अटल पेंशन योजना

अटल पेंशन योजना, नमस्कार मित्रांनो आपण सगळेच जन रिटायरमेंट प्लॅनिंग करत असतो, कोण एलआयसी मध्ये, म्यूचुअल फंड, बँकमध्ये फिक्स्ड डिपॉजिट करून पैसे गुंतवणूक करत असतो जेणेकरून रिटायरमेंट किवा 60 वर्षांनंतर एक आर्थिक सहयता म्हणून पैसे कामाला येतील. तसेच काही पेंशन म्हणून योजना देखील आहेत एलआयसी किवा दुसर्‍या ज्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला पेंशन देत असतात.

पण देशातील प्रत्येक व्यक्तीला या योगणेमध्ये पैसे गुंतवणूक करणे शक्य नाही, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विविध योगणा राबवण्यात आल्या त्यामधील कृषी कल्याण योगणा, गोर गरीबांना घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री घरकुल योगणा, देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी व लोकांना बिजनेस करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योगणा अशा बर्‍याच योगणा आपल्या देशातील गरिबांसाठी राबवण्यात आल्या आहेत. आज आपण त्यामधील एक जी 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रुपये पर्यत्न तुम्हाला ही पेंशन भेटू शकणारी अटल पेंशन योजना काय आहे? याविषयी डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

अटल पेंशन योजना

अटल पेंशन योजना काय आहे? 

भारत सरकारने 2015 च्या आर्थिक बजेट मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये तीन योजनेची घोषणा केली यामध्ये एक प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योगणा, दुसरी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि लास्ट अटल पेंशन योजना या तिन्हीही योजनेची सुरवात 9 मे 2015 मध्ये कोलकत्ता येथे करण्यात आली.

अटल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर रिटायरमेंट नंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला पेंशन भेटते. तुम्हाला 1000 ते 5000 रुपये पर्यत्न पेंशन भेटू शकते हे तुमच्या वयानुसार आणि तुम्ही महिन्याला किती रुपये गुंतवणूक करता यावर अवलंबून आहे. 60 वर्षानंतर तुम्हाला पेंशन मिळायला सुरवात होते. या योगनेमध्ये 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

जर समजा तुम्ही 18 व्या वर्षी तुम्ही तर महीने 210 रुपये यामध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली तर रिटायर झाल्यानंतर तुम्हाला 5000 रुपये पेंशन भेटू शकते. या योगणेचा आणखी एक फायदा आहे, जर का काही कारणाने तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या पत्नीला पेंशन भेटते आणि पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तुमच्या मुलांना पेंशन भेटण्याचे प्रावधान या योगनेमध्ये आहे.

हे ही वाचा 

अटल पेंशन योजना प्रीमियम चार्ट

खाली दिलेल्या चार्ट मध्ये तुम्हाला तुमच्या वयानुसार प्रत्येक महिन्याला किती पैसे गुंतवावे लागतात हे डीटेल मध्ये संगीतले आहे. जस की आपण वरती बगीतल्याप्रमाणे ही योगणा 18 ते 40 वर्षातील लोकांसाठी आहे. यामध्ये कमीत कमी तुम्ही 20 वर्षे पैसे गुंतवू शकता आणि जास्तीत जास्त 42 वर्षे.

[table id=1 /]

अटल पेंशन योजना रजिस्ट्रेशन

या योगनेमध्ये रजिस्ट्रेशन करणे खूप सोपे आहे. तुमचे बँक अकाऊंट ज्या बँक शाखेमध्ये आहे तिथे जाऊन अटल पेंशन योगणेचा फॉर्म भरून घ्या. तो फॉर्म भरून बँक मध्ये जमा करा, बँक मध्ये फॉर्म जमा झाल्यानंतर तुमचे अटल पेंशन योगणेचे खाते सुरू होईल. याचा प्रीमियम महिन्याला किवा वर्षाला कट होत राहील हे तुमच्यावर अवलंबून आहे.

या योजनेमध्ये एक मुख्य घोष्ट म्हणजे जेवढे लवकर होईल तेवढे तुम्ही यामध्ये गुंतवणूक करायला सुरवात करा जर तुम्ही 18 वर्षाच्या जागी 35 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरवात केली तर तुम्हाला प्रीमियम डबल भरावा लागेल.

अटल पेंशन योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन

अटल पेंशन योगनेमध्ये तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाऊंट प्लस त्याचे नेट बँकिंग असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही घर बसल्या ऑनलाइन रेसिस्टर करून या योगणेचा लाभ घेऊ शकता. 

या योगनेमध्ये कोण भाग घेऊ शकते?

ही योगणा भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांचे वय 18 ते 40 वर्ष आहे. जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल किवा सरकारी नोकरी करत असाल तर यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकत नाही. किवा तुम्ही EPF, EPS यांसारख्या योगणेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही या योगनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. या योगणे विषयी अधिक महितीसाठी तुम्ही https://npscra.nsdl.co.in/ या वेबसाइट ला विजिट देऊ शकता.

डीफॉल्टसाठी दंड

या योगणेसाठी तुम्हाला स्वत: पैसे भरण्याची गरज नाही तुमच्या लिंक केल्याला बँक अकाऊंट मधून ऑटोमॅटिक पैसे कट होत राहतात. पण काही कारणाने तुमच्या अकाऊंट वर पैसे नसल्यास तुम्हाला एकस्ट्र दंड लावते. हा दंड 1  रुपया ते 10 रुपयापर्यत्न आहे.

  • जर का तुम्ही 100 रुपयापर्यत्न प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करत असाल तर 1 रुपये प्रती महिना दंड भरावा लागतो.
  • जर का तुम्ही 101 ते 500 रुपयापर्यत्न प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करत असाल तर 2 रुपये प्रती महिना दंड भरावा लागतो.
  • जर का तुम्ही 501 ते 1000 रुपयापर्यत्न प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करत असाल तर 5 रुपये प्रती महिना दंड भरावा लागतो .
  • 1000 रुपये किवा त्यापेक्षा जास्त प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करत असाल तर 10 रुपये प्रती महिना दंड भरावा लागतो.

तुमचे अकाऊंट कधी बंद केले जाऊ शकते?

 मित्रांनो वरती आपण पैसे नाही भरू शकलो तर किती दंड भरावा लागतो हे भगीतले. पण तुम्ही जास्त दिवस दंड नाही बरला तर तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

  • सहा महीने पेमेंट नाही केले तर तुमचे अकाऊंट गोठले (frozen) केले जाऊ शकते.
  • बारा महीने पेमेंट नाही केले तर तुमचे अकाऊंट निष्क्रिय (Deactivate) केले जाऊ शकते.
  • 24 महीने पेमेंट नाही केले तर तुमचे अकाऊंट बंद (closed) केले जाऊ शकते.

मधून पेंशन बंद करता येते का? 

अटल पेंशन योजना मधील लोकांना 60 वर्षानंतर या योगणेचा लाभ पेंशन म्हणून घेता येतो. 60 वर्षांनंतर तुम्ही तुमचे बँक अकाऊंट असलेल्या शाखेमध्ये जाऊन एक फॉर्म सबमिट करावा लागतो व नंतर तुम्हाला पेंशन भेटायला सुरवात होते.

वयाच्या 60 वर्षापूर्वी तुम्ही पेंशन बंद करू शकता या मध्ये तुम्हाला जेवढे पैसे भरलेत ते प्लस इंट्रेस्ट रेट सहित परत केले जातात. यामध्ये सरकारचे योगदान (contribution) परत केले जात नाही. तथापि, केवळ त्यास परवानगी आहे अपवादात्मक परिस्थिती, म्हणजेच लाभार्थी किंवा टर्मिनलचा मृत्यू झाल्यास आजार.

अटल पेंशन योजना

आज आपण या लेखामध्ये अटल पेंशन योजना काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला व जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील त्याची उत्तरे तुम्हाला भेटली असतील अशी अपेक्षा करतो, व तुम्हाला दुसरी कडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये काही शंका असतील तर खाली commend मध्ये जरूर कळवा. 

हे ही वाचा 

 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *