एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आरसी ट्रान्सफर कसे करायचे (RC Transfer from One State to Another in Marathi), मित्रांनो नमस्कार, आपण दुसर्या राज्यात नौकारी करत असताना, एकादे वाहन टू व्हीलर किवा फोर व्हीलर विकत घेतल्यास आपल्याला ती अन्य कोणत्याही राज्यात किवा आपल्या राज्यात आणणे आणि त्याचा वापर करणे कठीण आहे व ते वाहन आपण तसेच वापरल्यास आपल्याला दंड ही भरावा लागतो.
तसेच आपल्या घरी एकादी टू व्हीलर किवा फोर व्हीलर दुसर्या राज्यात चालवायची असल्यास आपण ती डायरेक्ट नेऊन चालवू शकत नाही.
ज्याप्रमाणे तुम्हाला वाहन विम्याशिवाय रस्त्यावर वाहन चालवण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या राज्यात आरसी हस्तांतरित केल्याशिवाय वाहन चालवू शकत नाही. तुम्ही ज्या राज्यात नोंदणी केली आहे त्या राज्याव्यतिरिक्त इतर राज्यात आरसी ट्रान्सफरशिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास, तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच आज तुम्हाला आरसी ट्रान्सफर करण्याचे सोपे मार्ग सांगणार आहोत.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आरसी ट्रान्सफर कसे करायचे (RC Transfer from One State to Another in Marathi)
एका राज्यातून दुसर्या राज्यात आरसी ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम तुमच्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी आरटीओकडून एनओसी मिळवणे आवश्यक आहे. एनओसी मिळवताना एनओसीवर चेसिस क्रमांक लिहिला जाणे आवश्यक आहे.
तुम्हाला NOC मिळाल्यानंतर, तुम्ही ज्या ठिकाणी कायमस्वरूपी दुसर्या राज्यात राहणार आहात त्या जील्याच्या जवळच्या RTO कार्यालयाला भेट द्या. लक्षात ठेवा की आरटीओ कार्यालयात जाताना संबंधित कागदपत्रे सोबत घ्या.
आरटीओ कार्यालयात आपल्या गाडीची सबंदीत कागदपत्रे सबमिट करा, कागदपत्रे जमा करताना आपल्या बाजूने सर्व कागदपत्रांची पडताळणी करा. जेणेकरून तुम्हाला आरसी ट्रान्सफर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
नंतर आपल्याला नवीन राज्याचे RTO तुम्हाला नवीन रोड-टॅक्स चलन जारी करेल. ती आवश्यक शुल्काची रक्कम तुम्हाला भरावी लागेल व नंतरच तुमचे अॅप्लिकेशन प्रोसेस होईल.
RTO ऑफिस मध्ये जात असताना आपली गाडी गेऊन जा, जेणेकरून RTO अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तुमच्या वाहनाची तपासणी करता येईल. नंतर अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी चेसिस क्रमांकाचे ठसे घेतील.
ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमची आरसी कोणत्या दिवशी नवीन राज्यात हस्तांतरित केली जाईल ते तुम्ही शोधू शकता.
RC ट्रान्सफर करण्यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents required for RC Transfer)
वरती आपण आपली गाडी एका राज्यातून दुसर्या राज्यात कशी ट्रान्सफर करायची हयाविषयी माहिती करून घेतली, आता आपण ह्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हयाविषयी माहिती करून घेऊयात.
- फॉर्म 28 च्या तीन प्रती
- फॉर्म 29 च्या दोन प्रती
- फॉर्म 30 च्या दोन प्रती
- फॉर्म 35
- NOC जे आपण पहिल्या राज्यातून RTO कडून घेतलेले
- विक्री प्रतिज्ञापत्र
- पॅनकार्ड
- अॅड्रेस प्रूफ: आधार कार्ड किवा वोटिंग कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- चेसिस नंबर
- आपल्या गाडीची जुनी आरसी
- पीयूसी
- इन्शुरन्स
- कार इनव्हॉइस
FAQ : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आरसी ट्रान्सफर
1. टू व्हीलर एका राज्यातून दुसर्या राज्यात कशी वापराची?
एका राज्यातून दुसर्या राज्यात गाडीचा वापर करण्यासाठी तुम्हाला सुरवातीला आपल्या गाडीची NOC जुन्या आरटीओ कडून घ्यावी लागेल. नंतर तुम्ही जिथे राहणार आहात त्या राज्याचा जिल्ह्याच्या आरटीओ मध्ये नवीन RC ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
2. मी पुण्यात इतर राज्य वाहन वापरू शकतो का?
हो नक्कीच, तुम्ही कोणत्याही राज्याचे वाहन पुण्यामध्ये वापरू शकता, त्यासाठी तुम्हाला आपल्या गाडीची NOC घेऊन पुणे जिल्ह्याच्या RTO ऑफिसमध्ये RC ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
3. मी महाराष्ट्रात इतर राज्यातील कार वापरू शकतो का?
हो, तुम्ही महाराष्ट्रमध्ये इतर राज्यातील वाहन वापरू शकता, त्यासाठी आपल्या गाडीची NOC घेऊन तुम्ही जिथे राहणार आहात त्या जिल्ह्याच्या RTO ऑफिस मध्ये RC ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागेल.
4. भारतात वाहनाची नोंदणी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी किती खर्च येतो?
भारतामध्ये वाहनांची नोंदणी एका राज्यातून दुसर्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 1500 रुपये पर्यत्न खर्च येतो, हा खर्च कमी जास्त असू शकतो.
5. वाहनाचे आरसी ट्रान्सफर कसे केले जाते?
गाडी का आरसी दुसर्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी, तुमच्याकडे मूळ आरसीची प्रत, जुन्या आरटीओची एनओसी, वाहन विम्याची प्रत, फॉर्म 29, फॉर्म 30, आयडी पुरावा, कायम पत्ता, ₹30 स्टॅम्प केलेला स्वत: पत्ता असलेला लिफाफा इत्यादी आवश्यक आहेत.
6. मालकी हस्तांतरण फॉर्म काय आहे?
आपली जुनी गाडी कोणाला विकायची असल्यास त्यासाठी तुम्हाला फॉर्म 28 हा आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एका शहरातून दुसऱ्या शहरात राहणाऱ्या व्यक्तीच्या नावाने वाहन आरसी ट्रान्सफर करत असाल.
हे ही वाचा