महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2023 (Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana), केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात, जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्र सुलभ होऊन त्यांचे उत्पन्न वाढू शकेल. परंतु महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली जात आहे, ज्याला मुख्यमंत्री किसान योजना असे नाव देण्यात आले आहे.
ह्या लेखात आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2023 (Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana) ह्या योजने बदल डीटेल मध्ये माहिती करून घेणार आहोत. जसे की याची घोषणा कधी करण्यात आली, ह्याचे फायदे काय आहेत, ह्याचा लाभ कसा घ्यायचा, एत्यादी.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2023 (Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana 2023)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री माननीय श्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र किसान सन्मान निधी योजना 2023 सुरू करण्याची घोषणा केली असून, या योजनेद्वारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना दरवर्षी 6 हजार रुपये प्रमाणे अनुदान म्हणून दिले जाईल.
याशिवाय येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना राबविण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असून, या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, या दृष्टिकोनातून ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सध्या देशभरात जारी करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना याअंतर्गत वर्षभरात टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम दिली 6000 रुपये दिली जाईल, ही रक्कम शासनाकडून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर पाठवली जाईल.
योजनेचे नाव | महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2023 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री माननीय श्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी |
संबंधित विभाग | कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचे शेतकरी |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील शेतकर्यांना आर्थिक मदत देणे |
आर्थिक मदत | 6000 रुपये प्रती वर्ष |
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ह्याची फक्त 2023-2024 च्या अर्थ संकल्पात घोषणा करण्यात आली आहे. ही योजना अद्याप लागू झालेली नाही. त्यामुळे ह्या योजनेचा लाभ कोणते शेतकरी घेऊ शकतात आणि कोणते नाही हे अध्याप स्पस्ट झाले नाही.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ह्याचे फायदे
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी ह्यांना प्रती वर्ष 6000 रुपये म्हणून आर्थिक सहाय्यता भेटेल.
भारत सरकार ध्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत 6000 रुपये शेतकर्यांना दिले जातात, त्यामुळे दोन्ही योजनेचे मिळून शेतकर्यांना 12000 रुपये आर्थिक मदत बेटेल.
FAQ: महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना काय आहे ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ही महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे, जी महाराष्ट्रातील शेतकर्यांना प्रती वर्ष 6000 रुपये आर्थिक सहाय्यता म्हणून त्यांना देण्यात येईल.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ह्याची फक्त घोषणा करण्यात आली आहे, ही योजना अद्याप लागू करण्यात आली नाही.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत किती रुपये दिले जातील ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान ह्या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्यांना प्रती वर्षे 6000 रुपये तीन टप्प्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या बँक अकाऊंट मध्ये दिले जातील.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेसाठी दुसर्या राज्यातील शेतकरी लाभ घेऊ शकतात का ?
नाही, तुमची जमीन महाराष्ट्र राज्यात येत असल्यास दुसर्या राज्यातील शेतकरी ह्याचा लाभ घेऊ शकतात, पण हे अध्याप स्पस्ट झाले नये.
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागटपत्रे लागतात ?
ह्या योजनेची फक्त घोषणा करण्यात आली आहे, ही अजून लागू करण्यात आली नाही, त्यामुळे कोणती कागदपत्रे लागतात हे स्पस्तपणे सांगता येत नाही.
मुख्यमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून किती रक्कम मिळणार आहे ?
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्यांना 6000 रुपये म्हणून मिळणार आहेत, आणि ही रक्कम त्यांना 3 टप्प्यात दिली जाईल.
हे ही वाचा