कन्फ्यूशियस संस्था काय आहे? चीनच्या 59 अप्प बंध केल्यानंतर भारत सरकारने 29 जुलै 2020 ला शिक्षण मंत्रालयने एक पत्र पाठीवले की कन्फ्यूशियस संस्था विषयी माहिती आणि कन्फ्यूशियस संस्थाच्या अॅक्टिविटी बधल जाणून घेण्याविषयी, तसेच शिक्षण मंत्रालयने हे ही सांगण्यात आले की हा एक उच्च शिक्षनाचा रिव्यूचा एक पार्ट आहे. यावेळी चीनी दूतावासाकडून दोन्ही देशांमधील संबध चांगले राहण्यासाठी निपक्ष रिव्यू करण्याचे सांगण्यात आले.
अलिकडच्या आठवड्यांत जगभरातील कन्फ्यूशियस संस्थाच्या गोंधळामुळे त्या बंद करण्यात आले आहेत. आणि ऑस्ट्रेलियामध्ये विद्यापीठे आणि संस्था यांच्यात झालेल्या करारामुळे परदेशीविरोधी हस्तक्षेप कायदा मोडला आहे की नाही याची तपासणीही सुरू आहे. आज आपण या लेखामध्ये कन्फ्यूशियस संस्था काय आहे?, कन्फ्यूशियस संस्था कशी काम करते? आणि कन्फ्यूशियस संस्थाचा इतिहास याची डीटेल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
कन्फ्यूशियस संस्था काय आहे?
कन्फ्यूशियस संस्था ही चाइणा यूनिवर्सिटी आणि अन्य देशामधील यूनिवर्सिटी आणि संस्था यांमधील एक भागीदारी आहे. याची सुरवात “चीनी भाषा आणि संस्कृतीला चालना देणे, आंतरराष्ट्रीय चीनी अध्यापन आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करणे” हे आहे.
कन्फ्यूशियस संस्थाची सुरवात 2004 मध्ये केली होती आणि याची देखरेख हानबान (अधिकृतपणे चीनी भाषा परिषद आंतरराष्ट्रीय कार्यालय) यांच्या ध्वारे केली जात होती. एक अंदाज व्यक्त केला जातो की 2019 पर्यात्न जगामध्ये 530 कन्फ्यूशियस संस्थाची स्थापना झाली असावी.
कन्फ्यूशियस संस्था कशी काम करते?
कन्फ्यूशियस संस्था काय आहे? कन्फ्यूशियस संस्थाला चीनी सरकार कडून पैसे पुरवले जातात आणि हे लोक या पैशाच्या आधारे जगभरातील कॉलेज आणि यूनिवर्सिटी मध्ये चीनी भाषा आणि संस्कृती शिकवण्याचे बोलणे करतात. यासाठी चिनी शिक्षण मंत्रालयाकडून त्यांना पैसे भेटतात. सुरवातीला कन्फ्यूशियस संस्थाची तुलना विदेशी संस्थाबरोबर केली जात होती जसे की ब्रिटीश कौन्सिल, अलायन्स फ्रॅंचायझी ईत्यादी. पण नंतर लोकांना समजू लागले की चीन मधून आलेल्या या संस्थांचा हेतू फक्त भाषा आणि संस्कृतीबद्दल बोलणे आणि सांगणे एवढेच नाही तर तरुणांना त्यांच्या प्रभावाखाली आणणे हा हेतु आहे.
कन्फ्यूशियस संस्थाचा इतिहास
विकिपीडिया नुसार, जून 2004 मध्ये उझबेकिस्तानच्या ताशकंद येथे पायलट संस्था स्थापन केल्यानंतर,पहिली कन्फ्यूशियस संस्था ही 21 नोव्हेंबर 2004 साली सोल साऊथ कोरिया मध्ये सुरवात झाली. ही संस्था चायनीज लोक जास्त दिवस चालवू शकले नाहीत. त्यानंतर दुसरी कन्फ्यूशियस संस्था यूनिवर्सिटी ऑफ मेरीलॅंड, कॉलेज पार्क ही नोवेंबर 2004 मध्ये सुरू करण्यात आली.
हानबान ने आतापर्यात्न 550 सीआयएस आणि 1172 कन्फ्यूशियस क्लासरूमची 162 देशमध्ये स्थापना केली. यामध्ये यूनायटेड स्टेट्स, जपान, आणि साऊथ कोरिया एत्यादी देशांचा समावेश आहे
एप्रिल 2007 जपान मध्ये पहिली रिसर्च वर आधारित कन्फ्यूशियस संस्था ही वेसेडा यूनिवर्सिटी, पेकिंग यूनिवर्सिटीच्या भागीदारीमध्ये सुरू करण्यात आली.
हानबान वेबसाइट नुसार भारतामध्ये 3 यूनिवर्सिटी आहेत, यूनिवर्सिटी ऑफ मुंबई, वेल्लोर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि लोवेली प्रॉफेश्नल यूनिवर्सिटी. तसेच तीन CCs स्कूल ऑफ चायनिज लॅंगवेज कोलकता, भरथियर यूनिवर्सिटी आणि के.आर.मंगलम यूनिवर्सिटी.