तुळशी शेती व्यवसाय (Tulsi Farming Business in Marathi), तुळस ही हिंदुसाठी एक पवित्र मनाली जाते आणि हिंदू धर्मामध्ये ह्याची पुजा केली जाते. ह्याची पाने विष्णु आणि त्याचे अवतार कृष्ण आणि राम यांच्यासह काही इतर देवतांची पूजेचा भाग आहे.
तुळशीचा आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत व ही एक चमत्कारी औषधी वनस्पती गुणधर्मांसाठी मोलाची आहे. 5,000 वर्षांपासून आयुर्वेद उपचारांमध्ये ह्याचा उपयोग केला जातो. तसेच ह्याला ‘औषधींची राणी’ म्हणून ओळखली जाते.
Tulsi Farming Business in Marathi | तुळशी शेती व्यवसाय
जगातील अनेक देशांमध्ये, विशेषतः भारतात, व्यावसायिक तुळशीची शेती हळूहळू एक फायदेशीर आणि लोकप्रिय व्यवसाय बनत आहे. ही एक पवित्र वनस्पती आहे आणि ती अनेक नावांनी ओळखली जाते. याच्या इतर नावांमध्ये तुळस, पवित्र तुळस, ओसीमम टेनुइफ्लोरम आणि संस्कृत:-सुरसा यांचा समावेश आहे.
तुळशी ही अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. आयुर्वेद आणि सिद्ध पद्धतींमध्ये याचा उपयोग रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. शतकानुशतके कीटकांना दूर ठेवण्यासाठी वाळलेली तुळशीची पाने साठवलेल्या धान्यांमध्ये मिसळली जातात.
व्यावसायिक तुळशीची शेती धार्मिक आणि पारंपारिक औषधांच्या उद्देशाने आणि आवश्यक तेलासाठी देखील केली जाते. ह्याचा उपयोग हर्बल चहा म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि सामान्यतः आयुर्वेदात वापरले जाते. हिंदू धर्माच्या वैष्णव परंपरेत तुळशीचे स्थान आहे, ज्यामध्ये भक्त पवित्र तुळशीची पाने पुजा करण्यासाठी वापरतात.
तुळशी शेती व्यवसाय कसा सुरू करावा?
तुळशीचा व्यवसाय सुरू करणे म्हणजे जे ईतर पीके शेतामध्ये आपण घेतो तसेच याचेही पीक घेणे आहे, नवीन व्यक्ती सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतात.
तुळशीची झाडे मजबूत असतात आणि त्यावरती रोग होण्याची शक्यता खूप कमी आहे. खाली आम्ही तुळशीची लागवड कश्या प्रकारे करायची हयाविषयी डीटेल मध्ये माहिती दिली आहे.
1. जागेची निवड करणे
तुळस ही कोणत्याही जागेवरती येऊ शकते, यासाठी ठराविक जमीन असावी असे काही नाही, पण एक चांगली जागा निवडवणे हे खूप महत्वाचे आहे.
परंतु उच्च सेंद्रिय घटक असलेली सुपीक माती तुळशीची रोपे वाढवण्यासाठी चांगली मानली जाते, आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होणे हे ही आवश्यक आहे.
आपल्या जमिनीतील मातीचा पीएच हा 4.3 ते 8.2 ह्या दरम्यान असला पाहिजे, त्याचबरोबर जास्त चिकणमाती, कमी प्रमाणात लॅटराइट चे प्रमाण, क्षारयुक्त जमीन, क्षारीय या सर्व प्रकारची माती तुळशीची रोपे वाढवण्यासाठी मानली जाते.
आपण जी जमीन आधीपासून वापरत आहात आणि त्यामध्ये दुसरे पीक घेतले असेल ती जमीन तुळशीची लागवड करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते.
2. लागवडीसाठी जमीन तयार करणे.
तुळस लागवडीसाठी जमीन तयार करत असताना पहिल्यांदा ती नांगरून घ्या, त्यानंतर त्यामध्ये शेणखत मिसळून जमीन रोटरुण घ्या.
3. तुळशीच्या शेतीसाठी हवामानाची आवश्यकता
तुळस ही उष्ण हवामानात चांगली वाढते, विशेषत: उप-उष्णकटिबंधीय प्रदेशातील हवामानात.
तुळशीचे बिया उगवण्यासाठी आपल्याला सामन्यात 20 डिग्री तापमानाची आवश्यकता असते आणि नंतर रोपांच्या वाढीसाठी 7 डिग्री ते 27 डिग्री तापमानाची गरज लागते.
