प्रधानमंत्री घरकुल योजना, जर तुमच्याकडे स्वता: च घर नाही किवा तुम्ही भविष्यात नवीन घर घ्यायचा किवा बांधायचा विचार करता असाल तर ही प्रधानमंत्री घरकुल योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेअंतर्गत तुम्ही 18 लाखापर्यत्न कर्ज घेवू शकता. सुरवातीला या योजने अंतर्गत प्रधानमंत्री गुरुकुल योजनाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती नंतर ती वाढवून 18 लाख रुपये करण्यात आली.
मागील लेखामध्ये आपण स्वता: बिजनेस सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना मराठी काय आहे? याबाधल डीटेल मध्ये माहिती करून घेतली आज आपण प्रधानमंत्री घरकुल योजना काय आहे हे व याचा पण लाभ कसा घेऊ शकतो याबाधल जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री घरकुल योजना
प्रधानमंत्री घरकुल योजना, भारत सरकार ध्वारा सुरू केलेली प्रधानमंत्री गुरुकुल योजना स्कीम, याचा उद्धेश गरीबांना आणि गरजूंना ग्रामीण आणि शहरी भागामध्ये घर उपलब्ध करून देणे आहे. ही योजना 25 जून 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचे 31 मार्च 2022 पर्यत्न 2 करोड घरे बनवण्याचे लक्ष्य आहे.
प्रधानमंत्री गुरुकुल योजना अंतर्गत पहिल्यांदा घर बनवण्यासाठी किवा योजनेचा लाभ घेणार्यांसाठी भारत सरकार ध्वारे सबसीडी दिली जाते. म्हणजे घर विकत घेण्यासाठी होम लोण वर सबसीडी दिली जाते. ही सबसिडी 2.67 लाख रुपयापर्यत्न भेटू शकते.
या स्कीम अंतर्गत चार कॅटेगरी मध्ये वर्गीकरण केले आहे. 3 ते 6 लाख वार्षिक उत्पन्न वाल्यांसाठी इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS) आणि लोअर इनकम ग्रुप (LIG), 6 ते 12 लाख वार्षिक उत्पन्न वाल्यांसाठी मिडल इन्कम ग्रुप 1 (MIG 1) आणि तिसरा 12 ते 18 लाख वार्षिक उत्पन्नवाल्यांसाठी मिडल इन्कम ग्रुप 2 (MIG2).
या इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS), लोअर इनकम ग्रुप (LIG) यांसाठी सबसिडी चा फायदा 31 मार्च 2022 पर्यत्न भेटत राहील. पण मिडल इन्कम ग्रुप 1 (MIG 1) आणि मिडल इन्कम ग्रुप 2 (MIG2) यांसाठी सब सीडी चा फायदा 31 मार्च 2020 पर्यत्न घेऊ शकता.
हे ही वाचा
या योजनेचा कोण लाभ घेऊ शकतो?
लाभ घेण्यासाठी आपले वय 21 ते 55 वर्ष असायला पाहिजे. जर तुमच्या घरातील मुख्य व्यक्तीचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त असेल तर त्याचा मुख्य कायदेशीर वारस गृह कर्जात सामील होईल.
सबसिडी किती भेटेल?
6.5 % ची क्रेडिट सबसिडी सहा लाख रुपया पर्यत्नच्या रकमेवर भेटून जाईल. 9 लाख रुपया पर्यत्नच्या कर्जावर 4% व्याज सबसिडी चा लाभ घेऊ शकता आणि 12 लाख रूपयाच्या लोन वर तुम्ही 3 % व्याज सबसिडीचा आर्थिक फायदा घेऊ शकता.
रमाई घरकुल योजना महाराष्ट्र/ घरकुल योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री घरकुल योजना, महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील लोकांसाठी रमाई घरकुल योजना महाराष्ट्र सुरू करण्यात आली. ही योजना अनुसूचित जाति (एससी) आणि नव-बौद्ध नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. जे लोक गरीब आहेत यासाठी महाराष्ट्र सरकार ध्वारे घर उपलब्ध करून देणे हा या योजनेचा हेतु आहे.
महाराष्ट्र सरकारने या योजनेचे नाव घरकुल योजना हे नाव ठेवले आहे. महाराष्ट सरकारने रमाई घरकुल योजने अंतर्गत 51 लाख घरे देण्याचे लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत दीड लाख घरे सामाजिक न्याय विभागाने मंजूर केली आहेत.
घरकुल योजना अर्ज
प्रधानमंत्री घरकुल योजना, प्रधानमंत्री गुरुकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्या बँके कडून कर्ज घेतले आहे. त्या बँकेशी तुम्ही संपर्क करून योगणेचा लाभ घेऊ शकता.
- होम लोण घेतलेल्या संस्थेशी तुम्ही सबसिडी विषयी चर्चा करा.
- जर तुम्ही पात्र असल्यास आपला अर्ज प्रथम केंद्रीय नोडल एजन्सीकडे पाठविला जाईल.
- जर तुमचा अर्ज मंजूर झाल्यास एजन्सी सबसिडीची रक्कम बँकेला देईल.
- नंतर ती रक्कम तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होईल.
- जर तुमची वार्षिक उत्पन्न सात लाख आहे आणि लोन ची रक्कम 9 लाख आहे तर तुम्हाला सबसिडी ची रक्कम 2.35 लाख रुपये भेटेल.
हे ही वाचा
घरकुल योजना कागदपत्रे
पगारदार वर्गासाठी
आयडेनटिटी प्रूफ
- पॅन कार्ड आवश्यक आहे
- वोटर आयडी, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लाइसेंस, फोटो आयडी कार्ड, एखाद्या मान्यता प्राप्त प्राधिकरणाकडून किंवा लोक सेवेकडील छायाचित्र असलेले कोणतेही पत्र.
अॅड्रेस प्रूफ
- वोटर कार्ड
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- जीवन विमा पॉलिसी
- रेसिडेंट अॅड्रेस सर्टिफिकेट
- स्टंप पेपर वरती रेंट अॅग्रीमेंट
- बँक पासबूक वरती असलेला पत्ता
इन्कम प्रूफ
- लास्ट 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- ITR फाइल केलेली पावती
- लास्ट 2 महीन्याची सॅलरी स्लिप
प्रॉपर्टि प्रूफ
- विक्री करार
- विक्री / खरेदी करार
- मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र
- पेमेंट पावती
पगार नसलेल्यांसाठी
आयडेनटिटी प्रूफ
- पॅन कार्ड आवश्यक आहे
- वोटर आयडी, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लाइसेंस, फोटो आयडी कार्ड, एखाद्या मान्यता प्राप्त प्राधिकरणाकडून किंवा लोक सेवेकडील छायाचित्र असलेले कोणतेही पत्र.
अॅड्रेस प्रूफ
- वोटर आयडी
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- यूटिलिटि बिल्ल ची कॉपी ज्यामध्ये टेलीफोन बिल, गॅस बिल, लाइट बिल. लास्ट 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
- पोस्ट ऑफिसमधील सेव्हिंग खात्यावर पत्ता
- जीवन विमा पॉलिसी
- रेसिडेंट अॅड्रेस सर्टिफिकेट
- स्टंप पेपर वरती रेंट अॅग्रीमेंट
- बँक पासबूक वरती अॅड्रेस
हे ही वाचा