सरकारी योजना महाराष्ट्र 2023 | Sarkari Yojana Maharashtra 2023

सरकारी योजना महाराष्ट्र 2023, सरकारी योजना महाराष्ट्र pdf , Sarkari Yojana Maharashtra 2023, महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023, शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र, अनुदान योजना महाराष्ट्र, महिलांसाठी सरकारी योजना, मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2023 :

सध्या महाराष्ट्रामध्ये खूप सार्‍या योजना राबाण्यात येत आहेत, पण आपल्याला कोणत्या योजना सुरू आहेत हे माहीते नसते, त्यामुळे आपण शेतकरी बांधव ह्याचा लाभ घेऊ शकत नाही. आज खूप सार्‍या अश्या वेबसाइट आहेत त्या योजनविषयी माहिती तर देत आहेत, पण त्या योजना एका पेग वरती नहिती. त्यामुळे आपल्याला समजण नाही की सध्या कोणत्या योजना सुरू आहेत आणि कोणत्या योजना सुरू नाहीत.

आज या लेखा अंतर्गत आपण सध्या महाराष्ट्रात कोणत्या योजना सुरू आहेत हे पाहणार आहोत.

Sarkari Yojana Maharashtra

अनुक्रमणिका

सरकारी योजना महाराष्ट्र 2023 (Sarkari Yojana Maharashtra 2023)

सध्या महाराष्ट सरकारने कडून खूप सार्‍या योजना राबवण्यात येत आहेत, आता 2023-24 चे बजेट ही विधान सभेत मांडण्यात आले, त्यावेळी ही खूप सार्‍या योजनाची घोषणा करण्यात आली. आपण या लेखामध्ये सध्या महाराष्ट्र कोणत्या योजना सुरू आहेत, ह्या विषयी खाली माहिती दिली आहे. जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व माहिती भेटून जाईल.

  • महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023
  • महिला सन्मान योजना महाराष्ट्र
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
  • रमाई घरकुल योजना
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
  • महाराष्ट्र स्वाधार योजना
  • महास्वयं रोजगार योजना
  • महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना
  • बेरोजगारी भत्ता योजना
  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
  • महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
  • माझी कन्या भाग्यश्री योजना
  • आंतरजातीय विवाह योजना
  • महाराष्ट्र विधवा पेंशन योजना

वरील दिलेल्या योजना आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

1. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 

महाराष्ट्र सरकारने 2023 -24 चे बजट विधान सभेत मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 याची घोषणा केली. या योजनेध्वारे गरीब कुटुंबातील महिलांना आपल्या लहान मुलींना उच्च शिक्षणासाठी एक आर्थिक मदत दिली जाईल हे घोषणा केली.

महाराष्ट्र सरकारध्वारे मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत 5 हप्त्यांमध्ये ही आर्थिक मदत दिली जाईल. ह्यामुळे गरीब कुटुंबातील माता पितांना आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणार्‍या कुटुंबातील मुलींनाच घेता येईल. हा लाभ मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये, मुलगी पहिलीत आल्यावर 4000 रुपये, सहावीत आल्यावर 6000 रुपये आणि अकरवीत आल्यावर 8000 रुपये तिच्या नावावर जमा केले जातील, आणि नंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75000 रुपये दिले जातील.

2. महिला सन्मान योजना महाराष्ट्र 

महाराष्ट्रचे वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 – 24 चे बजेट मांडताना महिलांसाठी महिला सम्मान योजनेची घोषणा केली, हे बजट त्यांनी 9 मार्च 2023 रोजी हे महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडले. तसेच त्यावेळी त्यांनी बर्‍याच योजनांची घोषणा केली. मग त्यामध्ये महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री किसान योजना असो किवा अन्य योजना.

महिला सम्मान योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवण मंडळ (MSRTC) मध्ये प्रवास करणार्‍या सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% तिकीटामध्ये सवलत देण्याची घोषणा केली, आणि लगेच 10 दिवसात म्हणजेच 17 मार्च 2023 पासून या योजनेची अंबलबजावणीही करण्यात आली.

3. महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री माननीय श्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र किसान सन्मान निधी योजना 2023 सुरू करण्याची घोषणा केली असून, या योजनेद्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये प्रमाणे अनुदान म्हणून दिले जाईल.

याशिवाय येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना राबविण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असून, या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, या दृष्टिकोनातून ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या देशभरात जारी करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना याअंतर्गत वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम दिली 6000 रुपये दिली जाईल, ही रक्कम शासनाकडून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर पाठवली जाईल.

4. रमाई घरकुल योजना महाराष्ट्र 

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जाती व नव-बौद्ध घटकांतील लोकांसाठी दिनांक 15 नोवेंबर 2008 पासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी सौचालयासह 1,32,000 रुपये, नक्षल ग्रस्त व डोंगराळ भागातील क्षेत्रासाठी 1,42,000 रुपये तसेच शहरी भागामध्ये 2,50,000 रुपये अनुदान देण्यात येते. हे सुधारित अनुदान 2016-17 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आले आहे.

आज तुम्ही चालू वर्षामध्ये रमाई घरकुल योजना महाराष्ट्र ह्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या चार्ट मध्ये अनुदान किती भेटेल हे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण क्षेत्रात सौचालयासह 1.32 लाख रुपये
डोंगराळ भागातील क्षेत्रात सौचालयासह 1.42 रुपये रुपये
शहरी भागामध्ये सौचालयासह 2.50 लाख रुपये
सौचालय बांधण्यासाठी 12,000 हजार रुपये

5. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 1 एप्रिल 2017 मध्ये ह्याची सुरवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ सर्वच 36जिल्ह्यात  ह्याचा समावेश करण्यात आला. ह्या योजनेचे अगोदर नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असे होते. आणि ह्याची सुरवात 2 जुलै 2012 रोजी 8 जिल्ह्यात  सुरू केली व नंतर 21 नोवेंबर 2013 पासून 28 जिल्ह्यात सुरू करण्यात आली.

ह्या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 2 लाख रुपयाचा विमा आणि तसेच गंभीर आजार असल्यास 3 लाख रुपये सरक्षण विमा म्हणून दिला जातो.

ह्या मध्ये तुम्ही प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग, मोतिबिंदू, कॅन्सर ऑपरेशन सोबत ढोपरांचे प्रत्यारोपण, डेंग्यू स्वाइन फ्लू, मलेरिया पीडियाट्रिक सर्जरी, सिकल सेल एनीमिया इत्यादी आजारावर उपचार घेऊ शकता. तसेच किडनी transplant करण्यासाठी तुम्हाला 3 लाख रुपये आणि कुटुंबाची उपचारासाठी 2 लाख रुपयाची आर्थिक मदत म्हणून दिली जाते.

6. महाराष्ट्र स्वाधार योजना

आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11वी, 12वी, डिप्लोमा व्यावसायिक, गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाकडून प्रतिवर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. या स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून प्रोत्साहन देणे व विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणे.

महाराष्ट्र सरकारने ही योजना 2016 -17 मध्ये सुरू केले आहे, ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10,12 आणि पदवी मध्ये 60% पेक्षा जास्त मार्क्स असणे आवश्यक आहे. त्यांच्या पालकांचे आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.

7. महास्वयं रोजगार योजना

महाराष्ट्रात वाढणारी बेरजागरी लक्षात घेता व जे शिकलेले तरुण नौकारी शोधत आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने महास्वयम् ह्या पोर्टेलची सुरवात केली. महास्वयम्चा अर्थ महा म्हणजे महाराष्ट्र आणि स्वय म्हणजे ज्यांना नौकारीची गरज आहे ते बेरोजगार, ज्यांना नोकरदार हवे आहेत ते उद्योजक आणि ट्रेनिंग देणार प्रशिक्षक हे सर्व एकाच प्लॅटफॉर्म वरती येतात.

 Sarkari Yojana Maharashtra

ह्याअगोदर तीन वेगवेगळे पोर्टेल होते त्यामध्ये ज्यांना नौकारीची गरज आहे ते बेरोजगार MSSDS (kaushalya.mahaswayam.in), ज्यांना नोकरदार हवे आहेत ते उद्योजक Maharojgar (rojgar.mahaswayam.in) आणि ट्रेनिंग देणार प्रशिक्षक Mahaswayamrojgar (udyog.mahaswayam.in) या सर्व वेब पोर्टल्सना एकाच महास्वयंम वेब पोर्टलमध्ये मर्ज करण्यात आले आहे.

महास्वय हे पोर्टेल कौशल्य विकास आणि उद्योग ह्या विभागाध्वारे बनवण्यात आले आहे. ह्याचा उद्देश राज्यात नौकर भरतीला संधी देणे आणि बेरोजगार दर कमी करणे हा आहे. ह्या पोर्टेल च्या माध्यमातून बेरोजगार, सुसूक्षित तरुणांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे हा आहे.

8. महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना

12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष्य माननीय शरद पवार ह्याची वाढदिवशी शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 ह्याची सुरवात करण्यात आली.

ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना गाय आणि म्हैस ह्याची शेडची उभारणी करण्यासाठी अनुदान देण्यात येईल. व त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे उत्पन्नाममध्ये वाढ होण्यास मदत होईल.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 ही योजना महाराष्ट्र शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोगाने संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे म्हटले जाते.

ह्या योजनेचा रोजगार हमी विभाग ह्यांच्या ध्वारे राबवण्यात आले आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 ह्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना गाय आणि म्हैस ह्याचे शेड बनवण्यासाठी 77,1188 रुपये खर्च देण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना 2023 ह्या योजनेची फक्त घोषणा करण्यात आले आहे, ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि कधी पासून करायचा हयाविषयी काहीही सांगण्यात आले नाही.

9. बेरोजगारी भत्ता योजना

महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता योजना ही सुरू करण्यात आली आहे, ह्या योजनेअंतर्गत जे 12 वी आणि पदवीधर तरुणांना प्रती महीने 5000 रुपये देण्याची घोषणा 2020 मध्ये करण्यात आली.

बेरोजगारी भत्ता योजना ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे. तुमचे वय हे 21 ते 35 वर्ष असले पाहिजे. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि तो कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेला नसावा.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची अधिकृत वेबसाइट वरती जाऊन “Job Seeker” वरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.

 Sarkari Yojana Maharashtra

10. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ह्याची सुरवात 2017 मध्ये करण्यात आली आहे, ह्याचा उद्देश महाराष्ट्रातील अल्प व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मिळणार आहे. महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2023 साठी 4,000 कोटी रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने मंजूर केला. या योजनेमुळे राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाणार असून, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे.

महाराष्ट्र सरकारने चालू वर्षी 4000 करोड रुपये खर्च करण्याचा विचार केला आहे, त्यामधील 2800 करोड हे विश्व बैंके कडून कर्ज स्वरुपात घेण्यात येणार आहेत. ह्या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या उत्पानामध्ये वाढ करणे हा आहे.

11. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने 1,00,000 सौर कृषी पंप याचे वाटप करण्याचे टार्गेट हाती घेतले आहे, हे कृषी पंप वाटप करण्याचे काम 1 जानेवरी 2019 पासून पुढील तीन वर्षासाठी हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात 25,000 पंप, दुसर्‍या 50,000 आणि तिसर्‍या टप्प्यात 25,000 पंप वाटप करण्यात येईल असे GR मध्ये नमूद केले आहे.

ज्या शेतकरी बांधवणा खात्रीशीर पाण्याचा स्त्रोत असलेले शेतजमीन आहे त्यांना ह्याचा लाभ भेटणार आहे, पण ज्यांना लाइटचे कनेक्शन आहे त्यांना ह्याचा लाभ घेता येणार नाही. तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकरी ह्यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ह्याचा उद्देश कृषी शेतीसाठी दिवसा लाइट उपलब्ध करून देणे. वीज अनुदान देणून कृषी क्षेत्र वाढणवे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांवर क्रॉस सबसिडीचा भार कमी करणे, आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे हा आहे.

12. महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती पेंशन योजना

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती पेंशन योजना ही महाराष्ट्र राज्यातील वृद्धांना एक आर्थिक मदत करणे हा आहे, ज्यांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त आहे त्यांना महाराष्ट्र सरकारकडून प्रती महिना 600 रुपये पेंशन दिली जाते. ह्यामध्ये महिला आणि पुरुष गटातील दोन्ही लोक ह्याचा लाभ घेऊ शकतात.

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती महाराष्ट्रात राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यार्‍या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये पेक्षा जास्त नसावे. लाभ घेण्यासाठी बीपीएल कार्ड असणे आवश्यक आहे.

ज्यांना ह्या पेंशन चा लाभ घेयचा आहे त्यांना https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ह्या वेबसाइट वरती जाऊन वृद्ध पेन्शन योजने वरती क्लिक करावे लागेल.

 Sarkari Yojana Maharashtra

13. माझी कन्या भाग्यश्री योजना

महाराष्ट्र राज्यातील मुलींचे शिक्षण, आरोग्य तसेच मुलगी स्वालंबी, मुलीच्या भविष्यासाठी तीची आर्थिक तरतूद करणे, बालविवाह रोकणे ह्याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजना ह्याची सुरवात 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू केली. ही योजना महिला व बालविकास विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत ज्यांना एक किवा दोन मुली आहेत त्यांना महाराष्ट सरकारकडून त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये आर्थिक रक्कम जमा करण्यात येणार आहे. ज्यांना एक मुलगी आहे त्यांना 50,000 रुपये आणि ज्यांना दोन मुली आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये महाराष्ट्र सरकडून जमा करण्यात येणार आहेत.

ह्यामध्ये मुलीच्या जन्मानंतर 50,000 रुपये एक मुलगी असल्यास आणि दोन मुली असल्यास 25,000 प्रत्येकी त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये जमा करण्यात येतील. मुलीचे वय 6 वर्षे झाल्यास त्यानंतर त्याचे व्याज भेटेल व मुद्दल बंके मध्ये जाम करण्यात येईल. नंतर मुलगी 12 वर्षाची झाल्यास व्याज भेटेल व मुद्दल बंके मध्ये जाम करण्यात येईल. आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर व्याज आणि मुद्दल दोन्ही मुलीला बेटेल . पण त्यावेळी मुलीचे लग्न झाले नसावे आणि मुलगी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

ह्या मध्ये लाभार्थीना दोन पेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजे, दोन अपत्य असल्यास दोन्ही मुली असाव्यात मुलगा असल्यास ह्याचा लाभ घेता येणार नाही. पहिल्या दोन मुली आणि तिसरा मुलगा असल्यास माझी कन्या भाग्यश्री योजना ह्याचा लाभ घेता येणार नाही.

ही योजना बीपीएल आणि एपीएल राशन कार्ड असणार्‍या कुटुंबातील व्यक्तींना लागू करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट ह्या बंकेकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जाऊन ह्याचा लाभ घेऊ शकता.

14. आंतरजातीय विवाह योजना

महाराष्ट्र सरकारकडून Inter Cast मॅरेज ला प्रोस्थान देण्यासाठी आंतरजातीय विवाह योजना ह्याची सुरवात केली ही योजना खूप जुनी योजना आहे आणि त्याची सुरवात 1959 मध्ये करण्यात आली होती. या योजनेचा हेतु राज्यामध्ये सर्व धर्माचे लोक एकजुटीने राहावे हा आहे. हे योजना सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टेंट डिपार्टमेंट ध्वारे राबवण्यात येत आहे.

आंतरजातीय विवाह योजने अंतर्गत जो कोणी intercast मॅरेज करेल त्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकारकडून 3 लाख रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात येईल. हा Inter Cast विवाह हा कोर्ट मॅरेज असला पाहिजे.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक अकाऊंट, जात प्रमाण पत्र, कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट आणि पासपोर्ट साइज फोटो असणे आवश्यक आहे.

 Sarkari Yojana Maharashtra

15. महाराष्ट्र विधवा पेंशन योजना

महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही, त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिक स्थिती बिकट होते. त्यांच्याशी भेदभाव केला जातो आणि त्यांना वाईट वागणूक दिली जाते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने राज्यातील गरीब, असहाय्य विधवांसाठी महाराष्ट्र विधवा पेंशन योजना सुरू केली.

ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील विधवा महिलांना 600 रुपये प्रती महिना आणि ज्यांना मुले आहेत त्यांना 900 रुपये प्रती महिना महाराष्ट्र सरकाकडून देण्यात येईल. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा जास्त नसावे. ह्या योजनेचा लाभ महाराष्टतील 65 वर्षा पेक्षा जास्त वय असणार्‍या महिलांना घेता येणार नाही.

 Sarkari Yojana Maharashtra

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *