फ्लॅट किवा जागा खरेदी करताना कोणती डॉक्युमेंट पाहणे गरजेचे आहे, आपली सगळी कमाई आपण फ्लॅट किवा जागा विकत घेण्यासाठी लावतो आणि नंतर आपल्याला समजते की आपण जी जागा विकत घेतली आहे, त्यामध्ये काहीतरी घडबड आहे. आणि आपल्याला 15-20 वर्ष कोर्ट कचेरी, त्रास यामध्ये वेळ घालवावा लागतो.
त्यासाठी कोणतेही जागा विकत घेत असताना आपल्याला त्या जागेची सर्व डॉक्युमेंट पाहणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात त्रास होणार नाही.
खाली आपण कोणतेही फ्लॅट किवा जागा खरेदी करताना कोणती डॉक्युमेंट पाहणे गरजेचे आहे हे विस्तारपणे संगितले आहे.
फ्लॅट किवा जागा खरेदी करताना कोणती डॉक्युमेंट पाहणे गरजेचे आहे.
फ्लॅट किवा जागा खरेदी करताना कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, ह्यामध्ये आपण 10 अशी डॉक्युमेंट सांगितली आहेत, ती डॉक्युमेंट तुम्ही पाहणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्रास होणार नाही.
1. टाइटल डॉक्युमेंट (Sale Deed, Gift Deed )
टाइटल डॉक्युमेंट हे आपल्याला प्रॉपर्टी बद्धल माहिती देते, जसे की या प्रॉपर्टीचा मालक, तसेच जो प्रॉपर्टी विकणारा आहे त्याला प्रॉपर्टी विकण्याचा अधिकार आहे का नाही हे आपल्याला समजते. टाइटल डॉक्युमेंट मध्ये आपल्याला प्रॉपर्टी बद्धल सगळी माहिती मिळते.
टायटल डॉक्युमेंट हा एक औपचारिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये मालमत्तेचा वारसा, मालकी, हस्तांतरित किंवा प्राधिकरणाद्वारे वाटप कसे केले आहे हे परिभाषित केले जाते. एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किती जमीन आहे किंवा जमिनीवर व्यक्तीचा अधिकार आहे याची माहिती त्यात समाविष्ट असते. एका व्यक्तीचे जमिनीचे मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीला टायटल डीडद्वारे हस्तांतरित केले जातात.
टिप्स:
- टाइटल डॉक्युमेंट हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे.
- तुमच्याजवळ प्रॉपर्टी कशी आली हे टाइटल डॉक्युमेंट ध्वारे समजते.
- एग्रीमेंट टु sale deed ने प्रॉपर्टी ट्रान्सफर होत नाही, प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला टाइटल डॉक्युमेंट (Sale Deed) असणे आवश्यक आहे.
2. चॅनल डॉक्युमेंट
एखाद्या व्यक्तीला मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी चॅनेलच्या कागदपत्रांमधून जावे लागते. जर एखादी मालमत्ता अनेक वेळा विकली गेली असेल, तर त्याचे तपशील चॅनल दस्तऐवजांतून पाहिले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, त्याला ते मृत्युपत्राद्वारे मिळाले आहे की नाही, ते त्यांच्या नावाखाली नोंदणीकृत आहे की नाही.
3. भार प्रमाणपत्र (Encumbrance Certificate)
Encumbrance सर्टिफिकेट हे आपल्याला प्रॉपर्टी वरती कोणते लोन आहे का नाही याबादधल आपल्याला माहिती देते. तसेच ही प्रोपेरटी कोर्ट ने अटॅच केलेली आहे का नाही ते आपल्याला Encumbrance सर्टिफिकेट मधून समजते.
प्रोपेरटी वरती कोणते टॅक्स, पेनॉल्टी भरायचे बाकी आहेत का नाही हे आपल्याला Encumbrance सर्टिफिकेट ध्वारे समजते.
4. Occupancy सर्टिफिकेट
Occupancy सर्टिफिकेट हे आपल्याला डेवलपर कडून कोणती प्रोपेरटी विकत घेत असाल तर पाहणे घरजेचे आहे. Occupancy सर्टिफिकेट हे आपण UID किवा स्थानिक सरकारकडून प्राप्त करू शकतो.
बांधलेली इमारत मंजूर आराखड्यानुसार आहे की नाही याची माहिती Occupancy सर्टिफिकेट ध्वारे मिळते.
5. Possession लेटर (अलॉटमेंट लेटर)
जेव्हा शासनाचे सर्व नियम आणि नियमांचे पालन केले जाते तेव्हा Possession लेटर दिले जाते. हे लेटर बिल्डरच्या नावावर असते.
6. टॅक्स रीसीप्ट
स्थानिक नगरपालिका प्रत्येक जमिनीवर जमीन कर लावते. प्रोपेरटी विकत घेत असताना आपल्याला हे सर्व कर भरले आहेत का नाहीत ह्याची खात्री करून घ्यावी लागते. तसे न झाल्यास आपल्याला ते कर भरावे लागतील.
7. कार अलॉटमेंट लेटर
जेव्हा तुम्ही फ्लॅट विकत घेता त्यावेळी हे लेटर पाहणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत पार्किंग ही मोठी समस्या आहे. हे पत्र तुम्हाला तुमच्या मालमत्तेजवळ कार पार्किंगसाठी जागा देण्याचे आश्वासन देते. जर तुमच्याकडे हे पत्र नसेल तर भविष्यात तुम्हाला पार्किंगची समस्या येऊ शकते.
8. No objection सर्टिफिकेट
मालमत्तेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र हे प्राधिकरण, बँकेने किंवा मालमत्तेशी संबंधित मंजुरी दर्शविणाऱ्या व्यक्तीद्वारे जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे.
मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये कोणतेही कायदेशीर अडथळे नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी कोणत्याही प्राधिकरण, संस्था किंवा व्यक्तीद्वारे एनओसी दिली जाते.
म्हणून, मालमत्तेची मालकी खरेदी करताना, भाड्याने देताना किंवा हस्तांतरित करताना, एनओसी हे महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनते.
9. Mutation लेटर
Mutation म्हणजे विद्यमान मालकाकडून नवीन मालकाकडे मालमत्तेच्या मालकीचे हस्तांतरण होय. Mutation latter हे कायदेशीर दस्तऐवज नसले तरी, भविष्यात तुम्हाला तुमची मालमत्ता विकायची किंवा हस्तांतरित करायची असेल तेव्हा ते आवश्यक आहे.
मालमत्तेचे उत्परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत मालमत्तेचे शीर्षक नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरित झाल्यानंतर स्थानिक नगरपालिका रेकॉर्डमध्ये बदलले जाते.
10 कन्वर्शन सर्टिफिकेट
दोण टाइप च्या प्रोपेरटी असतात एक अॅग्रिकल्चरल लँड आणि दुसरी नोन अॅग्रिकल्चरल लँड. तुम्हाला प्रॉपर्टि विकताना अॅग्रिकल्चरल लँड असलेली प्रॉपर्टि नोन अॅग्रिकल्चरल लँड आहे म्हणून विकली जाऊ शकते. व नंतर तुम्हाला नोन अॅग्रिकल्चरल लँड मध्ये कन्वर्ट करताना जास्त पैसे देऊन कन्वर्ट करावी लागू शकते.