आज तुम्हाला ऑनलाइन वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही आमझोन, फ्लिपकार्ड वर जाऊन त्या वस्तु खरेदी कराता, तुम्हाला खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही Swiggy किंवा Zomto वरती जाता, टॅक्सी बुक करायची असेल तर Ola किंवा Uber ह्याची सर्विस घेता. तिकीट बुक करण्यासाठी पेटीएम, मेक माय ट्रिप सारख्या ऍप्लिकेशन्स किंवा वेबसाइट्स ह्याची मदत घेता.
या सर्व वस्तु तुम्हाला घ्यायच्या असल्यास तुम्ही दुसर्या वेबसाइट वरती जाऊन त्याची किमत तपासता आणि नंतरच त्या वस्तु विकत घेता.
तुम्ही विक्रेता असाल आणि तुमचा प्रॉडक्ट एखाद्या मोठ्या साईटवर विकायचा असेल, तेव्हा तुम्ही नवीन असल्यामुळे तुमचा माल टॉप वरती ग्राहकांना दिसत नाही, आणि वस्तू विकल्यानंतरही या सर्व वेबसाइट तुमच्याकडून 25 -30% कमिशन घेतात. यामुळे या वस्तू ग्राहकांना महागड्या किमतीत विकल्या जातात.
ह्या वरती जेवढ्या समस्या तुम्हाला जाणवतात ह्याचे ओएनडीसी समाधान घेऊन आले आहे, ह्या लेखात आपण ओएनडीसी म्हणजे काय, हे कसे काम करते, ह्याचे फायदे काय आहेत, हयाविषयी डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत.
ओएनडीसी म्हणजे काय आहे (What is ONDC in Marathi)
ONDC: ओपेन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे भारत सरकारकडून बनवलेले e-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, ज्याची सुरवात 31 डिसेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आली आहे. ओएनडीसी हे प्लॅटफॉर्म मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री ह्यांच्याकडून ह्याची सुरवात करण्यात आली आहे.
ओएनडीसी हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो की तुम्हाला ऑनलाइन सर्व सुविधा देण्याचे काम करतो, ओएनडीसी मधून तुम्ही ऑनलाइन कोणतेही सामान, खाण्याचे पद्धार्थ, रेल्वे टिकिट, शेतकर्यांचे सामान, अशा बर्याच वस्तु तुम्हाला हयाच्यावरती विकत भेटू शकतात.
ओएनडीसी वर अश्या सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल बोलले जाते की तुम्हाला एकच वस्तू वेगवेगळ्या विक्रेत्यांकडून पाहायला मिळेल, ज्यामुळे ग्राहक त्या वस्तूची गुणवत्ता, त्याची किंमत, त्या वस्तुचा डेलिवेरी टाइम अशे बरेच पाहिलू तपासून नंतर त्या वस्तु ऑनलाइन ऑर्डर करू शकता.
ओएनडीसी वर कमिशन म्हणून विक्रेत्याकडून 5-10% घेण्याबद्दल बोललो जाते, हे कमिशन अन्य e-कॉमर्स वेबसाइट पेक्षा खूपच कमी आहे, ज्यामुळे ग्राहकांना खूपच स्वस्त वस्तु भेटू शकतात.
सुरुवातीला ओएनडीसी ने बेंगळुरू, दिल्ली, शिलाँग, भोपाळ आणि कोईम्बतूर या 5 शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता, त्यानंतर ओएनडीसी सुमारे 200 शहरांमध्ये बीटा प्रोजेक्ट म्हणून काम करत आहे.
ओएनडीसी सध्या दिल्ली आणि बंगलोर या दोन शहरांमध्ये बीटा प्रकल्प म्हणून काम करत आहे. आणि देशातील २७३ शहरांमध्ये अल्फा प्रकल्पांतर्गत ओएनडीसी चे काम सुरू करण्यात आले आहे.
आज, ओएनडीसी कडे 49 नेटवर्कचा भाग आहे आणि सुमारे 40,000 पेक्षा जास्त विक्रेते त्याच्याशी जोडलेले आहेत, हा सर्व डेटा ओएनडीसी च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
ओएनडीसी हा प्लॅटफॉर्म सध्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोटीन द्वारे चालवली जात आहे जी एनपीएस देखील चालवते.
ओएनडीसी ची वैशिष्ट्ये
1. ओएनडीसी बनवण्याचे सरकारचे एकच धोरण आहे जे की, देशातील प्रत्येक विक्रता आणि ग्राहक e-कॉमर्स शी जोडला गेला पाहिजे.
2. ओएनडीसी हे ओपन नेटवर्क प्रोटोकॉल वापरून विकसित केले आहे, म्हणजेच तुम्हाला त्यात सर्व प्रकारच्या सुविधा पाहायला मिळतील, हे प्लॅटफॉर्म कोणावरही अवलंबून नाही.
3. ओएनडीसी वर, तुम्ही खाद्यपदार्थ, ई-कॉमर्स वस्तू, कपडे, टॅक्सी आणि इतर अनेक गोष्टी ऑर्डर करू शकता, त्यामुळे प्रत्येकजण त्याचा लाभ घेऊ शकतो.
4. ओएनडीसी वरती तुम्ही एखादी वस्तु विकत घेयला जाता त्या वेळी त्या वस्तूचे अनेक विक्रेते ओएनडीसी वरती उपलब्ध असतील, त्यामुळे तुम्ही त्याची किमत, गुणवत्ता, डीलिवेरी टाइम ह्या गोष्टी तपासून ती विकत घेऊ शकता.
5. ओएनडीसी वर प्रत्येक व्यापारी स्वतःचा डेटा जतन करू शकतो, त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहचण्यास त्याला अडचण येत नाही.
6. ओएनडीसी आमझोन, फ्लिपकार्ट, जोमटो, ओला ह्यांसारख्या कस्टमरला एकाच ठिकाणी घेऊन येण्याचे काम करत आहे, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होऊ शकेल.
7. कस्टमर चा डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी ओएनडीसी वर्ष 2000 च्या Conformation टेक्नॉलजी अंतर्गत काम करेल.
8. ओएनडीसी वर विद्यमान अॅपसह ग्राहकांचा व्यवहार डेटा शेअर करणे बंधनकारक नाही.
9. ओएनडीसी हे एक असे प्लॅटफॉर्म आहे की त्यांची वेबसाइट किंवा अॅप नाही, ओएनडीसी तुम्हाला पेटीएम, मेशो, आयडीएफसी फर्स्ट बँक, पिनकोड, माय स्टोअर सारख्या 49 नेटवर्क अॅप्सद्वारे सेवा प्रदान करण्याचे काम करत आहे.
ओएनडीसी ची गरज का पडली
ओएनडीसी म्हणजेच ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केले आहे.
आज, भारतात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचे काम करत आहेत, यामध्ये आमझोन, फ्लिपकार्ड ह्या वेबसाइट तुम्हाला A to Z सामान देण्याचे काम करतात.
झोमॅटो, स्विगी तुम्हाला फूट डिलिव्हरी देण्यासाठी काम करतात, तुम्हाला शहरात टॅक्सी बुक ओला आणि उबेर आहेत. किराणा सामान घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिग बास्केट यांसारख्या ई-कॉमर्स साइट्स उपलब्ध आहेत.
हे सर्व प्लॅटफॉर्म आपापल्या क्षेत्रात खूप चांगले काम करत आहेत आणि लोकांना चांगली सुविधाही देत आहेत. परंतु या सेक्टरमध्ये कोणताही विक्रेता जोडलेला असेल, तो या वेबसाइट वरती आपले सामान विकण्यासाठी 25-30% पर्यंत कमिशन देतो.
त्यानंतर फ्लिपकार्ट अॅमेझॉन सारख्या वेबसाइट्सवर ग्राहकांचा डेटा उपलब्ध आहे आणि कोणते उत्पादन विकले जात आहे, कोणते नाही, हे त्या वेबसाइट्सना चांगले माहीत आहे, त्यानुसार वेबसाइट चांगला नफा मिळवण्यासाठी स्वतःचे उत्पादन बनवत बनवण्याचे काम करतात.
ह्या वेबसाइट वरती उत्पादन दाखवायचे आणि कोणाचे उत्पादन नाही, हे या वेबसाइट्सच्या हातात राहते. आणि जे विक्रेते या प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच जोडलेले आहेत, त्यांची उत्पादने तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळतील, कारण ते आधीच कनेक्ट झालेले आहेत, त्यांच्याकडे ग्राहकांचा डेटा उपलब्ध आहे आणि त्यांची रेटिंग मोठ्या कंपन्यांकडे उपलब्ध आहे.
जे नवीन विक्रेते ह्या प्लॅटफॉर्म वर जोडले जातात, त्यांचे प्रॉडक्ट ह्या वेबसाइट वरती सुरवातीला दाखवत नाहीत, व नंतर हे प्रॉडक्ट विकले तर त्यांच्याकडून 25-30% पर्यत्न कमिशन घेतले जाते, त्यामुळे कस्टमर ला प्रॉडक्ट जास्त किमतीला भेटतो.
यामुळे, आज भारताचा ई-कॉमर्स उद्योग केवळ 1.4% पर्यंत वाढला आहे, जो चीनचा 52% आहे, युनायटेड स्टेट्सचा 19%, युनायटेड किंगडमचा 4.8% पर्यंत आहे. हे सर्व तुम्हाला या साइटवर पाहायला मिळेल.
ऑनलाइन ई-कॉमर्सशी जोडल्या जाणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी भारत सरकारने नॉन-प्रॉफिटेबल ओएनडीसी सुरू केली आहे जेणेकरून प्रत्येक गावातील व्यापारी त्याच्याशी जोडला गेला पाहिजे.
ओएनडीसी कसे काम करते
ओएनडीसी कसे कार्य करते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, आपण UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) बद्दल जाणून घेऊया, UPI अॅप हे प्रत्येकाला पेमेंट ट्रान्सफर करू देते, ग्राहक त्या अॅपशी कनेक्ट केलेला आहे की नाही याची पर्वा न करता. त्याचप्रमाणे, ओएनडीसी प्लॅटफॉर्म हे इंटरफेस होस्ट करणारे खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील मध्यस्थ स्तर आहे.
तुम्ही ऑनलाइन मोबाइल विकत घेण्याचा विचार करता त्यावेळी तुम्ही आमझोन आणि फ्लिपकार्ड वरती ह्याची किमत चेक करता, आणि जिथे कमी किमतीत बेटतो, त्या ठिकाणाहून विकत घेता. पण तुमचा आमझोन आणि फ्लिपकार्ड ह्या वरती शोधण्यात वेळे जातो.
ह्यासाठी ओएनडीसी हा पर्यायी प्लॅटफॉर्म आहे जो की तुम्हाला एकच मोबाइल वेगवेगळ्या सेल्लर कडून दाखवण्यात येईल. व तुम्ही त्याची किमत पाहून विकत घेऊ शकता.
ओएनडीसी मध्ये, विक्रेता आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क असतो, त्यात कोणतेही अॅप किंवा कोणतीही वेबसाइट नाही, ज्यामुळे ग्राहक ऑनलाइन सामान, तिकीट बुकिंग ह्या सर्व वस्तु विकत घेऊ शकतो. ONDC येत्या काही दिवसांत टॅक्सीसारखी सुविधा आणण्याचाही विचार करत आहे.
ओएनडीसी चा फायदा कोणाला होईल
ओएनडीसी मध्ये, तुम्हाला येत्या काही दिवसांत प्रत्येक प्रकारच्या सुविधा पाहायला मिळतील, ज्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध उत्पादने खरेदी करण्याची आणि त्यांची किंमत आणि गुणवत्ता पाहण्याची संधी मिळेल.
ओएनडीसी ही एक ना-नफा देणारी संस्था आहे, ज्यामुळे ती विक्रेत्याकडून 5% कमिशन घेण्याचे आश्वासन देत आहे. यामुळे ग्राहकांना तेच सामा स्वस्त मिळण्याची आणि विक्रेत्याला अधिक परतावा मिळण्याची संधी आहे.
अगदी लहान व्यापारी देखील ओएनडीसी मध्ये जोडून आपला ई-कॉमर्स व्यवसाय ऑनलाइन आणू शकतो आणि सामान विकू शकतो.
जे नवीन इंफ्लुएंसर आहेत जे ओएनडीसी द्वारे घरी बसून आपला माल ऑनलाइन विकू शकतात.
ओएनडीसीच्या आगामी काळात शेतकरी आपल्या मालाची ऑनलाइन विक्री करू शकतील, असे सांगण्यात येत आहे.
आगामी काळात ओएनडीसी च्या समस्या
सध्या सुमारे ४० हजार विक्रेते ओएनडीसीवर जोडलेले आहेत. आणि जर तुम्हाला हा सर्व माल मागवायचा असेल तर 49 नेटवर्क आहेत ज्यात तुम्ही वस्तू ऑर्डर करू शकता.
परंतु प्रत्येक श्रेणीतील वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या नेटवर्कवर जावे लागेल.
ओएनडीसी वर एखादे उत्पादन खराब आढळल्यास, कोणाशी बोलायचे, ते परत करायचे, असे संबंधित प्रश्न ग्राहकांच्या मनात आहेत.
ओएनडीसी त्याच्या पोर्टलच्या रचनेत योग्य सुधारणा झालेली नाही, ती सुधारण्याची गरज आहे. जेणेकरून ग्राहकवर्ग टिकून राहील.
ओएनडीसी कोण चालवतो
ओएनडीसी सध्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोटीन द्वारे चालवले जात आहे, जे NPS देखील चालवते, या दोन कंपन्या आहेत. आणि त्याचा वापर ग्राहक त्यांच्या वस्तू ऑर्डर करण्यासाठी करतात. IDFC First Bank, Digit, Paytm, Go Frugal, eSamudaay, Seller App, Growth Falcons, Dunzo, Loadshare, Messho सारखी 49 नेटवर्क त्याच्याशी जोडलेली आहेत. या वेबसाइटद्वारे ग्राहक ओएनडीसी च्या सेवांचा लाभ घेऊ शकतात.
IDFC First bank ही पहिली बँक आहे जी ई-कॉमर्स क्षेत्रातील ओएनडीसी शी संबंधित आहे.
ओएनडीसी ची स्थापना कोणी केली
ओएनडीसी हे एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह 8 कंपन्यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी त्याची सुरुवात केली.
सुरुवातीला, यात फक्त दोन कंपन्यांनी गुंतवणूक केली, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोटीन ईजीओव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेड.