रमाई घरकुल योजना महाराष्ट्र | Ramai Gharakul Yojana Maharashtra | रमाई घरकुल योजना महाराष्ट्र सुधारित अनुदान | घरकुल योजना अर्ज

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र (Ramai Gharakul Yojana Maharashtra ), नमस्कार मित्रांनो मागील लेखामध्ये आपण सेंट्रल गवर्नमेंट ध्वारे राबवण्यात आलेली प्रधानमंत्री घरकुल योजना काय आहे? या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली. ही योजना काय आहे? या योजनेसाठी लाभ कसा घ्यायचा ईत्यादी. आज आपण महाराष्ट्र सरकार ध्वारे राबवण्यात आलेली रमाई घरकुल योजना महाराष्ट्र काय आहे?  व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ह्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र (Ramai Gharakul Yojana Maharashtra)

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जाती व नव-बौद्ध घटकांतील लोकांसाठी दिनांक 15 नोवेंबर 2008 पासून राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी सौचालयासह 1,32,000 रुपये, नक्षल ग्रस्त व डोंगराळ भागातील क्षेत्रासाठी 1,42,000 रुपये तसेच शहरी भागामध्ये 2,50,000 रुपये अनुदान देण्यात येते. हे सुधारित अनुदान 2016-17 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात आले आहे.

आज तुम्ही चालू वर्षामध्ये रमाई घरकुल योजना महाराष्ट्र ह्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या चार्ट मध्ये अनुदान किती भेटेल हे सांगण्यात आले आहे. 

ग्रामीण क्षेत्रात सौचालयासह 1.32 लाख रुपये 
डोंगराळ भागातील क्षेत्रात सौचालयासह 1.42 रुपये रुपये 
शहरी भागामध्ये सौचालयासह 2.50 लाख रुपये 
सौचालय बांधण्यासाठी  12,000 हजार रुपये 

महाराष्ट्र सरकारने या योजनेचे नाव घरकुल योजना हे नाव ठेवले आहे. महाराष्ट सरकारने रमाई घरकुल योजने अंतर्गत 51 लाख घरे देण्याचे लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत दीड लाख घरे सामाजिक न्याय विभागाने मंजूर केली आहेत.

तसेच या योजने मध्ये तुमचे घर मंजूर झाले आहे, परंतु पहिला हफ्ता सन 2023-24 मध्ये दिला गेला आहे, त्यांनाही सुधारित अनुदान मिळू शकते.

हे ही वाचा 

रमाई घरकुल योजना नियम व अटी

 • रमाई घरकुल योजनेचे लाभ घेणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहवशी असला पाहिजे, त्यासाठी त्या व्यक्तीने रहवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
 • महाराष्ट्र राज्याबाहेरील व्यक्तींना रमाई घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. 
 • अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किवा बौद्ध प्रवर्गात मोडणारा असावा, त्यासाठी त्या व्यक्तीला जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. 
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आर्थिक उत्पन्न ग्रामीण भागात 1.20 लाख, नगर परिषद क्षेत्रात 1.5 लाख आणि शहरी भागात 2 लाख रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 
 • जो कोणी रमाई घरकुल योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे त्याच्याकडे पक्के घर नसावे. 
 • ह्या अगोदर रमाई घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा. 
 • एकाच कुटुंबातील एकाहून अधिक लोकांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

वार्षिक उत्पन्न मर्यादा 

 • ग्रामीण भागात राहत असाल तर 1.20 लाख
 • नगर परिषद क्षेत्रात 1.5 लाख
 • शहरी भागात पुणे, मुंबई ह्या ठिकाणी 2.0 लाख 

रमाई घरकुल योजना महाराष्ट्र कागदपत्रे

वरती आपण रमाई घरकुल योजना महाराष्ट्र हयाविषयी माहिती करून घेतली, आता आपण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतात हाय विषयी माहिती करून घेऊयात. 

 • आधार कार्ड 
 • निवासी प्रमाण पत्र 
 • जातीचे प्रमाणपत्र
 • ओळख पत्र 
 • पासपोर्ट साइज चे फोटो 
 • मोबाइल नंबर 

रमाई आवास घरकुल योजना लिस्ट

रमाई आवास घरकुल योजने मध्ये अर्ज केलेल्या महाराष्ट सरकारने लाभा अर्थ्यांची लिस्ट प्रकाशित केली आहे तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जाणून ही यादी चेक करू शकता.

घरकुल योजना अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट वरती जावून अर्ज करावा लागेल.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *