बिटकॉइन काय आहे? बिटकॉइन आज खूप पॉप्युलर होत आहे एक वेळ अशी होती बिटकॉइनची किमत खूप कमी होती. आणि लोक बिटकॉइन मध्ये पैसा इन्वेस्ट करू शकत नव्हते पण आज जो कोणी बिटकॉइन खरेदी साठी मागे लागला आहे. पण हे बिटकॉइन कसे खरेदी किवा विक्री करायचे, बिटकॉइन कसे काम करतो. याला कुठे स्टोर केले जाते, याचे आपल्याला फायदे किवा तोटे काय आहेत, या बदल माहिती करून घेणार आहोत.
बिटकॉइन काय आहे?
बिटकॉइन ही एक डिजिटल करंसी आहे त्याला सरळ भाषामध्ये इंटरनेट करंसी असेही म्हटले जाते. बिटकॉइनला आपण आपल्या घरी किवा वॉलेट मध्ये ठेहू नाही, शकत कारण की ही एक नोट किवा कोईन नाही. बिटकॉइनचा आपण फक्त ऑनलाइन वापर करू शकतो. बिटकॉइन एक विकेंद्रित करंसी आहे, मंजे ह्या करंसीला कंट्रोल करण्यासाठी कोणती अथॉरिटी, गवर्नमेंट किवा बँक नाही.
ही करंसी पीयर To पीयर नेटवर्क वर काम करते, मंजे लोक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किवा बँक यांच्या माध्यमातून सरळ ट्रांजिशन करू शकतात. बिटकॉइनचा आविष्कार संतोषी नाकामोतो ने 2009 मध्ये केला होता. आणि तेव्हा पासून लोक खूप प्रमाणात बिटकॉइनचा उपयोग करत आहेत.
सध्या बिटकॉइनची किमत किती आहे?
आपण बिटकॉइन काय आहे? याविषयी माहिती करून घेतली, पण तुम्हाला एक बिटकॉइनची किमत काय आहे हे माहिती आहे का? आज (जून 2020) एका बित्कोईन ची किमत 7,22,107 इंडियन रूपीस आहे. ही प्राइस फिक्स नाही यामध्ये चेंजेस होत राहतात यासाठी तुम्ही गूगल मध्ये डायरेक्ट बित्कोईन करेंट प्राइस सर्च करू शकता.
असे नाही की जर तुम्ही बिटकॉइन विकत घेत असाल तर 1 बिटकॉइन विकत घावे लागेल. तुम्ही बिटकॉइनची एक संतोषी विकत घेहू शकता 1 बिटकॉइन =10,00,00,000 (कोटी) संतोषी होते जसे की इंडियन करंसी मध्ये 1 रुपये = 100 पैसे , तसेच 10 कोटी संतोषी मिळून 1 बिटकॉइन तेयार होते.
बिटकॉइन वॉलेट काय आहे ?
आपण बिटकॉइनला घरी किवा वॉलेट मध्ये स्टोर करू शकत नाही. यासाठी आपल्याला स्टोर करण्यासाठी बिटकॉइन वॉलेटची गरज आहे. इंटरनेट वर खूप सारे अॅप्लिकेशन, सॉफ्टवेअर आणि क्लाऊड बेस्ड वॉलेट आहेत यामध्ये आपण अकाऊंट बनवून बिटकॉइन स्टोर करू शकतो.
बिटकॉइन वॉलेट कसे काम करते ?
सगळ्यात अगोदर आपल्याला एक उनिक अॅड्रेस उपलब्ध होतो. समझा आपण बिटकॉइन विकत घेतले आहे तर ते मागवण्यासाठी उनिक अॅड्रेस ची गरज पडते. अशामध्ये आपण बिटकॉइनला आपल्या वॉलेट मध्ये स्टोर करू शकतो. जसे की आपण बिटकॉइनला विकून काही पैसे कमावले असतील तर या पैसे बँक मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी बिटकॉइन वॉलेटची गरज पडते.
बिटकॉइन कुठून आणि कसे विकत घ्यायचे?
बिटकॉइन विकत विकत घेणे किवा विकणे ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही ऑनलाइन पैसे पेमेंट केले असेल हे कोणत्याही वेबसाइट किवा अॅप्लिकेशन वरुण, तर तुम्ही इझिली बिटकॉइन खरेदी किवा विक्री करू शकता, यासाठी तुम्हाला वेबसाइट किवा मोबाइल चा उपयोग करवा लागेल.
इंडिया मध्ये दोन खूप पॉप्युलर कंपनी आहेत ज्यामधे आपण बित्कोईन खरेदी किवा विक्री करू शकता Zebpay.com आणि unocoin.com.
वेबसाइट वर साइन उप करण्यासाठी डॉक्युमेंट
- वोटर आयडी कार्ड
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- फोन नंबर
- बँक अकाऊंट डिटेल्स
बिटकॉइन चे फायदे
- बिटकॉइन लेणदेन करण्यासाठी खूप कमी फी लागते.
- बिटकॉइनला आपण जगामध्ये कुठेही खरेदी किवा विक्री करू शकतो.
- तुम्ही यामध्ये लॉन्गटर्म इनवेस्तमेंट करू शकता.
- बिटकॉइन मध्ये गवर्नमेंट तुमच्यावर नजर ठेहू शकत नाही.
- बिटकॉइन अकाऊंट ब्लॉक होत नाही जसे की डेबिट कार्ड किवा क्रेडिट कार्ड बँक काही कारणास्तव ब्लॉक करू शकते.
बिटकॉइन चे तोटे
- याला कंट्रोल करण्यासाठी बँक, गवर्नमेंट किवा कंट्रोल अथॉरिटी नाही त्यामुळे याची किमत कमी जास्त होत राहते.
- जर तुमचे बिटकॉइन अकाऊंट हॅक केले जाते, तेव्हा तुमचे सगळे बिटकॉइन जाऊ शकतात आणि गवर्नमेंट तुमची काहीच मदत करू शकत नाही.