आयुष्मान भारत योजना, नमस्कार मित्रांनो आज आपण हॉस्पिटल मध्ये साधे डॉक्टरांना दाखवायचे झाले तर 500 ते 1000 रुपये खर्च आहे, आणि नंतर मेडिकल खर्च, लॅब टेस्टिंगचा खर्च हे सगळे आपल्या देशातील गरीबांना परवडणारे नाही. तसेच जर का आपल्याला हॉस्पिटल मध्ये अॅडमिट किवा एखादे ऑपरेशन करायचे झाल्यास लाखो रुपयामध्ये खर्च आहे, ह्या लाखो रूपयाच्या खर्चा मुळे आपल्या देशातील गरीब आणि मध्यम कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटल मध्ये जाण्यास घाबरत आहे.
तसेच आजचाच विचार केला तर आज संपूर्ण जगामध्ये कोरोना (COVID-19) पसरला आहे. आज लोकांना हॉस्पिटल मध्ये बेड भेटत नाहीत आणि प्रायवेट हॉस्पिटल मध्ये लोकांना उपचार घेणे परवडत नाही. आज या लोकांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजना याची घोषणा केली. आज आपण या लेखामध्ये आयुष्मान भारत योजना काय आहे? या योगणेचा लाभ कोण घेऊ शकतो? या यागनेमध्ये कोणत्या रोगांचा समावेश आहे? आयुष्मान भारत योजना पात्रता काय आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
आयुष्मान भारत योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सेप्टेंबरला आयुष्मान भारत या योजनेची सुरवात केली. मोदी केयर या नावाने प्रसिद्ध असणारी ही योगणा देशातील गरीब लोकांसाठी हेल्थ इन्शुरेंस स्कीम आहे. या योगणे अंतर्गत देशातील 10 कोटी परिवारांना 5 लाख रुपयापर्यत्न आरोग्य विमा दिला जातो.
करोना (COVID-19) विषाणू जशा महामारीमुळे भारत सरकार हॉस्पिटलची संख्या वाढवत आहे. या योगणे अंतर्गत 5 लाख रूपयांचा हॉस्पिटल खर्च फ्री मध्ये केला जातो. यामधील लाभार्थीना सरकार कडून ई- कार्ड दिले जाते. याचा उपयोग करून कैशलेस सेवा हॉस्पिटल मधून दिली जाते. यासाठी देशभरात सरकारी आणि खासगी रुग्णालये नोंदणीकृत आहेत. आयुष्मान भारत योजनेंतर्गत वैद्यकीय सुविधांची व्याप्ती सरकार विस्तारवित आहे.
या योगणेचा लाभ कोण घेऊ शकतो?
- देशातील 10 कोटी कुटुंब या योगणेचा लाभ घेऊ शकतात.
- या कुटुंबातील लोकांची वोळख गरीब आणि सुविधा पासून वंचित कुटुंब म्हणून केली गेली आहे.
- या योगणेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आकड्यांचा वापर केला गेला आहे.
- या योगणेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील लोकांची संख्या आणि त्यांचे वय यांची कोणतीही मर्यादा घातली गेली नाही.
कोणत्या रोगांचा समावेश आहे?
- या योगणे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 5 लाख रुपया पर्यत्न हॉस्पिटल खर्च मोफत दिला जातो.
- मोदी केयर मध्ये जुन्या आजारांवरती पण उपचार केला जातो.
- कोणत्याही आजारावरती हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होण्याअगोदर आणि नंतर चा पण खर्च कवर केला जातो.
- कोणताही रोग झाल्यास, सर्व वैद्यकीय तपासणी / ऑपरेशन / उपचार इत्यादी पीएम-जेवाय अंतर्गत येतात.
- आरोग्य विम्याच्या क्षेत्राबाहेर असलेल्या गोष्टींची यादी फारच लहान आहे.
हे ही वाचा
आयुष्मान भारत योजना पात्रता
या योगणे अंतर्गत आपले नाव यादीमध्ये आहे का नाही हे ऑनलाइन कसे चेक करायचे याविषयी स्टेप बाय स्टेप प्रोसीजर जाणून घेऊया.
1. भारत सरकार ध्वारे https://pmjay.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या. नंतर राइट साइडला वरती “Am I Eligible” वरती क्लिक करा
2. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, तिथे तुमचा मोबाइल नंबर आणि Captch भरून Generate OTP वर क्लिक करा. नंतर OTP भरून सबमिट बटन वरती क्लिक करा.
3. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही आपले राज्य आणि तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये कसे शोधणार आहे याची निवड करा. यामध्ये तुमच्या समोर चार ऑप्शन येतील.
- सर्च बाय नेम (Search By Name)
- सर्च बाय एचडीडी नंबर (Search By HDD Number)
- सर्च बाय रेशन कार्ड नंबर (Search By Ration Card Number)
- सर्च बाय मोबाइल नंबर (Search By Mobile Number)
4. वरील चार नावामधील मधील एका नावाची निवड करा तुम्हाला तुम्हाला तुमचे नाव आयुष्मान भारत योजने मध्ये आहे की नाही हे तुम्हाला माहीत पडेल.
आयुष्मान भारत योजना टोल फ्री नंबर
आयुष्मान भारत योजना ही भारत सरकार ध्वारे देशातील गरीब लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, 2011 च्या जनगणना वरती 8.03 कोटी ग्रामीण परिवार आणि 2.33 कोटी शहरी परिवार या स्कीम अंतर्गत जोडले गेले आहेत, या योनेमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही भारत सरकार ध्वारे 14555 किवा 1800 111 565 या नंबर वर फोन करून जाणून घेऊ शकता.
आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन
वरती आपण आयुष्मान भारत योजना या अंतर्गत आपले नाव लिस्ट मध्ये आहे का नाही हे कसे चेक करायचे याविषयी स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेतली, जर तुमचे नाव या योगनेमध्ये नसेल व तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे असल्यास ते कसे करायचे याविषयी आपण माहिती करून घेऊया.
1. या योगणेचा लाभ घेण्यासाठी आणि ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC सेंटर वर तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल.
2. यानंतर, सर्व कागदपत्रांची लोक सेवा केंद्राच्या (सीएससी) एजंटद्वारे पडताळणी केली जाईल आणि योजने अंतर्गत नोंदणी सुनिश्चित केली जाईल.
3. यानंतर, 10 ते 15 दिवसांनंतर आपल्याला जन सेवा केंद्राच्या माध्यमातून आयुष्मान भारतचे सुवर्ण कार्ड दिले जाईल. अशा प्रकारे आपली नोंदणी यशस्वी होईल.
या योगणेसाठी लागणारी डॉक्युमेंट
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाइल नंबर
- अडड्रेस प्रूफ
आयुष्मान भारत हॉस्पिटल लिस्ट
आयुष्मान भारत योजना या अंतर्गत कोणत्या हॉस्पिटल मध्ये जाऊन याचा आपण लाभ घेऊ शकतो व ज्या हॉस्पिटल मध्ये आपण उपचार घेणार आहे हे हॉस्पिटल लिस्ट मध्ये आहे का नाही हे ऑनलाइन कसे चेक करायचे हे स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया.
1. सर्व प्रथम तुम्हाला https://pmjay.gov.in/ या वेबसाइट वर जावे लागेल.
2. नंतर वरती तुम्हाला हॉस्पिटल या वरती क्लिक करावे लागेल, नंतर Find Hospital वरती क्लिक करा.
3. तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमचा राज्य, जिल्हा, हॉस्पिटल टाइप, स्पेशलिटी आणि हॉस्पिटल नेम याची निवड करा.
4. नंतर तुमच्या समोर एक Captcha येईल तो भरून सर्च वरती क्लिक करा.
5. तुम्हाला या योगणे अंतर्गत कोणते हॉस्पिटल समाविष्ट केले आहे हे माहीत होऊन जाईल आणि तुम्हाला उपचार घेणे सोपे होईल.
आयुष्मान भारत योजना
आज आपण या लेखामध्ये आयुष्मान भारत योजना काय आहे? याविषयी संपूर्ण माहिती डीटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला, वर दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही अशी अपेक्षा करतो, यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा.
हे ही वाचा