झोपताना कोणत्या कुशीवर झोपावे | रात्री झोपताना कोणत्या कुशीवर झोपावे | Zopatana konatya kusheevar zopave

झोपताना कोणत्या कुशीवर झोपावे (Zopatana konatya kusheevar zopave), दररोज आपण काम करून थकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने नियमितपणे पुरेशी झोप घेतली पाहिजे. दररोज योग्य पद्धतीने पुरेशी झोप घेतल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते आणि मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहते.

परंतु झोपताना कसे झोपावे आणि कोणत्या स्थितीत झोपावे आणि झोपण्याचे फायदे काय आहेत हे बहुतेक लोकांना माहिती नसते. खरे तर अनेक वर्षापासून आपल्या वडिलांनी सांगितले आहे की जेवल्यानंतर डाव्या बाजूला झोपावे. डाव्या बाजूला झोपल्याने पोटाचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारते. अनेकवेळा तुम्ही चुकीच्या स्थितीत झोपल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

चला जाणून घेऊया चांगल्या आरोग्यासाठी आपण झोपताना कोणत्या कुशीवर झोपावे (Zopatana konatya kusheevar zopave) आणि त्या कुशीवर झोपल्याने आपल्याला त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत.

Zopatana konatya kusheevar zopave

झोपताना कोणत्या कुशीवर झोपावे (Zopatana konatya kusheevar zopave)

आपण रात्री कोणत्या कुशीवर झोपतो, त्याचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर होत असतो. रात्री झोपताना आपण वेगवेगळ्या बाजूने झोपत असतो ते म्हणजे पाठीवर, पोटावर, डाव्या अंगावर आणि उजव्या अंगावर, योग्य कुशीवर झोपल्याने ह्याचे आपल्यासाठी फायदे आहेत, व आपण अयोग्य कुशीवर झोपल्याने आपल्या आरोग्यासाठी तोटेही आहेत.

संशोधांनामध्ये असे सिद्ध झाले आहे की तुम्ही डाव्या बाजूला चेहरा करून झोपला तर त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल. व डाव्या बाजूला चेहरा करून झोपल्याने आपल्याला सांधेदुखी, पाठदुखी ह्या आजारांचा त्रास कमी होतो.

आपण एका कुशीवर झोपल्याने काय फायदे होतात हे पहिले पण त्यामध्ये आपण डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या हृदयावर दबाव कमी जाणवतो, आपली पचन क्रिया सुररीत चालते आणि आपल्याला पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुररीत चालण्यास मदत होते.

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे (Benefits of sleeping on the left side in Marathi)

जसे की आपण वरती पहिले की झोपताना आपण डाव्या कुशीवर झोपले पाहिजे, आता आपण डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्यासाठी फायदे काय आहेत हे माहिती करून घेणार आहोत.

  1. डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या हृदयावर दबाव कमी पडतो, आणि ते अधिक चांगले कार्य करू लागते. त्यामुळे आपण निरोगी राहतो.
  2. रक्ताबरोबरच ऑक्सिजनचा प्रवाह शरीराच्या विविध भागांमध्ये आणि मेंदूला योग्य प्रकारे होतो आणि शरीराचे सर्व अवयव निरोगी राहतात आणि चांगले कार्य करतात.
  3. गर्भवती महिलांनी डाव्या कुशीवर झोपल्याने त्यांच्या जन्मलेल्या बाळाच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. शिवाय टाच, हात आणि पाय ह्यांची सूज येण्याची समस्या जाणवत नाही.
  4. डाव्या बाजूला झोपल्याने आपल्या शरीरात रक्कताचा पुरवठा सुररीत चालतो, व आपल्याला चांगली झोप येण्यास मदत होते.
  5. आपल्याला थकवा आणि पोटाच्या समस्या गॅस येणे आणि अॅसिडिटी येणे ह्या कमी होतात.
  6. झोपताना आपण खालेले अंग चांगले पचते आणि आपल्या पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव पडत नाही.
  7. डाव्या बाजूला झोपल्याने शरीरात साचलेली विषारी द्रव्ये लिम्फॅटिक सिस्टिमद्वारे बाहेर पडतात.
  8. पोटात अनेकदा बद्धकोष्ठता असेल तर डाव्या बाजूला झोपल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात अगदी आरामात पोहोचते आणि सकाळी पोट साफ करणे सोपे होते.
  9.  डाव्या बाजूला झोपल्याने पोटातील ऍसिड वरच्या ऐवजी खालच्या दिशेने जाते, ज्यामुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होत नाही. काही वेळा नीट झोप न लागल्यामुळे अॅसिडिटी सारखी समस्याही उद्भवते.

डाव्या कुशीवर झोपण्याचे तोटे (Disadvantages of sleeping on the left side in Marathi)

झोपण्यासाठी आपल्याला डाव्या कुशीवर झोपणे चांगले असे आपल्याला सांगण्यात आले आणि आपण त्याचे फायदे काय आहेत हे ही, वरच्या लेखात बगितले. आता आपल्याला ह्याचे तोटे काय आहेत हयाविषयी माहिती करून घेणार आहोत.

उजवीकडे किंवा डाव्या बाजूला झोपणे केवळ फायदेशीर नाही तर अनेकांना हानीही पोहोचवू शकते. वास्तविक उजव्या बाजूला झोपल्याने तुमच्या पोटाच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि ते पचनसंस्थेसाठीही फायदेशीर मानले जात नाही. याशिवाय उजव्या बाजूला झोपल्याने खांदेदुखी आणि मानेच्या समस्याही होऊ शकतात.

हे ही वाचा 

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *