कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते? 

कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कमी होणे किवा वाढणे ही आज खूप गंभीर समस्या झाली आहे. आपण चुकीचे खाल्याने आपल्या आणि लाइफस्टाईल मुळे शरीराचे मोठे नुकसान होते आणि आपले पोट वाढते किवा कमी होते. वजन वाढणे आणि कमी होणे हे कॅलरीशी संबिधित आहे .

सरळ भाषेत सांगायचे झाल्यास कॅलरी कमी जास्त केल्यास आपले वजन वाढवू किवा कमी करू शकतो. यासाठी आपण या लेखामध्ये कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते? याविषयी माहिती करून घेणार आहोत.

कॅलरीज म्हणजे काय कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते 

कॅलरीज म्हणजे काय?

प्रत्येक व्यक्तीला काम करण्यासाठी उर्जाची गरज पडते. जसे की वाहन चालवण्यासाठी पेट्रोल किवा डीजल तसेच आपल्याला वेग वेगळी कामे करण्यासाठी उर्जाची गरज पडते यालाच आपण कॅलरी म्हणू शकतो.

कॅलरी ऊर्जा मोजण्यासाठी एक कॅलरी एक युनिट आहे. खासकरून कॅलरीचा उपयोग खाद्य पदार्थ आणि पेय पदार्थ मधील उपस्थित सामग्री मोजण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा शरीरास आवश्यक खाद्य पदार्थ पासून मिळते. आपली रोजची कामे करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रमाणात कॅलरीचे सेवन केले पाहिजे.

1 किलो वजनाला किती कॅलरीज असतात?

एका रीपोर्टच्या अनुसार, एका पुरषाला निरोगी राहण्यासाठी रोज 2500 कॅलरीची गरज पडते आणि महिलांना 2000 कॅलरीची गरज पडते. 1 किलो कॅलरी मध्ये जवळ जवळ 1000 कॅलरी असतात म्हणजे 4186 जुलच्या बरोबर. 

एका दिवसात आपल्याला किती कॅलरी आवश्यक आहेत?

विविध प्रकारच्या जेवणामध्ये विविध प्रकारच्या कॅलरी आपल्याला भेटत असतात. ज्या अन्नामध्ये चरबी असते, त्यापासून आपल्याला अधिक कॅलरी मिळतात. प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेट वाल्या जेवणातून आपल्याला कमी कॅलरी मिळते. आपल्याला एका दिवसामध्ये..

पुरषांसाठी

  • 2500 कॅलरी आपले वजन संतुलन राहण्यासाठी आवश्यक आहेत.
  • 2000 कॅलरी जर तुमचे वजन कमी करायचे असल्यास गरजेचे आहेत.

महिलांसाठी

  • 2000 कॅलरी आपले वजन संतुलन राहण्यासाठी आवश्यक आहेत.
  • 2000 कॅलरी जर तुमचे वजन कमी करायचे असल्यास गरजेचे आहेत.

वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी किती कॅलरी आवश्यक आहेत? किवा वजन कसे कमी केले जाते? 

एका पौंड शरीराच्या चरबीमध्ये सुमारे 3500 कॅलरी असतात. एक आठवड्यात एक पौंड चरबी कमी करण्यासाठी आपल्याला दररोज वर्क आऊट कॅलरी आणि मेंटेनेंस कॅलरी कमी झालेल्या 500 कॅलरी मधून कमी घ्याव्या लागतील आणि आपल्याला वजन वाढवण्यासाठी आपल्याला दररोज वर्क आऊट कॅलरी आणि मेंटेनेंस कॅलरी कमी झालेल्या 500 कॅलरी मधून जास्त घ्याव्या लागतील. 

हे ही वाचा

कॅलरीचे प्रकार

1. लहान कॅलरी : 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस वाढविण्यासाठी जेवढ्या उर्जेचे उपयोग होतो त्याला लहान कॅलरी म्हणतात.