तुळशीची झाडे ही थंड आणि दमट हवामानात चांगली वाढतात, तसेच चांगल्या प्रकारे ह्याची वाढ ही सूर्याच्या किरणामध्ये होते, आणि तुळशीची झाडे जवळ जवळ 900 मिटर पर्यत्न वाढतात.
आपण तुळस सावलीमध्ये देखील वाढवू शकतो, पण त्यामुळे झाडांच्या पानामध्ये तेलाचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आढळते.
तुळस ही दुष्काळी भागात देखील येऊ शकते, आपल्याकडे मध्यम पाऊस असल्यास आपण तुळशीची लागवड करू शकतो.
4. जातीची निवड
तुळशीच्या अनेक जाती आहेत पण भारत आणि नेपाळमध्ये लागवडीसाठी मुख्य तीन जाती आहेत, राम तुळशी, कृष्ण तुळशी आणि सामान्य वन्य वाण तुळशी.
राम तुळशी हा सर्वात सामान्य तुळशीचा प्रकार आहे, ज्यामधे तुळशीची पाने हिरवी रुंद आणि चमकदार आणि थोडीशी गोड असतात.
कृष्ण तुळशी ही जांभळ्या आणि हिरव्या पानांची असते.
काही चांगल्या आणि व्यवसायासाठी काही लोकप्रिय तुळशीच्या जाती आहेत जसे की, कृष्ण तुळशी, राम तुळशी, द्रुद्रिह तुळशी, बाबी तुळशी, अमृता तुळशी, तुकाश्मिया तुळशी, कपूर तुळशी आणि वाणा तुळशी. आपण मागणीनुसार याची निवड करून आपल्या शेतात लाऊ शकता.
5. लागवडीसाठी रोपांची खरेदी
आपण तुळशीची रोपे ही आपल्या जवळच्या नर्सरी प्लांट मधून विकत घेऊ शकता किवा घरी स्वता: याची लागवड करू शकता. स्वता: रोपे तयार करण्यासाठी बियाणे पेऊन ह्याची रोपे तयार करता येतात.
4.5 X 1.0 X 0.2 मिटर लांबीचे बेड तयार करून त्यामध्ये सेंद्रिय खते आणि थोडी वाळू मिसळून घ्या. बी पेरणीकरून झाल्यानंतर लगेच वाफयांना पानी द्या आणि त्यावरती काही तर झाकून घेणे गरजेचे आहे.
6. रोपांची लावणी
आपली तुळशीची रोपे लागवडीच्या 10 ते 15 दिवस अगोदर जमीन तयार करण्यास सुरवात करा, लागवड सुरू करण्याअगोदर आपण आपली जमीन चांगली तयार करून त्यामध्ये सेंद्रिय खत मिसळून घ्या.
महाराष्टात तुळशीची लागवड ही रोपे 6 आठवड्यांची झाल्यावर आणि रोपांवरती 4-5 पाने असताना एप्रिल महिन्यामध्ये ह्याची लागवड करू शकता.
रोपांची लागवड करण्याअगोदर रोपांना पानी ध्यावे जेणेकरून रोपे सहज उपटता येतील आणि त्याची लागवड चांगली करता येईल. लागवड केल्यानंतर रोपांना लगेच पानी ध्यावे लागते.
7. रोपांची काळजी घेणे
तुळशीची झाडे ही मजबूत असतात त्यामुळे त्यांना कमी काळजी घ्यावी लागते. तसेच चांगले उत्पादन मिळविण्यासाठी रोपांची योग्य काळजी घेणे खूप प्रभावी ठरेल.
8. खत घालणे
ह्याची लागवड चांगली येण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवडा खताचा पुरवठा करावा लागतो, आपल्याला शक्य होईल तेवढे चांगले शेणखत घाला आणि ते मातीमध्ये मिसळून घ्या.
प्रति एकर नायट्रोजन 48 किलो आणि पोटॅश 24 किलो आणि फॉस्फरस 24 किलो प्रति एकर दराने खतांचा डोस द्या (युरिया 104 किलो, एमओपी 40 किलो आणि एसएसपी 150 किलो प्रति एकर).
9. पानी देणे.
तुळशीची लागवड करण्यासाठी आपल्याला पुरेसे पानी देणे गरजेचे आहे, पावसाळ्यात पाण्याची गरज पडत नाही परंतु उन्हाळ्यात महिन्यातून तीन वेळा तरी पानी ध्यावे लागते.
पहिल्यांदा बी लावल्यानंतर दुसरे रोपे लावताना आणि वर्षातून आपल्याला 12-15 पानी ध्यावे लागतात.
10. मल्चिंग पेपरचा वापर
आपल्या जमिनीत ओलावा ठेवण्यासाठी मल्चिंग पेपर बेड वरती लावणे हा एक चांगला मार्ग आहे, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा बरोबरच तन रोखण्यास देखील मदत होतो.
11. कीटक आणि रोग
तुळशीची झाडे खूप मजबूत आणि कणखर असतात. ते कीटक आणि रोगांना कमी संवेदनशील असतात. तुळशीच्या झाडावरील सामान्य कीड आणि रोग आणि त्यांच्या नियंत्रणाच्या पद्धती खाली नमूद केल्या आहेत.
- कीटक आणि त्यांचे नियंत्रण: तुळशीच्या झाडाची सामान्य कीटक म्हणजे लीफ रोलर्स आणि तुळशीच्या लेस विंग.
- लीफ रोलर्स : हे कीटक पाने काळी करतात, तसेच झाडांच्या कळ्या खातात, तसेच ते पानांना सील करून त्यांना दुमडतात. ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी 300 मिली क्विनॅलफॉस 150 लिटर पाण्यामध्ये प्रति एकर मिसळून झाडांवर फवारणी करून घ्या.
- तुळशीची लेस विंग: हे कीटक पानांना खातात आणि त्यावरती मुलमुत्र सोडतात, त्यामुळे पाने कुरळे होतात व नंतर संपूर्ण झाड सुकते. लेस विंग्सच्या नियंत्रणासाठी अॅझाडिराक्टीन 10,000 लिटर पाण्यामध्ये पीपीएम कोंकची फवारणी करा.
12. तुळशीची कापणी
तुळस ही एक अतिशय वेगाने वाढणारी वनस्पती आहे, ह्याची कापणी आपण लागवड केल्यापासून तीन महिन्यात करू शकतो. ह्याची कापणी सामान्यतः पूर्ण फुलण्याचा कालावधी असताना केली जाते.
जेव्हा झाड जमिनीपासून किमान 15 सेमी ह्याची वाढ होते, त्यावेळी पुन्हा वाढ होण्यासाठी ह्याची कापणी करणे गरजेचे पडते. भविष्यात पानांचा वापर करण्यासाठी पाने ताजी वापरली जातात आणि उन्हात वाळवली जातात.
13. काढणीनंतरची कामे
तुळशीची कापणी केल्यानंतर जास्त करून त्याची पाने वाळवली जातात आणि नंतर त्यांचा उपयोग तेल काढण्यासाठी केला जातो.
मार्केट मध्ये पाठवण्याअगोदर ते पिशवीमध्ये पॅक करून ठेवले जाते आणि एका कोरड्या ठिकाणी त्याची साठवण केली जाते.
औषधी वनस्पतींवर प्रक्रिया केल्यानंतर अनेक उत्पादने तयार केली जातात. तुळशीचे तेल, तुळशी पावडर, तुळशी आले, तुळशी कॅप्सूल आणि तुळशी चहा ही सामान्य तुळशी उत्पादने, एत्यादी.
14 तुळशीचे उत्पन्न
आपल्याला नेमके किती फायदा होईल हे सांगता येणार नाही, हे सर्व आपल्या जमिनीवर, जागेवर आणि ह्याची लागवड कोणत्या ठिकाणी केली आहे ह्यावर अवलंबून आहे.
परंतु साधारणपणे हेक्टरी सरासरी 9 ते 14 टन पानांचे उत्पादन मिळू शकते. आणि तुळशीच्या तेलाचे प्रति हेक्टर सरासरी उत्पादन 10 ते 25 किलो दरम्यान असते.
15 मार्केटिंग
ह्याची लागवड करण्या अगोदर आपल्याला हे मार्केट मध्ये कोठे विकता येईल हे ठरवावे लागेल. तसेच आपण लोकप्रिय हर्बल कंपनी बरोबर कॉंट्रॅक्ट फरमिंग (करार) करून ह्याची लागवड करू शकता.
Tulsi Farming Business in Marathi | तुळशी शेती व्यवसाय
वरती ह्या काही इम्पॉर्टंट माहिती आहे जी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, मी वरती दिलीली माहिती आपण वाचल्यानंतर तुम्हाला एक मनामध्ये आयडिया आली असेल की ह्याची शेती कश्याप्रकारे केली जाते.
तुम्हाला डीटेल मध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या तुळशी फार्मला विजिट देऊन डीटेल मध्ये माहिती घेऊ शकता आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता.
हे ही वाचा