आरोग्य सेतु अप्प काय आहे? आरोग्य सेतु अप्पचा वापर आणि त्याचे फायदे

आरोग्य सेतु अप्प काय आहे? आरोग्य सेतु अप्पचा वापर आणि त्याचे फायदे:  कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी  भारत सरकारणे  2 एप्रिल 2020 मध्ये आरोग्य सेतु अप्प लॉंच केले, हे अप्प मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी यांनी निर्माण केले आहे. हे ब्लूटूथ-आधारित COVID-19 ट्रॅकर अप्प आहे. आज आपण आरोग्य सेतु अप्प काय आहे? ते कसे काम करते, आरोग्य सेतु अप्पचे फायदे काय आहेत आणि आपल्या मोबाइल मध्ये याचा कसा वापर करायचा या विषयी माहिती करून घेणार आहोत.

 

आरोग्य सेतु अप्प काय आहे? आरोग्य सेतु अप्पचा वापर आणि त्याचे फायदे

आरोग्य सेतु अप्प काय आहे?

आरोग्य सेतु मोबाइल अप्प आहे जे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राद्वारे विकसित केले गेले आहे जे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक भाग आहे. हे ब्लूटूथ-आधारित COVID-19 ट्रॅकर अप्प आहे. त्याचे मेन उद्दीष्ट म्हणजे भारत सरकारच्या, विशेषत: आरोग्य विभागाच्या, पुढाकाराने कृतीशीलपणे जोखीम, उत्तम पद्धती आणि संबंधित सूचनांशी संबंधित सल्ल्यांबद्दल माहिती देणे आणि त्यांचे कार्य वाढविणे हे आहे. 

सर्वात मोठे कार्य म्हणजे संपर्क शोधणे आणि संभाव्य COVID-19  रुग्ण पीडितांना ओळखण्यासाठी सरकारसाठी एक विश्वासार्ह नेटवर्क तयार करणे. हे अप्प गूगल प्ले स्टोर (अन्द्रोइड फोन साठी ) आणि अॅपल अप्प स्टोर (ioS फोन साठी ) उपलब्ध आहे. हे 11 भाषमध्ये इंग्लिश, हिन्दी, तेलुगू , कन्नड, मळयालम, तामिळ, पंजाबी, बंगाली, ओरिया, गुजराती आणि मराठी उपलब्ध आहे.

आरोग्य सेतु अप्प कसे काम करते ?

ह्या अप्पचा उपयोग चांगल्या रीतीने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये ब्लूटूथ ऑन ठेवावे लागेल.जेणेकरून आपल्या माहितीची देवाणघेवाण होहील.

जेव्हा आरोयोग्य सेतू अप्प असलेले दोन स्मार्टफोन एकमेकाच्या ब्लूटूथ रेंजमध्ये येतात तेव्हा माहिती संकलित होते. दोन यूजरपैकी एकाची COVID-19 टेस्ट पॉजिटिव आली असेल तर हे अप्प दुसर्‍या व्यक्तीस सतर्क करते आणि प्रक्रियेत सरकारला संभाव्य घटनांचा शोध घेण्याची परवानगी देते.

तसेच हे अप्प त्या व्यक्तीला वेगळे राहण्यास आणि जर का कोणती लक्षणे आढल्यास COVID-19 टेस्ट करण्यास सल्ला देते. तसेच आपल्या जवळील लॅबची माहिती किवा फ्री हेल्पलाइन नंबर देते.

बर्‍याच संस्था संभाव्य घटना ओळखण्यासाठी आपल्या कर्मच्यार्यांना त्यांच्या दैनंदिन कामात आरोग्य सेतु अप्प उपयोग करण्यास सांगत आहेत. तसेच बर्‍याच संस्था अॅप समाविष्ट करण्याची योजना देखील आखत आहेत. लोकांना  मेट्रो, रेल्वे स्टेशन, एयर फोर्ट आणि अन्य ठिकाणी प्रवेश देण्यासाठी ह्या अप्प चा e-pass म्हणून उपयोग केला जातो.

आरोग्य सेतु अ‍ॅप कसे वापरावे?

आरोग्य सेतु अ‍ॅप कसे डाऊनलोड करून मोबाइल मध्ये कसे इंस्टॉल करायचे यासाठी खाली देलेल्या स्टेप्स फॉलो करा.

1. आरोग्य सेतु अ‍ॅप गूगल प्ले स्टोर वरुण (अन्द्रोइड यूजर ) किवा अॅपल स्टोर (ios यूजर ) वरुण डाऊनलोड करा.

2. तुमची भाषा निवडा.

3. तुमच्या सेटटिंग मध्ये जाऊन ब्ल्युटूथ आणि लोकेशन ऑन करा. 

4. तुमच्या फोन सेटटिंग मधून लोकेशन शेयरिंग “Always ” हे सेट करा.

5. तुम्हाला रजिस्टर करण्यास विचारले जाईल. तुम्ही रजिस्टर करा.

6. “I Agree” बटन वरती क्लिक करा.

7. नंतर तुम्हाला मोबाइल नंबर विचारला जाईल, मोबाइल नंबर टाइप करा. तुमच्या मोबाइल मध्ये ओटीपी भेटेल तो भरा.

8. तुम्हाला अप्प मध्ये प्रवेश भेटेल. नंतर तुम्ही सेल्फ अससेस्समेंट टेस्ट करून रिस्क जाणू घेवू शकता.

आरोग्य सेतु अ‍ॅपचे फायदे 

1. आरोग्य सेतु अ‍ॅप हे ब्लूटूथ आधारे टेक्निक वर काम करते हे यूजरच्या लोकेशन नुसार त्याची जोखीम निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये यूजर COVID-19 पॉजिटिव व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला अलर्ट करून सेल्फ ईसोलेशेण राहण्याचा सल्ला देते.

2. यामध्ये यूजरची जोखीम त्याच्या लोकेशनवर अवलंबून आहे. मंजे यूजर कोठून प्रवास करतो तो कोणटेंमेंट जॉने मध्ये गेला असेल तर यूजर त्याला अलर्ट केले जाते.

3. आरोग्य सेतु अप्प हे यूजरला सावधगिरीच्या उपायांविषयीआणि जागतिक साथीच्या काळात सोशल Distancing चा वापर कसा करायचा याविषयी सल्ला देते. 

4. पीएमओच्या विधानानुसार ह्या अप्पचा आपण ट्रवेल्लिंगसाठी, रेल्वे स्टेशन, एयर फोर्ट एत्यादी ठिकाणी e pass म्हणून उपयोग करू शकतो.

5. जर एखाद्या यूजर COVID-19 रुग्ण पीडिताच्या संपर्कात आला असेल तर त्याला लगेच जवळच्या चाचणी केंद्रावर चाचणीसाठी जाण्यास किवा टोल-फ्री नंबर 1075 वर त्वरित कॉल करण्याचा सल्ला दिला जातो.

6. यूजर भारतामधील प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन नंबर देखील शोधू शकतात.

7. ह्या अप्प मध्ये त्रिज्या पॅरामीटर्स निश्चित केले आहे यूजर पाच मूल्यांपैकी एक घेऊ शकतात

8. आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये 500 मीटर, 1 किमी, 2 किमी. 5 किमी आणि 10 किमी ही मानक पॅरामीटर्स आहेत. त्यानुसार यूजर रेंज रिस्क ठरवू  शकतात.   

आरोग्य सेतु अप्प काय आहे? आरोग्य सेतु अप्पचा वापर आणि त्याचे फायदे

आज आपण आरोग्य सेतु अप्प काय आहे? आरोग्य सेतु अप्पचा वापर आणि त्याचे फायदे याबाधल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, व वर दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल व तुम्हाला दुसरेकडे जाण्याची गरज पडणार नाही. यामध्ये तुम्हाला काही बाधल किवा शंका असतील तर commend मध्ये जरूर कळवा. 

Leave a Comment