांना थोडे हलके पानी दिले जाते. कोरफडीची रोपे एकदा लावल्यास त्याचे पीक तीन ते सात वर्षे पर्यत्न काढता येते. लागवडीनंतर, ते 8 ते 10 महिन्यांत काढणीसाठी तयार होते. पहिल्या वर्षी उत्पादन सुमारे 50 टन होते, दुसऱ्या वर्षी त्याचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यांनी वाढते.
हे ही वाचा
- मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | Fish Farming Business
- द्रोण पत्रावळी व्यवसाय माहिती | Paper Plate Business Information
कोरफड शेती करण्यासाठी लागणारा खर्च
कोरफडीच्या व्यवसायात वापरल्या जाणार्या साहित्याचा खर्च खालीलप्रमाणे आहे-
रोपाची किंमत रु 27500,
8750 रुपये शेणखत, रासायनिक आणि वनस्पती सिंचनासाठी खर्च,
उत्पादनांच्या पॅकेजिंग आणि श्रमाची किंमत 14,500 रुपये असू शकते.
कोरफड शेतीतून मिळणारा फायदा
कोरफड लागवडीच्या व्यवसायात आपण 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून ५ ते ६ लाख रुपये नफा मिळवू शकता. कमी खर्चात तुम्ही हात धुण्याच्या साबणाचा व्यवसायही सुरू करू शकता.
कोरफडीची रोपे कोठून विकत घ्यायची?
कोरफडीची रोपे विकत घेण्यासाठी आपण जे लोक ह्याची शेती करत आहेत त्यांच्याची संपर्क साधून ह्याची रोपे विकत घेऊ शकता, किवा आपल्या जवळच्या यूनिवर्सिटी मध्ये ही ह्याची रोपे व प्रशिक्षण भेटते.
तसेच ह्याची रोपे विकत घेण्यासाठी काही कंपन्याशी आपण संपर्क साधून कॉंट्रॅक्ट फरमिंग करून, त्यांच्याकरून रोपे विकत घेऊ शकता.
कोरफडीची विक्री काशी करायची?
कोरफड लागवड केल्यानंतर ह्याची विक्री करणे हे मुख्य आहे, ह्यासाठी आपण ज्या कंपनी ह्याचे प्रॉडक्ट बनवतात त्यांच्याशी कॉनटॅक्ट करून आपल्या मालाविषयी माहिती देऊन आपण ह्याची विक्री करू शकतो.
त्याच बरोबर आपण ह्याची लागवड करण्याअगोदर ह्या कंपन्याशी संपर्क करून कॉंट्रॅक्ट फरमिंग करून ह्याची विक्री करू शकतो.
तसेच सोशल मीडिया हा एक ऑनलाइन मार्केटिंग करण्याचा ऑप्शन आहे पण हा जास्त फायदेशीर ठरेल असे मला वाटत नाही. आपण ह्याची विक्री कॉंट्रॅक्ट फरमिंग करून आणि डायरेक्ट कंपनीशी कॉनटॅक्ट करून ह्याची विक्री करू शकतो.
हे ही वाचा