2. मोठी कॅलरी : 1 किलोग्राम पाण्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअस वाढविण्यासाठी जेवढ्या उर्जेचे उपयोग होतो त्याला मोठी कॅलरी म्हणतात.

कमी कॅलरी जेवण/ कमी कॅलरी आहार

वजन कमी करण्यासाठी 10 आवश्यक फूड जे आपले वजन कमी करण्यास मदत करते 

1. अजमोद: हा झीरो खाद्य पदार्थ आहे यामध्ये विटामीन ए, बी आणि सी तसेच पोटेशियम, मैंगनीज, मैग्नीशियम, फास्फोरस, कैल्शियम, लोहा, सोडियम और फाइबर ची मात्रा खूप प्रमाणात असते.

2. संत्री: संत्री मध्ये विटामीन सी चे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. पण यामध्ये कॅलरीचे प्रमाण  कमी आढळते.

3. कोबी: कोबी हृदयरोग आणि कॅन्सरशी लढायला मदत करतात. कोबी मध्ये विटामीन ए आणि सी चे प्रमाण आढळते जे वजन कमी करण्यास मदत करते  

4. साखर बीट: कमी कॅलरी व्यतिरिक्त बीट अँटीऑक्सिडेंट्स, बीटलन्स शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सर्व्हिंग्ज: 43

5. काकडी: हे केवळ वजन कमी करण्यातच नव्हे तर चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करते. त्यात ए, सी आणि ई सारख्या अँटी-ऑक्सिडंट जीवनसत्त्वे असतात जे आपल्या शरीरातील विष बाहेर काढण्यास मदत करतात. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सर्व्हिंग्ज: 16

6. लिंबू: लिंबू जीवनसत्व सीचा एक चांगला स्रोत आहे. त्यात थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि व्हिटॅमिन-ई सारख्या विविध जीवनसत्त्वे असतात. त्यातील अँटिऑक्सिडेंट्स तुम्हाला निरोगी ठेवतात. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सेव्हिंग्ज: २.

7. फुलकोबी: फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. जे शरीरातील रासायनिक घटक भिजवून आणि चयापचय प्रणाली वाढविण्यात मदत करते. या प्रकारच्या कोबीमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, याचा अर्थ असा आहे की आपण बराच वेळ परिपूर्ण आहात आणि जास्त प्रमाणात खाणे टाळा.

8. कांदा: कांदा बहुधा सॅलड किंवा स्वयंपाकात वापरतात. याद्वारे कांदा केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर वजन कमी करतेच तसेच मधुमेह आणि रक्तदाबसारख्या आजारांनाही प्रतिबंधित करते. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते कांद्यामध्ये कॅल्सीन आणि रिबॉफ्लेविन (व्हिटॅमिन बी) मुबलक प्रमाणात असते. त्याचा वास एन-प्रोपिल-डाय सल्फाइडमुळे होतो. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सर्व्हिंग्ज: 40

9. गाजर: शरीरावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी गाजरचे सेवन फायदेशीर आहे. गाजरचा रस वजन कमी करण्यास देखील मदत करतो. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सर्व्हिंग्ज: 41

10. टोमॅटो: टोमॅटो व्हिटॅमिन सी चे मुख्य स्त्रोत आहे. यासह, तो वजन कमी करण्यात यशस्वी आहे. टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात बीटाकारोटिन, लाइकोपीन, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. एकूण कॅलरी 100 ग्रॅम सर्व्हिंग्ज: 17

कॅलरी चार्ट मराठी / कॅलरी तक्ता

आपण कॅलरी काय आहेत आणि कॅलरी कमी जास्त करून आपण आपले शरीर कसे नियंत्रित ठेवू शकतो हे आपण वरती बगीतले. आता आपण आपल्याला फळांमध्ये, भाजांमध्ये आणि विविध पदार्थ मध्ये किती कॅलरी भेटतात हे समजून घेऊया. 

हे ही वाचा 

सकाळी नाष्टा मधील घेतले जाणारे पदार्थ 

आहार  प्रमाण  कॅलरी 
अंडी (उकडलेले) 01 80 कॅलरी 
अंडी (तळलेले) 01 110 कॅलरी 
अंड्याचे आमलेट  01 120 कॅलरी 
भाजी 01 कप  150 कॅलरी 
पराठा  01  150 कॅलरी 
पुरी  01 75 कॅलरी 
ब्रेडचे तुकडे 01 90 कॅलरी 
चपाती  01 60 कॅलरी 
ईडली  01 कप  100 कॅलरी 
सांभर  01 कप  150 कॅलरी 
डोसा प्लेन मध्ये  01  120 कॅलरी 

दुपारी किवा संध्याकाळी घेतले जाणारे पदार्थ 

आहार  प्रमाण  कॅलरी 
तांदूळ (उकडलेले) 1 कप  120 कॅलरी 
तांदूळ (तळलेले / तळलेले) 1 कप  150 कॅलरी 
फुलका (चपाती) 1 60 कॅलरी 
नान 1 150 कॅलरी 
दाल 1 कप  150 कॅलरी 
दही  1 कप  100 कॅलरी 
भाजी  1 कप  150 कॅलरी 
मांस 1 कप  175 कॅलरी 
कोशिंबीर 1 कप  100 कॅलरी 
कटलेट 1 75 कॅलरी 
लोणचे  1 चमचा  30 कॅलरी 
सूप  1 कप  75 कॅलरी 

स्वीट आणि दुसरे पदार्थ 

आहार  प्रमाण  कॅलरी 
जाम 1 चमचा  30 कॅलरी 
लोणी 1 चमचा  50 कॅलरी 
तूप 1 चमचा  50 कॅलरी 
साखर 1 चमचा  30 कॅलरी 
बिस्किट 1 30 कॅलरी 
आइस क्रीम  1 कप  200 कॅलरी 
मिल्क शेक 1 ग्लास  200 कॅलरी 
समोसा  100 कॅलरी 
भेल पुरी/ पाणी पुरी  1 हेल्पिंग 150 कॅलरी 
कबाब 1 प्लेट  150 कॅलरी 
फ्रूट  1 हेल्पिंग 75 कॅलरी 
भारतीय मिठाई 1 पीस  150 कॅलरी 

पेय पदार्थ  मधून भेटणारी कॅलरी

आहार  प्रमाण  कॅलरी 
चहा  1 कप  45 कॅलरी 
ब्लॅक टी 1 कप  10 कॅलरी 
कॉफी  1 कप  45 कॅलरी 
दूध  1 कप  60 ते 75 कॅलरी 
हॉर्लिक्स (दूध आणि साखर बरोबर) 1 कप  120 कॅलरी 
फळांचा ज्यूस  1 कप  120 कॅलरी 
बिअर 1 बाटली  200 कॅलरी 
मद्यपान 1 पेग  75 कॅलरी 

कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते? 

आज आपण कॅलरीचे आपल्या जीवनमधील महत्त्व काय आहे हे “ कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते?” तसेच कॅलरी चे प्रकार व अन्य प्रश्नाची उत्तरे या लेखामधून जाणून घेतली. वर दिलेली डीटेल मध्ये माहिती तुम्हाला समजली असेल व दुसरीकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही शंका किवा बदल हवे असल्यास commend मध्ये जरूर कळवा. 

6 thoughts on “कॅलरीज म्हणजे काय? कॅलरी चार्ट मराठी, वजन कसे कमी केले जाते? ”

  1. Pingback: औषधी वनस्पती माहिती व उपयोग, औषधी वनस्पती नावे मराठी

  2. Pingback: मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध उपचार, काय खाऊ नये?

  3. Pingback: वजन वाढवण्याचे घरगुती उपाय

  4. Pingback: वजन कमी करण्याचे उपाय, आहार तक्ता | 2021

  5. Pingback: दूध व्यवसाय माहिती मराठी, गाय जातीची निवड, फायदे | 2021

Leave a Reply

%d bloggers like this: