FASTAG Information in Marathi | FASTAG म्हणजे काय?
FASTAG Information in Marathi, FASTAG हे इलेक्ट्रॉनिक टोल कनेक्शनचे तंत्रज्ञान आहे. वास्तविक, राष्ट्रीय महामार्गावरून वाहन चालवण्यासाठी सरकार टोल टॅक्स आकारते व टोल टॅक्स वसूल करण्यासाठी सरकारने टोल नाके बसवले आहेत. सुरवातीला लोक टोल प्लाझा वरती कॅश ने पेमेंट करत होते त्यामुळे आपला टाइम आणि मोठ्या रांगा लागत होत्या, ह्या रांगा कमी करण्यासाठी सरकारने FASTAG सुविधा चालू केली.
FASTAG हा एक RFID निष्क्रिय टॅग आहे जो थेट प्रीपेड किंवा बचत/चालू खात्याशी जोडलेल्या ग्राहकांकडून टोल पेमेंट करण्यासाठी वापरला जातो. हे वाहण्याच्या समोरच्या काचेवरती लावलेले असते व आपण टोल प्लाझा वरती गेल्यावर ऑटोमॅटिक डेटेक्ट होऊन आपल्या अकाऊंट वरुण पेमेंट कटते आणि आपणास पुढे जाण्यास संधी देते.
प्रत्येक 4 चाकी वाहन चालकाला त्याच्या वाहनाच्या समोरच्या काचेवरती FASTAG लावणे बंधनकारक आहे, हा FASTAG मिळविण्यासाठी, त्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तो त्यांच्या वाहनासाठी जारी केला जातो. यासह, त्यांना टोल प्लाझावर रोख पैसे द्यावे लागणार नाहीत, ऑनलाइन ऑटोमॅटिक आपल्या अकाऊंट वरुण पेमेंट होईल.
FASTAG लावण्याचे फायदे
1. टाइम आणि मोठ्या रांगा लागणार नाहीत.
FASTAG सुविधा सुरू केल्याने टोल प्लाझा वरती गांडांच्या मोठ्या रांगा लागणे कमी झाले आहे आणि लोकांचा टाइम बचत होत आहे.
2. पेट्रोल आणि डिझेल ची बचत
FASTAG लावल्याने आपला टाइम वाचल्याने आपले पेट्रोल आणि डिझेल ची बचत वाढत आहे.
3. प्रदूषण कमी होईल.
पेट्रोल आणि डिझेल ची बचत झाल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
4. कॅशबॅक सुविधा
सुरवातीला 2016-17 मध्ये ह्याचा वापर करणार्या सर्वांना 10% कॅशबॅक ऑफर केला जात होता. त्यानंतर 2017-18 च्या दरम्यान 7.5%, 2018-19 मध्ये 5% आणि 20189-20 मध्ये 2.5% करण्यात आला. हा कॅश बॅक 1 आठवड्यात आपल्या FASTAG अकाऊंट मध्ये जमा होत होता.
5. एसएमएस सुविधा उपलब्ध
आपण FASTAG लावालेले वाहन कोणत्याही टोल प्लाझा वरुण पास झाल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाइल वरती पेमेंट कट झाल्याचा एसएमएस येतो. ह्यामुळे आपल्याला आपल्या FASTAG अकाऊंट वरती किती रक्कम आहे ह्याची माहिती मिळते.
6. मासिक पास सुविधा
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने जी वाहने रोज ट्रॅवल करतात त्यांच्यासाठी मासिक पास सुविधा सुरू केली आहे, त्यामुळे आपल्याला एक टाइम पेमेंट केल्यावर नंतर एक महिना पेमेंट चेक करण्याची गरज नाही. मासिक पास मुळे आपली पैशाची बचत ही होते व त्याच बरोबर आपला टाइम ही वाचतो.
FASTAG काम कसे करते?
आपली गाडी टोल प्लाझा जवळ आल्यावर, टोल प्लाझा वरील लावलेले सेन्सॉर आपल्या गाडीवरील FASTAG ला ट्रक करतात. त्यानंतर FASTAG ला अटॅच असलेल्या अकाऊंट वरुण पैसे कट होतात. अशा पद्धतीने टोल प्लाझा वरती बिना थांबता आपण टोलचे पेमेंट करू शकतो.
तुमचे प्रीपेड खाते सक्रिय होताच हा वाहन-माउंट केलेला टॅग कार्य करण्यास सुरवात करेल. त्याच वेळी, जेव्हा तुमच्या FASTAG खात्याची रक्कम संपेल, तेव्हा तुम्हाला ते पुन्हा रिचार्ज करावे लागेल.
FASTAG चा उपयोग एका पेक्षा जास्त वाहनांणा करता येतो का?
FASTAG चा उपयोग एका पेक्षा जास्त वाहनांना करता येत नाही, तुम्हाला वेगळ्या वाहनांनासाठी वेगळे FASTAG कार्ड विकत घ्यावे लागते.
FASTAG कार्डचा रीचार्ज कसा करायचा?
आपले FASTAG कार्ड NHAI प्रीपेड वॉलेटशी जोडलेले असल्यास, ते चेकद्वारे किंवा UPI/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/NEFT/नेट बँकिंग इत्यादीद्वारे रिचार्ज केले जाऊ शकते.
बँक खाते FASTAG शी लिंक केल्यास थेट खात्यातून पैसे कापले जातात.
जर पेटीएम वॉलेट FASTAG शी लिंक केले असेल तर थेट वॉलेटमधून पैसे कापले जातात.
FASTAG कार्ड कोठून विकत घायचे?
FASTAG स्टिकर्स राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझा आणि 22 वेगवेगळ्या बँकांमधून खरेदी केले जाऊ शकतात. हे पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे. याशिवाय फिनो पेमेंट्स बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील FASTAG जारी करतात.
हे ही वाचा