7/12 Utara in Marathi Online, ऑनलाइन सातबारा उतारा महाराष्ट्र, ऑनलाइन सातबारा बघणे, सात बाराचा उतारा, Mahabhumi Abhilekh, mahabhumi.gov.in 7/12, 7/12 utara in marathi online kolhapur:
“7/12 Utara” ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जमीन रेकॉर्ड आहे. याला “सातबारा उतारा” असेही म्हणतात आणि त्याची देखभाल राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून केली जाते. या नोंदीमध्ये जमिनीची मालकी, जमिनीचा वापर आणि इतर संबंधित माहितीचे महत्त्वाचे तपशील आहेत.
7/12 उतारा दस्तऐवज हा महाराष्ट्रातील जमीनमालकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो, कारण तो मालकीचा पुरावा म्हणून काम करतो आणि त्यात मालकाचे नाव, सर्वेक्षण क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, जमिनीवर उगवलेले पीक, यासारखी महत्त्वाची माहिती असते.
तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनच्या आगमनाने, महाराष्ट्र सरकारने 7/12 उतारा रेकॉर्ड सुलभ प्रवेश आणि सोयीसाठी ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. याचा अर्थ असा की जमीनमालक आता सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट न देता त्यांच्या जमिनीच्या नोंदी इंटरनेट कनेक्शनसह कुठूनही मिळवू शकतात. ऑनलाइन 7/12 उतारा प्रणालीने जमिनीच्या नोंदी मिळविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवली आहे आणि फसवणूक किंवा छेडछाड होण्याची शक्यता कमी केली आहे.
7/12 Utara in Marathi Online | ऑनलाइन सातबारा उतारा महाराष्ट्र
7/12 उतारा किंवा सातबारा उतारा हा जमिनीच्या नोंदीतील उतारा आहे, जो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो ज्यामध्ये विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. महाभूलेख ह्या वेबसाइट वरती आपल्याला ऑनलाइन 7/12 उपलब्ध आहे.
जेव्हा आपण एखादा प्लॉट खरेदीसाठी जातो, त्यावेळी त्या प्लॉटचे निरीक्षण करण्यासाठी जसे की रोल, इम्पॉर्टेन्स, लीगल स्टेटस, एत्यादी त्यावेळी 7/12 उतार्याची आपल्याला गरज पडते.
Bhulekh.Mahabhumi or Bhumi Abhilekh 7 12 Utara in Marathi Online
Bhulekh.Mahabhumi or Bhumi Abhilekh ही लँडची रेकॉर्ड असलेली महाराष्ट्राची वेबसाइट आहे, त्यामध्ये तुम्हाला 7/12 उतारा, 8 अ उतारा आणि मालमत्ता पत्रक हे मिळते.
महाभूलेख 7/12 हे राज्यातील जमिनीची कागदपत्रे शोधणे, डाउनलोड करणे आणि काढणे यासाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म आहे. 7/12 आणि 8A कागदपत्रे ही भूतकाळातील मालकी आणि जमिनीवरील विवादांची पडताळणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
7/12 महाभुलेखात दिसल्याप्रमाणे ऑनलाईन उतारा महसूल विभागाकडून तहसीलदारांमार्फत जारी केला जातो. महाभूलेख 7/12 गावाचा फॉर्म क्रमांक दाखवतो. इतर सर्व अधिकारांच्या नोंदीप्रमाणे, महाभुलेख 7/12 मधील ऑनलाइन 7/12 उतारामध्ये सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, मालक, जमिनीतील त्यांचा वाटा, जमिनीवरील बोजा इ. यासह जमिनीची महत्त्वपूर्ण माहिती आहे.
ऑनलाइन सातबारा उतारा (Online 7/12 Uttara Marathi)
वरती आपण ऑनलाइन 7/12 उतारा काय आहे हयाविषयी माहिती करून घेतली, आता आपण ऑनलाइन 7/12 उतारा कसा काढायचा हयाविषयी माहिती करून घेणार आहोत.
स्टेप 1 : ऑनलाइन 7/12 उतारा डाऊनलोड करण्यासाठी “https://bhulekh.mahabhumi.gov.in/“ ह्या वेबसाइटला विजिट द्या. तुमच्या पुढे ही विंडो ओपेन होईल, त्यामध्ये आपला विभाग निवडून गो वरती क्लिक करा.
जर आपण कोणत्या विभागात येतो हे आपल्याला माहीत नसेल तर तुम्हाला खाली विभाग सिलेक्ट केल्यानंतर खाली त्या विभागातील जिल्हे आपल्याला दिसतात, त्यानुसार तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येता त्यावरून विभाग निवडा.
स्टेप 2: आपल्या विभागाची निवड केल्यानंतर तुमच्या पुढे तीन ऑप्शन येतील एक 7/12, दूसरा ८ अ आणि मालमत्ता पत्रक आपण ऑनलाइन ७/१२ काडण्याचा विचार करत असाल तर त्याच्यावरती क्लिक करा.
त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जिल्हा, तालुका, गाव ह्याची अचूक निवड करा.
स्टेप 3: दिलेली माहितीची निवड केल्यानंतर आपल्याला सुर्वे नंबर/ गट नंबर माहीत असल्यावर त्यानुसार तुम्ही 7/12 शोधू शकता किवा नावावरून 7/12 शोधू शकता.
ह्या काही सिम्पल स्टेप्स आहेत ज्या तुम्हाला ऑनलाइन 7/12 शोधण्यास मदत करतील.
महाभूलेख ऑनलाइन सेवा
आपण महाभूलेख वेबसाइटला भेट दिल्यानंतर आपल्याला अनेक सेवा भेटतात जसे
1. ई नकाशे बद्दल माहिती
2. ऑनलाइन जमीन रेकॉर्ड
3. महाभूलेख अॅप्लिकेशन
4. ऑनलाइन 7/12
5. ऑनलाइन 8 अ
6. मालमत्ता पत्रक
7. प्रॉपर्टि कार्ड
8. Digitally Signed 7/12
9. डिजिटल नोटिस बोर्ड
हे ही वाचा